निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 14/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/08/2011 कालावधी 05 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ध्रुपताबाई भ्र.जनार्धन राठोड. अर्जदार वय 27 वर्ष.धंदा. घरकाम. अड.अरुण डी.खापरे. रा.जोगी तांडा.ता.जिंतूर.जि.परभणी. विरुध्द 1 तालुका कृषी अधिकारी साहेब. गैरअर्जदार. तालुका कृषी अधिकारी कार्यालय,जिंतूर. प्रतिनिधी. ता.जिंतूर जि.परभणी. 2 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. भास्करायन, एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग. प्लॉट नं.7,सेक्टर ई-1, टाऊन सेंटर सिडको.औरंगाबाद. 3 व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.देडिया. 570, रेटी फायर हाउस,इन्दुरी जिन इलेक्ट्रीक. नायगम क्रॉस रोड, नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट, वडाळा वेस्ट,मुंबई. ------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.सौ.सुजाता जोशी.सदस्या. ) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई आजपर्यंत न देवुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार रा.जोगी तांडा ता.जिंतूर येथील रहिवासी असून तीचा पती मयत जनार्धन राठोड हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची गट क्रमांक 36/4/3 व 36/2/4 जोगी तांडा येथे शेतजमिन आहे. दिनांक 07/01/2009 रोजी त्याचा मोटार सायकल अपघातात मृत्यू झाला.घटनेची खबर जिंतूर पोलिस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा केला त्यानंतर सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह तारीख 04/09/2009 रोजी क्लेम दाखल केला. परंतू आज पर्यंत मंजूरीविना प्रकरण विमा कंपनीने रखडत ठेवले आहे. अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळावी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यतील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 23 कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचाची नोटीस स्विकारुनही नेमले तारखेस व त्यानंतर संधी देवुनही लेखी जबाब सादर न केल्याने त्यांचे विरुध्द तारीख 21/04/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्टामार्फत पाठवलेले लेखी म्हणणे प्रकरणात दिनांक 23.03.2011 रोजी नि. 9 ला समाविष्ट करण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी जबाब नि. 16 दिनांक 27.04.2011 रोजी सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी म्हणणे (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्यक ती पूर्तता करुन घेण्यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत जनार्धन राठोड याच्या डेथ क्लेमची कागदपत्रे त्याना तारीख 17/02/2010 रोजी मिळाले पॉलिसीची मुदत 15/08/2008 ते 14/08/2009 अखेर होती क्लेम कागदपत्रे पॉलिसीची मुदत संपल्यावर 90 दिवसांच्या आत मिळाली नव्हती ती 17/03/2010 रोजी मुदतीच्या बाहेर मिळाली ती विमा कंपनीकडे पाठविल्यावर त्याने तारीख 24/11/2010 चे पत्र पाठवुन 90 दिवसांपेक्षा उशिरा कागदपत्रे पाठविली असल्यामुळे फाईल बंद केली असल्याचे कळवले सबब त्याना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपल्या लेखी जबाबात ( नि.16) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन मयत जनार्धन राठोड याच्या शेतकरी विमा क्लेम संबंधी कोणतीही कागदपत्रे त्यांचेकडे आलेली नाहीत.त्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी असे सुरवातीला नमुद केले आहे.याउलट पुढे असाही खुलासा केला आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 कडून असे समजले आहे की, अर्जदाराने पॉलिसीची मुदत संपलयावर 90दिवसांच्या आत दाखल क्लेम दाखल केलेला नव्हता याबाबतीत अर्जदाराकडून पॉलिसीचे उल्लंघन झालेले असल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही. त्यामुळेच तारीख 24/11/2010 च्या पत्रातून अर्जदाराचा क्लेम कायदेशिररित्या नाकारले आहे.याबाबतीत विमा कंपनीकडून मुळीच सेवात्रुटी झालेली नाही.तक्रारीस कायदेशीर कारण घडलेले नाही.तक्रार अर्जातील शेतकरी विमा संदर्भाचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्यांनी साफ नाकारुन तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र (नि. 17) दाखल केले आहे. तक्रारीत दाखल केलेले कागदपत्रे व संबंधीत वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचे मयत पतीच्या अपघाती निधनाची विमा नुकसान भरपाई रुपये 100000/- आजपर्यंत न देवुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा पती मयत जनार्धन राठोड शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात नि.4 लगत .महसुल रेकॉर्डचे उतारे (नि.4/19 ते 4/23) या कागदपत्रातील नोंदीतून शाबीत झाले आहे. दिनांक 07.01.2009 रोजी मयत जनार्धन राठोड जिंतूर ते जालना रोडवरुन मोटार सायकल एम.एच.12 बी.सी.6316 वरुन निघाला असतांना बाईक रस्त्यात स्लीप होवुन जबर जखमी झाला व मरण पावला हे पुराव्यात दाखल केलेली जिंतूर पोलिस स्टेशन गु.र.नं.04/09 मधील पोलिस पेपर्स, पी.एम.रिपोर्ट वगैरे नि.4/13 ते 4/16 पुराव्यातून दिसते.मयत जनार्धन राठोड हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी. अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता हे नि.4 लगत दाखल केलेल्या क्लेम फॉर्मसह इतर सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता व शपथपत्रातील कथनावरुन स्पष्ट दिसते.शासन परिपत्रकात दिलेल्या यादी प्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दिला होता गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिल्यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-याने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पुढिल कार्यवाहीसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 पाठविले असल्याचे गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबात म्हंटलेले आहे की,पॉलिसीची मुदत दिनांक 14/08/2009 रोजी संपल्यानंतर नियमाप्रमाणे 90 दिवसांच्या आत क्लेमची कागदपत्रे दाखल करणे बंधन कारक आहे अर्जदाराचा क्लेम त्या मुदतीनंतर 17/03/2010 रोजी मिळाला असल्यामुळे विमा कंपनीने 24/12/2010 च्या पत्रातून (नि.10) क्लेमची फाईल बंद केले असल्याचे कळवलेले होते हे पुराव्यातील क्लेम नामंजुरी पत्राचे अवलोकन केले असता दिसते.गैरअर्जदार क्रमांक 3 देखील हाच बचाव लेखी जबाबात घेतलेला आहे. उशिरा क्लेम दाखल केला म्हणून पॉलिसी हमी प्रमाणे अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.व पॉलिसीची मुदत संपल्यावर 90 दिवसांत क्लेम दाखल केलाच पाहिजे ही अट देखील मँडेटरी तथा बंधनकारक नाही असे मत मा.महाराष्ट्र आयोगाने ही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 (महाराष्ट्र) आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड इन्शु.कं.विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात मत व्यक्त केलेले आहे.शिवाय औरंगाबाद सर्किट बेंचने देखील फर्स्ट अपील 1047/08 निकाल तारीख 05/02/2009 या प्रकरणात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे.ते प्रस्तुत प्रकरणालाही लागु पडतात त्यामुळे अर्जदार अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे व तो शेतकरी विमा योजनेचा लाभार्थी असल्याने पतीच्या मृत्यू पश्चात तिला विम्याची नुकसान भरपाई आज पर्यंत न देवुन विमा कंपनीने अर्जदारावर अन्याय केलेला आहे याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 3 कडून निश्चतीपणे सेवा त्रूटी झालेली आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 याने अर्जदाराचा मयत पती जनार्धन राठोडच्या डेथ क्लेम ची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत द.सा.द.शे. 9 % दराने क्लेम नाकारले तारखे पासून म्हणजे दिनांक 24.11.2010 पासून व्याजासह द्यावी. 2 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |