निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 14/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 16/03/2011 कालावधी 03 महिने29 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अनिता भ्र.कारभारी लांडगे अर्जदार वय 35 वर्षे. धंदा.घरकाम, अड.व्हि.पी.चोखड रा.केकरजवळा ता.मानवत .जि.परभणी. विरुध्द 1 मा.तालुका कृषी अधिकारी गैरअर्जदार. मानवत ता.मानवत. स्वतः जि.परभणी. 2 कबाल ईन्श्युरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. स्वतः शॉप क्रमांक 2 कॅनाट दीशा अंलकार कॉम्पलेक्स, टाउन सेंटर,सिडको,औरंगाबाद. 3 मॅनेजर. एकतर्फा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, प्रादेशीक कार्यालय अंबिका भवन क्रमांक 19, तिसरा मजला धरमपेठ एक्सटेंशन शंकरनगर चौक, नागपूर 440 010. ----------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघाती विम्याची नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे बाबतीत त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदारमौजे केकरजवळा ता.मानवत जि.परभणीयेथीलरहिवाशी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. त्या पॉलीसीचा अर्जदाराचा मयत पती नामे कारभारी लिंबाजी लांडगे हा देखील लाभार्थी होता तारीख12.05.2010 रोजी दुपारी 3.00 चे सुमारात शेतातील झाडावरील आंबे उतरवित असताना तोल जावून जमिनीवरुन खाली पडला. डोक्यास मार लागून जबर जख्मी झाला सरकारी दवाखान्यात अडमिट केल्यावा उपचार चालू असताना मरण पावला. अपघाताची खबर पोलीस स्टेशनला दिल्यावर पोलीसानी अ.मृ.र.नं.18/10 प्रमाणे मानवत पोलीस स्टेशनला नोंद झाली त्यानी घटनास्थळाचा पंचनामा केला व सरकारी दवाखाना परभणी येथे पोष्ट मार्टेम व मरणोत्तर पंचनामा केला. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे मयत पतीचे मृत्यू पश्चात तिला शेतकरी अपघाती विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह क्लेम सादर केला. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 कडे त्यानी कागदपत्रे व क्लेम पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी छाननी करुन गैरअर्जदार क्रमांक 3 कडे मंजूरीसाठी वर्ग केला. परंतू आजतगायत विमा कंपनीने अर्जदाराला नुकसान भरपाई मंजूर केली नाही. अशा रितीने विमा कंपनीने सेवेत त्रूटी करुन मानसिक त्रास दिला व नुकसान भरपाई मिळण्याच्या लाभापासून वंचीत ठेवले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार क्रमांक 3 कडून रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 5लगतएकूण12 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी दिनांक 25.01.2011 रोजी आणि गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्टाव्दारे लेखी म्हणणे पाठविले होते ते दिनांक 25.01.2011 रोजी प्रकरणात नि. 12 ला समाविष्ट केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी मंचाची नोटीस स्वीकारुनही नेमले तारखेस आपले लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांचे विरुध्द तारीख 01/03/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपल्या लेखी जबाबात (नि. 10) अर्जदाराचे मयत पतीचा विमा क्लेम तारीख 14.07.2010 रोजी त्यांचे कार्यालयात सादर केल्याचे मान्य केले आहे तो क्लेम अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचे कार्यालयामार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यांच्याकडे तारीख 26.07.2010 रोजी पाठविण्यात आले. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यानी क्लेम मध्ये काही कागदपत्रांची उणीव असल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी मागणी केली त्याप्रमाणे त्रूटीच्या कागदपत्रांची पूर्तता पुन्हा तारीख 07.10.2010 व 15.10.2010 आणि शेवटी 04.11.2010 या कार्यालयीन पत्राव्दारे केली आहे. सध्या ते प्रकरण कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यांच्या स्तरावर प्रलंबित आहे असा लेखी जबाबात खुलासा केला आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र नि. 11 सादर केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.12) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात नुकसान भरपाई दावा क्लेम मंजूरी संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता व छाननी करण्यासाठी व विमा कंपनीकडे आवश्यक ती कागदपत्रे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किवा त्यांच्याकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत कारभारी लिंबाजी लांडगे रा.केकरजवळा ता.मानवत याच्या क्लेमची कागदपत्रे तारीख 30/07/2010 रोजी प्राप्त झाली परंतु पाठविलेल्या कागदपत्रात काही कागदपत्रांची उणीव होती त्याची पुर्तता करण्याबद्दल गैरअर्जदार क्रमांक तारीख 03/08/2010 रोजी कळविले होते त्यानंतर पुन्हा तारीख 05/10/2010, तारीख 03/11/2010 , तारीख 06/12/2010 रोजी स्मरणपत्रे पाठली परंतू कागदपत्रे मिळाली नाहीत. तारीख 21/12/2010 रोजी विमा क्लेम व कागदपत्रे मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठवली आहेत..सबब प्रस्तुत प्रकरणातून रुपये 2,000/- कॉस्टसह गैरअर्जदार क्रमांक 2 ला वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत गैरअर्जदार क्रमांक 1 ला कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत वेळोवेळी पाठविलेल्या स्मरणपत्रांच्या छायाप्रती ( नि. 13 ते नि. 16 ) दाखल केल्या आहेत. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदार तर्फे अड चोखट यानी तक्रार अर्जातील कथन हाच युक्तिवाद समजण्यात यावा असे सांगितले. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे कोणीही हजर नव्हते. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्दे उत्तर 1 गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती निधनाची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत सेवा त्रूटी केली आहे काय ? होय. 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 – अर्जदाराचा मयत पती कारभारी लिंबाजी लांडगे रा.केकरजवळा ता. मानवत हा शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि. 5/03 वरील शेत जमिनीचा 7/12 उतारा, नि. 5/2 बी वरील तलाठयाचे प्रमाणपत्र, नि.5/4 वरील फेरफार 6-ड चा उतारा, नि.5/3 बी वरील होल्डींग प्रमाणपत्र, नि. 5/5 वरील नमुना नं. 6-क चा उतारा यामधील नोंदीवरुन शाबीत झाले आहे. दिनांक 12.05.2010 रोजी दुपारी 3.00 चे सुमारास मयत कारभारी लांडगे हा शेतातील झाडावरील आंबे उतरवीत असताना झाडावरुन तोल जावून खाली पडला व डोक्याला जबर मार लागला. उपचारासाठी त्याला सरकारी दवाखान्यात आणल्यावर उपचार चालू असताना मरण पावला ही वस्तूस्थिती पुराव्यातील मानवत पोलीस स्टेशन अ.मृ.रजि.क्रमांक 18/10 मधील खबरी जबाब ( नि.5/10), घटनास्थळ पंचनामा (नि.5/6), मरणोत्तर पंचनामा (नि.5/8) आणि सरकारी हॉस्पिटल परभणी यांचेकडील मयताचा पी.एम.रिपोर्ट (नि 5/7) या कागदोपत्री पुराव्यातून शाबीत झाले आहे. मयत कारभारी लांडगे हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती हे पुराव्यात नि.5 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म व त्यासोबत दिलेल्या कागदपत्रांच्या तपशिलातील छायाप्रतीवरुन दिसते. त्यामध्ये कसलीही अपुर्णता दिसून येत नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे क्लेम सादर केल्यावर त्यानी कबाल इन्शुरन्स ब्रोकर यांच्याकडे सदर क्लेम व कागदपत्रे पाठविली होती याचा गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात सविस्तर खुलासा दिला आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 कडे कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यानी गैरअर्जदार क्रमांक 1 ला त्रूटीच्या कागदपत्रांची मागणी केली त्याप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 यानी तारीख 07.10.2010, 15.10.2010 आणि तारीख 04.11.2010 रोजी उणीव असलेल्या कागदपत्रांची पूर्तता जिल्हा अधिक्षक परभणी यांच्यामार्फत केली होती. हे लेखी जबाबा सोबतच्या शपथपत्रातूनही शपथेवर सांगितले आहे ते खोटे मानता येणार नाही. यावरुन गैरअर्जदार 2 कडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता क्लेम मंजूर होण्याचे दृष्टीने झालेली होती हे यातून स्पष्ट होते. त्यामुळेच त्याने मंजूरीसाठी क्लेम व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठवली असली पाहीजे. अर्जदाराने नि. 5 लगत दाखल केलेल्या शासनाच्या शेतकरी विमा संदर्भातील परीपत्रकातील प्रपत्र- ड मध्ये नमूद केलेली आवश्यक ती कागदपत्रे दिली असतानाही नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 यानी आजतगायत तो मंजूर केलेला नाही यापेक्षा वेगळा अर्थ निघू शकत नाही. सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रतीही ( नि. 5) लगत अर्जदाराने दाखल केलेल्या आहेत परिपत्रकातील तपशीलाप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडे पाठविलेल्या कागदपत्रात क्लेम मंजूर होण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असतांनाही आणि ती कागदपत्रे कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यानी दिनांक 21.12.2010 रोजी विमा कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविलेले असतानाही ती मंजूर न करुन विमा कंपनीने सेवा त्रूटी केली आहे हे स्पष्ट होते कारण त्यांच्याकडे गैरअर्जदार क्रमांक 2 कडून पाठविलेल्या कागदपत्रात जर अपूर्णता असती तर त्याने तसे अर्जदारालाही आजपर्यंत कळविलेले असते. निसर्गावर अवलंबून असणा-या राज्यातील शेतकरी कुटूंबातील शेतक-याचे अपघाती निधन अथवा त्याला कायमचे अपंगत्व आले तर कुटूंबाला अर्थिक हातभार देण्यासाठी शासनाने स्वतः विम्याचे हप्ते भरुन शेतक-याचे मृत्यू पश्चात वारसाला रुपये 1,00,000/- ची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी उतरविलेली आहे. या कल्याणकारी विमा योजनेव्दारे विमा कंपनीकडून ही नुकसान भरपाई मंजूर होण्यसाठी मध्यस्थ सल्लागार म्हणून महसूल खाते व कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यानाही नेमलेले आहे. अपघातात मरण पावलेल्या लाभार्थी शेतक-यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी परिपत्रकात जी आवश्यक कागदपत्रू नमूद केलेली आहे ती किंवा त्याला पर्यायी असलेली इतर कागदपत्रे क्लेमट कडून मिळाली आसतील तर कोणत्याही तांत्रीक कारणास्तव अडवणुक न करता तो क्लेम मंजूर केला पाहीजे. अर्जदाराच्या प्रस्तूत प्रकरणाच्या बाबतीत हीच वस्तूस्थिती दिसते ? क्लेम मंजूर होण्याच्या दृष्टीने अर्जदाराने आवश्यक ती कागदपत्रे दिली असतांनाही गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराची विनाकारण आडवणूक करुन तिला मानसिक त्रास दिलेला आहे व सेवा त्रूटी केलेली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो सबब मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 यानी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदारला विमा क्लेम नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- दयावी. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |