निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 25/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 07/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 19/07/2011 कालावधी 05 महिने 12 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. वेनुबाई भ्र.नारायण जाधव. अर्जदार वय 40 वर्ष.धंदा.घरकाम. अड.व्ही.पी.चोखट. रा.गौडगांव,ता.गंगाखेड.जि.परभणी. विरुध्द 1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार. तालुका कृषी अधिकारी कार्यालय,गंगाखेड. 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिस प्रा.लि. गैरअर्जदार. शॉप नं.2,कॅनॉट दिशा अलंकार कॉम्लेक्स. टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद. 3 व्यवस्थापक. गैरअर्जदार. रिलायन्स इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडिया. 570,नायगम क्रॉस रोड, नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल, इस्टेट,वडाला,वेस्ट मुंबई. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदारानी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदारचा पती नारायण जाधव दिनांक 15/05/2009 रोजी सायंकाळी 6.30 वा.च्या सुमारास गावाकडे जात असतांना गोदावरी नदीच्या पुलाजवळ गंगाखेड – परभणी रोडवर MH – 22. N 812 ह्या क्रमांकच्या अटो मध्ये पाठीमागे बसून जात असताना सदर अटोच्या चालकाने त्याचा अटो भरधाव वेगाने व हलगर्जीपणे चालवुन रोडच्या बाजूच्या उभ्या असलेल्या झाडास धडक दिली.त्यामुळे त्याला डोक्याला व इतर अंगास मार लागल्यामुळे त्याला सरकारी दवाखना परभणी येथे उपचारासाठी शरीक केले व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.तदनंतर पोलीस स्टेशन गंगाखेड येथे सदरील अटो चालका विरध्द कलम 279, 337, भा.द.वि.प्रमाणे गुन्हा ( गुन्हा क्रमांक 84/2009) नोंदविण्यात आला.पुढे दिनांक 11/08/2009 रोजी अर्जदाराने तीच्या मयत पतीची शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा क्लेम दाखल केला.त्या सोबत आवश्यकत कागदपत्रे मुळ प्रतिसह सादर केली,परंतु गैरअर्जदाराने अद्याप पावेतो अर्जदाराचा क्लेम मंजूर केला नाही तसेच अर्जदाराला प्रस्तुत प्रस्तावा विषयी कुठल्याही प्रकारची लेखी सुचना व कागदपत्राच्या त्रुटीच्या पुर्तते विषयी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार गैरअर्जदाराने केलेला नाही.शेवटी दिनांक 15/01/2011 रोजी अर्जदाराने तालुका कृषी अधिका-याकडे प्रस्तावा विषयी माहिती विचारली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने तीच्या मयत पतीच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- व्याजासह तसेच अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु. 2000/- व मानसिकत्रासापोटी रक्कम रु. 2000/- अर्जदारास द्यावे अशा मागण्या केल्या आहेत. अर्जदाराने अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/9 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 व 3 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि. 18, नि 9 व नि.24 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुत अंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, अर्जदार हा त्याचा ग्राहक नसल्यामुळे त्याच्या विरोधात सदरचा वाद मंचासमोर चालविता येणार नाही. किंबहुना मंचास तसा अधिकार पोहचत नाही.तसेच अर्जदारास उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा गैरअर्जदार क्रमांक 1 ने इनकार केला आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, महाराष्ट्र शासनाने त्याची सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे.लाभार्थी शेतक-यांचा फायदा व्हावा या एकमेव उद्देशाने त्यांची नियुक्ती झालेली आहे.विमा कंपनीस प्रस्ताव पाठविण्यापूर्वी सर्व कागदपत्राची पुर्तता योग्यरित्या करण्यात आल्याची खातरजमा करण्याची व परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याची त्यांची जबाबदारी आहे.त्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा शेतक-यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे चार्ज किंवा मानधन ते स्वीकारत नाही. सदर प्रकरणात अर्जदाराच्या पतीचा अपघात 15/05/2009 रोजी झाल्यानंतर त्यांना प्रस्ताव 17/09/2009 रोजी मिळाला ,परंतु क्लेम हा परिपूर्ण नव्हता.आवश्यक कागदपत्रांची पुर्तता त्यासोबत करण्यात आलेली नव्हती.या त्रुटीबद्दल अर्जदारास कृषी अधिका-याच्या मार्फत कळविण्यात आले होते, परंतु अद्यापपावेतो अर्जदाराने मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे अर्जदाराच्या विमा प्रस्तावा वर कारवाई होऊ शकलेली नाही.यात गैरअर्जदार क्रमांक 2 चा कोणताही दोष नाही विनाकारण त्याला सदर प्रकरणात ओढण्यात आलेले आहे.त्यामुळे त्याच्या विरोधातला दावा रक्कम रु.2000/- च्या खर्चासह खारीज करण्यात यावा.अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 2 ने मंचासमोर केली आहे. लेखी निवेदनासोबत गैरअर्जदार क्रमांक 2 ने पुराव्यातील कागदपत्र नि.10 ते नि.15 वर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हे सर्व कागदपत्राची पाहणी करुन व ते योग्य व पूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतरच विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठविण्यात येतो.सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 कडे अद्याप पावेतो पाठवलेला नाही.त्यामुळे अर्जदाराचा क्लेम मंजूर अथवा नामंजूर करण्या विषयीचा प्रश्नच उदभवत नाही.तसेच तक्रार अर्ज मुदतीत दाखल न केल्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि.25 वर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारानी अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 – अर्जदाराच्या पतीचा दिनांक 15/05/2009 रोजी अपघाती मृत्यू झाला तो शेतकरी व्यक्तिगत अपघात योजने अंतर्गत लाभार्थी होता सदर योजने अंतर्गत तीच्या पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने विमा क्लेम दाखल केला,परंतु अद्याप पावेतो तो अनिर्णीत असल्याची अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिलेल्या लेखी निवेदनावरुन काहीच बोध होत नाही.अतिशय ढोबळ स्वरुपाचे लेखी निवेदन मंचासमोर दाखल केलेले आहे.त्यावरुन गैरअर्जदारास नेमके काय म्हणावयाचे आहे हे स्पष्ट होत नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 चे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने आवश्यक कागदपत्राची पुर्तता अद्याप पावेतो न केल्यामुळे तीच्या विमा प्रस्तावा बाबत पुढिल कारवाई करण्यात आलेली नाही.या विधानाच्या पृष्टयार्थ त्याने नि.10 ते नि.15 वर कागदपत्र दाखल केलेली आहेत.त्याचे अवलोकन केले असता नि.14 वर गैरअर्जदार क्रमांक 2 ने एक पत्र लाभार्थी शेतक-यांच्या यादीसह जोडलेले आहे.ते पत्र जिल्हा अधिक्षक कृर्षी अधिका-यांना उद्देशुन लिहिण्यात आले आहे.यादी (नि.15) मध्ये क्रमांक 10 वर अर्जदाराच्या पतीचे नाव आहे.व त्याच्या पुढिल रिमार्क्स या कॉलम खाली Incomplete असा शेरा मारलेला दिसतो.व requirement या कॉलम खाली आवश्यक कागदपत्राची यादी दिलेली आहे.यावरुन अर्जदाराचा प्रस्ताव हा परिपुर्ण नसल्याचे जिल्हा कृषी धिका-यास कळविण्यात आल्याचे स्पष्ट होते.कृषी अधिका-यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 ने मागणी केलेल्या कागदपत्राची पुर्तता करावयास अर्जदारास सांगितले किंवा नाही व सांगीतले असल्यास अर्जदाराने सदर कागदपत्राची पुर्तता केली अथवा नाही याचा बोध गैरअर्जदार क्रमांक 1 च्या लेखी जबाबा वरुन होत नाही त्यामुळे अपूर्ण विमा प्रस्ताव कबालने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठविलेला नाही असेच यावरुन अनुमान काढावे लागेल.त्यामुळे अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 ला मिळाला नसल्याच्या च्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते.तसेच अर्जदाराने सर्व कागदपत्राची पुर्तता केल्याचे ठोसरित्या मंचासमोर शाबीत झाले नसल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात आले.त्यामुळे अर्जदाराने सर्व कागदपत्राची पुर्तता गैरअर्जदार क्रमांक 1 कडे करावी व कागदपत्राची पुर्तता केलयानंतर त्वरित गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवावा व तदनंतर प्रस्ताव मिळाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचा क्लेम मंजूर करावा असा आदेश देणे न्यायोचित असल्यामुळे आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराने निकाल कळाल्यापासून 15 दिवसांच्या आत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पुर्तता करावी.गैरअर्जदार क्रमांक 1 ने सर्व कागदपत्र मिळाल्यानंतर लवकरात लवकर गैरअर्जदर क्रमांक 2 कडे कागदपत्र दाखल करावी.व गैरअर्जदार क्रमांक 3 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत अर्जदाराचा क्लेम मंजूर करावा. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |