ग्राहक तक्रार क्र. 88/2014
दाखल तारीख : 07/04/2014
निकाल तारीख : 04/07/2015
कालावधी: 01 वर्षे 02 महिने 28 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती वनमाला विनायक लोमटे,
वय-56 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.देवळाती, ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. तालूका कृषि अधिकारी कळंब,
ता. कळंब, जि.उस्मानाबाद.
2. न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी व्यवस्थापक,
शाखा क्र. 153401, 23 बुधवार पेठ, महालक्ष्मी चेंबर्स,
दुसरा मजला प्रभात थेअटर्सच्या जवळ, पुणे, जि. पुणे,
3) Deccan Insurance and Reinsurance Brokers
Private Lit. Mont. Vert Zenith, Office No. 201
Opposite L.G. Showroom, Near Baner, Pune-411045.
4) deputy Director regional,
Forsenic Science laboratory,
State of Maharashtra, Old Nizam Banglow,
Cantonment, Aurangabad-431002. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एस.व्ही. ननावरे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : स्वत:,
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही. मैंदरकर,
विरुध्द पक्षकारा क्र.3 तर्फे विधीज्ञ : पत्राव्दारे.
विरुध्द पक्षकारा क्र.4 तर्फे विधीज्ञ : एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) 1. तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार ही मौ. देवळाली ता. कळंब जि. उस्मानाबादयेथील रहिवाशी असून अर्जदार हिचे मयत पती विनायक बंकट लोमटे यांच्या नावे सर्वे नं.102,104,105,138,,121 मध्ये जमीन असून व्यवसायाने शेतकरी होते. दि.25/06/2011 रोजी स्वत: ची बैलगाडी घेऊन शेतात असलेले भुईमुगाची पोती बैलगाडीत टाकत असतांना पाय घसरुन जागेवर पडले त्यामुळे डोक्यास जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव हेाऊन शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे दि.26/06/2011 रोजी निधन झाले. सदर घटनेची नोंद उस्मानाबाद शहर यांनी दि.26/06/2011 रोजी मयत व्यक्तिच्या संदर्भात आकस्मित मृत्यूची नोंद केली. पहिली खबर क्र.32/2011 अन्वये नोंद करुन दि.27/06/2011 रोजी घटनास्थळ पंचनामा केला.तसेच उस्मानाबाद शासकीय दवाखान्यातील डॉक्टरांनी मरणोत्तर पंचनामा, पोस्टमॉर्टम केले. दि. 27/02/2012 रोजी विप इन्शुरंन्स कंपनीच्या पत्राव्दारे सर्व कागदपत्रे पाठवली. दि.02/07/2012 रोजी कागदपत्रे पाठविण्याबद्दल लेखी पत्र दिले. त्यावर अर्जदाराने व्हीसेरा रिपोर्ट व्यतिरिक्त सर्व कागदपत्रे पाठवली मात्र नुकसान भरपाई न मिळाल्याने पुणे येथे जाऊन अनेकदा विनंती केली मात्र व्हिसेरा रिपोर्ट शिवाय रक्कम मिळणार नसल्याचे सांगितल्याने सदर तक्रार दाखल केली असल्याचे म्हंटले आहे. म्हणून विप यांनी सेवेत त्रुटी केली असल्याने विमा रक्कम रु.1,00,000/- मयत झालेल्या तारखेपासून 15 % व्याज दराने तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
ब) सदर प्रकरणी विप क्र. 1 यांना मा. मंचाने नोटीस पाठविली असता त्यांनी आपले म्हणणे दाखल केले ते पुढीलप्रमाणे.
विनायक बंकट लोमटे, रा.देवळाली यांचा बैलगाडी अपघात होऊन दिनांक 26/06/2011 रोजी मृत्यू झाला.
क) सदर प्रकरणी विप क्र.2 यांना मा. मंचाने नोटिस पाठविली असता त्यांनी दि.08/09/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते पूढीलप्रमाणे.
अर्जदाराचे पतीचे निधन दि.25/06/2011 व विप क्र.1 यांच्याकडे अर्ज दि.18/08/2011 रोजी दाखल करण्यात आला व विप क्र. 2 यांनी दि.27/02/2012, 15/05/2012 व 02/07/2012, 02/07/2012 व 04/12/2012 व रोजी पत्र देऊन व्हीसेरा रिपोर्ट मागण्यात आला असता आजतागायत तक यांनी त्याची पुर्तता केली नसल्याने पुढील कार्यवाही केली जाऊ शकली नाही व तसे तक यांना कल्पना देण्यात आली आहे म्हणून सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. विप क्र.2 व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या अटी व शर्तीनुसार विमा योजनेची रक्कम मिळणेकामी व्हिसेरा रिपोर्टची आवश्यता आहे. सदरची तक्रार मुदतपूर्व आहे. तक यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यास विप आजही पुढील कार्यवाही करण्यास तयार आहेत. म्हणून सदरची तक्रार रद्द करण्यात यावी असे नमूद केले आहे.
ड) विप क्र.3 यांना सदर प्रकरणात मा. मंचाने नोटिस बजावली असता त्यांनी दि.07/05/2015 रोजी आपले म्हणणे अभिलेखावर दाखल केले असून ते पुढीलप्रमाणे.
विप क्र.3 याची भुमीका मर्यादीत स्वरुपाची आहे. दाव्यांची रक्कम देणे किंवा दावा नाकारणे हा निर्णय फक्त विमा कंपनीच्या हातात असतो, विप क्र.3 ची भूमीका प्राप्त दाव्याची कागदपत्रे विमा कंपनीस पाठविणे व त्याचा पाठपुरावा करणे, त्रुटी असल्यास संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयास कळविणे असे आहे. दावेदाराने तीनवेळा व्हिसेरा व्यतिरिक्त विमा कंपनीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर केली. पण विमा कंपनीने सदर प्रस्तावामध्ये निर्णय घेण्यासाठी व्हिसेरा रिपोर्टची आवश्यकता आहे, असे म्हंटले कारण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी मृत्यूचे कारण दिले नाही व व्हिसेरा जतन करुन ठेवला आहे आजतागायत दावेदाराने व्हिसेरा रिपोर्ट दिलेला नाही.
इ) विप क्र.4 यांना सदर प्रकरणी नोटीस बजावली असता त्यांनी आपले म्हणणे वेळोवेळी संधी देऊनही दाखल केले नाही म्हणून दि.11/06/2014 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
ई) अर्जदार यांनी तक्रारी सोबत मृत्यूचे प्रमाणपत्र, कार्यकारी दंडाधिकारी यांचे जाहीर प्रगटन, ओळखपत्र, विप क्र.2 चे तीन पत्र, अर्जदाराने पाठवीलेल्या पोष्टा मार्फत पाठविलेल्या कागदपत्रासंदर्भाची पोच पावती इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच विप यांचे म्हणणे व उभयतांचा लेखी युक्तीवाद वाचला व तोंडी युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) विप यांनी अर्जदार यांना देण्यात
येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
फ) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
1) विमा कंपनीने सदर प्रकरणात अशी हरकत घेतलेली आहे की, व्हिसेरा रिपोर्ट प्राप्त नाही त्यामुळे विमा रक्कम देता येत नाही जर आजही व्हिसेरारिपोर्ट प्राप्त झाला तर क्लेम देता येईल असे म्हणणे दिलेले आहे. मंचातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र देऊन त्याचे व्हिीसेरा रिपोर्ट बद्दल विचारण केल्यानंतर दि.19/11/2014 रोजी व्हिसेरा रिपोर्ट मंचात अभिलेखावर दाखल केलेला आहे. त्या व्हिसेरा रिपोर्टचे सुक्ष्म अवलोकन केले तर असे निदर्शनास येते की, फुफ्फुसाचा निमोनिया व फुफ्फुसाला संसर्ग (infection) झालेले आहे तसेच ह्रदय, किडणी, लहान व मोठे आतडे या अवयवात बदल घडून आलेला आहे व संसर्ग झालेला आहे. अर्जदाराचे पती हे डोक्याला मार लागून उपचारा दरम्यान मयत झालेले आहे. जर डोक्यास मार लागला तर मेंदू व अंतर्गत रक्तस्त्राव होऊन रसायनिक विष्लेशन अहवालात जे ओपिनियन दिलेले आहे ते होण्यास कारणीभूत ठरते कारण रसायनिक विष्लेशन अहवालाचा खरा (dictionary) अर्थ आहे की, शेजारच्या पेशीला लागण होऊन (infection) संसर्ग झालेला आहे. रक्तस्त्राव झाल्यावर शरीरात असे बदल होण्यास व मृत्यूला कारणीभूत होण्यास वेळ लागत नाही आणि अर्जदाराचे पतीचा बैलगाडीवरुन पडून दवाखान्यात उपचाराकामी गेल्यावर मयत झालेले आहे त्यामुळे हा एक अपघात आहे हे ग्राहय धरावेच लागेल कारण रसायनिक अहवालात (autolytic changes) शरीरातील अवयवात बदल असा आहे.
2) तसेच घटनास्थळ पंचनाम्यात सुध्दा डोक्याला मार लागून उपचारा दरम्यान मयत असे स्पष्ट नमूद केलेले आहे. त्यामुळे अर्जदाराचे पतीचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द होते. सदर प्रकरणात आम्ही मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या शकुंतला धोडिराम मुंढे/विरुध्द/ स्टेट ऑफ महाराष्ट्र 2010 (2) महा लॉ. जर्नल पेज नं.880 या निवाडयाचा संदर्भ विचारात घेऊ इच्छित आहोत त्यात मा. न्यायालयाने खालील प्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे.
a) Besides is to be borne in mind that as per the government Resolution dated dt.05.01.2005 as well as minutes of the meeting dated 16/02/2006 that the said scheme is social welfare scheme and it is beneficial to the family members of the farmers who expire in accidental death and respondent no.4 insurance should to have adopted the technical approach while granting the claims of the family members of the deceased farmer for compensation but still respondent no. 4 insurance company has adopted abstractive attitude and deprived the petitioner from the claim of compensation although as stated the petitioner completed the necessary formalities and submitted the claim along with the necessary documents.
अभिलेखावर दाखल कागदपत्रावरुन मयत विनायक यांचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द होते.
b) F.A.NO.303/2013 new India Assurance co. Ltd. V/s Smt. Kantabai Baliram Ware. P/o Chikhle Tq. Georai Dist. Beed.
Para 9 – From perusal of papers specially report of police Patil as well as spot panchanama dated 12/10/2011 as drawn by concern Talathi and also report of revenue inspector on the same dat i.e. 12/10/2011 submitted to Tahasildar, Gevrai it reveals that deceased Baliram while working in his field on 11/10/2011 there was stormy wind associated with heavy rain due to which branch of week tree was parted from said tree and fallen on the deceased Baliram due to which he died on the spot. Therefore it is very much clear that his death was not natural but accidental. Respondent No. 3 i.e. Collector. Beed vide letter dated 19/11/2013 had authorized the District. Agriculture officer Beed to submit the say on behalf of him. Accordingly District agriculture officer has submitted say vide letter dated 11/12/2013 in this commission from the perusal of the written say filed by district agriculture officer it appears that deceased Baliram was died on 11/10/2011 accidentally by falling part of tree on him as there was heavy rain associated with stormy wind. It is answered that in case of accidental death required documents including report of police Patil. Hence in the present case police Patil has already submitted report and therefore from the report and other documents such as spot panchanama conducted by Talathi and report submitted by revenue inspector to Tahasildar it is evident that deceased Baliram was died. Accidentally, as mentioned above in fact as mentioned above on the basis of record available it is very much clear that the death was accidental. Therefore complaint was entitled for the insurance claim were the said policy and by not setting the claim the opponent insurance company can be said to have committed deficiency in service.
c) तसेच, मा.राज्य आयोग मुंबई F.A.104/2006 the new India Assurance co. Ltd. V/s Smt. Anusuya Ambadas Borude या निवाडयात the dead body was sent for post mortem and doctors conducting autopsy could not come to definite conclusion about cause of death so they reserved their opinion and sent viscera in two bottles and blood in third bottle to regional forensic science laboratory A,bad Report of Chemical Analyser mentioned that general and specific chemical distinct does not revel and poison in Exbibit No. 1,2,8,3 Thereafter Accident does not necessarily mean though some vehicle should dash him and cause injury. Accidental death mean a death which in foreseen. Unexpected and occurring all of sudden other than the death. Which is natural death
3) वर नमूद केलेल्या सर्व न्याय निर्णयात असे तत्व विषद केलले आहे की अर्जदाराचा मृत्यू हा बैलगाडीच्या अपघातात मृत्यू झाला असे कृषी अधिकरी यांनी त्यांचे कैफियती मध्ये नमूद केलेले आहे तसेच घटनास्थळ पंचनामामध्ये सुध्दा डोक्यास मार लागून उपचारादरम्यान मयत असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतांना पीएम रिपोर्ट मध्ये सदर प्रकरणातील मयताचा मृत्यू नेमका कशाने झाला हे लिहू शकले नाही परंतू अर्जदार नामे विनायक हा बैलगाडीवरुन पडला त्याचे डोक्याला मार लागला व तो उपचारा दरम्यान मयत झालेला आहे यावरुन हे लक्षात येते की मयताच्या डोक्याला मार लागला व त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव तर झालेलाच असणार यात शंकानाही आणि त्या रक्तस्त्रावामुळे शरीरात व अवयवात व पेशींमध्ये चेंजेस (बदल) हे घडून आले आणि शरीरात अंतर्गत रक्त स्त्रावामध्ये शरीरात काहीही बदल होण्याची शक्यता असते व संसर्ग होऊ शकतो याच प्रकरणात नेमके तसेच झालेले आहे.
4) अर्जदाराने ज्या निवाड्याचा आधार या प्रकरणात घेतलेला आहे ते सर्व न्यायनिवाडे या प्रकरणात तंतोतंत लागू होतात. कारण एका न्यानिर्णयात असे ही म्हंटले आहे की accident does not necessarily mean that some vehicle should dash him and cause injury अपघात होण्यासाठी एखादी गाडी येऊन धडकली पाहिजे म्हणजे तो अपघात असे नाही तर अपघात घडण्यास अनेककारणे आहेत जसे की विनायक हा बैलगाडी वरुन पडला व त्याला डोक्याला मार लागला ही बाब मान्यच करावी लागेल की विनायक यांचा मृत्यू अपघातानेच झाला.
5) तसेच विप यांनी काही निवाडयाचा आधार घेत अर्जदाराची तक्रार खारीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतू विप यांनी दाखल केलेले सर्व निवाडे हे death claim आहे आणि सदरचे प्रकरण हे शेतकरी अपघात विमा योजना या अंतर्गत आहे. त्यामुळे विप यांनी दाखल केलेले न्यानिवाडे ह्या प्रकरणात लागू होत नाहीत. कारण ही शासनाने खास शेतक-यांसाठी राबवलेली आहे.
6) कंपनीला तांत्रिक बाबीचा आधार घेऊन अर्जदारास विमा रक्कम मिळविण्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. आमचे मत महाराष्ट्र शासनाने विमा योजना ही फक्त शेतक-यांसाठी कार्यान्वित केलेली आहे त्या मागच्या पॉलिसीचा हेतू व उददेश सामाजिक व परोपकारी हेतूने क्लेमबाबत विचार करणे गरजेचे आहे. तसेच शासन निर्णयात असे कुठेच नमूद केलेले नाही की, व्हिसेरा रिपोर्ट आल्याशिवाय शेतक-याचा क्लेम देऊन नका. खरेतर शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी प्रेताचे शवविच्छेदन केले त्या नंतर त्यांना विनायकच्या डोक्याला मार लागून जर मृत्यू झालेला आहे तर opinion मध्ये “The cause of death is head injury” असे सहजपणे लिहिता आले असते. सदर प्रकरणातील विनायक हा डोक्याला मार लागून मयत झालेला आहे व औषाधोपचार दरम्यान मयत झालेला आहे. हा एक अपघात आहे हे स्पष्ट होते कारण शासन निर्णय असे सांगतो की शेतक-याचा केवळ अपघात झाला या कारणास्तव शेतकरी अपघात विमा प्रस्ताव मंजूर करा असे स्पष्ट लिहिलेले असतांना विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा केवळ व्हिसेरा रिपोर्ट नाही या कारणास्तव प्रलंबित ठेवलेला आहे असे करणे म्हणजे सेवेतील त्रुटी होय.
7) वरील विवेचनावरुन विमा कपंनीने अत्यंत तांत्रिक कारण देऊन तक्रारदार यांचा शेतकरी अपघात विमा दावा प्रलंबित ठेवलेला आहे ही सेवेतील त्रुटी आहे अर्जदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र ठरतात असे मंचाचे स्पष्ट मत आहे त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) विमा कंपनीने अर्जदारास विमा रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) व त्यावर दि.02/07/2012 पासून द.सा.द.शे.9 % व्याज दराने आदेश पारीत तारखेपासून 30 दिवसात द्यावेत.
2) विमा कंपनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) आदेश पारीत तारखेपासून 30 दिवसात द्यावेत.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.