(मंचाचे निर्णयान्वये, श्री रत्नाकर ल.बोमीडवार, सदस्य)
(पारीत दिनांक : 23 ऑगष्ट 2011)
... 2 ... (ग्रा.त.क्र.10/2011)
अर्जदार हिने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार ही मौजा पळसगांव (जाट), तह. सिंदेवाही, जि. चंद्रपुर येथील रहिवाशी असून, मयत इंश्युअर्ड गोविंदा किसन नंदरधने यांची मुलगी आहे. सदर मयताचा दि.23.6.2010 रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार रोड अपघात झाला. सदर अपघातामुळे शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत दि.20.8.2010 ला तलाठी ठाणेगांव, तह. आरमोरी, जि. गडचिरोली येथे प्रस्ताव दिला असता, तलाठ्यानी तलाठी प्रमाणपञ क्लेम फार्म भाग 2 अर्जदाराला दिले व तोंडी निर्देश दिल की, प्रस्ताव अर्जदाराच्या राहते ठिकाणी सिंदेवाही तहसिल मध्ये द्यावे. त्यानुसार, अर्जदाराने सदर प्रस्ताव सिंदेवाही ला कृषि अधिकारी यांना दिला व त्यांनी तो स्विकारला. दि.23.11.10 ला तालुका कृषि अधिकारी सिंदेवाही यांनी प्रस्ताव अर्जदाराला परत केला व सदर प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी, आरमोरी यांच्याकडे सादर करण्यास सांगीतले. त्यानुसार, अर्जदाराने दि.14.12.2010 ला सदर प्रस्ताव तालुका कषि अधिकारी, आरमोरी यांच्याकडे सादर केला. वास्तवीक, सदर प्रस्ताव गडचिरोली जिल्ह्यात दि.20.8.10 ला करण्यात आला.
2. मयत हा महाराष्ट्रातील खातेदार शेतकरी असून वरील योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांचा शेतकरी अपघात विमा काढलेला होता व प्रिमियमची सर्व रक्कम सरकारने इंश्युरंस कंपनीकडे भरलेली आहे. विमा रक्कम न मिळाल्याने अर्जदार मंचासमोर दाद मागत आहे. त्यामुळे, अर्जदाराला शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा क्लेम रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्र.3 कडून मिळावे. अर्जदाराला गैरअर्जदाराकडून मानसिक व शारिरीक ञासापोटी व तक्रार खर्च अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी प्रार्थना केली आहे.
3. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 16 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही हजर झाले नाही. त्यामुळे, नि.क्र.1 वर गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यांत आले. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र. 12 नुसार हजर होऊन लेखी उत्तर दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र.3 ने लेखी उत्तरात नमूद केले की, हे म्हणणे नाकबूल आहे की, गोविंदाचा दि.23.6.2002 रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यु झाला. ही
... 3 ... (ग्रा.त.क्र.10/2011)
केस ‘हिट अॅण्ड रन’ या सदरात मोडत असल्यामुळे कोर्टाला चालविण्याचा अधिकारी नाही. मृतकाचे वारसांनी गैरअर्जदाराकडे दावा मुदतीच्या आंत सादर केला नाही. तसेच, मृत्युची वेळीच सुचना दिली नाही. शेतकरी अपघात विमा योजना पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणे उभय पक्षांवर बंधनकारक आहे. अर्जदाराने त्याचा भंग केल्यामुळे विमा क्लेम देण्याची गैरअर्जदाराची जबाबदारी नाही. मृत्युच्या कारणाबद्दल वैद्यकीय अभिप्राय अपूर्ण आहे. शेती संबंधी कामकाज करीत असतांना मयत झाल्याचा उल्लेख नाही. अर्जदार ही मयताची वैवाहीत मुलगी असून तिला उत्पन्नाचे साधन असल्यामुळे ती मयतावर कधीच अवलंबून नव्हती व तिच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या मयतांवर नव्हती. अर्जदाराने मयताचे सर्व वंश वारसांना प्रकरणात पार्टी केले नसून स्वतःच्या स्वार्थासाठी खोटी केस दाखल केली आहे. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गंत विवाहीत मुलीला नुकसान भरपाई मिळण्याची तरतुद नाही. अर्जदाराला मयताने कधीही जिवंतपणी नॉमिनी म्हणून घोषीत केलेली नाही.
5. गैरअर्जदार यांनी लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे अर्जदाराचा क्लेम नियमबाह्य असल्यामुळे नामंजुर करण्यात आला. महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी जातीने स्वतः कधीच प्रिमियमची रक्कम विमा कंपनीकडे भरणा करीत नाही. त्यामुळे, त्याचे वारसांना सकृतदर्शनी नुकसान भरपाई फक्त विमा कंपनीकडून मागण्याचा हक्क व अधिकार नाही. अर्जदाराची तक्रार मुळतः नियमबाह्य असल्यामुळे खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी उत्तर, शपथपञ, व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
7. अर्जदार हिचे वडील गोविंदा किसन नंदरधने यांचा दि.23.6.2010 रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार रोड अपघात झाल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस दस्त ऐवजात दिसून येते. अर्जदार ही मृतकाची वारसदार मुलगी असल्यामुळे, क्लेम फार्म सोबत सर्व दस्ताऐवज जोडून गैरअर्जदार क्र.1 ला प्रस्ताव सादर केला. परंतु, नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे.
8. गैरअर्जदार क्र.2 ने आपल्या लेखी बयाणात सांगीतले की, सदर प्रस्ताव आमच्या कार्यालयास जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयाचा मार्फत दि.13.1.2011 रोजी प्राप्त
... 4 ... (ग्रा.त.क्र.10/2011)
झाला व सदरील दावा दि.13.1.2011 रोजी युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनी, नागपूर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. परंतु, विमा कंपनीने दि.31.11.2010 च्या पञाव्दारे सदर दावा अर्ज अपूर्ण कागदपञे असल्यामुळे व ते दि. 14 नोव्हेंबर 2010 पर्यंत न दिल्यामुळे फेटाळला.
9. गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे असे आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी बिना मोबदला सहाय्य करतो. तालुका कृषि अधिकारी/तहसीलदार यांच्या मार्फत आलेल्या विमादावा अर्ज योग्य आहे की, नाही हे पाहून त्याची पुर्तता करुन दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसास देणे, एवढेच कार्य आहे. हे गैरअर्जदाराचे क्र.2 चे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
10. गैरअर्जदार क्र.1 च्या विशेष सूचनानुसार अर्जदाराचा क्लेम फार्म मुदतीत सादर केला नाही. तसेच, पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार क्लेम नियमबाह्य आहे. त्यामुळे, नामंजुर करण्यात येत आहे. परंतु, शासन परिपञकानुसार राज्यातील कोणत्याही आपत्तीने होण-या अपघातात कमावता पुरुष मरण पावल्याने त्याच्या वारसास आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून शासनाने ही योजना अंमलात आणली. अर्जदार लाभधारक असल्याने शेतकरी विमा अपघात योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पाञ आहे. अर्जदाराने सर्व दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.1 कडे सादर केले व गैरअर्जदार क्र.1 यांनी पूर्ण दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.2 कडे सादर केले. गैरअर्जदार क्र.2 यांनी तो प्रस्ताव दि.13.1.2011 रोजी गैरअर्जदार क्र.3 कडे दाखल केला.
11. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव सर्व दस्ताऐवजासह गैरअर्जदार क्र.3 कडे पाठवून योग्य ती सेवा दिली आहे. त्यामुळे, त्यांच्या सेवतेत न्युनता आहे, असे म्हणता येत नाही. त्यामुळे, त्याचे विरोधात तक्रार खारीज करण्यांस पाञ आहे.
12. गैरअर्जदार क्र.3 यांनी, अर्जदार यांचा दावा कागदपञाची पुर्तता न केल्यामुळे नामंजुर केले. परंतु, अर्जदाराने, योग्य ती कागदपञे दाव्या सोबत जोडून पाठविले आहे. उपलब्ध दस्ताऐवज, कागदपञ व रेकॉर्डवरुन दिसून येते. यावरुन, गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदारास सेवा देण्यात ञुटी केली असल्याचे सिध्द होते. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
... 5 ... (ग्रा.त.क्र.10/2011)
वरील कारणे व निष्कर्षावरुन तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे तक्रार मंजुर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.3 ने, मृतक गोविंदा किसन नंदरधने याचा अपघाती मृत्युबाबत शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल दि.29/3/2011 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजाने, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदारास द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.3 ने, अर्जदारास झालेल्या मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 1500/- व ग्राहक तक्रारीचा खर्चापोटी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदारास द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.1 व 2 चे विरुध्द तक्रार खारीज. त्यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/08/2011.