(मंचाचे निर्णयान्वये, श्री रत्नाकर ल.बोमीडवार, सदस्य)
(पारीत दिनांक : 24 ऑगष्ट 2011)
अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार ही मौजा ठाणेगांव, तह. आरमोरी, जि. गडचिरोली येथील रहिवासी असून मयत इंश्युअर्ड भाष्कर बाबुराव लोथे यांची पत्नी आहे. सदर मयताचा अपघात दि.16.2.10 रोजी हिरो होंडा पॅशन दुचाकी वाहन क्र.एम.एच.33 ई 6792 ने गडचिरोली ला डबल सिट मागे रविंद्र गेडामला बसवून गाडी चालवित असतांना मौजा चिचोडा,
... 2 ... (ग्रा.त.क्र.9/2011)
जि.गडचिरोली येथील रोडच्या वळणावरील रस्त्यांच्या खड्डयामुळे अचानक नियंञण सुटून गाडी पडून अपघात झाला. मयत गंभीर जखमी झाल्यामुळे सरकारी दवाखाना गडचिरोली येथे रेफर केल्यामुळे नेत असतांना मयत रस्त्यात मरण पावले.
3. मयताचे अपघाती मृत्युमुळे अर्जदारांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गंत आवश्यक सर्व कागदपञासह दोन प्रतीत क्लेम फार्म भाग 1 ते 4 तलाठी मार्फत दि.19.4.2010 ला गैरअर्जदार क्र. 1 कडे सादर केला. मयताचे नावाने शेती असून ते सादर शेत जमीनीतून उत्पन्न घेत होते. गैरअर्जदार क्र.2 ने दर्शविलेले कारण मयताचे नांव 7/12 रेकॉर्डमध्ये पॉलिसी जारी करण्याच्या वेळी नव्हते हे आयोग्य व अन्यायकारक असून शेतक-याला पैसे मिळू न देण्याचा गैरकायदेशीर हेतु आहे. गैरअर्जदार क्र.1 कडे अर्जदाराने क्लेम फार्म सादर केल्यानंतर, गैरअर्जदार क्र.2 कडून एका महिन्याच्या आंत विमा रक्कम देणे बंधनकारक आहे. परंतु, रक्कम न मिळाल्याने अर्जदार मंचासमोर दाद मागत आहे. त्यामुळे, अर्जदाराला शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गंत विमा क्ल्ेम रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्र.2 कडून मिळावे. सर्व गैरअर्जदारांकडून अर्जदाराला मानसिक व शारीरीक ञासापोटी, तसेच तक्रार खर्च अर्जदाराला देण्याची कृपा व्हावी. वरील रक्कम दि.19.4.10 पासून द.सा.द.शे.24 % व्याजाने अर्जदाराला हाती रक्कम पडेपर्यंत देण्याची कृपा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 15 दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यांत आला. गैरअर्जदार क्र.1 ला नोटीस प्राप्त होऊनही हजर झाला नाही, त्यामुळे त्याचेविरुध्द नि.क्र.1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.11 नुसार लेखी बयान दाखल केले.
5. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी बयानात नमूद केले की, हे म्हणणे असत्य आहे की, भास्करचा अपघाती मृत्यु दि.16.2.2010 रोजी झाला. मयत भास्कर हा शेतकरी नव्हता व कास्तकारी हा त्याचा व्यवसाय नव्हता. अर्जदाराला कोणत्याही प्रकरची नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही.
6. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराकडून क्लेम फार्म सादर करण्यांत आला नाही. तसेच, पॉलिसीच्या अटी व शर्थी प्रमाणे अर्जदाराचा क्लेम नियमबाह्य असल्यामुळे नामंजूर करण्यात आला. मयत हा दुचाकी वाहन क्र.एम.एच.33 ई/6792 रविंद्र गेडामला घेवून जाताना नियंञण सुटून गाडीला अपघात झाल्याने मृत्यु पावला. त्यामुळे, मोटार अपघात क्लेम ट्रीब्युनल समोर दावा सादर करुन अनिवार्य होते. मयताचा मृत्यु हा शेती संबंधीच्या संलग्न कोणत्याही प्रकारच्या कारणास्तव झालेला नाही. त्यामुळे, शेतकरी अपघात विमा योजनेचा फायदा मयताच्या वारसांना मिळू शकत नाही. मयताने दुचाकी चालवित असतांना हेल्मेट
... 3 ... (ग्रा.त.क्र.9/2011)
घातलेले नव्हते. म्हणजेच मोटार वाहन नियमांचा भंग केलेला आहे. मयताच्या नावाने कोणत्याही प्रकारची शेती पॉलिसी जारी करण्याची वेळी नव्हती व 7/12 पटवारी रेकॉर्डमध्ये नांव दर्ज नव्हते. त्यामुळे, ‘नो क्लेम’ म्हणून रितसर नियमानुसार प्रकरण बंद केलेले आहे. सदर प्रकरणात ‘रेपुडिएशन’ क्लेम नामंजूर करण्याचे मुख्य कारण की, ञिसदस्यीय पॉलिसी अॅग्रीमेंट नुसार मान्य व कबूल केलेल्या अटी व शर्ती आहेत. मय्यताचा मृत्यु मोटार वाहन चालवितांना झालेला आहे मोटार वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मृतकाकडे नव्हता व त्यामुळे, त्याच्या वारसांनी क्लेम पेपर्स सहीत वारवांर मागणी करुनही सादर केलेला नाही. अर्जदाराची तक्रार मुळतः नियमबाह्य असल्यामुळे खारीज करण्यांत यावी, अशी विनंती केली.
7. अर्जदाराने तक्रारीतील मजकूर हाच पुरावा व युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस नि.क्र.13 नुसार दाखल केली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र. 12 नुसार पुरसीस दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी उत्तर, व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
8. अर्जदार हीचे पती भास्कर बाबुराव लोथे यांचा दि.16.2.2010 रोजी अपघाती मृत्यु झाला, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस दस्ताऐवजावरुन दिसून येते. अर्जदार ही मृतकाची वारसदार पत्नी असल्यामुळे क्लेम फार्म सोबत सर्व दस्ताऐवज जोडून गैरअर्जदार क्र.1 कडे प्रस्ताव सादर केला. परंतु, नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे.
9. गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी बयानात व विशेष कथनात असे सांगितले की, पॉलिसीच्या अटी व शर्थीप्रमाणे अर्जदाराचा क्लेम नियमबाह्य असल्यामुळे नामंजूर करण्यात आला. मयत हा दुचाकी वाहन क्र. एम.एच.33 ई/6792 रविंद्र गेडामला घेवून जातांना निमंञण सुटून गाडीला अपघाताने मृत्यु पावला. त्यामुळे, मोटार अपघात क्लेम ट्रीब्युनल समोर दावा सादर कारणे अनिवार्य होते. मयताचा मृत्यु हा शेती संबंधीचा संलग्न कोणत्याही प्रकारचा कारणास्तव झालेली नाही. त्यामुळे, शेतकरी अपघात विमा योजनेचा फायदा मयताच्या वारसांना मिळू शकत नाही. तसेच, पॉलिसी जारी करण्याच्या वेळी त्याचेकडे शेती नव्हती व 7/12 रेकॉर्डमध्ये नांव दर्ज नव्हते. त्यामुळे, ‘नो क्लेम’ म्हणून रितसर नियमानुसार प्रकरण बंद केले आहे. मोटार वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मृतकाकडे नव्हता व वारसदाराला मागुनही सादर केला नाही. ज्याअर्थी, मृतकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, त्याअर्थी तो मोटर वाहन चालविण्यास
... 4 ... (ग्रा.त.क्र.9/2011)
सक्षम व पाञ नव्हता म्हणून अर्जदाराची मागणी अमान्य केलेली आहे. हे गैरअर्जदार क्र.2 चे मत ग्राह्य धरण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत ग्राहक मंच आले आहे.
10. शासन परिपञकानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत वाहनाने किंवा मोटार अपघाताने मृत्यु झाल्यास, त्याचेकडे वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे, असे नमूद केले आहे. प्रस्तुत प्रकरणात मृतकाचा अपघात त्याच्याच वाहनाने वाहन चालवीत असतांना त्याचे निष्काळजीपणा मुळे झाला. गैरअर्जदार क्र.2 यांनी वैध वाहन परवाना मृतकाजवळ अपघाताचे वेळी नव्हता व मागणी करुनही अर्जदार हीने सादर केला नाही, या कारणामुळे विमा दावा नाकारला, यात गैरअर्जदार क्र.2 यांनी कायदेशीरपणे योग्य कारणाने विमा दावा नाकारला असल्याने, सेवा देण्यात न्युनता केली नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही, असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे.
वरील कारणे व निष्कर्षानुसार तक्रार खारीज करण्यास पाञ आहे. तक्रार खारीज करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यांत यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/08/2011.