नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर न करुन सेवेत त्रुटी केली म्हणून विम्याचे लाभ मिळणेकरीता प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रार अर्ज क्र.१९३/११
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचे पती गुलाब पाच्या पावरा हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाचे राज्यातील सर्वखातेदार शेतक-यांच्या कल्याणासाठी विम्याचे संरक्षण असावे विरुध्द पक्ष क्र.३ दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी (यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांच्याकडे प्रती शेतकरी रु.८/- प्रमाणे प्रिमियमभरुन प्रत्येक शेतक-याचा रु.१,००,०००/- चा विमा उतरवला आहे. सदर योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी विरुध्द पक्ष क्र.२ कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांची नियुक्ती केली आहे.
३. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, दि.०९/०५/१० रोजी त्यांचे पतीचे अपघाती निधन झाले. त्यांनी विमा असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी शिरपूर यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दाखल केला. कृषी अधिकारी यांनी तो कबालकडे पाठवला. परंतू त्यांनी विम्याचे लाभ दिले नाहीत व सेवेत त्रुटी केली आहे.
४. तक्रारदार यांनी शेवटी विरुध्द पक्ष यांच्याकडून विम्याची रक्कम रु.१,००,०००/- व त्यावर १८ टक्के दराने व्याज, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु.२५,०००/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
५. विमा कंपनीने व कबाल इन्शुरन्स यांनी दाखल केलेल्या खुलाशात अर्जदार यांनी दि.१२/०५/११ रोजी विमा रकमेचा चेक फुल अॅण्ड फायनल सेटलमेंट म्हणून स्विकारल्याबद्दल पुरावा दाखल केला आहे व तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
६. दि.२७/०१/२०१२ रोजी तक्रारदार यांनी अर्ज देवून सदर तक्रार मागे घेत असल्याबाबत पुरसीस दाखल केली आहे. त्यामुळे सदर तक्रार निकाली काढणे योग्य व न्यायाचे होईल असे आम्हांस वाटते. वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(सी.एम.येशिराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे