आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 अर्जदाराने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत परत एकदा आवश्यक
त्या सर्व कागदपत्रांसह मयत पतीचा विमादावा आदेश तारखे पासून 30
दिवसांच्या आत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल करावा.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 याने अर्जदाराचा सदर विमादावा प्राप्त झाल्यानंतर 08
दिवसांच्या आत गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवावा.
4 गैरअर्जदार क्रमांक 3 याने सदरचा विमादावा प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसाच्या
आत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवावा, व गैरअर्जदार क्रमांक 2 याने सदर
विमादावा प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत सदरचा विमादावा गैरअर्जदार
क्रमांक 4 विमा कंपनीकडे पाठवावा.
5 गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने सदरचा विमादावा प्राप्त झाल्यानंतर
एक महिन्याच्या आत विमादावा गुणवत्तेवर निकाली काढावा.
6 तक्रारी खर्च ज्याचा त्यांनी करावा.
7 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.एस.एम.आळशी. सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.सदस्या. मा.अध्यक्ष.