निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 14/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 16/07/2011 कालावधी 05 महिने. 02 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. मुक्ताबाई भ्र.गोविंद मोहिते. अर्जदार वय 27 धंदा.घरकाम. अड.ए.डी.खापरे रा.धानोरा मोत्या ता.पूर्णा.जि.परभणी. विरुध्द 1 तालुका कृषी अधिकारी साहेब. गैरअर्जदार. तालुका कृषी कार्यालय,पूर्णा.ता.पूर्णा.जि.परभणी. 2 तहसिलदार साहेब. तहसिल कार्यालय,पूर्णा.ता.पूर्णा.जि.परभणी. 3 विभागीय व्यवस्थापक कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन एच.डी.एफ.सी. होम लोन बिल्डींग, प्लॉट क्रमांक 7 सेक्टर ई-1, टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. 4 व्यवस्थापक. . अड.गोपाल दोडीया रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमीटेड, 570 रेक्टीफायर हाऊस इंदोरिजीन इलेक्ट्रीक लिमीटेड, नायगम क्रॉसरोड.नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट, वडाळा ( वेस्ट ),मुंबई 400031. ( निकालपत्र पारित व्दारा.श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष. ) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार मौजे धानोरा मोत्या ता.पूर्णा येथील रहिवासी असून तीचा पती मयत गोविंद लक्ष्मण मोहिते हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची गट क्रमांक 267 धानोरा येथे शेतजमिन आहे. दिनांक 07/04/2009 रोजी त्याचा मोटार सायकल अपघातात त्याचा मृत्यू झाला.सोनखेड जि.नांदेड येथील पोलिस स्टेशनला अपघाताची खबर दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवुन घटनास्थळाचा व शवाचा मरणोत्तर पंचनामा केला.व सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे पतीच्या अपघाती मृत्यूची मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह 01/06/2009 रोजी क्लेम दाखल केला.त्यांनी मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे क्लेम पाठविलयावर गैरअर्जदार क्रमांक 3 ने तारीख 03/02/2009 चे पत्र पाठवुन आणखी काही कागदपत्रांची मागणी केली होती त्याचीही पुर्तता अर्जदाराने केली,परंतु क्लेम मंजुरी बाबत आज अखेर गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी कळविले नाही. अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळवी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यतील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 24 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 2 ने नोटीस स्विकारुनही नेमलेल्या तारखेस हजर राहून आपले म्हणणे सादर न केल्यामुळे त्याचेविरुध्द दिनांक 27/04/2011 रोजी एकतर्फा हुकूम करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपले लेखी म्हणणे (नि.10) प्रकरणात दिनांक 23/03/2011 रोजी दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 3 ने पोस्टामार्फत पाठविलेला लेखी जबाब प्रकरणात ( नि.11) वर समाविष्ट केला आणि गैरअर्जदार क्रमांक 4 यांने आपला लेखी जबाब (नि. 22) दिनांक 27.04.2011 रोजी सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.10) असा खुलासा केला आहे की, मयत गोविंद मोहिते याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाईचा विमा प्रस्ताव अर्जदाराकडून तारीख 28/10/2009 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर कागदपत्रांची आवश्यक ती जुळणी करुन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत तो प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविला. विमा कंपनीकडून क्लेम मंजूरी अथवा नामुंरीचे पत्र आले नाही. विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या बाबतीत गैरअर्जदार क्रमांक 1 कडून टाळाटाळ झालेली नव्हती,सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना दोषी धरु नये.अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र ( नि.20) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांच्या लेखी जबाबात (नि.11) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्यक ती पूर्तता करुन घेण्यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत. किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत गोविंद मोहिते याच्या डेथ क्लेमची कागदपत्रे त्याना 08.07.2009 रोजी मिळाले परंतु त्यामध्ये काही आवश्यक कागदपत्रे नव्हती त्या अपू-या कागदपत्रात बँक पासबुक, फेरफार उतारा, घटनास्थळाचा पंचनामाच्या सर्टीफाईड कॉपीज नसल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराला दिनांक 20.07.2009 रोजी कळविले होते त्यानंतर तारीख 15.09.2009, तारीख 03.02.2010, तारीख 24.02.2010 रोजी स्मरणपत्र पाठविली.त्यानंतर कागदपत्रे प्राप्त झाल्यावर क्लेम मंजुरीसाठी विमा कंपनीकडे तारीख 02.06.2010 रोजी पाठविली मंजुरीसाठी अद्याप तो प्रलंबीत आहे. सबब त्याना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत विमा कंपनीचे दिनांक तारीख 15.02.2009, व तारीख 03/02/2010 व तारीख 24.02.2010 रोजी पाठविलेल्या स्मरणपत्रांच्या छायाप्रती दाखल केल्या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 4 ने आपले लेखी जबाबात ( नि.22) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन मयत गोविंद मोहिते याच्या शेतकरी विमा क्लेम संबंधी पाठवलेल्या कागदपत्रात बरीच कागदपत्रे अपूरी असल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यानी अर्जदाराला डी.ए.एस.ओ.मार्फत पत्र व स्मरणपत्रे पाठवूनही त्याचेकडून कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही असे कबाल ब्रोकरेज इन्शुरंस कंपनी यांचेकडून चौकशीही केली तेव्हा समजले आहे.तक्रार अर्जातून शेतकरी विमा पॉलिसीची त्यांचेकडून विम्याचा मजकूर वगळता इतर सर्व विधाने विमा कंपनीने साफ नाकारलेली आहेत व अर्जदाराला ग्राहक मंचाने तक्रार कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नाही, सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 4 चे शपथपत्र (नि. 23) दाखल केले आहे. पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे व संबंधीत वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती निधनाची विमा नुकसान भरपाई रुपये 100000/- देण्याचे आजपर्यंत रखडत ठेवुन सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा पती मयत गोविंद मोहिते शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात नि.4 लगत सादर केलेल्या महसूल रेकॉर्डच्या कागदपत्रावरुन आणि नि.4/3 वरील तलाठयाचे प्रमाणपत्रा वरुन शाबीत झाले आहे. दिनांक 07.04.2009 रोजी मयत गोविंद मोहिते याचा मोटार सायकल अपघातात मृत्यू झाला होता ही वस्तूस्थिती देखील पुराव्यात दाखल केलेल्या नि. 4/11 वरील सोनखेड पोलिस स्टेशन गु.रजि.नं. 18/09 वरील घटनास्थळ पंचनामा, नि.4/09 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/13 वरील पोस्टमार्टेम रिपोर्ट व सरकारी हॉस्पिटलने पोलिसांना पाठविलेली एम.एल.सी. (नि.4/8) या कागदपत्रातून शाबीत झाले आहे. मयत गोविंद मोहिते हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी. अर्जदाराने वर नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 2 तहसिलदार पूर्णा यांचेकडे नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता व ती कागदपत्रे गैरअर्जदारास मिळालेली होती ती अडमिटेड फॅक्ट आहे परंतू त्या व्यतिरीक्तही आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता होती म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 यानी वेळोवेळी पाठविलेल्या पत्रानुसार व स्मरणपत्रातून केलेल्या कागदपत्राची केलेल्या मागणी प्रमाणे त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता अर्जदाराने केलेली होती व त्यानुसार क्लेम प्रस्ताव कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविलेला आहे असे गैरअर्जदार कमांक 1 यांनी लेखी जबाबातून व शपथपत्रातून ही सांगीतले आहे.त्यामुळे जिल्हा कृषी अधिका-यानी क्लेम फॉर्मसह ती सर्व कागदपत्रे नुकसान भरपाई मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 4 कडे नक्कीच पाठविली असलीच पाहीजेत याबद्यल तिळमात्र ही शंका वाटत नाही. पुराव्यातून ही बाब सिध्द झालेली असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यानी कागदपत्रांची अर्जदाराकडून पूर्तता झाली नाही असे खोटे निवेदन केवळ नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच केले असले पाहीजे यापेक्षा वेगळा निष्कर्ष निघूच शकत नाही. प्रस्तूत प्रकरणात ही आपल्या लेखी जबाबात खोटा व चुकीचा बचाव घेवून मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असे खेदाने म्हणावे लागते. अर्जदाराने पुराव्यात दाखल केले प्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे क्लेम मंजुरीसाठी दिलेली असताना गैरअर्जदार क्रमांक 4 यानी अर्जदाराच्या विमा क्लेम विना कारण मंजुरीविना रखडत ठेवुन अर्जदाराचे आर्थिक नुकसान करुन तीचेवर अन्याय केलेला आहे याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 4 कडून निश्चतीपण सेवा त्रूटी झालेली आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 4 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेम ची नुकसान भरपाई रुपये 100000/- ( रुपये एक लाख फक्त ) आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत द.सा.द.शे. 9 % दराने मंचात प्रकरण दाखल तारखेपासून म्हणजे दिनांक 14.02.2011 पासून व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |