जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 146/2011 तक्रार दाखल तारीख – 14/06/2011
निकाल तारीख - 10/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 07 म. 26 दिवस.
1) लक्ष्मण धोंडीबा दंडिमे,
वय – 32 वर्षे, धंदा – शेती,
2) गयाबाई भ्र. धोंडीबा दंडिमे,
वय – 58 वर्षे, धंदा – शेती,
रा. मौ. गंगापुर, ता.जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) तलाठी,
मौ. गंगापुर, ता.जि. लातुर.
2) तहसीलदार,
तहसील कार्यालय,
ता. व जि. लातुर.
3) जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय,
लातुर.
4) कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी,
लातुर.
5) कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा. लि.
दुकान नं. 2 दिशा अलंकार,
टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद.
6) महाव्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी,
प्रादेशीक कार्यालय, अंबिका भवन क्र. 19,
तिसरा मजला, धरमसेठ एक्सटेंशन
शंकर नगर चौक, नागपुर – 440010.
7) व्यवस्थापक,
युनायटेड इन्शुरन्स कंपनी लि.,
कार्यालय टिळक नगर, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.एस.रांदड.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 5 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 6 व 7 तर्फे :- अॅड.एस.व्ही.तापडीया.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हे मयत दंडिमे धोंडिबा उर्फ धोंडिराम रामा यांचे कायदेशीर वारसदार आहेत. मयत दंडिमे धोंडिबा उर्फ धोंडिराम रामा हा मौजे गंगापुर ता. व जि. लातुर येथील रहिवाशी असून त्याचे मालकी व कब्जेची मौजे गंगापुर येथे शेत जमीन आहे. त्याचा गट क्र. 132 असून क्षेत्र 2 हेक्टर 88 आर जमीन आहे. शासनाने प्रत्येक शेतक-यांचा विमा गैरअर्जदार नं. 6 कडे उतरविला आहे. दि. 20/07/2010 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये बैल चारत असताना अचानकपणे एका बैलाने शिंगाने उचलून आपटले. त्यामुळे मयतास जांघेत व इतर ठिकाणी जबर मार लागला. लगेच अर्जदार यांनी मयतास विवेकानंद हॉस्पीटल येथे दाखल केले उपचार चालू असताना मरण पावले. सदरील घटना आकस्मिक स्वरुपाची आहे. बैलाला चारत असताना अचानकपणे घडली. म्हणून ग्रामीण
पोलीस स्टेशन लातुर येथे पोलिसांनी तपास केला ज्याचा रजि नं. 36/10 असा आहे. तशी पोलीसांनी तपास कामाची कागदपत्रे तयार केली. अर्जदाराने गैरअर्जदारास आपल्या नोटिस सोबत दि. 30/03/2011 रोजी सर्व कागदपत्रे व जमिनीचा सात बाराच्या सत्यप्रती नोटिस सोबत पाठवून दिल्या. आजपर्यंत सदर नोटिसचे काहीही उत्तर आले नाही. म्हणून गैरअर्जदारानी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु. 1,00,000/- व अपघाती तारखेपासुन 12 टक्के व्याजाने दयावेत. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/-, दाव्याचा खर्च रु. 5,000/- असे देण्यात यावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत विवेकानंद रुग्णालय चे पत्र, आकस्मिक मृत्यू खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, अखेर अहवाल क्र. 26/10, जाहीर प्रगटन, तालुका दंडाधिकारी लातुर यांचे आदेश, गट नं. 132 चा 7/12 आठ ‘अ’, नोटीस, डाक नोंद परत पावतीने नोटीस पाठवलेली पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 6 व 7 च्या म्हणण्यानुसार अर्जदाराने जनता अपघात पॉलिसी घेतलेली होती व त्याचा कालावधी दि. 15/08/2009 ते 14/08/2010 असा होता. तसेच धोंडिराम दंडिमेचा मृत्यू अपघाती झाला होता ही बाब अर्जदाराने सिध्द करावी. तशीच त्यांच्याकडे गट क्र. 132 मध्ये 2 हेक्टर 88 आर जमीन गंगापुर येथे आहे ही बाब अर्जदाराने सिध्द करावी. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा बैलाने पाडल्याने झाला ही बाब अर्जदाराने सिध्द करावी. अर्जदाराने दि. 30/03/2011 रोजी कागदपत्रे पाठवली होती ही बाब सिध्द करावी. अर्जदाराचा तक्रारी अर्ज पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसानंतर आल्यामुळे सदरचा अर्ज हा विचारात घेण्याजोगा नसल्यामुळे विमा कंपनीची कोणतीही जबाबदारी दिसुन येत नाही.
गैरअर्जदार कबाल इंन्शुरन्सच्या म्हणण्याप्रमाणे सदरचा अर्ज हा त्यांच्याकडे आलेला नाही. तसेच तहसीलदार लातुर यांनी से साठी वेळ मागितला. मात्र त्यानंतर आपले म्हणणे दाखल केलेले नाही. गैरअर्जदार विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा क्लेम हा त्यांना मिळालेला नाही. म्हणून पॉलिसीच्या 90 दिवसाच्या अखेरपर्यंत अर्जदाराने तक्रार अर्ज पाठवलेला नसल्यामुळे सदर केस ही फेटाळण्यात यावी. तक्रारदाराने मयत धोंडिराम दंडिमेचा मृत्यू हा बैलाने मारल्याने झाला, हि बाब सिध्द करावी. तसेच त्यास गट नं. 132 मध्ये 2 हेक्टर 88 आर जमीन गंगापुर येथे आहे, ही बाब सिध्द करावी. गैरअर्जदाराकडे क्लेमच आलेला नसल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. मात्र अर्जदाराकडुन गैरअर्जदाराला क्लेम अर्ज पोहचलेला नाही.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. अर्जदाराचा क्लेम फॉर्म गैरअर्जदार इंन्शुरन्स कबाल कंपनी यांच्याकडे आला नाही. त्यानंतर विमा कंपनीकडे जाणे दुरच राहिले. तसेच सदर केसमध्ये तहसीलदार लातुर हजर आहे. मात्र त्यांनी सुध्दा म्हणणे देण्यासाठी वेळ मागितला. मात्र आजपर्यंत त्यांचे म्हणणे आलेले नाही. अर्जदार गैरअर्जदारांची ग्राहक असूनही त्यांना जर कागदपत्रे व क्लेम अर्ज पोहचला नसेल तर त्यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली ही बाब सिध्द होणार नाही. तसेच अर्जदाराने शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत येणारा क्लेम फॉर्म देखील पाठवल्याचे कागदपत्रे मंचात दाखल केलेली आहेत. त्यावर सदरचा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि. 02/08/10 रोजी पोहचलेला आहे. मात्र या गैरअर्जदाराने आपले म्हणणे दाखल केलेले नाही. म्हणून विमा कंपनीची यात त्रुटी नसून म्हणून सदरचा अर्ज पुन्हा अर्जदाराने रितसर आदेश प्राप्तीनंतर 30 दिवसात पाठवावा. 45 दिवसानंतर विमा कंपनीने सदर प्रस्तावाचा विचार करुन अर्जदाराचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली काढावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) सदरचा प्रस्ताव अर्ज अर्जदाराने रितसर आदेश प्राप्तीनंतर 30 दिवसात
तो प्रस्ताव मुदतीत गैरअर्जदार क्र. 6 कडे पाठवावा व गैरअर्जदार क्र. 6 ने 45
दिवसात तो प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली काढावा.