Maharashtra

Nagpur

CC/359/2017

SHRI. NIKHIL RAJNIT BHOWTIK - Complainant(s)

Versus

TAJSHREE AUTO WHEELS PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. NIKHIL BHOWTIK

29 Jul 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/359/2017
( Date of Filing : 28 Aug 2017 )
 
1. SHRI. NIKHIL RAJNIT BHOWTIK
R/O. PLOT NO. 153, TRUST LAYOUT, NORTH AMBAZARI, NAGPUR UNIVERSITY CAMPUS ROAD, NAGPUR-440033
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. TAJSHREE AUTO WHEELS PVT. LTD.
R/O. PLOT NO. 9, DEVNAGAR, KHAMALA ROAD, NAGPUR-440015
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. NIKHIL BHOWTIK, Advocate
For the Opp. Party: Adv. Vora, Advocate
Dated : 29 Jul 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष हे होंडा कंपनी निर्मित टू व्‍हीलर (दुचाकी) वाहनाचे विक्रेता आहे. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाच्‍या ताजश्री ऑटोव्‍हील्‍स प्रा.लि. देवनगर, खामला नागपूर येथील शोरुम मध्‍ये दि. 30.03.2017 ला दुपारी 1.30 वाजताच्‍या दरम्‍यान दुचाकी वाहन खरेदीकरिता गेला असता विरुध्‍द पक्ष सेल्‍स मॅनेजर, श्री.प्रकाश चोपडे यांनी तक्रारकर्त्‍याला भेटून दुचाकी वाहन दाखविले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने होंडा डीओ डी.एल.एक्‍स मॉडेल घेण्‍याचे ठरविले. त्‍यानंतर सेल्‍स मॅनेजर यांना होंडा डीओ ची किंमत विचारली असता सेल्‍स मॅनेजर, प्रकाश चोपडे यांनी शोरुम मध्‍ये दि. 31.03.2017 पर्यंत ऑफर सुट सुरु आहे आणि जर तुम्‍ही आज दुचाकी विकत घेतली तर तुम्‍हाला रुपये 20,000 ते 22,000/- एवढया डिस्‍काऊंट मिळणार असे सांगितले व त्‍याकरिता तुम्‍हाला रक्‍कम रोख किंवा चेक किंवा आर.टी.जी.एस. द्वारे अदा करावे लागेल असे सांगितले. त्‍यावर तक्रारकर्त्‍याने सेल्‍स मॅनेजरला सांगितले की, मी संपूर्ण रक्‍कम चेक द्वारे अदा करणार यावर विरुध्‍द पक्षाचे सेल्‍स मॅनेजर यांनी आपली संमती दाखविली व   त्‍यांनी कागदपत्र दाखवून चेक कॅश काऊन्‍टरवर देण्‍यास सुचविले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने सेल्‍स एझेकेटीव यांना भेटून कोटेशन बनवून घेतले. विरुध्‍द पक्षाच्‍या मॅनेजरने तक्रारकर्त्‍याकडून आर.टी.ओ.रजिस्‍ट्रेशन व टॅक्‍सकरिता लागणारे कागदपत्रे मागवून तक्रारकर्त्‍याला रोख रक्‍कम रुपये 700/- कॅश काऊन्‍टरला भरण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने चेक नं. 655105, दि. 30.03.2017 रुपये 38,551/- चा धनादेश व कोटेशन कॅश काऊन्‍टरवर जमा केल्‍यावर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पावती दिली. विरुध्‍द पक्षाच्‍या सेल्‍स मॅनेजरने तक्रारकर्त्‍यास डीओ डी.एल.एक्‍स. मॉडेल दि. 31.03.2017 ला शोरुम मध्‍ये येऊन भरलेल्‍या रक्‍कमेची पावती दाखवून घेऊन जाण्‍यास सांगितले.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो दुस-या दिवशी म्‍हणजे दि. 31.03.2017 ला दुपारी 12.00 वाजताच्‍या दरम्‍यान विरुध्‍द पक्षाचे सेल्‍स एझेकेटीव, श्री.मनिष लोंढे यांच्‍या मोबाईल क्रं. 8605394185 यावर संपर्क करुन गाडीच्‍या डिलेवरीबाबत विचारणा केली असता त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला  सांगितले की, ज्‍या व्‍यक्‍तीने रक्‍कम चेक द्वारे अदा केली आहे त्‍यांना गाडी देण्‍यात येणार नाही, कारण चेक क्‍लीयरींगकरिता 2-3 दिवस लागतात. त्‍यावर  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे सेल्‍स एझेकेटीव यांना विनंती केली की, तो रोखीने रक्‍कम देण्‍यास तयार आहे, परंतु त्‍याला गाडीची डिलीवर देण्‍यात यावी, परंतु विरुध्‍द पक्षाचे एझेकेटीव यांनी तक्रारकर्त्‍याला नकार दिला व त्‍यांच्‍या विनंतीची दखल घेतली नाही. तक्रारकर्ता शोरुमला भेट देण्‍यास गेला असता शोरुम बंद असे शोरुमवर लिहिलेले होते व बाहेर गाडीची डिलीवरी  घेण्‍याकरिता खूप गर्दी होती. तिथे लोकांशी विचारणा केली असता असे कळले की, ज्‍या लोकांनी चेक द्वारे व्‍यवहार केले आहे त्‍यांना गाडीची डिलीवरी देण्‍यास नकार देऊन लोकांची फसवणूक करण्‍यात आली आहे. त्‍यांनतर तक्रारकर्त्‍याने वारंवारं विरुध्‍द पक्षाच्‍या एझेकेटीवच्‍या मोबाईलवर संपर्क साधला असता त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो दि. 01.04.2017 ला शोरुम उघडल्‍यावर सेल्‍स एझेकेटीव व सेल्‍स मॅनेजर यांना भेटला, त्‍यावेळी त्‍यांनी सांगितले की, चेकने व्‍यवहार करणा-यांना गाडीची डिलीवरी दिली नाही. तक्रारकर्त्‍याने राधा अय्यर यांचा मोबाईल क्रं. 942305355 यांच्‍या दूरध्‍वनीवर संपर्क सांधून विचारणा केली असता राधा अय्यर यांनी धनादेशाद्वारे रक्‍कम दिल्‍यावर ही त्‍यांना गाडीची डिलीवरी दिल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना दि. 10.04.2017 ला नोटीस पाठविली असता विरुध्‍द पक्ष यांनी सदरच्‍या नोटीसला दि. 17.05.2017 ला उत्‍तर पाठविले व त्‍याद्वारे कळविले की, तक्रारकर्त्‍याला गाडी खरेदीकरिता रक्‍कम रोख स्‍वरुपात देण्‍यास सांगितले होते व तक्रारकर्त्‍याने रक्‍कम चेक द्वारे दिल्‍यामुळे गाडीची डिलीवरी देऊ शकत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍या समोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्‍ध नसल्‍यामुळे त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला Honda Dio Delux model Bule Colour या गाडीची डिलीवरी देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाईकरिता रुपये 90,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5000/- देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपला लेखी जबाब नि.क्रं. 9 वर दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हा वेगवेगळया कंपनीने निर्मित केलेल्‍या  दुचाकी वाहन विक्रीचा व्‍यवसाय करतो व सदरची कंपनी ही 1956 च्‍या कायदा अंतर्गत रजिस्‍टर्ड आहे. विरुध्‍द पक्ष कंपनी हिरो होंडा यांनी निर्मित  केलेल्‍या दुचाकी वाहनाचा विक्रेता आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या शोरुमला दि. 30.03.2017 ला भेट दिल्‍याचे कथन मान्‍य केले आहे परंतु तक्रारकर्ता 13.30 वाजता भेट देऊन तेथील सेल्‍स मॅनेजर प्रकाश चोपडे यांनी तक्रारकर्त्‍याला इन्‍टरटेन्‍मेंट केल्‍याचे माहिती अभावी नाकारलेले आहे. हिरो होंडा कंपनीने त्‍यांनी निर्मित केलेले  BS III emission टू व्‍हीलर वाहनाला काही विशिष्‍ट कालावधीकरिता व तोटका साठा भरपूर सुट देऊन विक्रीला काढल्‍यामुळे ग्राहकांची बरीच गर्दी वाहन खरेदीकरिता विरुध्‍द पक्षाच्‍या शोरुमला झाली होती, अशा परिस्थितीत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वैयक्तिक लक्ष दिले असेल असे निश्चित सांगू शकत नाही. विरुध्‍द पक्षाच्‍या प्रतिनिधीने त्‍याला देण्‍यात आलेल्‍या प्रशिक्षणानुसार त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला शोरुम मधील टू व्‍हीलरची माहिती दिली व त्‍यावर देण्‍यात येत असलेल्‍या सुटबाबतची माहिती दिली. भारत सरकारने रचलेल्‍या पॉलिसी नॉर्म मध्‍ये झालेल्‍या बदलामुळे भारत स्‍टेज III अंतर्गत निर्मित वाहनांना बाहेर काढण्‍याबाबत संबंधित अॅथोरिटीला दि. 31.03.2017 पर्यंत त्‍याची नोंद घ्‍यावयाची होती. सदर तारखेनंतर भारत स्‍टेज IV emission नॉर्मसचे पालन करणा-या वाहनाला विक्रीची परवानगी नोंदणी मोटर वाहन कायदा अंतर्गत देण्‍यात आली होती, अशा परिस्थितीत BS III चा शिल्‍लक साठा व प्रत्‍येक मॉडेलवर वेगवेगळी भरपूर सुट देऊन विक्रीस काढण्‍याकरिता होंडा मोटर्स इंडिया अॅटोमोबाईलच्‍या नि‍र्मात्‍यांनी माहे मार्च 2017 ला शर्तीला अधीन राहून रुपये 10,000/- पर्यंतची सुट अशी स्‍थानिक वर्तमानपत्रातून त्‍यांच्‍या स्किमची जाहिरात दिली होती.

 

  1.      विरुध्‍द पक्षाचे सेल्‍स मॅनेजर प्रकाश चोपडे यांनी वाहनाच्‍या खरेदीकरिता तक्रारकर्त्‍याला कोणत्‍या प्रकारे रक्‍कम जमा करावी याबाबत मार्गदर्शन केल्‍याचे कथन नाकारले असून विरुध्‍द पक्षाने वाहन खरेदीपोटी तक्रारकर्त्‍याची रक्‍कम रोखीने, क्रॉस चेक किंवा आर.टी.जी.एस.द्वारे जमा करण्‍याबाबत सोय केली होती. जर विरुध्‍द पक्षाने सदर रक्‍कम धनादेशाद्वारे स्‍वीकारली असल्‍यास जो पर्यंत धनोदशाची रक्‍कम विरुध्‍द पक्षाच्‍या खात्‍यात जमा होत नाही तो पर्यंत वाहनाची विक्री होत नाही. विरुध्‍द पक्षाकडे वाहनाचा अगदी तोटका साठा असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला त्‍याच्‍या अधिकाराचा वापर करण्‍याची मोकळीकता  आहे आणि ज्‍यांची रक्‍कम रोखीने किंवा आर.टी.जी.एस.द्वारे प्राप्‍त झाली त्‍यास विरुध्‍द पक्षाने प्रथम येणा-यास प्रथम सेवा देऊन टू व्‍हीलरची विक्रीची ऑफर दिली.
  2.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने कंपनीच्‍या सेल्‍स मॅनेजरच्‍या सुचनेनुसार तक्रारकर्ता सेल्‍स काउन्‍सलर मनिष लोंढे यांच्‍याशी संपर्क साधून निविदा तयार करुन घेतल्‍याचे कथन अमान्‍य केलेले आहे. निविदाचे अवलोकन केल्‍यावर निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने डीओ डी.एल.एक्‍स. आणि अॅक्टिव्‍हा 4 जी या 2 गाडयांची निविदा मिळण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली व प्राप्‍त केली. सदर निविदामध्‍ये डीओ डी.एल.एक्‍सची  किंमत रुपये 58,703/- नमूद करण्‍यात आली होती.  सदर निविदा द्वारे स्किममधील पॉलिसी प्रमाणे देण्‍यात येणारी सुट नमूद करण्‍यात आली नव्‍हती. तक्रारकर्त्‍याने बुकिंग रक्‍कम रुपये 700/- रोखीने जमा केली व जमा केलेला धनादेश वटविण्‍याच्‍या अटीवर तसेच धनादेश वटण्‍याच्‍या तारखेवर उपलब्‍ध असलेल्‍या स्‍टॉकच्‍या अधीन राहूनच तक्रारकर्त्‍याने बुकिंग रक्‍कम रुपये 700/- आणि डीओ.डी.एल.एक्‍सबाबतची रक्‍कम धनादेशाद्वारे विरुध्‍द पक्षाकडे जमा केली होती. विरुध्‍द पक्षाच्‍या कर्मचा-यांनी कायद्यानुसार गाडीची आर.टी.ओ.नोंदणीकरिता आवश्‍यक असणारे दस्‍तावेज तक्रारकर्त्‍याला जमा करण्‍यास सांगितले. तक्रारकर्ता हा सुशिक्षित व्‍यक्‍ती असून त्‍याला कायद्याचे संपूर्ण ज्ञान असतांना तक्रारकर्त्‍याचा धनादेश विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या    कर्मचा-याने भरुन दिल्‍याचे कथन अमान्‍य केले आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे त्‍याच दिवशी वरीलप्रमाणे रक्‍कम भरली आणि विरुध्‍द पक्षाने त्‍याबाबतची पावती दिली. विरुध्‍द पक्षाच्‍या सेल्‍स मॅनेजरने वरील प्रमाणे रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याला दि. 31.03.2017 ला येऊन गाडी घेऊन जाण्‍याबाबत सांगितल्‍याचे कथन नाकारलेले आहे.
  3.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या विक्री सहाय्यकाच्‍या मोबाईल क्रं. 8605394185 वर दि. 30.03.2017 ला संपर्क साधल्‍याचे कथन अमान्‍य केलेले आहे. तसेच धनादेशा व्‍यतिरिक्‍त इतर पध्‍दतीने वाहनाची किंमत  देणा-या व्‍यक्तिनां गाडीची डिलीवरी देण्‍यात येईल असे सांगितल्‍याचे कथन ही अमान्‍य केले आहे. ज्‍या ग्राहकांनी गाडीची किंमत धनादेशाद्वारे अदा केली त्‍यांना गाडीची डिलीव्‍हरी देण्‍यात आली नसल्‍याचे तक्रारकर्त्‍याला सांगण्‍यात आल्‍याचे कथन नाकारलेले आहे. स्किम अंतर्गत देण्‍यात आलेल्‍या फायदयाचे फळ मिळण्‍याकरिता रक्‍कम रोखीने किंवा आर.टी.जी.एस.ने जमा करावयाचे होते आणि प्रथम येणा-यास प्रथम सेवा आणि गाडीचा स्‍टॉक उपलब्‍ध आणि विक्रेता विवेकबुध्‍दीनुसार या धरतीवर गाडीची डिलीवरी देणार हे तक्रारकर्त्‍याला गाडी बुकिंगच्‍या वेळेस माहिती असतांना स्‍वतःचा फायदा सुरक्षित ठेवण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने नशीब अजमावले. तक्रारकर्त्‍याला माहित होते की, गाडी बुकिंगची नोंदणी करणे  म्‍हणजे सदर स्किममधील मिळणारे फायदयाचे आश्‍वासन नाही. सामान्‍य परिस्थितीमध्‍ये कोणतीही व्‍यक्‍ती वाईट संकल्‍पाशिवाय कोणताही वार्तालाप ध्‍वनीमुद्रीत करीत नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षावर लावलेले आरोप व त्‍याच्‍याजवळ असलेल्‍या तक्रारकर्ता व मनिष यांच्‍या मधील संवादाचे ध्‍वनीमुद्रन केलेले संभाषण निःसंशयपणे तक्रारकर्त्‍याचा वाईट उद्देश दर्शवितो. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत विरुध्‍द पक्षाला पुरविलेले नि.क्रं. 7, आरोपाची सी.डी. ही निरंक/रिकामी (Blank ) असून ती चालवू शकत नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या शोरुमला दि. 31.03.2017 ला भेट दिल्‍याची माहिती अभावी नाकारले. कारण दि. 31.03.2017 ला विरुध्‍द पक्षाचे शोरुम बंद होते. शोरुम बंद असल्‍यामुळे त्‍यादिवशी शोरुमच्‍या समोर बरीच गर्दी असल्‍याचे कथन नाकारले. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीनुसार जमलेल्‍या गर्दीतील विचारणा केल्‍यानुसार ज्‍या व्‍यक्तिीनी धनादेशाद्वारे रक्‍कम अदा केली त्‍यानां वाहन देण्‍याचे कथन व त्‍यांना विरुध्‍द पक्षाने मुर्ख बनविल्‍याचे कथन नाकारलेले आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, सदर स्किम संपल्‍यानंतर ज्‍या ग्राहकांना सदर स्किम मध्‍ये फायदा मिळाला नाही, त्‍या ग्राहकांना विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली रक्‍कम रुपये 700/- परत केली. ज्‍या ग्राहकांनी सदर स्किम मध्‍ये बुकिंग केली होती त्‍यांना सदर स्किमच्‍या शर्ती व अटी माहिती होत्‍या. ज्‍या ग्राहकांना सदर स्किममध्‍ये तोटक्‍या स्‍टॉकमुळे समाविष्‍ट करण्‍यात आले नाही, त्‍यांना पत्र पाठवून कळविण्‍यात आले व त्‍यांनी जमा केलेली रोख रक्‍कम व धनादेश परत घेऊन जाण्‍याबाबत कळविण्‍यात आले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याला सदर पत्र मिळाले असावे, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली रक्‍कम रुपये 700/- बिन व्‍याज तक्रारकर्त्‍याला परत करण्‍यास व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेला धनादेश परत करण्‍यास तयार आहे व तसा ही तो विरुध्‍द पक्षाने वटविलेला नाही. कारण तक्रारकर्ता सदर स्किम मध्‍ये बेनिफिट मिळण्‍यास पात्र ठरलेला नाही. तक्रारकर्त्‍याने सदरची खोटी तक्रार दाखल केली असल्‍यामुळे ती दंडासह खारीज करण्‍यात यावी अशी विरुध्‍द पक्षाने विनंती केली आहे.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व त्‍यांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद केली आहे.

 

अ.क्रं. मुद्दे उत्‍तर

 

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय ? नाही.

3. काय आदेश ? अंतिम आदेशानुसार

  • कारणमिमांसा
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने  दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की,  होंडा कंपनी यांनी स्‍थानिक वृत्‍तपत्र लोकमत मधून दि. 30.03.2017 ला जाहिरात देऊन त्‍या द्वारे होंडा निर्मित दुचाकी वाहन BS III ची विक्री रुपये 10,000/- पर्यंत आकर्षक सुट देऊन विक्रीस काढले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या शोरुमला दि. 30.03.2017 ला भेट देऊन डीओ व अॅक्टिव्‍हा या गाडीची निविदा व गाडीचे आर.टी.ओ.नोंदणीच्‍या अनुषंगाने आवश्‍यक कागदपत्रासमवेत धनादेश क्रं. 655105 दिनांक 30.03.2017 अन्‍वये रुपये 38,551/- चा धनादेश व रोख रुपये 700/- विरुध्‍द पक्षाकडे जमा केले व त्‍याबाबतची पावती विरुध्‍द पक्षाकडून प्राप्‍त केली होती. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. परंतु होंडा कंपनी दिलेल्‍या जाहिरातीमध्‍ये स्‍पष्‍ट नमूद करण्‍यात आले की, Accessories shown the picture are not a part of the standard equipment Scheme is valid till 31st March 2017 Scheme is applicable on all BS III models till stocks last. Scheme is given at the sole discretion of the dealer, Conditions apply.  विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या निविदा अर्जामध्‍ये नमूद केले होते की, सदर स्किम मध्‍ये जमा करावयाची रक्‍कम डी.डी./चेक/पे ऑर्डर ताजश्री अॅटोव्‍हील प्रा.लि. (Payable at Nagpur) या नावाने जमा करावयाचे आहे व वाहनाची डिलीवरी धनादेश वटविण्‍याच्‍या अधीन राहून करण्‍यात येईल. तसेच आर.टी.जी.एस.द्वारे जमा करावयाची रक्‍कम कोणाच्‍या नांवे जमा करावयाची याबाबत ही सूचित करण्‍यात आले होते. विरुध्‍द पक्षाने त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या BS III वाहनाची स्किम द्वारे करावयाची विक्री त्‍यांच्‍याकडे प्राप्‍त झालेल्‍या अर्जामधून त्‍यांना देण्‍यात आलेल्‍या विशेष अधिकाराचा वापर करुन स्‍वविवेकबुध्‍दीनुसार प्रथम येणा-यास प्रथम सेवा या आधारावर ज्‍या ग्राहकांनी रक्‍कम आर.टी.जी.एस. द्वारे जमा केली त्‍यांना त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या तोटक्‍या साठयाच्‍या मर्यादेत राहून केली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे सदर स्किममध्‍ये अदा करावयाची रक्‍कम धनादेशाद्वारे जमा केली आहे व सदरचा धनादेश विरुध्‍द पक्षाने वटविलेला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने सदर स्किम BS III या टू व्‍हीलर वाहनाची विक्री करतांना तक्रारकर्त्‍याला  कोणत्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला असे म्‍हणता येणार नाही. तसेच ज्‍या ग्राहकांनी विरुध्‍द पक्षाकडे त्‍यांच्‍या वाहन खरेदीपोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 700/- व धनादेश जमा केले आहेत त्‍यांना परत घेऊन जाण्‍याबाबत सूचित केले आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                       अंतिम आदेश

 

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.
  2.  उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.
  4.  तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.