Maharashtra

Nagpur

CC/684/2015

UTTAM PANDHARINATH DAHAKE - Complainant(s)

Versus

TAJASHREE CHEVROLEST/ TAJASHREE MOTORS PVT. LTD. - Opp.Party(s)

P.N. VAIDYA

18 Oct 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/684/2015
( Date of Filing : 04 Nov 2015 )
 
1. UTTAM PANDHARINATH DAHAKE
R/O. PLOT NO. 80-A, TAPOVAN, WARDHA ROAD, SOMALWADA, NAGPUR-440025
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. TAJASHREE CHEVROLEST/ TAJASHREE MOTORS PVT. LTD.
NEAR TELEPHONE EXCHANGE, WADI, AMRAVATI ROAD, NAGPUR-440028 / TAJASHREE SAI, 01, AJANI SQR. WARDHA ROAD, NAGPUR-440015
Nagpur
Maharashtra
2. PRESIDENT& MANAGING DIRECTOR (ARVIND SAXSENA), GENERAL MOTORS INDIA PVT.LTD
CHANDRAPURA INDUSTRIAL ESTATE, ALOL-389351
PANCHMAHAL
Gujarat
3. CUSTOMER ASSISTANT CENTER
PLOT NO. 15, ECHELON INDUSTRIAL AREA, SECTOR 32, GURGAON -122001.
GURGAON
HARIYANA
4. REGIONAL TRANSPORT OFFICER
CIVIL LINES, NAGPUR
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:P.N. VAIDYA, Advocate
For the Opp. Party: ADV. SUMITRA SINGALKAR, Advocate
Dated : 18 Oct 2019
Final Order / Judgement

 आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये –

 

तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल  केली असून तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालीलप्रमाणे.....

  1.        विरुध्‍द पक्ष क्रं. 1 हा वितरक (डीलर) असून विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे सेव्‍हरलेट ब्रान्‍ड या चारचाकी वाहनाचे निर्माते आहेत व विरुध्‍द पक्ष क्रं. 3 हे त्‍यांचे कस्‍टमर केअर सेंटर (ग्राहक सेवा केंद्र) आहे.  तक्रारकर्ता हा ए.जी. ऑफिस नागपूर येथून सेवानिवृत्‍त झालेले असून आज रोजी वकिली करीत आहेत. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडून  शेवरलेट स्‍पार्क कार खरेदी केली असून त्‍याचा रजिस्‍ट्रशन क्रं. एम.एच.31 /सी.आर. 4620 असा होता आणि ती त्‍याने  विरुध्‍द पक्ष यांच्‍या बायबॅक स्किम मध्‍ये विकण्‍याचे ठरविले आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी सदरहू कार ही रुपये 2,40,000/- ला खरेदी करण्‍याचे कबूल केले. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी नविन कार Chevrolet New Sail  (U-Va) 1.2 LS. ही कार तक्रारकर्त्‍याला रुपये 5,79,776/- मध्‍ये विकण्‍याचे कळविले. सदरहू किंमती मध्‍ये इन्‍श्‍युरन्‍सबाबतचे रुपये 18,620/- आणि आर.टी.ओ.रजिस्‍ट्रेशनचे रुपये 45,246/-  व लॉजिस्टिक / हॅन्‍डलिंगकरिता रुपये 5,000/-,  इतर खर्चाकरिता रुपये 3,000/-  आणि (वाढीव हमी) एक्‍सडेंट वॉरन्‍टीकरिता रुपये 5,175/- असल्‍याचे सांगितले. तसेच पंजाब नॅशनल बॅंक यांच्‍याकडून कर्ज मिळवून देणार असल्‍याचे ही सांगितले. पंजाब नॅशनल बॅंकेने तक्रारकर्त्‍याला रुपये 3,38,776/- चे कर्ज मंजूर करुन सदरहू रक्‍कम डी.डी. ने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ला दि. 19.12.2014 ला दिली. दि. 26.12.2014 ला विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने नविन कार ( इंजिन क्रं. 10CXDZ142750131 & Chassis No. MA6SFBK2EET001661) दिली आणि त्‍यासाठी रुपये 4,59,734/- ची पावती दिली. तक्रारकर्त्‍याला इन्‍श्‍युरन्‍स कव्‍हर नोट नं. 927343 प्रमाणे पॅकेज पॉलिसी दिली आणि त्‍याची आय.डी.व्‍ही. रुपये 4,68,975/- ठरविण्‍यात आली आणि विमा किस्‍त पोटी रुपये 18,620/- रुपये घेतले.
  2.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्‍याला फक्‍त रुपये 4,59,734/- ची पावती दिली असून सदरहू कारची एकूण किंमत 5,79,776/- अशी होती. याबाबत विरुध्‍द पक्ष 1 कडे विचारणा केली असता त्‍याने उडवाउडवीचे उत्‍तर दिले. तसेच तक्रारकर्त्‍याने डिसेंबर 2014 मध्‍ये कार बुक केल्‍यानंतर त्‍याला ऑक्‍टोंबर 2014 मध्‍ये उत्‍पादित केलेली गाडी दिली आणि सदरहू गाडयांच्‍या किंमती 27.10.2014 नंतर बदलण्‍यात आल्‍या. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी योग्‍य पावती देण्‍यास नकार दिला असून विरुध्‍द पक्ष यांनी निरनिराळया फॉर्म मध्‍ये सदरहू कारच्‍या वेगवेगळया किंमती लिहिलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍याने पुढे असा आरोप केला की, विरुध्‍द पक्ष यांनी विमा किस्‍तामध्‍ये आर.टी.ओ. चार्जेस मध्‍ये स्‍वतःसाठी कमिशन काढून तक्रारकर्त्‍याकडून जास्‍त रक्‍कम घेतलेली आहे.
  3.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, सदरहू कारचा दि. 09.01.2015 रोजी अपघात झाला आणि त्‍यावेळी वि.प. क्रं. 1 यांनी Salvage Value (तारण मूल्‍य) पोटी रुपये 1870.27 पै. घेतले. परंतु Salvage Value (तारण मूल्‍य)  परत केले नाही. सदरहू कारला पुन्‍हा दि. 17.06.2015 रोजी अपघात झाला आणि सदरहू गाडीची दुरुस्‍ती विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी वेळेवर करुन दिली नाही आणि तक्रारकर्ते यांना खर्चाबाबत रुपये 3,422/- देण्‍यास सांगितले आणि Salvage पोटी रुपये 1,522/- घेतले . तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याने दि. 13.02.2015 रोजी वकिला मार्फत नोटीस पाठविली आणि जास्‍तीची रक्‍कम घेतल्‍याबाबत तक्रार नोंदविली. त्‍यावर विरुध्‍द पक्ष यांनी केवळ एक पत्र पाठविले परंतु तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली जास्‍तीची रक्‍कम परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.
  4.        तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत................

       Particulars Of Claim :

Rs. 43,000/- Being refund of excess amount

  1.  

Rs.  5,586/- Being 30% Commission on insurance Premium 

     Discount.

Rs.  1870/-  Being Salvage Value of repairs on 10/01/2015 (para-

      10)

Rs. 32,000/- Being Compensation For Mental harassment,

     inconvenience & Agony & Medical expenses.

Rs.  4,565/-   Being interest @10.50 From 19/12/2014 to

     30/09/2015 for  288 days.

Rs.  5,000/- Notice Charges.

Rs.    526/-  Being Typing, X-Rox & Misc.Charge.

अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने Rs. 97,000/- Being Total Claim मंजूर करण्‍याची विनंती करुन पुढील व्‍याज 18 टक्‍के दराने मागितलेले आहे.

  1.        विरुध्‍द पक्ष 1 व 3 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 3  यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 23.05.2017 रोजी पारित करण्‍यात आला.  
  2.        विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 18 वर दाखल केला असून त्‍यात असे नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे कार वितरक (डीलर) नाही आणि principle to principle basis या तत्‍वाच्‍या आधार विरुध्‍द पक्ष क्रं. 1 हे विरुध्‍द पक्ष  2 चे वितरक आहेत. परंतु विरुध्‍द पक्ष क्रं. 2 चे एजंट नाही आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे  कोणत्‍याही प्रकारे जबाबदार नाही आणि म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार ही खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.
  3.        विरुध्‍द पक्ष क्रं. 4 आर.टी.ओ. यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 8 वर दाखल केलेला असून त्‍यांनी तक्रारीतील मजकूर नाकारलेला आहे.  विरुध्‍द पक्ष क्रं. 4 यांच्‍या विरुध्‍द वर्तमान तक्रारीमध्‍ये कोणतीही मागणी केलेली नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची विनंती केलेली आहे.
  4.        तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले कागदपत्र, लेखी युक्तिवाद व त्‍यांच्‍या वकिलांचा व विरुध्‍द पक्ष 4 तर्फे अॅड.दुबे यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद.

 

       मुद्दे                                                     उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ                होय
  2. विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ        होय
  3. विरुध्‍द पक्ष 2 ते 4 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ    नाही 
  4. काय आदेश ॽ                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •                                                                               कारणमिमांसा
  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत  - आम्‍ही तक्रारकर्त्‍याचे वकिल व विरुध्‍द पक्ष क्रं.  4 चे वकील अॅड. दुबे यांचा युक्तिवाद ऐकला. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 च्‍या वकिलांना पुरेशी संधी देऊन ही त्‍यांनी तोंडी युक्तिवाद केला नाही.  
  2.        तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍याकडून सदरहू कार खरेदी केलेली आहे म्‍हणून तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष 1 चा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन विरुध्‍द पक्ष 1 यांनी आर.टी.ओ. रजिस्‍ट्रशेन करिता रुपये 6453/-, कारच्‍या किंमती पोटी रुपये 43,000/- आणि इन्‍श्‍युरन्‍सकरिता रुपये 5,586/- आणि सालव्‍हेज पोटी रुपये 1,870/-  अशा प्रकारे अधिकच्‍या स्‍वरुपात रक्‍कम घेतलेल्‍या आहेत आणि त्‍याबाबतच्‍या पूर्ण रक्‍कमेच्‍या पावत्‍या ही दिलेल्‍या नाहीत, ही विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांची सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. परंतु विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ते 4 यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केल्‍याचे अथवा अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे दिसून येत नाही आणि वर्तमान प्रकरणात त्‍यांना विनाकारण पक्षकार केले आहे असे आमचे मत आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतरही ते आपल्‍या बचावाच्‍या समर्थनार्थ हजर झाले नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन अधिकच्‍या रक्‍कमा घेतल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सबब विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विरुध्‍द वरील प्रमाणे घेतलेल्‍या अधिकच्‍या रक्‍कमाबाबंत वर्तमान तक्रार मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे आणि तक्रारकर्त्‍याकडून अधिकची घेतलेली एकूण रक्‍कम रुपये 56,909/- परत मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने तक्रारीतील परिच्‍छेद क्रं. 14 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे मागणी मंजूर करता येणार नाही आणि त्‍याला व्‍याजावर व्‍याज देता येणार नाही असे आमचे मत आहे.  म्‍हणून मुद्दा क्रं. 1 व 2 वर  होकारार्थी व मुद्दा क्रं. 3 वर नकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.
  3. मुद्दा क्रमांक 4 बाबत -  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 10,000/- आणि तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 5,000/- मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे. तसेच रक्‍कम रुपये 56,909/- वर 9 टक्‍के दराने व्‍याज देणे वर्तमान प्रकरणात योग्‍य आहे असे आमचे मत आहे.

 

                                           सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ते 4 विरुध्‍द नामंजूर करण्‍यात येते.  
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्‍याला एकूण रक्‍कम रुपये 56,909/- द्यावी आणि सदरहू रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने तक्रार दाखल दिनांक 23.10.2015 पासून रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत व्‍याज द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.