निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 19.06.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 30.06.2010 तक्रार निकाल दिनांकः- 01.10.2010 कालावधी 3 महिने 01 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ संगिता भ्र. ज्ञानोबा गायकवाड अर्जदार वय 28 धंदा शेती/घरकाम रा.उमरी माळयाची, ( अड ए.डी.खापरे ) ता.जि.परभणी विरुध्द 1 तहशीलदार ( स्वतः ) तहसील कार्यालय परभणी, ता. जि. परभणी. 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लिमीडेट ( स्वतः ) भास्करायन एच.डि.एफ.सी होम लोन बिल्डींग, प्लॉट क्रमांक 7 सेक्टर इ-1 टाऊन सेंटर, सिडको औरंगाबाद 431003.. 3 मॅनेजर नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड ( अड रवि गायकवाड ) मंडळ कार्यालय (272000) विभागीय कार्यालय, नगीना घाट रोड, नांदेड 431 601. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदारमौजे उमरी माळयाची ता. जि. परभणीयेथीलरहिवाशीआहेतीचा पती ज्ञानोबा किसनराव गायकवाड हाशेतीव्यवसायकरीतहोता. महाराष्ट्रशासनानेराज्यातीलसंपूर्णखातेदारशेतक-यांचागैरअर्जदारक्रमांक3यानीपुरस्कृतकेलेल्याशेतकरीअपघातविमायोजनेअंतर्गतविमाउतरविलेलाहोतात्यापॉलीसीचामयतज्ञानोबा हादेखीललाभार्थीहोता.विमापॉलीसीमध्येशेतक-याचाअपघातीमृत्यूझाल्यासत्याच्यावारसानारुपयेएकलाखवअपघाती शारीरीककायमचेअपंगत्वआल्यासरुपयेपन्नास हजार चीनुकसानभरपाईदेण्याचेगैरअर्जदारक्रमांक3विमाकंपनीनेहमीघेतली आहे तारीख22.03.2007 रोजीअर्जदाराचा पती जीप घेवून जात असताना समोरुन येणा-या ट्रकने जीपला जोरात धडक दिल्यामुळे त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावर पोलीसानी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व प्रेत पोष्ट मार्टेमसाठी लगेच सरकारी हॉस्पिटल परभणी येथे पाठविले. अर्जदारानेत्यानंतरतहशीलदारपरभणी यांचेतर्फेमयतपतीच्या मृत्यूपश्चात शेतकरीअपघातविम्याचीनुकसानभरपाईमिळणेसाठीक्लेम फॉर्म सह आवश्यक ती कागदपत्रे संपूर्त केली परंतू विमा कंपनीने क्लेम मंजूर न करता 17.08.2007 चे पत्र पाठवून काही कागदपत्रे पाठविण्याविषयी कळविले त्याप्रमाणे दिनांक 22.01.2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सर्व सांक्षाकीत कागदपत्रांची पूर्तता केली व ती मिळाल्याचे अर्जदाराने पोहोच ही घेतली होती तरी देखील नुकसान भरपाईचा अर्ज मंजूर केला नाही त्याबाबत वकिलामार्फत नोटीस पाठविली होती त्यालाही दाद दिली नाही अशाप्रकारे सेवेतील त्रूटी करुन मानसिक त्रास दिला व नुकसान भरपाई मिळण्याच्या लाभापासून वंचीत ठेवले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून द.सा.द.शे. 18 % व्याजासह रुपये 100000/- विमा नुकसान भरपाई मिळावी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- नुकसान भरपाई व अर्जाचा खर्च रुपये 7000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 4 लगतएकूण15 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी दिनांक 24.08.2010 रोजी लेखी जबाबातून ( नि.16) सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले ते दिनांक 10.08.2010 रोजी प्रकरणात ( नि.9) ला समाविष्ट केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी दिनांक 02.09.2010 रोजी लेखी म्हणणे (नि.17) सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबातून ( नि.16) तक्रार अर्ज परिच्छेद क्रमांक 1 ते 6 बाबत काहीही भाष्य केलेले नाही परिच्छेद क्रमांक 7 मधील मजकूराबाबत असा खुलासा केला आहे की, अर्जदाराच्या मयत पतीचा विमा क्लेम व कागदपत्रे कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांच्याकडे दिनांक 17.08.2007 रोजी पाठविले आहेत मंजूरीबाबत उडवाउडवी चे उत्तरे देण्याचा प्रश्न उदभवत नाही. क्लेम मंजूरीचे अधिकारी त्यांच्याकडे नाही सबब दावा खारीज करण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात नि.9 असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत ज्ञानोबा गायकवाड डेथ क्लेमची कागदपत्रे दिनांक 04.02.2008 रोजी मिळाली परंतू नियमाप्रमाणे क्लेम व कागदपत्रे घटना घडल्यापासून 90 दिवसाचे आत म्हणजे दिनांक 14.11.2007 पर्यंत पाठविणे आवश्यक असताना ती उशीरा पाठविल्यामुळे कागदपत्रे तहशीलदाराकडे दिनांक 16.02.2008 रोजी परत पाठविले आहे. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 याना या प्रकरणातून वगळावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबा सोबत पुराव्यातील कागदपत्रात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचे परिपत्रक ( नि.10) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी आपल्या लेखी जबाबातून ( नि.17) शेतकरी विमा पॉलीसी संबधीचा तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 1 ते 3 मधील मजकूर वगळता इतर सर्व विधाने वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारली आहेत. अर्जदाराने मयत पतीच्या अपघाती नुकसान भरपाईचा क्लेम अर्धवट भरलेला होता तसेच पाठविलेली कागदपत्रे देखील साक्षाकींत केलेली नसल्याचे आढळून आले तसेच मयत ज्ञानोबा हा ड्रायव्हर म्हणून व्यवसाय करीत होता असेही पोलीस पेपर्स मधून आढळून आले. अर्जदाराने नुकसान भरपाईचा क्लम मुदतीत दाखल केलेला नव्हता. 7/12 मध्ये मयताच्या नावे जमिन असल्याचे दिसत नाही तसेच कंपनीने मागणी केलेल्या कागदपत्राची पूर्तता अर्जदाराने केलेली नाही . विम्या संबंधी महाराष्ट्र सरकार व गैरअर्जदार 2 व 3 याचे दरम्यान जो लेखी करार झालेला होता त्या करारातील अट क्रमांक xiv नुसार शेतकरी विमा पॉलीसी नुकसान भरपाई संदर्भातील कायदेशीर वाद फक्त मुंबई कोर्टाचे अधिकार स्थळासिमेतच उपस्थित करण्याची प्रमुख अट आहे त्यामुळे तक्रार अर्ज परभणी ग्राहक मंचात चालणेस पात्र नाही तसेच अट क्रमांक iv नुसार कंपनीने काही कारणास्तव विमाधारकाचा क्लेम नामंजूर केला किंवा त्याबाबतीत वाद उपस्थित झाला तर लवाद कमिटीपुढे तो दाखल केला पाहीजे कन्झुमर कोर्टात एकदम जाता येणार नाही. या करणास्तवही तक्रार अर्ज फेटाळण्यास पात्र आहे. तसेच अर्जदाराने डेथ क्लेम सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिलेली नव्हती त्यामुळे क्लेम नामंजूर करणे भाग पडले त्यांच्याकडून सेवा त्रूटी झालेली नाही सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र (नि.18) दाखल केलेले आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड ए.डी.खापरे यानी युक्तिवाद केला आणि गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे अड आर.वाय.गायकवाड यानी तोंडी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार क्रमांक 3 कडून अर्जदाराच्या विमा क्लेमची नुकसान भरपाई मंजूर करण्याचे बाबतीत सेवा त्रूटी झाली आहे काय ? 2 निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे . कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मयत पती ज्ञानोबा किसनराव गायकवाड रा. उमरी माळयाची हा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता ही बाब शाबीत करण्यासाठी अर्जदाराने पुराव्यात नि. 20 लगत सादर केलेल्या (नि.20/5) वरील सन 2006-07 सालची 7/12 मधील नोंद, (नि.20/7) वरील सन 2002-03 सालचा 7/12 (नि.20/9) वरील सन 2000-01 चा 7/12 मधील नोंद नि. 20/8 वरील फेरफार क्रमांक 4775 नि4/4 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र यामधील नोंदीतून शाबीत झालेले आहे. दिनांक 22.03.2007 रोजी मयत ज्ञानोबा गायकवाड काळी पिवळी जीप क्रमांक एम.एच.22-4255 परभणी ते पाथरी रोडवरुन घेवून निघाला असताना समोरुन भरधाव वेगात येणारा ट्रक क्रमांक एम डब्ल्यू वाय 5502 च्या चालकाने समोरुन धडक दिल्याने अपघातात ज्ञानोबा गायकवाड याचा मृत्यू झाला.ही वस्तूस्थित नि. 4 लगत दाखल केलेली पोलीस स्टेशन परभणी ग्रामीण गु. रजि.क्रमांक 26/07 मधील एफ.आय.आर (नि.4/5) घटनास्थळ पंचनामा नि.4/6 इनक्वेस्ट पंचनामा नि .4/7 पी.एम.रिपोर्ट नि.4/8 या पोलीस पेपर्स वरुन लक्षात येते. यावरुन अर्धातच अर्जदराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता ही वस्तूस्थिती वरील पुराव्यातून शाबीत झाली आहे. मयत ज्ञानोबा गायकवाड हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) तहशीलदार परभणी यांचेकडे विम्याची नुकसानभरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी शासनाच्या परिपत्रकात नमूद केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 4 व नि. 20 लगत दाखल केलेल्या आहेत. कागदपत्रामध्ये अपूर्णता असल्याचे वाटत नाही. गैरअर्जदार विमा कंपनीचे क्लेम मंजूरी च्या बाबतीत एवढेच म्हणणे आहे की, परिपत्रकातील अटीनुसार घटना घउल्यापासून 90 दिवसाचे आत नुकसान भरपाईचा क्लेम व कागदपत्रे पाठविणे आवश्यक असताना अर्जदाराने ती उशीरा पाठविली तसेच मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रती / साक्षाकीत प्रती पाठविल्या नसल्याने क्लेम नामंजूर करण्यात आला. परंतू याबाबतीत जिल्हा मंचाचे मत असे की, क्लेम व कागदपत्रे 90 दिवसाचे आत पाठविणे बाबतची अट मुळीच मॅडेटरी तथा बधनकारक नाही वास्तविक उशीरा कागदपत्रे मिळाली या कारणास्तव क्लेम नाकारणे निश्चीतपणे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधी आहे उलट गैरअर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 17.08.2007 च्या पत्रातून मागणी केलेल्या कागदपत्राची पूर्तता अर्जदाराने दिनांक 22.01.2001 रोजी केली होती हे पुराव्यातील ( नि.4/1 व नि.4/2 ) वरील पत्रावरुन स्पष्ट दिसते. गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे सादर केलेल्या लेखी जबाबचे अनुषंगाने अड. गायकवाड यानी उपस्थित केलेल्या अग्रीमेंट क्लॉज XIV ची कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्यतः गैरअर्जदार 1 कलेक्टर आर.डी.सी., शेती, अधिकारी व विमा कंपनी या कमिटीची आहे त्या कमिटीपुढे जर क्लेम सेटल झाला नाहीतर शासनातर्फे विमा उतरविलेल्या लाभार्थीला कन्झुमर कोर्टातून दाद मागता येइल असे करारातच स्पष्ट नमूद केलेले आहे त्यामुळे या क्लॉजचीही प्रस्तूत प्रकरणाला बाधा येत नाही.वरील संपूर्ण बाबीवरुन अर्थातच गैरअर्जदार 3 तर्फे घेतलेला बचाव मुळीच ग्राहय धरण्याजोगा नाही .अलीकडेच महाराष्ट्र राज्य आयोग सर्कीट बेंच औरंगाबाद यानी अशाच प्रकारच्या प्रकरणातील अपील क्रमांक 1047/08 मध्ये दिनांक 05.02.2009 रोजी दिलेला निर्णयाचा आणि रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) पान 13 (महाराष्ट्र) तसेच मा. राष्ट्रीय आयोगाने रिव्हीजन पिटीशन 3329/2007 युनियटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द पी. अरुणा या प्रकरणात दिनांक 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रातील मत तसेच रिपोर्टेड केस 2010 (1) सी.पी.आर. पान 219 मध्ये मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने व्यक्त केलेले मत विचारात घेऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेमची नुकसान भरपाई रुपये 1 लाख आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत मंजूर करुन अर्जदाराला आदा करावी. 3 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |