जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 47/2011 तक्रार दाखल तारीख – 17/02/2011
निकाल तारीख - 09/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 11 म. 22 दिवस.
मिराबाई धर्मपाल गुरमे,
वय – 28 वर्षे, धंदा – शेती,
रा. गांजुरवाडी ता. चाकुर जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) तहसीलदार,
तहसील कार्यालय चाकुर,
जि. लातुर.
2) मा. डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफिसर,
नॅशनल इन्शुरेन्स कं.लि.,
स्टर्लींग सिनेमा बिल्डींग, 2 रा मजला,
65 मर्झबान रोड,
डी.ओ.14 फोर्ट, मुंबई.
3) शाखाधिकारी,
नॅशनल इन्शुरेन्स कं. लि.,
मालु बिल्डींग, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. पी.पी.काळेगोरे.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे :- अॅड. एस.जी.दिवाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार मिराबाई धर्मपाल गुरमे रा. गांजुरवाडी ता. चाकुर जि. लातुर येथील रहिवाशी असून ही मयत धर्मपाल मनोहर गुरमे यांची कायदेशीर पत्नी आहे. पोलीस स्टेशन लातुर ग्रामीण यांनी गुन्हा क्र. 141/2007 नुसार अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कलम 279, 304/अ, 337, 338, 427,184, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अर्जदाराचे पती नामे धर्मपाल मनोहर गुरमे हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांना मौजे गांजुरवाडी ता. चाकुर जि. लातुर येथे गट क्र. 88 मध्ये 1 हेक्टर जमीन होती. धर्मपाल मनोहर गुरमे हे त्या जमीनीचे मालक व कब्जेदार होते. म्हणून अर्जदाराने न्यायालयाच्या अवलोकनासाठी नमुना नं. 7/12, नमुना नं. 8 ची प्रत दाखल केली आहे. सदरील पॉलीसीचा कालावधी 15/07/2006 ते 14/07/2007 असा आहे. व ही घटना दि. 27/06/2007 रोजी झालेली आहे. व सर्व आवश्यक ती कागदपत्रे म्हणजे घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, 7/12, नमुना नं. 8 वारसा फेर, नमुना नं. 6 ची नक्कल इत्यादी आवश्यक ती कागदपत्रे देवून सदरील रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई मिळणेसाठी तहसीलदार, तहसील कार्यालय देवणी येथे प्रस्ताव दाखल केला होता.
अर्जदार ही विमा रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर 18 टक्के दराने व्याज तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 50,000/- व अर्जदाराचा खर्च रु. 5,000/- गैरअर्जदारांकडुन मिळणे योग्य व न्यायाचे आहे.
तक्रारदाराने तक्रारी सोबत महाराष्ट्र शासन परिपत्रक, क्लेम फॉर्म, तलाठी यांचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, 7/12, 8 ‘अ’, फेरफार नोंदवही नक्कल, नमुना नं. 6 (क) ची नक्कल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, नोटीस, आर.पी.ए.डी पावती(तीन प्रती), इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार तहसीलदार यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा प्रस्ताव दि. 05/03/2008 या तारखेस प्र. क्र. 2008/कावि/100 तहसील कार्यालय चाकुर येथून औरंगाबाद येथे पाठविलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 3 च्या म्हणण्यानुसार अर्जदाराने तहसीलदाराकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तहसीलदाराने तो प्रस्ताव कबाल इंन्शुरन्स कंपनीकडे पाठविलेला आहे. परंतु कबाल इन्शुरंन्स कंपनीने तो प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवलेला नाही. म्हणून सदरचा विमा प्रस्ताव हा प्राथमिक स्वरुपात असल्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असुन अर्जदाराचा पती हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. ही बाब गैरअर्जदारांनी मान्य केलेली आहे. अर्जदारास मौजे गांजुरवाडी ता. चाकुर येथे 1 हेक्टर 00 आर इतकी जमीन आहे. तो मृत्यूसमयी शेतकरी होता.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असुन अर्जदाराच्या पतीचा दि. 27/06/2007 रोजी महमदापुर पाटी येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला. म्हणून लातुर ग्रामीण पोलीस स्टेशन 141/2007 अशी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे. कलम 279, 304 A, 337, 338, 427,184,177 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच अर्जदाराच्या पतीच्या शवविच्छेन अहवालानुसार अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. अर्जदाराने शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत प्र. क्र. 2008/संकीर्ण/कावि100 तहसील 05/03/2008 तारखेस प्रस्ताव पाठवलेला आहे. व तो प्रस्ताव कबाल इंन्शुरन्सला देखील पाठवलेला आहे. त्यानंतर कबाल इंन्शुरन्स कंपनीने तो प्रस्ताव विमा कंपनीस पाठवलेला नाही. यात गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केल्याचे निष्पन्न होते. तसेच गैरअर्जदार विमा कंपनी ही सदरची तक्रार ही प्राथमिक अवस्थेत आहे. असे म्हणणे त्यामुळे अर्जदाराने आपला प्रस्ताव योग्य ठिकाणी पाठवलेला आहे. मात्र तक्रार अर्जात त्याने कबाल इन्शुरन्स कंपनीला पार्टी केलेले नाही. म्हणून अर्जदाराचा प्रस्ताव विमा कंपनीकडे गेला किंवा काय झाले याचे उत्तर केवळ कबाल इंन्शुरन्स कंपनीच देवून शकते. तसेच विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार सदरचा प्रस्ताव प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या सेवेत कोणतीच त्रुटी केल्याचे निष्पन्न होत नाही. म्हणून हे न्यायमंच असे निर्देशीत करत आहे की, अर्जदाराने आपला पुर्ण प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे 30 दिवसाच्या आत पाठवावा. त्यानंतर 45 दिवसात सदर प्रस्तावाचा विचार करुन अर्जदाराचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली काढावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराने आपला पुर्ण प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे 30 दिवसाच्या आत पाठवावा व त्यानंतर 45 दिवसात सदर प्रस्तावाचा विचार करुन अर्जदाराचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली काढावा.
(