जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/173. प्रकरण दाखल तारीख - 28/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 10/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य गोदावरीबाई भ्र. अमृत कोटीवाल वय,35 वर्षे, धंदा घरकाम रा. बोळसा (बु.) ता.उमरी जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. मा.तहसीलदार, उमरी, तहसील कार्यालय उमरी जि. नांदेड. 2. रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत व्यवस्थापक/मॅनेजर, 19,रिलायंन्स सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400038 3. रिलांयन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा उज्वल इंटरप्रायजेस च्यावर हनुमान गड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. 4. विभागीय प्रमुख, कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स, टाऊन सेंअरा, कॅनाट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एस. टेंभूर्णीकर गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - कोणीही हजर नाही.(एकतर्फा) गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकिल - अड.अविनाश कदम. गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार रिलायंन्स इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदाराचे पती मयत अमृत कोटीवाल हे शेतकरी होते व मौजे बोळसा (बु.) ता. उमरी जि. नांदेड येथे शेत गट नंबर 337 क्षेञ 80 आर चे ते मालक होते. दि.25.9.2008 रोजी उमरी येथील गोरठा रस्त्यावरील रेल्वे गेट जवळ इंटरसिटी एक्सप्रेसखाली आल्यामूळे तक्रारदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. शेतक-यास व त्यांचे कूटूंबास अपघातापासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्या अनुषंगाने औरंगाबाद महसूल वीभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गेरअर्जदार क्र.1 रिलायंन्स इन्शूरन्स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. यांचा कालावधी दि.15.8.2008 ते दि.15.8.2009 पर्यत होता. कबाल इन्शुरन्स ही विमा सल्ला देणारी कंपनी आहे व ते शासन व विमा कंपनी यामधील दूवा आहेत. अपघाती मृत्यूमूळे मयताचे वारस म्हणून तक्रारदार हिने विम्याची रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपञासह राज्य शासनाच्या नियमानुसार तहसीलदार उमरी यांचेकडे अर्ज केला व त्यांनी कागदपञाचे अवलोकन करुन अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविला व गेरअर्जदार क्र.2 यांनी तो अर्ज गैरअर्जदार क्र.3 कडे पाठविला व त्यांला क्लेम नंबर दिला. गैरअर्जदार क्र.2 यांनी क्लेम प्राप्त झाल्यापासून एक महिन्यात त्यांनी मयत व्यक्तीच्या वारसास विम्याची रक्कम देणे बंधनकारक असताना त्यांनी केवळ दूष्ट हेतूने विम्याची रक्कम देण्यास इन्कार केला म्हणून अर्जदाराने वकिलामार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस दि.3.5.2009 रोजी आरपीएडी ने पाठविली परंतु सदरील नोटीसलचे उत्तर अद्यापपर्यत दिले गेले नाही. अर्जदार ही विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याज व तक्रारीचा खर्च रु.5000/- मिळण्यास पाञ आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस बजावली असता ती प्राप्त होऊनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. प्रस्तूतची तक्रार खोटया माहीतीवर व आरोपावर आधारित आहे. अर्जदाराने तिचा पती शेतकरी होता व तो गट नंबर 337 चा मालक होता या बददल कोणताही पूरावा दिलेला नाही. याशिवाय मयत अमृत हा दि.25.9.2008 रोजी रेल्वे गेट जवळ अपघातात मृत्यू पावला हे ही अर्जदार यांना सिध्द करावयाचे आहे. गैरअर्जदार यांना हे माहीत नाही की त्यांनी सर्व आवश्यक कागदपञ गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दिले व त्यांनी ते गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे पाठविले. यांचा अर्थ गैरअर्जदार कंपनीस त्यांचा क्लेम आजपर्यत प्राप्त झालेला नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांना क्लेम देण्याचे टाळले हे म्हणणे उचित नाही. अर्जदाराकडून गैरअर्जदाराला कोणतीही नोटीस प्राप्त नाही म्हणून त्यांचा दावा हा प्रिमॅच्यूअर स्वरुपाचा आहे व तो खारीज करणे योग्य आहे. तलाठयास प्रपोजल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एक आठवडयात ते पाठवीणे आवश्यक होते. त्यामूळे दावा मूदतीत नाही. शिवाय मयत हे शेतकरी असल्या बददलचा पूरावा म्हणजे 7/12, फेरफार इत्यादी कागदपञ आवश्यक आहेत. गैरअर्जदार क्र.4 यांनी जो जवाब दिलेला आहे तो पाहिला असता हे स्पष्ट होते की, मयत अमृत यांचा अपघाती मृत्यू बददलचा क्लेम गैरअर्जदार क्र.1 कडून त्यांना प्राप्त झालेला नाही त्यामूळे त्यांनी तो गैरअर्जदार कंपनीस पाठविला नाही हे ही स्पष्ट होते. म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.4 यांनी पोस्टाने आपले म्हणणे पाठविले आहे.त्यांचा दि.24.9.2009 च्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराचा क्लेम तहसिलदाराकडून त्यांचेकडे पोहचलाच नाही. त्यावर त्यांना नीर्णय घेता आलेला नाही असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी तिचे मयत शेतकरी पती अमृत कोटीवाले यांचा दि.25.9.2008 रोजी रेल्वे गेट वर रेल्वे खाली सापडून अपघातात मृत्यू झाला असे म्हटले आहे. या बददलचा पूरावा म्हणून घटनास्थळाचा पंचनामा, इन्क्वेसट पंचनामा, यात एक इसम रेल्वे पटरीला लागून त्यांचे डोक्यावर व कपाळाला मार लागलेला आहे. म्हणजे रेल्वे खाली अपघात झाल्याचे म्हटले आहे. घटनेच्या प्राथमिक अहवालात मयताचे नांव अमृत कोटीवाले असे असून पोलिस स्टेशन उमरी येथे गून्हा नोंदविण्यात आलेला आहे. मयत हा गाडी खाली येऊन कटून मरण पावल्याचे म्हटले आहे. पी.एम. रिपोर्ट ही या सोबत जोडलेला आहे. पी. एम. रिपोर्ट प्रमाणे मयत हा रेल्वे खाली कटून मरण पावला असे म्हटले आहे. आकस्मात मृत्यू रिपोर्ट मध्ये मरणाचे कारण अपघाती मृत्यू असे म्हटले आहे. एकंदर मयत अमृत यांचा मृत्यू रेल्वे खाली येऊन अपघाताने झाला असे सर्व चौकशी करणारे व तपासणीक अधिका-याचा अहवाल आहे. त्यामूळे मृत्यू हा अपघाताने झाला हे सिध्द होते. मयत अमृत यांचे मृत्यूपञ या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्याबददल त्यांच्या नांवाचा 7/12 व होल्डींग दाखल आहे. म्हणजे 7/12 प्रमाणे 80आर या जमिनीत ते शेती करीत होते. मयताचे कायदेशीर वारीस म्हणून प्रथम त्यांची पत्नीच असते त्यामूळे तिला विम्याची रक्कम मिळण्यास ती हक्कदार आहे.कागदपञावरुन अपघाती मृत्यू सिध्द होतो तसेच कायदयाप्रमाणे विम्याची रक्कम अर्जदार ही मिळण्यास पाञ आहे. परंतु या प्रकरणात गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा क्लेम मिळालाच नाही व गैरअर्जदार क्र.4 ने देखील त्यांचेकडे तो क्लेम प्राप्त झाला नाही असे म्हटले आहे. ही बाब स्पष्ट करण्यासाठी एकमेव सक्षम अधिकारी म्हणून गैरअर्जदार क्र.1 तहसिलदार हे आहेत, त्यांनी हा क्लेम पाठविला का नाही यावर ते प्रकाश टाकू शकले असते परंतु त्यांचे म्हणणे न आल्यामूळे हे उत्तर मिळाले नाही. गैरअर्जदार कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार ही प्रिमॅच्यूअर स्वरुपाची असली तरी विमा गैरअर्जदार यांना मान्य आहे. शेतक-याचा मृत्यू अपघाती झाला हे स्पष्ट आहे त्यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्याची रक्कम दिली पाहिजे हे न्यायाच्या दृष्टीने उचित आहे. कारण सरकारी यंञणेमार्फत प्रपोजल प्रोसेस करणे इतकेच आहे व गैरअर्जदारानेच नीर्णय घ्यावयाचा आहे. म्हणून गैरअर्जदार यांचेकडे क्लेम मिळालाचा नसल्याकारणाने त्यांनी ञूटीची सेवा दिली असे म्हणता येणार नाही. अर्जदार यांनी कबाल इन्शूरन्स सर्व्हीस प्रा.लि. यांचा क्लेम फॉर्म भाग नंबर 1 वर परत तो क्लेम फॉर्म या प्रकरणात असलेले सर्व कागदपञ जसे की पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, गून्हाचा प्राथमिक अहवाल, पी.एम. रिपोर्ट, जवाब, आकस्मात मृत्यू रिपोर्ट, 7/12 होल्डींग, मृत्यू प्रमाणपञ, बँकेचे पासबूक, ओळखपञ इत्यादी सर्व कागदपञ सह प्रपोजल सरळ गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे दाखल करावे व हे प्रपोजल प्राप्त झाल्या बरोबर 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.3 ने क्लेम प्रोसेस करुनयावर आपला नीर्णया द्वारे अर्जदार यांना विमा रक्कम देण्याची कारवाई करावी. या प्रकरणात शासनाने शेतक-यासाठी हितकारी योजना राबवावी व तलाठी व तहसिलदार यांनी जवाबदाराने क्लेम प्रपोजल पाठवावे असे असताना तहसिलदार हे या प्रकरणात नोटीस मिळूनही गैरहजर राहतात. गैरअर्जदार यांचेकडे प्रपोजल पाठविले का ? हे तेच सांगू शकतात, पण त्यांनी हे प्रकरण गांर्भीयाने न घेता शासनाचे योजनाकडे दूर्लक्ष केले. शेतक-यांना रक्कम त्यांचे चूकीमूळे मिळाली नसेल तर त्यांचीपण सेवेतील ञूटी होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखविलेल्या दूर्लक्ष पणामूळे त्यांना जवाबदार धरुन त्यांना रु.2000/- दंड लावणे न्यायाचे दृष्टीने उचीत होईल. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. अर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत परत क्लेम प्रपोजल क्लेम फॉर्म भाग 1 वर भरुन वर उल्लेख केलेल्या सर्व आवश्यक त्या कागदपञासह पूर्ण प्रपोजल सरळ गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे दाखल करावे. गैरअर्जदार क्र.3 यांनी यावर पूर्ण कारवाई करुन अर्जदाराला विम्याची रक्कम रु.1,00,000/- 30 दिवसाचे आंत देण्याची व्यवस्था करावी. 3. गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेल्या निष्काळजीपणा बददल रु.2000/- दंड लावण्यात येतो तो त्यांनी वैयक्तीकरित्या अर्जदार यांना दयावा. 4. गैरअर्जदार क्र.2,3 व 4 सेवेत ञूटी नसल्याकारणाने व्याज व दंड व्याज किंवा खर्चाचा आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |