Maharashtra

Nanded

CC/08/278

Shivaji Gangandar Shinde - Complainant(s)

Versus

Tahsildar Umari - Opp.Party(s)

ADV.B.V.Bhure

03 Dec 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/278
1. Shivaji Gangandar Shinde R/0.Bolsa Tq.umri Dist NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Tahsildar Umari Tq.Umri Dist.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 03 Dec 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  278/2008.
                           प्रकरण दाखल तारीख   - 16/08/2008
                           प्रकरण निकाल तारीख   - 03/12/2008
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर              -  सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
शिवाजी गंगाधर शिंदे
वय, 36 वर्षे, धंदा शेती                                  अर्जदार
रा. बोळसा (ग.प.) ता. उमरी जि. नांदेड.
      विरुध्‍द.
1.   तहसीलदार,
     तहसील कार्यालय, उमरी ता.उमरी
     जि. नांदेड.                                      गैरअर्जदार
2.   व्‍यवस्‍थापक/मॅनेजर
     रिलायंन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     19, रिलायंन्‍स सेंटर वॉलचंदइ हिराचंद मार्ग,
     बेलार्ड इस्‍टेट, मुंबई-400 038.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.बी.व्‍ही. भूरे.
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील        -   स्‍वतः
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील       -   अड.ऐ.जी. कदम.
                            निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
                  गैरअर्जदार यांनी विम्‍याची रक्‍कम अदा न करुन सेवेत ञूटी केलेली आहे म्‍हणून अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रु.1,00,000/- व सन 2007 पासून 12 टक्‍के व्‍याजाने, मानसिक व शारीरिक ञासापोटी रक्‍कम रु.50,000/- मिळावी म्‍हणून तक्रार अर्ज दाखल केला आहे.
              अर्जदाराची आई पदमीनबाई गंगाधर शिंदे ही व्‍यवसायाने शेतकरी होती व तिच्‍या नांवे मौजे बोळसा (ग.प.) ता. उमरी येथे गट नंबर 120, क्षेञफळ 96 आर एवढी जमीन आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी शासनाने गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे विमा पॉलिसी घेतली. विमा पॉलिसीचे प्रिमियन महाराष्‍ट्र शासनाने भरलेले आहेत. अर्जदाराची आई लाभार्थी आहे. सदरील पॉलिसीचा कालावधी हा दि.15.8.2007 ते 14.08.2008  असा आहे. अर्जदाराची आई पदमिनीबाई गंगाधर शिंदे ही दि.12.8.2007 रोजी हायब्रीडच्‍या शेतात निदंन करण्‍यासाठी गेली असताना  तीथे सापाने तिला चावले. अर्जदाराच्‍या वडीलांनी तिला ग्रामीण रुग्‍णालय उमरी येथे शरीक केले. त्‍यानंतर डॉ. वैद्य हॉस्‍पीटल नांदेड यांचेकडे पूढील उपचारासाठी दि.13.8.2007 रोजी दाखल केले. डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार पूढील उपचारासाठी घाटी औरंगाबाद येथे नेण्‍यात आले. उपचारा दरम्‍यान दि.18.8.2007 रोजी विमेदार हे औरंगाबाद येथे मरण पावली. यासंबंधी पोलिस स्‍टेशन औरंगाबाद यांनी पोलिस स्‍टेशन उमरी यांचेकडे गुन्‍हा नोंदविला व घटनास्‍थळ पंचनामा केला व यानंतर पी.एम. रिपोर्ट व मरणोत्‍तर पंचनामाही करण्‍यात आला. शासनाच्‍या जीआर नुसार विमेदाराच्‍या मृत्‍यूनंतर दि.20.9.2007 रोजी तहसीलदार उमरी यांचेकडे अर्ज दिला. यासोबत आवश्‍यक कागदपञ व क्‍लेम प्रपोजल दाखल केले. येथे मंचात ती सर्व कागदपञे दाखल केलेली आहेत. क्‍लेम दाखल केल्‍यानंतर अनेकवेळा विनंती केल्‍यानंतरही गैरअर्जदाराने टाळाटाळ केली. यानंतर दि.2.7.2008 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. अर्जदाराने रक्‍कम न दिल्‍याकारणाने अर्जदाराने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
 
              गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपले म्‍हणणे दाखल केले आहे. अर्जदाराच्‍या तक्रार अर्जातील परिच्‍छेद नंबर 7 नुसार अर्जदाराने दि.8.12.2007 रोजी क्‍लेम व त्‍यासाठी लागणारी सर्व आवश्‍यक कागदपञ दाखल केलेली आहेत. यानंतर दि.23.1.2008 रोजी प्रस्‍तूत क्‍लेम रिलायंन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे पाठविण्‍यात आला.  मूददा क्र.1 ते 12 च्‍या खुलाशानुसार पदमिनीबाई ही दि.12.8.2007 रोजी हायब्रीडच्‍या शेतात काम करताना साप चावला व दि.18.8.2007 रोजी मृत्‍यू पावली. मयत विमेदार ही मौजे बोळसा ता. उमरी येथील 96 आर शेत जमिनीची मालक आहे. ती शेतकरी असल्‍यामूळे वैयक्‍तीक विमा योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी पाञ आहे म्‍हणून शिफारस करुन गैरअर्जदार क्र. 2 कडे हा प्रस्‍ताव पाठविण्‍यात आला आहे.
              गैरअर्जदार क्र. 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले आहे. विमा पॉलिसी ही काही अटी व नियमावर शासनाला देण्‍यात आलेली आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी आहे. अर्जदार यांने मयत पदमीनबाई हीशेतकरी असलयाबददलचा पूरावा दाखल केलेला नाही. तसेच विमेदार यांचा साप चावून दि.18.8.2007 रोजी मृत्‍यू झाला यांचाही पूरावा दिलेला नाही. गैरअर्जदार हे महाराष्‍ट्र शासनाचे प्रतिनीधी आहेत. अर्जदार ही गैरअर्जदार यांचे ग्राहक होऊ शकत नाही. अर्जदारांनी शासन परिपञक दि.19.8.2004 नुसार तलाठी यांचेकडे अर्ज दिला पाहिजे. त्‍यानंतर सात दिवसांत तलाठयाने अपघाताचे प्रपोजल तयार करुन ते पाठविले पाहिजे. अपघाती मृत्‍यू हा दि.18.8.2007 रोजीला झाला व अर्जदाराने प्रपोजल दि.20.9.2007 रोजी दाखल केले जे की मूदतीत नाही. गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. त्‍यामूळे अर्जदाराची मागणी गैरकायदेशीर आहे म्‍हणून ती फेटाळण्‍यात यावी.
 
              अर्जदाराने पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअज्रदार क्र. 2 यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
     मूददे                                        उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?        होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                             कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे क्‍लेम फॉर्म भाग 1 व त्‍यासोबत दि.20.9.2007 रोजी तहसिलदार यांना लिहीलेले सूचना अर्ज तसेच भाग नंबर 2 व तलाठयाचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे. भाग नंबर 2 मधील प्रमाणपञाप्रमाणे पदमिनीबाई गंगाधर शिंदे ही शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत समाविष्‍ट असून त्‍यांचा अपघातामूळे त्‍यांचे वारसास मिळणारी रक्‍कम रु.1,00,000/- यासाठी ते पाञ आहेत. यासोंबत भाग नंबर 3 मध्‍ये तहसीलदार यांचे प्रमाणपञ यातही शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमेदार हे समाविष्‍ट असून अपघातामूळे रु.1,00,000/- मिळण्‍यास ते पाञ आहेत असे प्रमाणपञ दिलेले आहे. दि.23.1.2008 रोजी तहसीलदार उमरी यांनी कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि. औरंगाबाद यांना पञ लिहून विमेदार पदमीनबाई शिंदे यांचे दि.18.8.2007 रोजी साप चावून मृत्‍यू झालेला आहे व त्‍यांनी नूकसान भरपाई साठी अर्ज केलेला आहे असे पञ लिहीलेले आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायत बोळसा (ग.प.) ता. उमरी यांनी पदमिनबाई शिंदे यांचा दि.18.8.2007 रोंजी मृत्‍यू झाल्‍या बददलचे प्रमाणपञ दिलेले आहे ते अर्जदाराने दाखल केलेले आहे. मयत विमेदार पदमिनीबाई हिला इलाजासाठी संजीवनी अतिदक्षता विभागात दाखल करुन घेण्‍यात आले होते तसेच गोळवलकर गुरुजी ब्‍लड बँक नांदेड यांनी रक्‍त दिल्‍याबददलचे प्रमाणपञ हे ही दाखल केलेले आहे. पोलिस स्‍टेशन  उमरी यांनी पोलिस स्‍टेशन औरंगाबाद यांना लिहीलेले पञ, एफ.आय. आर., वैद्यकीय अधिकारी घाटी औरंगाबाद यांनी पोलिस स्‍टेशन उमरी यांना लिहीलेले पञ, इत्‍यादी सर्व आवश्‍यक कागदपञ प्रकरणात अर्जदाराने दाखल केलेले आहेत. तसेच मृताचा घटनास्‍थळ पंचनामा, विठठलराव शिंदे व गंगाधर शिंदे  याचे जवाब, पी. एम. रिपोर्ट इत्‍यादी कागदपञ या प्रकरणात दाखल आहेत. पी. एम. रिपोर्टमध्‍ये मृत्‍यूचे कारण साप चावून असे स्‍पष्‍ट उल्‍लेख केलेला आहे. मयत विमेदार यांचे ओळखपञ निवडणूक आयोगाचे, वारसाचे प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. एवढे सर्व कागदपञ क्‍लेम सेंटल करण्‍यास पूरेसे आहेत असे असताना गैरअर्जदार यांनी क्‍लेम नाकारुन सेवेत ञूटी केलेली आहे.
              महाराष्‍ट्र शासनाने शेतक-याच्‍या हितासाठी  गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा पॉलिसी प्रिमियमची पूर्ण रक्‍कम भरुन घेतलेली आहे व महाराष्‍ट्रातील सर्व शेतकरी लाभार्थी आहेत. पदमीनबाईच्‍या नांवाने शेती असल्‍याबददलचा 7/12 व होल्‍डींग अर्जदाराने दाखल केलेले आहेत व इतरही कागदपञ आहेत. त्‍यामूळे ती लाभार्थी आहे यावीषयी वाद नाही. शेतकरी विमा योजना सन 2007-08 हे परिपञक या प्रकरणात दाखल आहे. शेतक-याकडून एक महिन्‍याचे आंत प्रस्‍ताव प्राप्‍त झाला पाहिजे असे जरी असले तरी वारसाने एवढया कमी वेळेत प्रस्‍ताव देणे हे शक्‍य नसते. आधीच ते दूखात असतात व यानंतर सर्व कागदपञ जमा करुन अशा प्रकारचा प्रस्‍ताव देण्‍यास वेळ लागणे शक्‍य आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांना जबाबदारी टाळता येत नाही व अशा प्रकारचा नियम हा बंधनकारक नाही. त्‍यात 2008 (2) ALL MR (JOURNAL) 13 Consumer Dispute Redressal State Commission Mumbai,   ICICI Lombard General Insurance Com. Ltd.    Vs.   Smt. Sindhubhai Khanderao Khairnar   या प्रकरणात मूदतीचा मूददा येत नाही. साप चावून मृत्‍यू हा अपघातामध्‍ये मोडतो.   मा. उच्‍च्‍ न्‍यायालय यांनी  (2000)   I Supreme Court Cases 98 Regional Provident Fund Commissioner   Vs   Shivkumar Joshi  यात केलेल्‍या आदेशाप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा 1986 सेक्‍शन 2 (1)(ड) (ii)  Consumer---Includes also the beneficiary for whose benefit the services are hired of availed of.   म्‍हणजे तो लाभार्थी आहे. यातही मयत विमेदार ही लाभार्थी आहे. हे सर्व असताना मयत विमेदार पदमाबाई हिचे वारस तिचा मूलगा विमेदाराची रक्‍कम मिळण्‍याचे हक्‍कदार आहेत यात काही संशय नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार क्र. 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.01.01.2008 पासून त्‍यावर 9 टक्‍के व्‍याज पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह अर्जदार यांना दयावेत.
3.                                         मानसिक ञासाबददल रु.4,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1000/- मंजूर करण्‍यात येतात.
4.                                         पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील    श्रीमती सुजाता पाटणकर      श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                       सदस्‍या                         सदस्‍य
 
 
जे. यु. पारवेकर
लघूलेखक.