जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/80. प्रकरण दाखल तारीख - 06/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 28/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. 1. कलावतीबाई भ्र. बालाजी पिटलेवाड वय 38 वर्षे, धंदा घरकाम 2. साईनाथ पि. बालाजी पिटलेवाड वय 7 वर्षे, धंदा शिक्षण अर्जदार 3. निकीता पि. बालाजी पिटलेवाड वय अज्ञान धंदा शिक्षण अज्ञानपालन कर्ता अर्जदार क्र.1 आई सर्व रा.सावरगांव(द) ता.उमरी जि. नांदेड विरुध्द. 1. मा.तहसीलदार, तहसील कार्यालय,उमरी ता.उमरी जि. नांदेड. 2. व्यवस्थापक रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लि. 19, रिलायंस सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग, गैरअर्जदार बेलार्ड इस्टेट मूंबई 400 038. 3. रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, उज्वल इंटरप्रायजेसच्या वर हनूमान गढ कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. 4. व्यवस्थापक, कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स, टाऊन सेंटर, सिडको कॅनॉट, औरंगाबाद-03 अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकिल - अड.अविनाश कदम. गैरअर्जदार क्र. 4 तर्फे वकील - स्वतः. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या ) गैरअर्जदार रिलायन्स इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे, अर्जदार कलावतीबाई ही सावरंगाव (द) ता. उमरी येथील रहीवासी असून मयत बालाजी पिटलेवार यांची पत्नी आहे. अर्जदार क्र.2 व 3 हे अर्जदार क्र.1 यांचे मूले आहेत. अर्जदार हिने मागणी केलेली विमा रक्कम ही आजपर्यत न मिळाल्यामूळे तिने गैरअर्जदार क्र.1 ते 4 विरुध्द ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे उमरी येथील तहसील कार्यालय आहे, गैरअर्जदार क्र.2 हे रिलायन्स जनरल इनशूरन्स यांचे मूख्य कार्यालय आहे, गैरअर्जदार क्र.3 हे त्यांची नांदेड येथील शाखा असून गैरअर्जदार क्र.4 हे कबाल इन्शूरन्स कंपनीचे मूख्य कार्यालय आहे. दि.16.10.2007 रोजी अर्जदाराचे पती बालाजी हे सावरगांव येथून उमरी येथे कामानिमीत्त गेले असता, परत येण्यासाठी उमरी बसस्टड जवळ आले असता त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. पोलिस स्टेशन उमरी येथे अपघाताची नोंद केली त्यांचा क्रमांक 24/2007 आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे तिचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांचे नांवे मौजे सावरगांव ता. उमरी येथे गट नंबर 19 मध्ये 62 आर एवढी जमीन होती. सदरच्या जमिनी बददल अर्जदाराने 7/12 नमूना नं.8 व 6-क चा उतारा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-याना विमा संरक्षण देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे सदरील विमा काढलेला होता. त्यांचे प्रिमियम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे भरलेले होते. गैरअर्जदार क्र.2 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याचे हक्कात दिलेला होता. अर्जदाराच्या पतीने काढलेला विम्याचा कालावधी दि.15.7.2007 ते दि.16.07.2008 असा होता व अपघात दि.16.10.2007 रोजी झाला. म्हणून अर्जदार हा नूकसान भरपाई मिळण्यास पाञ होता. अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूनंतर अर्जदार हिने दि.22.01.2008 रोजी तहसील कार्यालय उमरी यांना विनंती अर्ज व क्लेम फॉर्म दाखल केला व अनेक वेळा तहसील कार्यालय उमरी यांचेकडे चकरा मारुन तोंडी विनंती केली व त्यांनी तूमच्या क्लेम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले. आजपर्यत अर्जदाराना कोणतीही क्लेमची रक्कम मिळाली नाही म्हणून अर्जदाराने अशी मागणी केली आहे की, विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याजाने 2007 पासून मिळावेत तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च रु.5000/- मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांचे पॅरा नंबर 1,2,3,4,5,6,7,9,10,11,12,13 वर त्यांना काहीही भाष्य करायचे नाही. अर्जदार यांचे पॅरा नंबर 8 बददलचे म्हणणे चूक आहे. त्यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नव्हते, तलाठी यांचे मार्फत प्राप्त झालेले अर्ज व क्लेम तहसीलदार यांचे प्रमाणपञासह तातडीने कबाल इन्शूरन्स कंपनी लि. औरंगाबाद यांचेकडे वर्ग केले. त्यामूळे त्यांचे सेवेत कोणत्याही प्रकारची ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार यांनी तक्रारीसोबत कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी सिध्द करायचे आहे की, त्यांचे पतीचा मृत्यू हा अपघाताने झालेला आहे.अर्जदार यांनी एफ.आय.आर., अंतीम इन्व्हीस्टेगेशन रिपोर्ट दाखल केलेला नाही. अर्जदार हा शेतकरी असलयाबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी घटना घडल्यापासून सात दिवसांचे आंत तक्रार करणे आवश्यक होते. अर्जदाराने ओरिजनल पेपर, फेरफार, पोलिस पेपर, पी.एम.रिपोर्ट, हे सर्व कागदपञे अर्जदाराने त्यांचेकडे दाखल केलेले नाहीत. त्यामूळे गैरअर्जदार यांनी आजपर्यत त्यांचा क्लेम सेटंल केलेला नाही व कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. अशा प्रकारची माहीती गैरअर्जदार क्र.4 यांना कळविण्यात आलेली आहे त्यामूळे आजपर्यत अर्जदाराचा क्लेम सेटल करता आलेला नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.4 यांनी आपले लेखी म्हणणे पोस्टाने पाठविले आहे. त्यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्कम मानधन म्हणून देखील स्विकारत नाहीत. त्यामूळे त्यांचे विरुध्द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा अपघात दि.16.10.2007 रोजी झाला व क्लेम त्यांचेकडे दि.18.09.2008 रोजी तहसिलदार यांचेकडून अपूर्ण कागदपञासह आला, त्यात फेरफार (6 डी) पोलिस पेपर, व पी.एम.रिपोर्ट हे नव्हते. याबाबत तहसीलदार उमरी व डिएसएओ नांदेड यांना पञ दि.30.09.2008, 21.11.2008 रोजी पाठविण्यात आले. शेवटी दि.26.6.2009 रोजी अपूर्ण क्लेम रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी यांना परत पाठविण्यात आला. मध्यस्थ करणे व शेतक-यांच्या प्रस्तावाची छाननी करणे व योग्य त्या शिफारशीसह इन्शूरन्स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्यांचे काम आहे. त्यामूळे त्यांचे विरुध्दचा दावा खारीज करावा. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांनी मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास किंवा विमा रक्कम देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार कलावतीबाई ही सावरंगाव ता. उमरी येथील रहीवासी असून मयत बालाजी पिटलेवार यांची वीधवा आहे. अर्जदार क्र.2 व 3 हे अर्जदार क्र.1 यांचे मूले आहेत. अर्जदार हिने मागणी केलेली विमा रक्कम ही आजपर्यत न मिळाल्यामूळे तिने गैरअर्जदार क्र.1 ते 4 विरुध्द ही तक्रार दाखल केलेली आहे. दि.16.10.2007 रोजी अर्जदाराचे पती बालाजी हे सावरगांव येथून उमरी येथे कामानिमीत्त गेले असता, परत येण्यासाठी उमरी बसस्टड जवळ आले असता त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. पोलिस स्टेशन उमरी येथे अपघाताची नोंद केली त्यांचा क्रमांक 24/2007 आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे तिचे पती हे व्यावसायाने शेतकरी होते व त्यांचे नांवे मौजे सावरगांव ता. उमरी येथे गट नंबर 19 मध्ये 62 आर एवढी जमीन होती. सदरच्या जमिनी बददल अर्जदाराने 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-याना विमा संरक्षण देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे सदरील विमा काढलेला होता. त्यांचे प्रिमियम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे भरलेले होते. गैरअर्जदार क्र.2 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याचे हक्कात दिलेला होता. अर्जदाराच्या पतीने काढलेला विम्याचा कालावधी दि.15.7.2007 ते दि.16.07.2008 असा होता व अपघात दि.16.10.2007 रोजी झाला. म्हणून अर्जदार हा नूकसान भरपाई मिळण्यास पाञ होता. अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूनंतर अर्जदार हिने क्लेम दाखल केला व अनेक वेळा तहसील कार्यालय उमरी यांचेकडे चकरा मारुन तोंडी विनंती केली व त्यांनी तूमच्या क्लेम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले. आजपर्यत अर्जदाराना कोणतीही क्लेमची रक्कम मिळाली नाही म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे आपल्या लेखी म्हणण्यात म्हणतात की, अर्जदाराने ओरिजनल पेपर, फेरफार, पोलिस पेपर, पी.एम.रिपोर्ट, हे सर्व कागदपञ अर्जदाराने त्यांचेकडे दाखल केलेले नाहीत. त्यामूळे गैरअर्जदार यांनी आजपर्यत त्यांचा क्लेम सेटंल केलेला नाही व कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. अशा प्रकारची माहीती गैरअर्जदार क्र.4 यांना कळविण्यात आलेली आहे त्यामूळे आजपर्यत अर्जदाराचा क्लेम सेटल करता आलेला नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपला लेखी यूक्तीवाद दाखल केला. ज्यामध्ये अर्जदाराने मा.राष्ट्रीय आयोग यांनी धर्मशेटटी श्रीनिवासराव विरुध्द न्यू इंडिया एश्योरंन्स कंपनी 2006(1) CPJ 11 (NC) या प्रकरणात जर अपघातात पडल्यामूळे जखमी झाला व त्यानंतर मृत्यू झाला तर तो अपघाती मृत्यू संबोधला आहे. म्हणून अर्जदारास क्लेम रक्कम मिळावी अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 असा लेखी यूक्तीवाद केला आहे. ज्यामध्ये अर्जदाराने दाखल केलेले पी.एम.रिपोर्ट वाचला असता त्यामध्ये मृत्यूचे कारण हे Cardio respiratory failure due to extensive pulmonary tubercularis. त्यामूळे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघातामूळे न होता शारीरिक आजारामूळे झालेला आहे. शासनाने शेतकरी अपघात विमा योजना ही अपघाताने मृत्यू झालेल्या शेतक-यासाठी लागू केलेली असल्यामूळे अर्जदाराचा पती हा सदरील योजनेचा लाभ मिळण्यास पाञ नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. क्लेम मध्ये आवश्यक ती कागदपञ अर्जदाराने संपूर्णपणे दाखल केलेली नाहीत. त्यामूळे आजपर्यत अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार यांनी सेटल केलेला नाही व ञूटीची सेवा दिली हे म्हणणे योग्य नाही. त्यामूळे अर्जदाराने मागितलेली क्लेम रक्कम देण्यास गैरअर्जदार जबाबदार नाहीत या नीर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकांरानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकांराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक |