जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 221/2011 तक्रार दाखल तारीख – 16/08/2011
निकाल तारीख - 27/03/2015
कालावधी – 03 वर्षे, 07 महिने, 11 दिवस.
श्रीमती कौशाबाई भ्र. योगीराज गडदे,
वय – 46 वर्ष, धंदा – शेती व घरकाम,
रा. ब्रम्हवाडी (येनगेवाडी),
ता. चाकुर जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- तहसीदार,
तहसील कार्यालय चाकुर,
ता. चाकुर जि. लातुर.
- जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, लातुर,
ता.जि. लातुर.
- तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
-
- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय,
- , ता व जि. लातुर.
- कबाल इन्शुरेन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि.,
विनित आठल्ये, प्लॉट नं. 7, भास्करायन,
ई- 1 सेक्टर, एच.डी.एफ.सी.लाईफ
इन्शुरेन्स ऑफिस खाली, टाऊन सेंटर,
- , औरंगाबाद – 431003.
- युनायटेड इंडिया इन्शुरेन्स कं.लि.,
प्रादेशीक कार्यालय, अंबिका भवन, क्र. 19,
तिसरा मजला, धरमपेठ एक्सटेंशन,
शंकर नगर चौक, नागपुर – 440010.
- युनायटेड इंडिया इन्शुरेन्स कं.लि.,
विभागीय कार्यालय, टिळक नगर,
मेन रोड लातुर, ता. व जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. आर.एम.रकटे/अनिता मेखले.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :-स्वत:
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 5 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 6 व 7 तर्फे :- अॅड. एस.व्ही.तापडीया.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार ही श्रीमती काशीबाई योगीराज गडदे रा. ब्रम्हवाडी (येनगेवाडी) ता. चाकुर जि. लातुर येथील रहिवाशी असून मयत योगिराज हरिबा गडदे यांची पत्नी आहे. अर्जदाराच्या पतीच्या नावे गट क्र; 562 मध्ये 1 हेक्टर 41 आर एवढी जमीन आहे. सदर शेतक-याचा महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा अंतर्गत विमा काढलेला होता. त्याचा कालावधी दि. 15/08/2009 ते 14/08/2010 असा आहे. दि. 21/08/2009 रोजी सकाळी 11:00 वाजता योगीराज गडदे चाकूर येथे आठवडी बाजार करण्यासाठी एम-80 मोटार सायकल ज्याचा नं. एम.एच. 24/ 5612 घेवून गेला होता. बाजार करुन दुपारी 4:00 वाजताचे सुमारास योगीराज गाडीवर बसून चाकुरहून गावाकडे येत असताना लातूर नांदेड रोडवर अलगरवाडी पाटीजवळील शाळेजवळ रस्त्यचे वळण असल्याने गाडी वळण घेत असताना गाडी कंट्रोल न झाल्यामुळे स्लिप होवून रोड लगतच्या डाव्या बाजुच्या दगडास गाडी धडकली सदरच्या अपघातात त्याच्या डोक्यास मार लागला होता. घटनेनंतर श्रीहरी गवळे व श्रीराम बांगड या दोघांनी नरसन शेळके यांच्या मिनी डोअर अॅटोमधून त्यास सरकारी दवाखाना चाकूर येथे उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन लातूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सायंकाळी 6.10 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याची नोंद पोलीस स्टेशन दि. 23/08/2009 चाकुर येथे गु.र.नं. 147/2009 कलम 279, 304 (अ) भा.दं.वि नुसार नोंदविण्यात आला. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते. व त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी विम्याचे लाभार्थी होते. म्हणून अर्जदाराने सर्व कागदपत्रे गोळा करुन दि. 26/08/2009 रोजी प्रस्ताव गैरअर्जदाराकडे दाखल केला. त्यांचा क्लेम अर्ज दि. 13/04/2011 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने सदरचा प्रस्ताव 90 दिवसाच्या आत न दिल्यामुळे परत करण्यात आला. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने रु. 1,00,000/- अपघात झालेल्या तारखेपासुन 12 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- तसेच दाव्याचा खर्च रु. 7,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत जिल्हा रुग्णालयाचे पत्र, पोलीस स्टेशनला दिलेले पत्र, घटनास्थळ पंचनामा, पोलीस अहवाल, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, अंतिम अहवाल, तहसीलदार यांना दिलेले पत्र, तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेले पत्र, तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, रहिवासी प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र, धारण जमिनीची नोंदवही, 7/12, फेरफार नक्कल, ओळखपत्र, युनायटेड इंडिया इन्शुरेन्स कं. लि यांनी पाठवलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराच्या पतीचा अपघात दि. 21/08/2009 रोजी प्राप्त झाला, त्यात अपूरे कागदपत्रे जसे 6 (क), वाहन परवाना, तलाठी, कृषी अधिका-याचे पत्र, पासबुक, वयाचे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला ही कागदपत्रे नव्हती. म्हणून गैरअर्जदार यांनी स्मरणपत्रे अर्जदारास दि. 05/02/2010, 06/08/2010, 05/10/2010, 03/11/2010, 06/12/2010 रोजी पाठवली. व ही कागदपत्रे दि. 21/12/2010 रोजी विमा कंपनीस पाठवण्यात आली विमा कंपनीने सदरचे प्रकरण दि. 24/03/2011 रोजी बंद केले. गैरअर्जदार विमा कंपनी 90 दिवसाच्या आत अर्जदाराचे कागदपत्रे मिळाली नसल्यामुळे अर्जदाराचा नुकसान दावा देता येत नाही. म्हणून फेटाळण्यात आला.
तालुका कृषी अधिका-याच्या पत्रानुसार अर्जदाराचा दि. 09/08/2010 रोजी त्रुटीचे पत्र कार्यालयास प्राप्त झाले. व अर्जदाराकडुन त्रुटीची पुर्तता करुन दि. 11/01/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरची कागदपत्रे पत्र क्र. ताकृअ/सांख्यिका/43/11/दि.11/01/2011 नुसार पाठवण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व त्याचा शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत व त्याचा पॉलिसी क्र. 230200/47/10/99/00000067 असा आहे. व अर्जदाराच्या पतीच्या नावाने गट क्र. 562 मध्ये 1 हेक्टर 41 आर शेती आहे. म्हणून तो शेतकरी आहे. व तो शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत येणा-या पॉलीसीचा लाभधारक होता.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराने आपला प्रस्ताव दि. 11/11/2009 रोजी पाठवलेला आहे. व त्रुटीचे पुर्तता करुन तो दि. 11/01/2011 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठवलेला आहे. तसेच या प्रस्तावात त्रुटी आहेत असे दि. 09/08/2010 रोजी कळवण्यात आले होते. व तिथून 90 दिवसात अर्जदाराने सर्व कागदपत्रांची एक प्रत न्यायमंचात अर्जदाराने दाखल केलेली आहे. यावरुन महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार अर्जदाराचा प्रस्ताव विमा कंपनीस त्या प्रस्तावाची माहिती मिळाल्यानंतर ती कागदपत्रे अर्जदाराने पुर्तता 90 दिवसात परिपुर्ण केलेली आहे. ही सर्व कागदपत्रे अर्जदारास जमवाजमव करण्यास वेळ लागलेला आहे. अर्जदार ही विधवा स्त्री आहे. तसेच दि. 21/08/2009 रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास चाकुरला बाजार करण्यासाठी त्यांचे जवळील M 80 Motor cycle No. MH-24/ 5612 चाकुरला गेला होता. बाजार संपवुन चाकूरहून येत असताना लातूर नांदेड रोडवर अलगरवाडी पाटीजवळ शाळेजवळ वळणाच्या ठिकाणी त्याच्या जवळील M 80 No. MH-24/ 5612 ही त्यास कंट्रोल न झाल्याने स्लीप होवून रोड लगतच्या डाव्या बाजुच्या दगडाच्या खुटास धडकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याचा 6:10 वाजता सरकारी दवाखाना लातुर येथे मृत्यू झाला. अर्जदाराच्या पतीचा शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू डोक्यास मार लागल्यामुळे झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्वीकारावेत. तसेच एखादया कागदपत्रांची पुर्तता होत नसेल तर पर्यायी दाखल्या बाबत आयुक्त (कृषी) जिल्हाधिकारी यांचेशी विचार विनिमय करुन पुर्तता करुन घेवून विम्याची रक्कम अदा करावी. तसेच अपघातग्रस्त दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सदरच्या शेतक-याचा अपघाती मृत्यू झालेला आहे. ही बाब सिध्द झालेली असल्यामुळे अर्जदार ही सदर विम्यास लाभास पात्र आहे. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 6 व 7 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/-
(अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात
यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 6 व 7 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 6 व 7 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
2,000/- (अक्षरी दोन हजार रुपये फक्त )आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.