जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/249 प्रकरण दाखल तारीख - 11/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 11/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. कांताबाई भ्र. बालाजी उबाळे वय सज्ञान, धंदा शेती व घरकाम अर्जदार. रा. जवळा पाठक ता.मुदखेड जि. नांदेड. विरुध्द. 1. मा. तहसीलदार, तहसील कार्यालय, मुदखेड ता.मुदखेड जि.नांदेड 2. रिलायंस जनरल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत व्यवस्थापक, 19, रिलायंन्स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 400 038 3. रिलायंस जनरल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक,शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्यावर हनुमानगड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. 4. विभागीय प्रमूख गैरअर्जदार कबाल इन्शूरंन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन एचडीएफसी, लाईफ इंशोरंन्सच्या खाली प्लॉट नं.7, सेक्टर ई 1 टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.,एस.डी.भोसले गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील - अड.अविनाश कदम गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदानुसार दाखल केलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार हजर. गैरअर्जदार क्र.2 व 3 चे वकील हजर. अर्जदारांनी प्रकरण बोर्डावर घेणेसाठी अर्ज दिला मंजूर, गैरअर्जदार यांनी कंपनीचे समेट पञाचे पञक दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी समेटपञ दाखल केले. नि.नं.17 समेट पञान्वये प्रकरण बंद करण्यात आले. खर्चासंबंधी आदेश नाही. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |