जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/246 प्रकरण दाखल तारीख - 13/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 23/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. कलावतीबाई भ्र.आशन्ना दासरवार वय 62 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा. मांडवा ता.किनवट जि. नांदेड विरुध्द. 1. मा. तहसीलदार, तहसील कार्यालय, किनवट ता.किनवट जि.नांदेड 2. व्यवस्थापक आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनी लि. झनिम हाऊस, केशवराव खाडे मार्ग, महालक्ष्मी, मुंबई 400 001 3. आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक रोड, कलामंदिराच्या बाजूला, नांदेड. 4. मा.व्यवस्थापक गैरअर्जदार कबाल इन्शूरंन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.एम.बी.टेळकीकर गैरअर्जदार क्र. 1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.अजय व्यास. गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष ) 1. अर्जदार कलावतीबाई ही मयत आशन्ना यांची पत्नी आहे. मयत आशन्ना हे शेतकरी व्यवसाय करुन त्यांचे कूटूंबीयाचे व त्यांचे पालनपोषन करीत होते. त्यांचे नांवे शेत गट नंबर 111 मध्ये क्षेञफळ 1 हेक्टर व 5 आर आणि स्थित मौजे मांडवा ता.किनवट येथे आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यास व त्यांचे कूटूंबियास सामाजिक न्याय देण्याच्या हेतूने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्यामध्ये मयत आशन्ना यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 ते 4 मार्फत उतरविण्यात आला आहे. सदर विम्याचा कालावधी दि.10.04.2005 ते 09.05.2006 असा होता. अर्जदाराचे पती दि.05.05.2005 रोजी रोजी ट्रक एम.एच.-15-ए.जी.50 मध्ये प्रवास करीत असताना सदर ट्रक भर वेगात असल्यामूळे पलटी होऊन अपघात झाला त्यात अर्जदाराचे पती हे मरण पावले. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायतचे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी आवश्यक त्या सर्व नियमानुसार कागदपञासह शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन किनवट ता. किनवट येथे गुन्हा नंबर 61/2005 कलम 279,337,338,304 (अ) द्वारे नोंदविली आहे. घटनास्थळ पंचनामा व तपास केला. अर्जदाराने अर्जासोबत घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, 7/12 उतारावरील होल्डींग, आठ अ चा उतारा,बॅंकेचे पासबूकचे सत्यप्रत, वारसा प्रमाणपञ, तलाठीचे प्रमाणपञ इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. नूकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- व त्यावर सन 2005 पासून 18 टक्के व्याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. 2. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही, गैरअर्जदार क्र,2 व 3 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. ज्यामध्ये गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार ही मयत आशन्ना यांची पत्नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही ? तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत आशन्ना हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही ? तसेच मयत आशन्ना यांनी प्रत्यक्षरित्या गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. मयत आशन्ना हे दि.05.05.2005 रोजी ट्रक एम.एच.-15-ए.जी.50 मध्ये प्रवास करीत असताना सदर ट्रक भर वेगात असल्यामूळे पलटी होऊन अपघात झाला त्यात अर्जदाराचे पती हे मरण पावले हे अर्जदाराने सिध्द केलेले नाही. अर्जदाराचा अर्ज ते मान्य करु शकत नाही. अर्जदार यांची शेतकरी अपघात विमा पॉलिसी होती हे त्यांना मान्य आहे परंतु मयत आशन्नाचे वय 70वर्ष नसून पॉलिसी काढण्याचे वेळी मयत आशन्ना यांचे वय 75 वर्ष होते म्हणून जीआर नुसार त्याचे वयास ती योजना पाञ नव्हती ? हे त्यांना मान्य ही की, गैरअर्जदार क्र.1 कडे क्लेम दि.30.05.2005 रोजी दाखल केला, अर्जदार यांने हे सिध्द करावे की, गैरअर्जदाराच्या सेवेत ञूटी आहे. सदर तक्रारीबाबत आयूक्त, पूणे यांना तक्रार निवारण करण्याचे अधिकार आहेत. अर्जदार यांनी योग्य कालावधीमध्ये तक्रार दाखल केलेली नाही. अपघातानंतर पाच वर्षाने तक्रार दाखल केलेली आहे म्हणून तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. तसेच अर्जदाराने तक्रार उशिरा दाखल केल्याबददल विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. योजनेनुसार वय 15 ते 70 वर्षाच्या शेतक-यासाठी ही योजना आहे व मयत आशन्ना यांचे पॉलिसीच्या वेळेस वय 75 वर्ष होते ? गैरअर्जदार यांनी दावा फेटाळला तर दोन महिन्याचे आंत मंचासमोर तक्रार दाखल करणे आवश्यक आहे पण असे अर्जदाराने केलेले नाही. अशा प्रकारच्या तक्रारी नॅशनल कमीशन मध्ये प्रलंबित आहेत व अर्जदाराने सदर तक्रार ही राज्य शासनाकडे दाखल करावी ? सदर तक्रार ही गैरअर्जदार यांना मानसिक ञास देण्यासाठी दाखल केलेली आहे म्हणून त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. 3. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.05.05.2005 रोजी झाला व कबाल इन्शूरन्स कंपनी ही दि.15.07.2006 रोज अस्तित्वात आली, तसेच मयत आशन्ना यांचा पॉलिसी कालावधी हा दि.10.01.2005 ते 9.04.2006 असा आहे व पॉलिसी ही आयसीआयसीआय लोबार्ड मुंबई यांनी काढलेली आहे. म्हणजे जेव्हा पॉलिसी काढली त्यावेळेस गैरअर्जदार क्र.4 ही कंपनी अस्त्तित्वात नव्हती. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 4. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2, 3 व 4 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात ते मूदे व त्यावरील सकारण उत्त्रे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 5. अर्जदारांनी मयत आशन्ना यांचे नांवे असलेल्या शेतीचा सातबारा दाखल केलेला आहे. त्यावरुन मयत आशन्ना हे शेतकरी होते हे सिध्द होते. त्यांचप्रमाणे अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ व वारसा प्रमाणपञ दाखल केलेले आहे.यामधील नोंदीनुसार मृत भोगवटदाराचे नांव आशन्ना दासरवार दाखवलेले आहे. ज्यामध्ये कलावतीबाई ही आशन्ना यांची पत्नी आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत मारोती यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. म्हणून अर्जदार ही त्या योजनेचा लाभ घेण्यास हक्कदार आहे. अर्जदार ही मयत आशन्ना यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- 6. अर्जदार ही मयत आशन्ना यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत आशन्ना यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत आशन्ना हे दि.05.05.2005 रोजी ट्रक एम.एच.-15-ए.जी.50 मध्ये प्रवास करीत असताना सदर ट्रक भर वेगात असल्यामूळे पलटी होऊन अपघात झाला त्यात अर्जदाराचे पती हे मरण पावले. हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे, हे म्हणणे बरोबर नाही. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराचा मृत्यू हा ट्रक पलटी होऊन झालेला होता अशी माहीती पोलिस स्टेशन किनवट ता. किनवट येथे दिलेली आहे. त्याबददल जवाब घेण्यात आला व घटनास्थळ पंचनामा दाखल केला. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत आशन्ना हे ट्रक पलटी झाल्यामूळे जागीच मरण पावले हे सिध्द झालेले आहे. सन 2005-06 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये आशन्ना यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, बँकेचे पासबूक, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह तहसील किनवट यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. सदरील सर्व कागदपञ तहसील कार्यालय यांनी कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविले आहेत. दि.05.05.2005 रोजी घटना घडली आहे व त्याबददलची कागदपञे दि.24.05.2005 रोजी तहसील कार्यालय किनवट यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे आय.सी.आय.सी.आय.लोबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत यावरुन अर्जदाराने क्लेम तहसील यांचेकडे वेळेत पाठविला होता व त्यांनी तो कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविला आहे. कबाल इन्शूरन्स यांनी गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे सेंटलमेंट साठी पाठविला आहे हे सिध्द होते. 7. अर्जदारांने दि.26.05.2002 ची मतदार यादी दाखल केली आहे. त्यावरुन मयत आशन्ना यांचे वय दि.26.05.2002 रोजी 62 वर्ष होते. घटना दि.05.05.2005 ची आहे म्हणजे घटनेच्या वेळी मयत आशन्ना यांहचे वय अंदाजे 65 वर्ष होते, म्हणजे ते वय 70 वर्षापेखा कमी होते. म्हणून अर्जदार ही सदरी विमा योजनेचा लाभ घेण्यास हक्कदार आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचंचे कार्यक्षेञ हे इतर पर्यायी सुवीधेसाठी पुरक आहे, त्यामुळे ही तक्रार या मंचासमोर चालू शकते. गैरअर्जदारांनी याबददल तोंडी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आहे पण त्या आक्षेपा पृष्टयर्थ कांहीही पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेले वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना दयावे लागेल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |