Maharashtra

Nanded

CC/09/188

Shkhubai Shivajirao Suryawanshi - Complainant(s)

Versus

Tahsildar kinwat - Opp.Party(s)

30 Dec 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/188
1. Shkhubai Shivajirao Suryawanshi R/o.Andhabari (Chi)Tq.Kinwat Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Tahsildar kinwat Kinwat Dist.NandedNandedMaharastra2. Mangar,National Insurance Co.LitNandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 30 Dec 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/188
                    प्रकरण दाखल तारीख -   02/09/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    30/12/2009
 
समक्ष  मा.श्री. सतीश सामते,                - अध्‍यक्ष (प्र)
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर           - सदस्‍या
       
सखुबाई भ्र.शिवाजीराव सूर्यवंशी,
वय 51 वर्षे धंदा घरकाम,                                   अर्जदार.
रा. आंदबोरी (चि) ता.किनवट जि.नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
1.   तहसीलदार,     
तहसील कार्यालय, किनवट ता.किनवट जि.नांदेड.        गैरअर्जदार.
2.   व्‍यवस्‍थापक,
नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग दुसरा मजला,
65, मर्झबान रोड, डि.ओ. 14 ख फोर्ट मुंबई 400001.
3.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,
शाखा- नगिना घाट रोड, नांदेड.
4.   कबाल इंशुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.
     दीशा अलंकार शॉप नं.2, टाऊन सेंटर,
     सिडको कॅनॉट, औरंगाबाद- 431003.
अर्जदारा तर्फे वकील             - अड.पी.जी.नरवाडे.
गैरअर्जदारा क्र.1                 - स्‍वतः
गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील   - अड. जी.एस.औंढेकर.
गैरअर्जदार क्र. 4                - स्‍वतः
 
 
 
 
 
निकालपत्र
(द्वारा- मा.श्री.सतीश सामते,अध्‍यक्ष.प्र)
 
          गैरअर्जदार नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि, यांच्‍या सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे मयत नंदकीशोर शिवाजीराव सुर्यवंशी यांची आई आहे. अर्जदार हीचा मुलगा मयत नंद‍कीशारे हा दि.13/04/2007 रोजी संध्‍याकाळी 7.00 वाजण्‍याच्‍या सुमारास मोटार सायकल क्र.एमएच-26/एन-189 ने लग्‍नाची पत्रिका देऊन मनूला येथे जात असताना शिळोना ते पोफाळी ता.उमरखेड जि.यवतमाळ रोउवर पोफाळी कडुन येणारी इंडिका कार नं. एमएच/एल-476 ने नंद‍कीशोरच्‍या मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्‍यामुळे अर्जदाराचा मुलगा नंदकीशोर व त्‍याच्‍या सोबत असलेला इसम नामे राजु सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. दवाखान्‍यात शेरीख करण्‍यासाठी आणत असतांना दि.13/04/2007 रोजी नंदकीशोर हा मरण पावला. यासंबधी पोलिस स्‍टेशन पोफाळी ता.उमरखेड जि.यवतमाळ यांनी गुन्‍हा नं.23/2007 नोंदविला असुन अर्जदाराने या मंचात एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍टमॉर्टेम रिपोर्ट, ग्रामपंचायतीचा मृत्‍यु प्रमाणपत्र इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत. अर्जदाराचा मुलगा नंदकीशोर हा रा.आंदबोरी (चि) ता.किनवट हा व्‍यवसायाने शेतकरी होता त्‍यांचे नांवे मौजे आंदबोरी(चि) ता.किनवट जि.नांदेड येथे गट नं.111 क्षेत्रफळ चा हेक्‍टर एवढया जमीनीचा मालक व ताबेदार होता. याबद्यल 7/12, गाव नमुना 8 दाखल केलेला आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी शेतक-यांचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे काढली व त्‍याचे प्रिमीयम भरले आहे व विमा घेते वेळेस गैरअर्जदाराने सर्व जोखीम स्विकारली व विमा शेतक-यांच्‍या हक्‍कात दिला. अर्जदाराचा मुलगा हा शेतकरी होता त्‍याचे प्रिमीयम महाराष्‍ट्र शासनाने अदा केले आहे. म्‍हणुन ते लाभार्थी आहे. सदरील पॉलिसीचा कालावधी हा दि.15/07/2006 ते 14/07/2007 असा आहे व घटना ही दि.13/04/2007 ची आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारा नुकसान भरपाई देण्‍यास बाध्‍य आहेत. महाराष्‍ट्र शासनाच्‍याय परिपत्रकाप्रमाणे आपल्‍या मुलाच्‍या मृत्‍युनंतर तहसील कार्यालयात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दि.10/05/2007 रोजी आवश्‍यक कागदपत्रासह अर्ज व क्‍लेम फॉर्म सादर केला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना दि.07/04/2008 रोजी कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि. यांचे मार्फत पत्र पाठविले ते पत्र दि.02/05/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांना मिळाले.सदरील पत्रानुसार गैरअर्जदार क्र. 2 यांनी बेकायदेशिररित्‍या क्‍लेम दाखल करण्‍यास उशीर झाला म्‍हणुन कळविले. प्रस्‍तुत पॉलिसीनुसार विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास अर्जदार हे हक्‍कदार असतांना गैरअर्जदाराने बेकायदेशिररित्‍या क्‍लेम दाखल करण्‍यास उशिर झाला म्‍हणुन कळविले व सेवेत त्रुटी केली. मयत नंदकीशोर हा अविवाहीत होता व अर्जदार ही मयताची आई असल्‍यामुळे ती पॉलिसीनुसार नुकसान भरपाई मिळण्‍यास हक्‍कदार आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्‍यामुळे विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.10/05/2007 पासुन 12 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- आणी दावा खर्च म्‍हणुन रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
          गैरअर्जदार क्र.1 हे स्‍वतः हजर झाले आहेत, त्‍यांनी लेखी म्‍हणणे देण्‍यासाठी दोन वेळा तारीखा घेतल्‍या वेळ देऊन देखील त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दिले नाही. म्‍हणुन त्‍यांचे विरुध्‍द नो से आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्‍यात आले.
 
          गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी आपले लेखी म्‍हणणे संयुक्‍तीकरित्‍या वकीला मार्फत दाखल केले. यात त्‍यांच्‍याकडुन सेवेत कुठेही त्रुटी झाली नाही. अर्जदाराची तक्रार चुकीची आहे, असे म्‍हटले आहे. मयत नंदकीशोर यांचा मोटरसायकलवरुन जात असतांना कारच्‍या धडकेने अपघात झाला हे अमान्‍य करतात. मयताने अतीशय निष्‍काळजीपणे मोटरसायकल चालविल्‍यामुळे अपघाता झाला. मयत हा शेतकरी होता व त्‍यांच्‍या नांवाने अपघाताच्‍या वेळी शेत जमीन होती हेही गैरअर्जदार अमान्‍य करतात. या विषयीचा पुरावा मागतात, मुळातच तो शेतकरी होता, शेतात उत्‍पन्‍न नीघत होत याबद्यलचा पुरावा दाखल केला पाहीजे. गैरअर्जदाराने क्‍लेम प्रस्‍ताव मिळाल्‍यानंतर त्‍यांनी ते गैरअर्जदार क्र.4 यांच्‍या मार्फत आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह पाठविला असे म्‍हटले होते त्‍यांना कागदपत्र मिळालेच नाही. त्‍यांनी तसे तहसीलदार यांना पत्र लिहीले होते. यात अर्जदार यांची स्‍वतःची चुक आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रक 2008/187 दि.29/05/2008 नुसार परिपत्रक क्र. 23 ई 8 यात शेतकरी जर वाहन चालवीत असेल तर अपघाताच्‍या वेळी त्‍याच्‍याकडे वैध वाहन चालविण्‍याचा परवाना पाहीजे. अपघाताच्‍या वेळी अशा प्रकारचा वाहन चालविण्‍याचा परवाना त्‍यांच्‍याकडे नव्‍हता. त्‍यामुळे गैरअर्जदार हे विम्‍याची रक्‍कम देण्‍यास बांधील नाहीत. अर्जदाराचा दावा खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
 
          गैरअर्जदार क्र. 4 यांनी आपले लेखी म्‍हणणे दि.18/11/2009 रोजी पोस्‍टाने पाठविला आहे याप्रमाणे मयत नंदकीशोर यांचा क्‍लेम त्‍यांना दि.04/04/2008 रोजी मिळालेला आहे. पॉलिसीचा कालावधी दि.15/07/2006 ते 14/07/2007 असा आहे व सुचना ही गैरअर्जदारा अपघात झाले पासुन 90 दिवसांच्‍या आंत मिळाली नाही व प्रत्‍यक्ष क्‍लेम हा दि.04/04/2008 रोजी मिळाल्‍यामुळे तहसिलदार यांचेकडे वापस पाठविण्‍यात आला. गैरअर्जदार यांचेकडुन कुठल्‍याही प्रकारचा मावेजा मिळणार नाही ते केवळ मध्‍यस्‍थी आहेत.
          अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहेत. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
 
1.   गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय?        होय.
2.   काय आदेश?                                             अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                        कारणे
मुद्या क्र. 1 व 2
 
          अर्जदार यांनी शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना क्‍लेम भाग 1 भरुन दिलेला आहे. यात दाव्‍याप्रमाणे सौ.सखुबाई शिवाजीराव सुर्यवंशी म्‍हणजे मयताच्‍या आईचा उल्‍लेख आहे. अर्जदार हीने सुरुवातीसच आपल्‍या तक्रार अर्जात तीचा मुलगा नंदकीशोर शिवाजीराव सुर्यवंशी हा अविवाहीत होता. त्‍यामुळे ती विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास हक्‍कदार आहे असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांचा गैरअर्जदार क्र. 2 यांना शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत यात नंदकीशोर रा.आंदबोरी (चि) यांचा दि.13/04/2007 रोजी अपघाती निधन झालेले आहे. त्‍यामुळे त्‍यांचे पात्र लाभार्थीनी अर्ज केला आहे, असे म्‍हटले आहे. मयत नंदकीशोर हा शेतकरी होता व त्‍याच्‍या नांवावर चार हेक्‍टर शेती आंदबोरी ता.किनवट येथे होती व यावर गांव नमुना 12 प्रमाणे शेती वहीवाट असल्‍याचे दाखविण्‍याचे कापुस,केळी,तुर याचा पेरा असल्‍याची नोंद केल्‍याचे दर्शविण्‍यात आले आहे, पुरावा म्‍हणुन अर्जदाराने शेतीचा 7/12 ऑक्‍टोंबर 2007 या वर्षासाठी तसेच गांव नमुना क्र. 8 अ होल्‍डींग मयताचे नांवे असल्‍याबद्यल दाखल केले आहे. तलाठी यांच्‍या सहीचे गांव नमुना क्र. 6 क त्‍यावर अर्जदार ही कायदेशिर वारस असल्‍याचे प्रमाणपत्र तसेच मयत नंदकीशोर यांचा अपघाती निधन झाल्‍याबद्यल ग्राम पंचायत कार्यालयाचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. मयत नंदकीशोर यांचा दि.13/04/2007 रोजी अपघात झाला याबद्यल पोलिस ठाणे पोफळी ता.उमरखेड जि. यवतमाळ येथे एफ.आय.आर. 0002723 देण्‍यात आला. पोष्‍ट मॉर्टेम रिपोर्ट, पोलिस पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, एफ.आय.आर. इ.कागदपत्र या प्रकरणांत दाखल केलेले आहे. पोष्‍ट मॉर्टेम रिपोर्ट मध्‍ये मृत्‍युचे कारण हे हेड इंज्‍युरी व रक्‍त स्‍त्राव असे दिले आहे. या सर्व कागदपत्रावरुन मयत शेतकरी नंदकीशोर यांचा अपघाती मृत्‍यु झाला याबद्यल वाद नाही. एवढे सर्व कागदपत्र असतांना गैरअर्जदार क्र. 4 यांनी दि.07/04/2008 रोजी तहसिलदार यांचा प्रस्‍ताव मिळाल्‍याच्‍यानंतर एक पत्र लिहुन त्‍यात 2007 चा एम.ओ.यु. प्रमाणे गैरअर्जदारांना अपघाताची सुचना सुचना उशिरा मिळाली. त्‍यामुळे तुमचा क्‍लेम वापस पाठविण्‍यात येतो, असे म्‍हटले आहे. याप्रमाणे ऑक्‍टोंबर 2007 ला गैरअर्जदार क्र.2 यांनी देखील अशाच प्रकारचे एक पत्र तहसिलदार यांच्‍या नांवाने पाठवलेले आहे व त्‍यात असे म्‍हटले आहे. क्‍लेम पाठविण्‍यास व सुचना देण्‍यास उशिर झाला व उशिर का झाला याचे योग्‍य कारण दिलेले नाही. गैरअर्जदारांना दावा नाकारण्‍याचे एकच कारण आहे ते म्‍हणजे शासनाचे परीपत्रकप्रमाणे त्‍यांना 90 दिवसांचे आंत अपघाताची सुचना देणे आवश्‍यक आहे परंतु हे नियम बंधनकारक नाही. ग्रामीण भागामध्‍ये हा अपघात झाल्‍यानंतर घरातील व्‍यक्ति मरण पावला आहे व सर्व कुटूंब दुखाःत असते यात त्‍यांना शासनाचे शेतक-यासाठी अशी काही योजना आहे याची माहीती नसते तेंव्‍हा दुखातुन सावरुन अशा प्रकारच्‍या योजनेची माहीती घेऊन सर्व कागदपत्र हस्‍तगत करुन क्‍लेम प्रस्‍ताव देण्‍यास उशिर लागणे शक्‍य आहे. म्‍हणुन अशा प्रकारचा विलंब हा माफ करण्‍यात यावा, असे शासनाने आपल्‍या परिपत्रकात स्‍पष्‍टपणे म्‍हटले आहे व केवळ उशिर झाला या कारणासाठी शेतक-याचा दावा नाकरण्‍यात येऊ नये असे म्‍हटले आहे व हा नियम बंधनकारक नाही (मॅडेंटरी) असे म्‍हटले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदाराने या कारणाखाली दावा नाकारणे हे न्‍यायाचे दृष्‍टीने योग्‍य नाही. गैरअर्जदार क्र. 4 व 2 यांनी दावा नाकारताना क्‍लेम दाखल करण्‍यास उशिरा झाला असे म्‍हटलेले आहे. आधी प्रत्‍यक्ष आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यात त्‍यांनी आपला बचावासाठी असे म्‍हटले आहे की, शेतकरी नंदकीशोर हा मोटरसायकल चालवतांना अपघात झाला, अपघाताच्‍या वेळी त्‍याच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना नव्‍हता म्‍हणुन त्‍याला क्‍लेम मिळु शकत नाही, हा उल्‍लेख त्‍यांनी दावा नाकारतांना त्‍यांच्‍या पत्रात करणे आवश्‍यक हाते तसे त्‍यांनी केले नाही. यात अर्जदाराने मयत नंदकीशोर याच्‍या नांवाचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स दाखल केलेले आहे जे दि.17/06/1996 ते 16/06/2016 पर्यत आहे म्‍हणजे गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे मयताकडे वाहन चालविण्‍याचा परवाना होता हेही सिध्‍द केले आहे. एवढे सर्व कागदपत्र उपलब्‍ध असतांना व ही कागदपत्र दावा मंजुर करण्‍यास पुरेशी असतांना एका नियमाचा आधार घेऊन दावा नाकारणे म्‍हणजे सेवेत त्रुटी आहे व शेतक-यावर अन्‍याय करणे देखील आहे.
          वरील सर्व बाबींचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश परीत करीत आहोत.
                              आदेश.
 
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्‍यात येतो.
2.   गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी हा निकाल लागल्‍या पासुन 30 दिवसांचे आंत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दावा नाकारल्‍याची तारीख दि.04/04/2008 पासुन 9 टक्‍के व्‍याजाने पुर्ण रक्‍कम मिळेपर्यंत व्‍याजासह द्यावे.
3.   गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- द्यावे व दावा खर्च रु.2,000/- द्यावे.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्रीमती.सुजाता पाटणकर)                          (श्री.सतीश सामते)
     सदस्‍या                                                      अध्‍यक्ष (प्र)                                   
 
 
गो.प.निलमवार.लघूलेखक.