Maharashtra

Jalna

CC/57/2013

Champabai Padmsingh Chandawade - Complainant(s)

Versus

Tahsildar ,Jafrabad,Dist.Jalna - Opp.Party(s)

R.V.Jadhav

16 Nov 2013

ORDER

 
CC NO. 57 Of 2013
 
1. Champabai Padmsingh Chandawade
R/o.Pasodi,Tq.Jafrabad
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tahsildar ,Jafrabad,Dist.Jalna
Jafrabad
Jalna
Maharashtra
2. 2) ICICI Lombard General Insurance co.Ltd.
2nd floor,Alaknanda complex,Near Baba petrol pump,Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 16.11.2013 व्‍दारा श्रीमती माधुरी विश्‍वरुपे, सदस्‍या)
 
      तक्रारदारांचे पती श्री. पद्मसिंग देवसिंग चंदवडे हे दिनांक 31.01.2005 रोजी संध्‍याकाळी शेतात त्‍यांचे गाय व बैल आणण्‍याकरिता गेले होते. दुसरे दिवशी दिनांक 01.02.2005 रोजी सकाळी त्‍यांचे मृत शरीर आढळून आले. संबंधित घटनेची माहीती जाफ्राबाद पोलीस स्‍टेशन यांना दिल्‍यानंतर चौकशी करुन पोलीसांनी आरोपी विरुध्‍द भा.द.वि. कायदा कलम 302, 504, 506, 34 अन्‍वये गुन्‍हयांची नोंद केली. मयताचे प्रेत पोस्‍टमार्टमसाठी पाठवले.
      तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्‍यांचे मौ. पासोडी ता.जाफ्राबाद जि.जालना येथे त्‍यांचे मालकीची शेत जमीन आहे. त्‍यामुळे पतीच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव विहीत मुदतीत व आवश्‍यक कागदपत्रासहीत गैरअर्जदार 1 तहसीलदार यांचेकडे पाठवला. परंतू गैरअर्जदारांनी अद्याप पर्यंत विमा प्रस्‍तावावर कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव गैरअर्जदार 2 यांचेकडे प्रलंबित आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
      महाराष्‍ट्र शासनाने गैरअर्जदार यांचे विरुध्‍द राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली येथे शेतक-यांच्‍या प्रलंबित प्रस्‍तावा संदर्भात तक्रार दाखल केली आहे. ज्‍या शेतक-यांचे प्रस्‍ताव परिपूर्ण आहेत त्‍यांना आदेश झाल्‍यानंतर 6 महिन्‍यात सदर योजने अंतर्गत नुकसान भरपाईची रक्‍कम देण्‍याचे आदेश निर्गमित केले आहेत. तसेच जे प्रस्‍ताव अपूर्ण आहेत त्‍यांचे प्रस्‍ताव आदेश झाल्‍यानंतर अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करुन 6 महिन्‍यात प्रस्‍तावाबाबत निर्णय घेण्‍याबाबत गैरअर्जदार 2 यांचे विरुध्‍द राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांनी आदेश निर्गमित केले आहेत. शेतक-यांच्‍या प्रलंबित विमा प्रस्‍तावाच्‍या यादीमध्‍ये तक्रारदारांचा प्रस्‍ताव अ.क्रं. 130 येथे आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अद्याप पर्यंत नुकसान भरपाईची रक्‍कम दिली नाही.
      गैरअर्जदार 1 यांना न्‍याय मंचाची नोटीस मिळूनही गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश घेण्‍यात आला.
      गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांच्‍या विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 असून तक्रारदारांना 2012 मध्‍ये प्रस्‍तुतची तक्रार मुदतबाह्य दाखल केली आहे. गैरअर्जदार 2 यांनी तक्रारदारांना प्रस्‍तावातील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्‍याबाबत पत्रान्‍वये कळवले. परंतू अद्याप पर्यंत तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. सदरची तक्रार मुदतबाह्य असल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्‍हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. आर.व्‍ही.जाधव व गैरअर्जदार 2 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्‍तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्‍यांचा खून झाला आहे. कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांचेकडे शेतक-यांच्‍या प्रलंबित प्रस्‍तावाची दाखल केलेल्‍या यादीची प्रत तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणात दाखल केली आहे. सदर यादीमध्‍ये अ.क्रं. 130 MUM/000 0458/ 31.01.2005/ 4005/0003 134,पॉलीसी कालावधी दिनांक 10.01.2005 ते 09.04.2005 असे असल्‍याचे दिसून येते. परंतू राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांच्‍या तक्रार क्रमांक 27/2008 मधील दिनांक 20.05.2008         रोजी दिलेल्‍या आदेशानुसार गैरअर्जदार 2 यांनी तक्रारदारांचा प्रस्‍तावावर कोणतीही कार्यवाही केली नसल्‍याचे दिसून येते.
गैरअर्जदार 2 यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यानूसार तक्रारदारांनी प्रस्‍तावा मधील अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा प्रस्‍ताव अपूर्ण कागदपत्रांच्‍या कारणास्‍तव प्रलंबित असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदारांनी अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केल्‍यानंतर गैरअर्जदार 2 यांनी तक्रारदारांचा प्रस्‍ताव गुणवत्‍तेवर निकाली करणे उचित होईल असे न्‍याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे. 
 
आदेश  
 
  1. तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांनी विमा प्रस्‍तावातील आवश्‍यक कागदपत्रे आदेश मिळाल्‍यानंतर 60 दिवसात गैरअर्जदार 2 यांचेकडे दाखल करावी.
  2. गैरअर्जदार 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍तावा बाबतची आवश्‍यक कागदपत्रे दाखल केल्‍यानंतर 60 दिवसात प्रस्‍ताव गुणवत्‍तेवर निकाली करावा.
  3. खर्चा बाबत आदेश नाही.
  4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच अर्जदाराला परत करावेत.
 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.