जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2011/36 प्रकरण दाखल तारीख - 02/02/2011 प्रकरण निकाल तारीख – 13/05/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. रामचंद्र पि.सखाराम मुधळ वय सज्ञान, धंदा शेती अर्जदार रा.उमरी ता.अर्धापूर जि. नांदेड विरुध्द. 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, अर्धापूर ता.अर्धापूर जि.नांदेड. 2. व्यवस्थापक नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. स्टलिंग सिनेमा बिल्डींग, दुसरा मजला, 65 मर्झबान रोड, डि.ओ.14 ख फोर्ट, मुंबई 400 001 3. नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगिना घाट रोड, नांदेड. 4. वीभागीय प्रमुख, कबाल इन्शुरन्स कंपनी प्रा.लि. शॉप नं.2, दीशा अलंकार कॉम्पलेक्स, टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही. भुरे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - एकतर्फा गैरअर्जदार क्र. 2 व 3तर्फे वकील - अड.एम.बी.टेळकीकर गैरअर्जदार क्र.4 तर्फे - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष ) 1. अर्जदार रामचंद्र हा मयत ज्ञानेश्वर रामचंद्र मुधळ यांचा पिता आहे. मयत ज्ञानेश्वर हे शेतकरी व्यवसाय करुन त्यांचे कूटूंबीयाचे व त्यांचे पालनपोषन करीत होते. त्यांचे नांवे शेत गट नंबर 14 मध्ये क्षेञफळ 40 आर आणि स्थित मौजे उमरी येथे आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यास व त्यांचे कूटूंबियास सामाजिक न्याय देण्याच्या हेतूने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्यामध्ये मयत ज्ञानेश्वर यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 व 4 मार्फत उतरविण्यात आला आहे. सदर विम्याचा कालावधी दि.15.07.2006 ते 14.07.2007 असा होता. अर्जदाराचा मुलगा दि.30.12.2006 रोजी कामठयाहून उमरीकडे मोटार सायकल क्र.एम.एच.-26-बी- 4005 जे जात असताना उमरी फाटा नांदेड ते बसमत रोडवर ट्रक्टर नंबर एमएच-26/इ.4571 या ट्रक्टरच्या चालकाने धडक दिल्यामूळे अर्जदाराचा मूलगा व अर्जदाराचे मूलासोबत असलेले पांडूरंग भिसे हे जागेवरच मरण पावले. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायतचे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी आवश्यक त्या सर्व नियमानुसार कागदपञासह शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन अर्धापूर येथे गुन्हा नंबर 234/2006 कलम 279, 304 (अ) द्वारे नोंदविली आहे. घटनास्थळ पंचनामा व तपास केला. अर्जदाराने अर्जासोबत एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, 7/12 उतारावरील होल्डींग, नमूना नं.8 चा उतारा, 6 क चा उतारा,वारसा प्रमाणपञ इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. नूकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- व त्यावर सन 2007 पासून 18 टक्के व्याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. 2. गैरअर्जदार क्र.1 हे नोटीस मिळूनही हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द दि.7.3.2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. 3. गैरअर्जदार क्र.2 व 3 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. ज्यामध्ये गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदाराचा दावा खोटा, निराधार व कायदयाशी विसंगत आहे त्यामूळे तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदाराचा दावा विमा पॉलिसीच्या करारातील तरतूदी, शर्ती तथा अटीच्या विरुध्द आहे. अर्जदार हे मयत ज्ञानेश्वर यांचे पिता आहेत याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत ज्ञानेश्वर हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही.. त्यामूळे तो या विमा योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही.कागदपञाची पूर्तता करण्यासाठी गैरअर्जदार क्र.2,3 व 4 यांनी अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांना पञ दिलेले आहेत. तसेच मयत ज्ञानेश्वर यांनी प्रत्यक्षरित्या गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. मयत ज्ञानेश्वर हा अर्जदाराचा मुलगा दि.30.12.2006 रोजी कामठयाहून उमरीकडे मोटार सायकल क्र.एम.एच.-26-बी-4005 जे जात असताना उमरी फाटा नांदेड ते बसमत रोडवर ट्रक्टर नंबर एमएच-26/इ.4571 या ट्रक्टरच्या चालकाने धडक दिल्यामूळे अर्जदाराचा मूलगा व अर्जदाराचे मूलासोबत असलेले पांडूरंग भिसे हे जागेवरच मरण पावले हे अर्जदाराने सिध्द केलेले नाही. मयत ज्ञानेश्वर हे स्वतःच्या मृत्यूस जबाबदार आहे परंतु मावेजा मिळविण्यासाठी ट्रक्टर चालकाविरुध्द खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ? अर्जदाराचा अर्ज ते मान्य करु शकत नाही. तसेच त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. 4. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.30.12.2006 रोजी झाला व क्लेम हा दि.18.09.2007 रोजी अपूर्ण कागदपञासह प्राप्त झाला. त्याबाबत त्यांना दि.25.10.2007, 20.09.2010, 30.12.2007 रोजी पञ पाठविण्यात आले. परंतु अर्जदार यांनी कागदपञ दाखल केले नाही म्हणून अर्जदाराना वारंवार मागणी करुनही त्यांनी कागदपञ दाखल केले नाहीत शेवटी गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर विमा दावा बंद केल्याचे दि.18.2.2009 रोजीचे पञाद्वारे कळविले.. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 5. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2,3 व 4 यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुददे व त्यावरील उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तरे 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 6. अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव ज्ञानेश्वर रामचंद्र मुधळ दाखवलेले आहे. ज्यामध्ये रामचंद्र हे ज्ञानेश्वर यांचे पिता आहेत असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत रामचंद्र यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार हे मयत ज्ञानेश्वर यांचे पिता आहेत हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- 7. अर्जदार यांनी मयत ज्ञानेश्वर यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत ज्ञानेश्वर यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत ज्ञानेश्वर हा अर्जदाराचा मुलगा दि.30.12.2006 रोजी कामठयाहून उमरीकडे मोटार सायकल क्र.एम.एच.-26-बी-4005 जे जात असताना उमरी फाटा नांदेड ते बसमत रोडवर ट्रॅक्टर नंबर एमएच-26/इ.4571 या ट्रक्टरच्या चालकाने धडक दिल्यामूळे अर्जदाराचा मूलगा व अर्जदाराचे मूलासोबत असलेले पांडूरंग भिसे हे जागेवरच मरण पावले हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे ? अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू हा ट्रक्टरने धडक बसून झालेला होता अशी माहीती पोलिस स्टेशन अर्धापूर येथे दिलेली आहे. त्याबददल जवाब घेण्यात आला व घटनास्थळ पंचनामा दाखल केला. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत ज्ञानेश्वर हे ट्रक्टरची धडक बसल्यामूळे जागीच मरण पावले हे सिध्द झालेले आहे. सन 2006-07 मध्ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये ज्ञानेश्वर यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार हे त्यांचे पिता असल्यामूळे ते प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार हे ग्राहक आहेत. त्यामूळे अर्जदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकतात. अर्जदार यांनी मृत्यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 मार्फत गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. दि.30.12.2006 रोजी घटना घडली आहे व त्याबददलची कागदपञे तहसील कार्यालय अर्धापूर यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे कबाल इन्शुरन्स यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी विम्याची रक्कम दिली नाही. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. 8. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना दयावे लागेल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |