Maharashtra

Gadchiroli

CC/08/21

Smt. Indu Manik Buddhe - Complainant(s)

Versus

Tahsiladar Saheb, Tahsil Office, Desaiganj (Wadsa) - Opp.Party(s)

Ravindra S. Donadkar

24 Jul 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/21
 
1. Smt. Indu Manik Buddhe
R/s. Visora, Ta. Desaiganj (Wadsa),
Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Tahsiladar Saheb, Tahsil Office, Desaiganj (Wadsa)
Tahsiladar Saheb, Tahsil Office, Desaiganj (Wadsa)
Gadchiroli
Maharastra
2. Branch Officer, I.C.I.C.I. Lombard Insurance Company Ltd., Nagpur
Branch Officer, I.C.I.C.I. Lombard Insurance Company Ltd., Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री अनिल एन.कांबळे,अध्‍यक्ष (प्रभारी))

                                      

1.           अर्जदाराने, सदर तक्रार गैरअर्जदाराचे विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता दाखल केलेली आहे.   अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणे. 

 

2.          अर्जदार हिचा पती माणिक दयाराम बुध्‍दे हा शेतकरी होता व त्‍याचा दिनांक 26/10/2005 ला सायंकाळच्‍या सुमारास शेती पाहणी करण्‍याकरीता गेला असता, विद्युत खांबावरील जिवंत तार शेतात पडल्‍याने करंट लागून मृत्‍यु झाला.  सदर अपघाताबद्दल अकस्‍मात मृत्‍युची नोंद पोलीस स्‍टेशन, देसाईगंज यांनी दाखल करुन,

                        ... 2 ...                       गा.त.क्र.21/2008.

 

घटनास्‍थळ पंचनामा तयार केला, मृतकाचा इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा तयार केला, तसेच पोष्‍टमार्टम करण्‍यात आले.  तुटलेल्‍या तारा संदर्भात महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत मंडळाच्‍या कार्यालयात तोंडी व लेखी सुचना देण्‍यात आली.  विद्युत कार्यालयाचे निष्‍काळजीपणामुळे अर्जदाराच्‍या पतीस मृत्‍युस सामोरे जावे लागले. 

 

3.          अर्जदाराने, दिनांक 3/12/2005 ला गैरअर्जदाराकडून मिळालेल्‍या अपघात विमा बद्दल लेखी मागणी केली.  परंतु, अर्जदाराला हाकलून लावण्‍यात आले.  शेतकरी अपघात विमा योजना शासनाने 2005-06 मध्‍ये कृषी विभागाच्‍या वतीने आय.सी.आय.सी.आय. लोम्‍बार्ड इन्‍शुरन्‍स कंपनीकडे फार मोठी रकमेचा भरणा करुन विमा काढण्‍यात आला.  अर्जदार या योजनेत येत असल्‍याने, गैरअर्जदार क्र. 1 कडे रितसर अर्ज केला.  परंतु, गैरअर्जदार क्र. 1 यांनी उडवाउडवीची उत्‍तरे देऊन, प्रकरण गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविण्‍याचे तोंडी सांगीतले.  परंतु, अजुनपर्यंत गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने नुकसान भरपाई दिली नाही.  अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 2 कडे विचारणा केली, परंतु त्‍यांनी टाळाटाळ केली.  अर्जदाराने, तहसिलदार, देसाईगंज यांचकडे लेखी अर्ज देवून नुकसान भरपाईची मागणी केली.  अर्जदाराने, क्‍लेम फार्म, घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पोष्‍टमार्टम रिपोर्ट, पोलीस पाटील प्रमाणपञ, तलाठी प्रमाणपञ, गावनमुना 8-अ, सात-बारा उतारा, नमुना 6-क, मर्ग खबरी, कुंटूंब विवरण पञ इत्‍यादी कागदपञ जोडून गैरअर्जदार क्र. 1 ला सादर करुन, नुकसान भरपाईची मागणी केली.  परंतु, गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाईची रक्‍कम दिली नाही.  त्‍यामुळे, अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन, शेतकरी विमा योजनेचे रुपये 1,00,000/- व मानसिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 2,000/- असे एकुण रुपये 1,22,000/-, 12 %  टक्‍के व्‍याजासह गैरअर्जदारांकडून वसूल करुन द्यावे, अशी मागणी केली आहे. 

 

4.          अर्जदाराने, निशाणी 2 नुसार एकुण 8 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आला.  गैरअर्जदार हजर होऊन आपले लेखी बयाण दाखल केले आहेत. 

 

5.          गैरअर्जदार क्र. 1 ने निशाणी 8 नुसार लेखी उत्‍तर सादर केले आहे.  अर्जदाराकडून प्राप्‍त झालेला अर्ज गैरअर्जदार क्र. 1 च्‍या कार्यालयाचे पञ क्र. वशि/सामान्‍य/93/2006, दि. 26/5/2006 नुसार संबंधीत कार्यालयाला पाठविण्‍यात आले.  तसेच, या संदर्भात गैरअर्जदार क्र. 1 चे कार्यालयाचे पञ दिनांक 20/1/2007 अन्‍वये नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता जिल्‍हाधिकारी, गडचिरोली यांनीही पञ सादर केले.  गैरअर्जदार क्र. 1 ने लाभार्थ्‍यास नुकसान भरपाई मिळावी, या दृष्‍टीने संबं‍धीत कार्यालयाकडे प्रस्‍ताव सादर केला असल्‍याने, नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 2 ची आहे.  अर्जदाराने लाभांश मिळण्‍याकरीता अर्ज सादर केल्‍यानंतर सदर प्रकरण आय.सी.आय.सी.आय. लोम्‍बार्ड इन्‍शुरन्‍स कंपनी यांचकडे सादर केलेला

 

                        ... 3 ...                       गा.त.क्र.21/2008.

 

आहे.  त्‍यामुळे, नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 2 ची आहे, त्‍याला गैरअर्जदार क्र. 1 जाबाबदार नाही.

 

6.          गैरअर्जदार क्र. 1 ने आपले लेखी बयाणासोबत गैरअर्जदार क्र. 2 ला पाठविलेल्‍या पञाची झेरॉक्‍स प्रत व जिल्‍हाधिकारी यांना पाठविलेल्‍या पञाची झेरॉक्‍स प्रत दाखल केली आहे. 

 

7.          गैरअर्जदार क्र. 2 ने निशाणी 13 नुसार लेखी उत्‍तर सादर केलेला आहे.  गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदाराची तक्रार माहिती अभावी अमान्‍य केली आहे.  गैरअर्जदार क्र. 2 ने विशेष उत्‍तरात असे नमुद केले आहे की, महाराष्‍ट्र सरकारने, शेतकरी अपघात विमा काढलेला असून, आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स सोबत, अपघात विमा करार शासन परिपञक क्र. 166/11-अ नुसार केलेला आहे.  योजनेनुसार तलाठयाकडे अर्ज दाखल करावयाचा असून, सर्व दस्‍ताऐवजासह तहसिलदारा मार्फत विमा कंपनीकडे पाठवावयाचा असतो व प्रस्‍तावात काही ञृटी असल्‍यास त्‍याची पुर्तता केल्‍यानंतर विमा कंपनी नुकसानभरपाई देण्‍यास बाध्‍य असते.  प्रस्‍तुत प्रकरण गैरअर्जदार क्र. 1 कडे अर्जदाराने अर्ज सादर केला असावा, त्‍याबद्दल गैरअर्जदार क्र. 2 अनभिज्ञ आहे.  शासन निर्णयानुसार गैरअर्जदार क्र. 1 ने प्रकरणाची दखल घेवून कागदपञाची पुर्तता व खाञी करुन, गैरअर्जदार क्र. 2 कडे प्रस्‍ताव पाठवावयास हवे होते.  परंतु, गैरअर्जदार क्र. 1 ने कोणताही प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविलेला नाही.  त्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार अपरिपक्‍व असून, कायद्याशी सुसंगत नाही.  त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 2 ने सेवा पुरविण्‍यास निष्‍काळजी केली नाही.  सदर मामल्‍यात जोडलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन असे दिसून येते की, मयत हा शेतकरी असल्‍याचे खोटे असून, शेतकरी असल्‍याचा पुरावा जोडलेला नाही.  सदर अपघात, महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत मंडळाच्‍या खांबावरील विद्युत प्रवाह चालु असलेली तार तुटल्‍यामुळे करंट लागून मृत्‍यु झालेला दिसून येतो.  त्‍यामुळे, वास्‍तविक, विद्युत मंडळाच्‍या निष्‍काळजीपणाने अपघात झाला असल्‍यामुळे, त्‍याला ते जबाबदार आहे. 

 

8.          शासन निर्णय, कृषी व पदुम विभाग क्र. एनआयएस 1204/पञ क्र. 166/11-A, दिनांक 19 ऑगष्‍ट 2004 च्‍या टिपणी-14 नुसार कुठलाही वाद उपस्थित झाल्‍यास, समाधानकारक तोडगा काढण्‍याकरीता आयुक्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती निर्णय घेईल, त्‍या समितीत विमा कंपनीचे प्रतिनीधी व महसूल विभागातील अतिरिक्‍त आयुक्‍त आणि इतर दोन सदस्‍य राहतील अशी तदतुद आहे.  सदर वाद या न्‍यायमंचास चालविण्‍याचा अधिकार नाही.

9.          अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्‍ठयर्थ निशाणी 10 नुसार पुरसीस दाखल करुन तक्रारीचा मजकूर शपथपञ समजण्‍यात यावे, अशी पुरसीस दाखल केली आहे.  गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी बयाण शपथपञावर दाखल केलेला आहे.  परंतु, रिजाईंडर दाखल केला नाही. अर्जदाराने दाखल केलेले दस्‍ताऐवज, गैरअर्जदार क्र. 1 ने

                        ... 4 ...                       गा.त.क्र.21/2008.

 

दाखल केलेले दस्‍ताऐवज आणि उभय पक्षाच्‍या वकीलांना युक्‍तीवाद करण्‍यास संधी देवूनही युक्‍तीवाद केला नाही.  त्‍यामुळे, उपलब्‍ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर (Merits)  निकाली काढण्‍याकरीता ठेवण्‍यात आले.  प्रकरणात उपलब्‍ध असलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन व लेखी उत्‍तरावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

                  //  कारणे व निष्‍कर्ष  //

 

10.         अर्जदाराचा पती माणिक दयाराम बुध्‍दे याचा शेतामध्‍ये विद्युत करंट लागून मृत्‍यु दिनांक 26/10/2005 ला सायंकाळच्‍या वेळात झाला असल्‍याचे, अर्जदाराने दाखल केलेल्‍या पोलीस दस्‍ताऐवजावरुन दिसून येतो.  अर्जदार ही मृतकाची वारसदार पत्‍नी असल्‍यामुळे, क्‍लेम फार्म सोबत सर्व दस्‍ताऐवज जोडून, गैरअर्जदार क्र. 1 कडे प्रस्‍ताव सादर केला असल्‍याचे दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होतो. 

 

11.          गैरअर्जदार क्र. 2 ने, आपले लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केला की, मृतक माणिक दयाराम बुध्‍दे याचे संदर्भात विमा रक्‍कम मिळण्‍याकरीता कोणताही प्रस्‍ताव प्राप्‍त झालेला नाही, त्‍यामुळे तक्रार ही अपरिपक्‍व (pre matured)  असल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी.  परंतु, गैरअर्जदार क्र. 2 चे म्‍हणणे संयुक्‍तीक वाटत नाही.  गैरअर्जदार क्र. 1 ने निशाणी 8 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले, त्‍यात त्‍याने असे मान्‍य केले आहे की, अर्जदाराकडून नुकसानभरपाई संदर्भात प्राप्‍त झालेला प्रस्‍ताव, त्‍याचे कार्यालयाने पञ क्र. वशि/सामान्‍य/93/2006, दि. 26/5/2006 नुसार गैरअर्जदार क्र. 2 च्‍या कार्यालयात पाठविण्‍यात आला आहे.  गैरअर्जदार क्र. 1 चे वरील म्‍हणणे ग्राह्य धरण्‍यास पाञ आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी बयाणासोबत गैरअर्जदार क्र. 2 ला दिनांक 26/5/06 ला पाठविलेल्‍या पञाची प्रत दाखल केलेली आहे.  सदर पञानुसार अर्जदाराचा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविण्‍यात आला तरी गैरअर्जदार क्र. 2 ने त्‍यावर कुठलीही दखल घेतली नाही आणि आता अर्जदाराने तक्रार दाखल केल्‍यानंतर आपली जबाबदारी टाळण्‍याकरीता, विमा प्रस्‍ताव प्राप्‍त झाला नाही, त्‍यामुळे तक्रार अपरिपक्‍व असल्‍यामुळे खारीज होण्‍यास पाञ आहे हे गैरअर्जदार क्र. 2 चे म्‍हणणे न्‍यायोचित वाटत नाही. 

 

12.         गैरअर्जदार क्र. 2 ने दाखल केलेल्‍या दि.26/5/06 च्‍या पञाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार क्र. 2 ला पान क्र. 1 ते 44 पर्यंतचे कागदपञ पाठविल्‍याचे नमुद आहे, व त्‍याची एक प्रत जिल्‍हाधिकारी, गडचिरोली यांना सादर केल्‍याचेही दिसून येत आहे.  सदर पञासोबत पाठविलेल्‍या कागदपञामध्‍ये 7/12 चा उतारा, 8-अ, 6-क चा उतारा, तसेच बँक खात्‍याबाबत माहिती आणि कुंटूंब विवरणपञ पाठविल्‍याचे दिसून येत आहे.  शासन परिपञकानुसार शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत तलाठी यांनी सर्व कागदपञासह, प्रस्‍ताव तहसिलदार यांचेकडे सादर करावयाचे व तहसिलदार यांनी आपले अभिप्रायासह प्रस्‍ताव, विमा कंपनीकडे पाठवावयाचे असते.  शासन परिपञका-

                        ... 5 ...                       गा.त.क्र.21/2008.

 

नुसार राज्‍यातील शेतक-यांचा विज पडून, सर्पदंश, वाहन अपघात किंवा कोणत्‍याही नैसर्गीक आपत्‍तीने होणारा अपघात, त्‍याचे कुंटूंबातील वारसदारांना कमवता पुरुष मरण पावल्‍याने आर्थिक अडचण होऊ नये म्‍हणून, शासनाने उदात्‍त धेयाने ही योजना काढली आहे.  गैरअर्जदाराकडे, प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर अर्जदार लाभधारक  (बेनीफिशियरी) असल्‍याने, शेतकरी विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्‍यास पाञ आहे.  या योजने अंतर्गत आवश्‍यक असलेल्‍या कागदपञानुसार, महाराष्‍ट्रातील रहिवासी असून, त्‍याचे वय 12 ते 75 असावे, 7/12, गाव नमुना 8-अ उतारा, शेतक-याची वारसान नोंद म्‍हणून तलाठयाकडील 6-क, वयाची नोंद म्‍हणून शाळा सोडल्‍याचा दाखला, राशन कार्ड, निवडणूक कार्ड असणे आवश्‍यक असल्‍याचे परिपञकात नमुद केले आहे.  त्‍यानुसार, अर्जदार हीने, सर्व दस्‍ताऐवज गैरअर्जदार क्र. 1 कडे दिले व गैरअर्जदार क्र. 1 ने वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे पूर्ण दस्‍ताऐवज जोडून प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र. 2 कडे सादर केला.  परंतु, गैरअर्जदार क्र. 2 ने कुठलीही दखल घेतली नाही.  त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास सेवा देण्‍यात ञृटी केली असल्‍याचे सिध्‍द होतो, त्‍यामुळे, तक्रार मंजूर करण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे. 

 

13.         गैरअर्जदार क्र. 2 ने, आपले लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केला की, कृषी आयुक्‍तालय पुणे यांचे अध्‍यक्षते खाली महसूल अतिरिक्‍त आयुक्‍त व इतर दोन सदस्‍य असलेल्‍या समिती समोर निर्णय द्यायचा आहे.  त्‍यामुळे या न्‍यायमंचाला वाद चालविण्‍याचा अधिकार नाही.  गैरअर्जदार क्र. 2 चे वरील म्हणणे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  कृषी आयुक्‍त यांचे अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन असली तरी, या नयायमंचाला शेतकरी विमा अपघात योजनेच्‍या तक्रारीत निकाल देण्‍याचा अधिकार आहे. या आशयाचे न्‍यायनिवाडे महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई, सर्कीट बेंच, औरंगाबाद यांनी, दि डिव्‍हीजनल हेड कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस प्रा.लि. - विरुध्‍द- सुशीला भिमराव सोनटक्‍के, फस्‍ट अपील क्र. 1114/2008 याप्रकरणात निर्णय दिलेला आहे.  सदर प्रकरणात जिल्‍हा न्‍यायमंचाने मंजुर केलेली तक्रार अंशतः आदेश मान्‍य केले आहे.  त्‍यामुळे, या न्‍यायमंचाला अर्जदाराचे तक्रारीत निकाल देण्‍याचा पूर्ण अधिकार आहे, या निर्णयाप्रत हे नयायमंच आले आहे. 

 

14.         अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 कडे प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर वारंवार नुकसान भरपाईची मागणी केली.  परंतु, गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 26/5/2006 ला प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर लाभार्थ्‍यास नुकसान भरपाई मिळण्‍याबाबत कोणतीही दखल घेतली नसल्‍याचे दिेसून येते.  वास्‍तविक, शासन निर्णयाचे परिपञकानुसार शेतकरी अपघात योजनेचा, सामान्‍य माणसाला लाभ मिळवून देण्‍याची जबाबदारी ही महसूल अधिका-यांवर लादली असून, मुख्‍य दूवा तहसिलदार व तलाठी यांनाच ग्राह्य धरले आहे.  अशास्थितीत, तहसिलदार, तलाठी यांनी पूर्ण जबाबदारीने कार्यकरुन लाभार्थ्‍यास त्‍याचा लाभ मिळवून देण्‍याची जबाबदारी असतांना, ती त्‍याने पूर्णपणे पारपाडली नाही.  आजपर्यंत अर्जदारास लाभ मिळवून दिलेला नाही. गैरअर्जदार क्र. 1 ने दि.26/5/06 ला

                        ... 6 ...                       गा.त.क्र.21/2008.

 

पञ पाठविल्‍यानंतर पुढे लाभ मिळवून देण्‍याकरीता कारवाई केले नाही.  तसेच, अर्जदाराने, दि. 3/12/05 ला सादर केलेला प्रस्‍ताव पाठविण्‍यास दि. 26/12/06 पर्यंत वेळ लागला, जेंव्‍हा की, शासन परिपञकानुसार ताबडतोब प्रस्‍ताव, तहसिलदार यांनी चौकशी करुन पाठविण्‍याचे नमुद आहे.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी परिपञकानुसार कार्य केले नाही, असे दिसून येतो.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी योग्‍यप्रकारे आपली जबाबदारी पारपाडली नसल्‍यामुळे, अर्जदारास मानसीक, शारीरीक ञास सहन करावा लागला.  त्‍यामुळे, त्‍याची नुकसान भरपाई करुन देण्‍यास, गैरअर्जदार क्र. 1 तेवढाच जबाबदार आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे. 

 

15.         वरील कारणे व निष्‍कर्षावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजुर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

 

                    //  अंतिम आदेश  //

 

(1)  अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.

(2)   गैरअर्जदार क्र. 2 ने मृतक माणिक दयाराम बुध्‍दे याचा अपघाती मृत्‍यु बाबत

शेतकरी अपघात विमा योजनेची रक्‍कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख) तक्रार दाखल केल्‍यापासून म्हणजे दि. 18/11/2008 पासून द.सा.द.शे. 9 % टक्‍के व्‍याजाने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(3)   अर्जदारास झालेल्‍या मानसीक, शारीरीक ञासापोटी गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने

प्रत्‍येकी रुपये 1,000/- व तक्रारीचा खर्चापोटी प्रत्‍येकी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(4)   उभयतांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

गडचिरोली.

दिनांक :24/07/2009.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.