निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 13/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 19/04/2011 कालावधी 05 महिने03 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. दैवशाला भ्र.वैजनाथ अप्पा स्वामी . अर्जदार वय 65 धंदा. घरकाम अड.अनिल ताठे रा.रावराजूर ता.पालम जि.परभणी. विरुध्द 1 मा.तहसिलदार साहेब. गैरअर्जदार. तहसिल कार्यालय.पालम जि.परभणी. 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन एच.डी.एफ.सी. होम लोन बिल्डींग, प्लॉट क्रमांक 7 सेक्टर इ- 1 टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. 3 व्यवस्थापक. . अड.गोपाल दोडीया रिलायन्स इंन्शुरन्स कंपनी, 570 रेक्टीफायर हाऊस इंदोरिजीन इलेक्ट्रीक लिमीटेड, नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट वडाळा ( वेस्ट ), मुंबई. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ( निकालपत्र पारित व्दारा.श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष. ) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात अशी की, अर्जदार रावराजूर ता.पालम येथील रहिवासी असून अर्जदाराच्या पतीचा दिनांक 30/09/2007 रोजी सकाळी 5.00 वाजता त्याचे शेतात डाव्या पायाला सर्पदंश झाला उपचारासाठी गंगाखेड येथील दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. अर्जदाराने पतीच्या मृत्यूनंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह तहसिलदारांकडे विमा दावा दाखल केला.आजतागायत अर्जदाराचा विमा दावा मंजूर करण्यात आलेला नाही म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 % व्याजासह मिळण्याची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराच्व्यातील कागदपत्रात नि. 4 लगत 9.कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने नोटीस स्विकारुन ही नेमलेल्या तारखेस मंचापुढे हजर राहून आपले म्हणणे सादर न केल्यामुळे त्याचेविरुध्द दिनांक 29.03.2011 रोजी एकतर्फा हुकूम करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्टामार्फत पाठवलेल लेखी म्हणणे प्रकरणात दिनांक 25.01.2011 रोजी नि. 8 ला समाविष्ट करण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 3 ने दिनांक 09.02.2011 रोजी लेखी म्हणणे सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्यांच्या लेखी जबाबात अर्जदाराचा मयत पती वैजनाथ स्वामी याच्या अपघाती मृत्यूच्या क्लेमची कागदपत्रे तहसीलदाराकडून त्याना मिळालेली नाहीत त्यामुळे त्याबाबत काहीही सांगता येत नाही. सबब त्याना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे.. गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन तिचा मयत पती वैजनाथ स्वामी याच्या शेतकरी अपघाती विम्याची कागदपत्रे त्यांचेकडे आलेली नाहीत त्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. प्रस्तूतचा तक्रार अर्ज कायदेशीर मुदतीत नाही. सन 2006-07 मध्ये अर्जदाराच्या पतीचा अपघात झाला असल्यामुळे त्या वर्षाचा विमा त्यांच्या कपनीकडून शासनाने घेतलेला नव्हता. सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र नि. 13 दाखल केले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 तक्रार अर्ज कायदेशीर मुदतीत आहे काय ? नाही 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराने दाखल केलेला प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 (अ) ( 1) मधील तरतुदीनुसार तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षाचे आत दाखल केलेला नाही हे विमा लाभार्थीची मृत्यूची तारीख व प्रस्तुतचे प्रकरण दाखल केलेल्या तारखेचे अवलोकन केले असता लक्षात येते. सदरील तक्रार अर्ज ग्राहक मंचात दिनांक 16/12/2010 रोजी दाखल केलेला आहे वास्तविक Cause of action घडल्यावर म्हणजे मयत वैजनाथ स्वामी याचा 30/09/2007 रोजी सर्पदंशाने अपघाती मृत्यू झाल्यावर दोन वर्षांच्या आत म्हणजे दिनांक 30/09/2009 पूर्वी दाखल करणे कायदयातील तरतूदीप्रमाणे आवश्यक होते. अर्जदारानी गैरअर्जदारास दिनांक 30.03.2010 रोजी नोटीस पाठवलेल्या नोटीशीची स्थळप्रत पुराव्यात नि. 4/4 व रजि.पोच पावती नि.4/3 ला दाखल केली आहे परंतू पाठवलेली नोटीस देखील Cause of action पासून कायदेशीर मुदतीत नाही त्यामुळे नोटीस तारखेपासून कायदेशीर मुदत गणण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराने उशीरा तक्रार दाखल केली आहे म्हणून तक्रार अर्जासोबत झालेला उशीर माफ व्हावा म्हणून वेगळा स्वतंत्र अर्जही दाखल केलेला नाही.त्यामुळे तक्रार अर्जास कायदेशिर मुदतीची निश्चितपणे बाधा येत असल्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यास पात्र ठरतो. या संदर्भात रिपोर्टेड केस. 1 2007 (1) सी.पी.जे. पान 232 ( राष्ट्रीय आयोग ) 2 2007 (1) सी.पी.जे. पान 323 ( राष्ट्रीय आयोग ) 3 2009 (1) सी.पी.आर.पान 257 ( राष्ट्रीय आयोग ) 4 महाराष्ट्र राज्य आयोग औरगांबाद सर्कीट बेंच अपील क्रमांक 680/08 कचरुनील विरुध्द आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरंस कंपनी निकाल 09/02/2002 मध्ये व्यक्त केलेल्या मताचातसेच 5 रीपोर्टेड केस 2009 (3) सी.पी.जे.पान 75 (सुप्रिम कोर्ट ) असे मत व्यक्त केले आहे की, Limitation for the purpose of sec 24 A of Consumer Protection Act 1986 Commences from the date of which incident happen of complaint ought to be filed within 2 years thereof. वरील सर्व रिपोर्टेड केसेस मधील मते विचारात घेऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1) तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2) तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापल सोसावा. 3) पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |