निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15/10/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 21/10/2010 तक्रार निकाल दिनांकः- 22/03/2011 कालावधी 05 महिने01दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. गिताबाई भगवानराव ढवळे अर्जदार वय 60 वर्षे धंदा शेती व घरकाम, अड.अरुण डि.खापरे रा.उमरी ता.परभणी,जि.परभणी. विरुध्द 1 तहसिलदार. एकतर्फा तहसिल कार्यालयपरभणी ता.जि परभणी. 2 मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. (स्वतः) भास्करायन एच.डि.एफ.सी.होम लोन बिल्डींग, प्लॉट क्रमांक 7 सेक्टर ई 1 टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. 3 नॅशनल इंशुरन्स कंपनी लिमीटेड. अड.एस.ए.पाठक मंडल कार्यालीय (272000), विभागीय कार्यालय नगीनाघाट रोड, नादेड 431601. ----------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती अनिता ओस्तवालसदस्या ) गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदाराचा मुलगा ज्ञानोबा पिता भगवानराव ढवळे हा गट क्रमाक 170/1/2 चा मालक व कब्जेदार होता त्यामुळे तो शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा हक्कदार होता. तारीख22.03.2007रोजीअर्जदाराचा मुलगा जीपने प्रवास करीत असताना जीप ट्रकच्या अपघातात जख्मी होउन मृत्यू पावला. दिनांक 09.08.2007 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 याच्याकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा क्लेम योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रासह दाखल केला तदनंतर गैरअर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 13.08.2007 रोजी सदरील क्लेम गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला परंतू अर्जदाराचा क्लेम अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही म्हणून अर्जदाराने प्रस्तूतची तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने व्यक्तिगत अपघात विमा योजनेजंतर्गत नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 100000/- द.सा.द.शे. 18 % व्याजदराने द्यावी तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रुपये 25000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रुपये 5000/- द्यावी अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेशपथपत्र(नि. 2) वविलंब माफीचा अर्ज व शपथपत्र अनुक्रमे नि. 3 वर व नि. 4 व पुराव्यातील कागदपत्र नि. 6/1 ते नि. 6/16 व नि. 19/1 ते नि 19/4 मंचासमोर दाखल केली आहेत. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 याना तामीळ झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 हे नेमल्या तारखेस मंचासमोर हजर न राहील्यामुळे त्याच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात येउन त्यांच्या विरोधात प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले. मंचाची नोटीस मिळाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपले लेखी निवेदन नि. 10 वर मंचासमोर दाखल केले आहे. . गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे असे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्रांची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लगार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत अथवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. पुढे त्यांचे म्हणणे असे की, मयत ज्ञानोबा ढवळे रा. उमरी ता. जि.परभणी याचा शेतकरी विमा डेथ क्लेमची कागदपत्र त्याना मिळालेली नाहीर त्यामुळे त्या क्लेम बाबत खुलासा देता येणार नाही. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 ला रुपये 2000/- खर्च मिळावा व त्याना या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती मंचासमोर केलेली आहे. त्याने मंचासमोर नि. 11 वर शेतकरी व्यक्तिगर अपघात योजनेची प्रत दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने मंचाची नोटीस मिळाल्यानंतर लेखी निवेदन नि. 15 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुत अंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसन्स दिलेले नाही तसेच सदचा वाद मुदतबाहय आहे म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र नि.16 वर व अर्जदाराचा विलंबमाफी अर्जावरील त्याचे म्हणणे नि. 17 वर मंचासमोर दाखल केले आहे. दोन्ही पक्षाच्या कैफीयतीवरुन खालील मुद्ये उपस्थित होतात. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज कायदेशीर मुदतीत आहे काय ? नाही 2 आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे . कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने त्याच्या तक्रार अर्जासोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे सर्वप्रथम त्याचा विचार होणे क्रम प्राप्त आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 24 अ (1) प्रमाणे तक्रार अर्जास कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत तक्रार अर्ज दाखल करावा लागतो परंतू पोट कलम (1) प्रमाणे तक्रार अर्ज, मुदतीत दाखल करता आला नाही तर पोट कलम (2) प्रमाणे पुरेशा कारणामुळे तक्रार अर्ज विहीत केलेल्या मुदतीत तक्रार अर्ज सादर करता आला नाही या बाबतीत जिल्हा मंच राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांची खात्री पटवली तर मुदती नंतरही तक्रार अर्ज दाखल करुन घेण्याची तरतूद आहे. सदर प्रकरणात अर्जदाराने दिनांक 09.08.2007 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे क्लेम दाख्ंल केलेला आहे त्या तारखेपासून ते दिनांक 17.08.2010 पर्यंतच्या कालावधीमध्ये अर्जदार व गैरअर्जदार यामध्ये कोणताही पत्रव्यवहार झालेला दिसत नाही दिनांक 17.08.2010 रोजी अर्जदाराच्या वतीने गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 याना कायदेशीर नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहे (नि.6/14 ते नि. 6/16) परंतू त्या नोटीसा सुध्दा मुदतीत पाठविण्यात आलेल्या नाही तसेच विलंब माफीसाठी अर्जदाराने दिलेले कारण पुरेशी व सबळ नसल्यामुळे अर्जदाराने दिलेल्या विलंब माफीचा अर्ज विचारात घेता येणार नाही असे मंचाचे मत आहे वास्तविक पाहता अर्जदाराने कागदपत्र क्लेम सहीत दिनांक 09.08.2007 रोजी गैरअर्जदाराकडे दाखल केल्यानंतर व गैरअर्जदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे अर्जदारास एवढी दिर्घ प्रतिक्षा करावयाची आवश्यकता नव्हती असे मंचास वाटते म्हणून सर्व बाबीचा सारासार विचार करुन मुद्या क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देउन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 पक्षकारानी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुराव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |