अति. जिल्हाा ग्राहक तक्रार निवारण न्या य मंच,जळगाव
मा.अध्यजक्ष - श्री.एम.एस.सोनवणे. मा.सदस्यि – श्री.सी.एम.येशीराव.
------------------------------- तक्रार अर्ज क्र. – 48/2012
तक्रार दाखल तारीख – 16/03/2012
तक्रार निकाली तारीख – 23/12/2013
देवकाबाई अर्जुन वंजारी ------ तक्रारदार वय- 37 वर्ष, धंदा – घरकाम, (अॅड.एस.टी.पवार)
मु.पो. वरणगांव,ता. भुसावळ,
जिल्हाा. जळगांव.
विरुध्दई
1. तहसिलदार ------ सामनेवाला
पत्ता . तहसिलदार कार्यालय, भुसावळ ता. भुसावळ, जि. जळगांव,
2. व्य्वस्था पक (क्र.1 व 2 स्व्तः)
कबाल इन्शुारन्सा कंपनी प्रायव्हे्ट लि., (क्र.3 तर्फे अॅड. अनिल
पत्ताइ – 4 अ, देहमंदीर सोसायटी, श्रीरंगनगर एस. चौगुले)
माईलेले श्रवण विकास विदयालया जवळ,, पंपिंग स्टेशनरोड, नाशिक. 3. आय.सी.आय.सी.आय. इन्शु रन्सर कंपनी तर्फे शाखाधिकारी, ओंकारेश्वयर मंदिराजवळ,
हॉटेल रॉयल पॅलेसशेजारी, जळगांव, ता.जि.जळगांव.
कोरम –
श्री. एम. एस. सोनवणे, अध्यइक्ष,
श्री. सी. एम. येशीराव. सदस्यन ,
नि का ल प त्र
श्री.मिलिंद सा. सोनवणे,अध्यहक्ष - शेतकरी अपघात विमायोजने अंतर्गत, तक्रारदारांचे मयत पती, अर्जुन गिरधर वंजारी, यांच्या् नुकसान भरपाई पोटी रु. 1 लाख मिळणेकरीता या मंचात तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्याणत खालील प्रमाणे.
2. तक्रारदार यांचे पती अर्जुन वंजारी मु.पो. वरणगांव, ता.भुसावळ, जि. जळगांव, हे शेतकरी असून दि. 18/07/2005 रोजी पाय घसरुन विहीरीत पडले व मयत झाले. मयत, अर्जुन गिरधर वंजारी हे शेतकरी असून महाराष्ट्रा शासन निर्णय कृषी व पणन विभाग क्र. एनएआयएस 1204/सी.आर.-166/11-अ/दि. 05 जानेवारी 2005 चे निर्णयानुसार प्रपत्र-अ, शासनाने प्रत्येगक शेतक-याचे व्य क्ती गत विमा रु. 1 लाखाचा काढलेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी अपघातात मयत झाल्या0वर त्याचच्यान वारसास विमा दाव्यागपोटी रक्कमम रु. 1 लाख अपघाती विमा योजनेअंतर्गत देय आहे.
3. या योजनेनुसार तक्रारदार यांनी तहसिलदार भुसावळ, यांच्याे तर्फे योग्यज ते परिपत्रकासह विमा रक्कोम मागणी दावा शासनाच्याक परिपत्रकानुसार पाठविला त्यातनंतरही सामनेवाला यांनी तक्रारदाराची विमापॉलीसीची रक्काम दिलेली नाही. म्हाणुन तक्रारदारांनी विमा योजनेपोटी रु. 1 लाख मिळावे तसेच मानसिक शारिरीक त्रासापोटी रु. 1 लाख, त्या1वर 18 टक्केा व्या ज मिळण्याेसाटी या मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
4. मंचा तर्फे सामनेवाला यांना नोटीस काढली असता सामनेवाला नं. 1 यांनी निशाणी 10 लगत खुलासा दाखल केलेला आहे. त्यां च्यात मते त्यां नी तक्रारदार यांचा दावा योग्यच त्यात कागदपत्रासह दि. 08/02/2006 अन्व्ये, सामनेवाला नं. 3 यांच्यांकडे पाठविलेला आहे. सामनेवाला नं. 2 यांनी नि.नं. 07 लगत खुलासा दाखल केला आहे. त्याित त्यांानी तक्रारदार हे त्यां चे ग्राहक नाहीत सामनेवाला नं. 2 हे फक्तल मध्यहस्थ3 व सल्लालगार आहेत. मयत अर्जुन वंजारी हे दि. 18/07/05 रोजी मयत झाले असुन हे कालावधीत सामनेवाला नं. 2 हे पॉलीसीची कुठल्या ही प्रकारे संबंधीत नव्हुते. वरील सामनेवाला नं. 2 यांचे खुलासा पाहाता सामनेवाला नं. 1 यांनी रितसर तक्रारदारांच्याी दावा सामनेवाला नं. 3 यांच्यााकडे पाठविला आहे. हे सामनेवाला यांना जबाबदार धरणे योग्यस होणार नाही हे या मंचाचे मत आहे. सामनेवाला नं. 2 हे या काळात सेवा देणारी कंपनी नव्ह ती म्हनणुन त्यांमच्याहविरुध्दा दावा रदद् करणे उचित होईल असे या मंचाचे मत आहे.
5. सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि. 17 दाखल करुन तक्रार अर्जास विरोध केला. त्यांोच्याीमते, तक्रारदार त्यांिचा ग्राहक नाहीत कारण विमा करार त्यांयनी तक्रारदारांशी नव्हेा तर शासनाशी केलेला होता. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचा विमा दावा व संबंधीत कागदपत्रे त्यांशना दिलेली नाहीत. त्यारमुळे त्यां नी तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही कमतरता केलेली नाही. तक्रारदाराचे पती दि. 18/07/2005 रोजी मयत झालेले आहे. मात्र प्रस्तुीत तक्रार दि. 05/03/2012 रोजी दाखल करण्यायत आलेली आहे. म्ह्णजेच तक्रार मुदतीत दाखल करण्या0त आलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदाराची तक्रार फेटाळण्याीत यावी अशी विनंती सामनेवाला क्र. 3 यांनी मंचाकडे केलेली आहे.
6. तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.नं. 01 वर तक्रार अर्ज, नि.नं. 02 वर अॅफिडेव्ही्ट, नि.नं.03 वर वकीलपत्र, नि.नं. 04 वर पत्ता पुरसिस, नि.नं. 05 वर दस्तडऐवज यादी, नि.नं. 12 वर पुराव्याीचे शपथपत्र दाखल केले आहेत.
7. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व सबब कागदपत्र पाहता आमच्या समोर खालील मुदे उपस्थित होतात.
मुद्ये निष्कतर्ष
1. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे किंवा नाही ? होय
2. तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? सा.क्र. 3 च्या
बाबतीत होय
3. सामनेवाल्यां नी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता सा.क्र. 3 च्या.
केली काय ? बाबतीत होय
4. आदेशा बाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
वि वे च न
मुद्दा क्र. 1 बाबत
8. तक्रारदाराचे पती दि. 18/07/2005 रोजी मयत झाल्याच नंतर प्रस्तुआत तक्रार दि. 17/07/2009 व तत्पुतर्वी दाखल करणे कायदयाने आवश्यतक होते. तक्रार दाखल करण्याचस सुमारे 5 वर्षांचा विलंब झालेला आहे, असा मुद्दा सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि. 17 मध्येर उपस्थित केला आहे. मात्र, तक्रारदाराचे पती जरी दि. 18/07/2005 रोजी मयत झाले तरी तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 08/02/2006 रोजी मुदतीत सामनेवाला क्र. 3 यांच्याे कडे सादर केलेला आहे, ही बाब उपलब्धस असलेल्या2 कागदपत्रांवरुन सहज दिसून येते. तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला क्र. 3 यांनी आजतागायत फेटाळलेला नाही किंवा मंजूरही केलेला नाही. म्हनणजेच तक्रारदाराच्याय तक्रारीचे कारण हे सातत्यांने रोजच्याा रोज घडत आहे. त्याेमुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 अ अन्वये, प्रस्तुेत तक्रारीस मुदतीची बाधा नाही, असे आमचे मत आहे. यास्तसव मुद्दा क्र. 1 चा निष्कर्ष आम्हीु होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत
9. तक्रारदारांनी त्यांंची तक्रार व प्रतिज्ञापत्र नि. 02 मध्ये् दावा केला की, त्यांरचे पती मृत्यु् समयी शेतकरी होते. त्यां्चा शेतकरी विमा योजने अंतर्गत शासनाने विमा रक्कमम भरलेली होती. ती रक्कपम सामनेवाला क्र. 3 यांच्याा कडे भरलेली असल्यातने त्याम त्यां च्याह ग्राहक आहेत. तक्रारदाराने नि. 5/4 व 5 दाखल केलेल्यार 7/12 उता-यावरुन हे स्पाष्टय होते की, विल्हा ळे शिवारातील गट क्र. 608 हा तक्रारदारांच्यान पतीच्याह नावे होता. सदर बाब सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि. 17 मध्येल नाकारलेली नाहीत. त्याटमुळे तक्रारदार सामनेवाला क्र. 3 यांच्याच ग्राहक आहेत, ही बाब शाबीत होते. यास्त व मुद्दा क्र. 2 चा निष्कयर्ष आम्हीा सामनेवाला क्र. 3 च्या् बाबतीत होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत
10. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचा विमा दावा आपल्यान पर्यंत आवश्यचक त्याह कागदपत्रांसह दिला नाही, त्या मुळे आम्हीच तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही कमतरता केली नाही, असा मुदा सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि. 17 मध्येय उपस्थित केलेला आहे. मात्र, सामनेवाला क्र. 1 यांनी जबाब नि. 10 सोबत तक्रारदाराचा क्लेेम फॉर्म, 7/12 उतारा, वारस दाखला, इ. 09 कागदपत्रे दि. 08/02/2006 रोजीच सामनेवाला क्र. 3 यांच्याब कडे पाठविल्याी बाबतचे कागदपत्रे सादर केलेली आहेत. सामनेवाला क्र. 1 याने सादर केलेली ही कागदपत्रे इतकी स्वरयंस्पनष्टस आहेत की, सामनेवाला क्र. 3 यांनी वर घेतलेला बचाव टिकू शकत नाही. परिणामी दि. 08/02/2006 रोजी कागदपत्रे मिळूनही सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराचा विमा दावा आजतागायत मंजूर किंवा फेटाळलेला नाही. सदर बाब आमच्याद मते सेवेतील कमतरताच ठरते. यास्तीव मुदा क्र. 3 चा निष्ककर्ष आम्हीे सामनेवाला क्र. 3 च्यार बाबतीत होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 4 बाबत
11. मुदा क्र. 1 ते 3 चे निष्क र्ष स्प्ष्टच करतात की, तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे. तक्रारदार या सामनेवाला क्र. 3 यांच्याो ग्राहक आहेत. सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 08/02/2006 रोजी सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र. 3 यांच्यान कडे पाठवूनही त्यां नी तक्रारदाराचा विमा दावा आजतागायत मंजूर किंवा नामंजूर करुन सेवेत कमतरता केलेली आहे. परिणामी प्रस्तुतत तक्रार अर्ज मंजूर करण्याेस पात्र आहे. त्यातमुळे सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारास विमा रक्कयम रु. 1,00,000/- दि. 08/02/2006 रोजी पासून द.सा.द.शे 9 टक्केक व्यारजाने अदा करण्याहचा आदेश न्या2योचित ठरेल. त्यासचप्रमाणे सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारांना काही कारण नसतांना इतके दिवस विमा हक्काम पासून वंचित केले, त्या.मुळे त्यां नी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व प्रस्तुेत अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- अदा करण्याकचा आदेश न्याकयसंगत ठरेल. यास्त्व मुदा क्र. 4 चा निष्क.र्ष आम्हीय होकारार्थी देत आहोत.
आदेश
1. सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्या0त येते की, त्यांानी तक्रारदारास विमा रक्क.म रु. 1,00,000/- दि. 08/02/2006 रोजी पासून ते प्रत्य क्ष रक्किम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के8 व्यामजाने अदा करावेत.
2. सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्या0त येते की, त्यांेनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्जा खर्चापोटी रु. 5,000/- अदा करावेत.
3. सामनेवाला क्र. 1 व 3 यांच्याे विरुध्दअ कोणतेही आदेश नाहीत.
4. निकालाच्याक प्रति उभय पक्षांस विनामुल्या देण्यात याव्या त.
दि. 23/12/2013
(श्री.सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्या अध्ययक्ष
अति. जिल्हाा ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच,जळगांव.