निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 23/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 06/05/2011 कालावधी 04 महिने. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. माणीक पिता रावसाहेब पौळ. अर्जदार वय 52 वर्षे.धंदा. शेती. अड. व्हि.पी.चोखट. रा.तारगव्हाण ता.पाथरी जि.परभणी.
विरुध्द 1 तहसिलदार साहेब. गैरअर्जदार. तहसिल कार्यालय,मानवत ता.मानवत. 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस.प्रा.लि. गैरअर्जदार. शॉप नं.02.दिशा अलंकार,टाउन सेंटर सिडको.औरंगाबाद. 3 व्यवस्थापक. अड.अजय.व्यास. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.झिनत हॉउस. केशवराव खाडे मार्ग.महालक्ष्मी.मुंबई. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.सौ.सुजाता जोशी.सदस्या. ) मुलाच्या मृत्यूनंतर शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की.अर्जदाराचा मुलगा मयत कृष्णा हा शेतकरी होता महाराष्ट्र शासनाने शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे शेतकरी जनता अपघात विमा उतरविलेला होता.अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू दिनांक 18/01/2006 रोजी ए.एस.ए.एल.या कंपनीत काम करत असतांना अपघाताने झाला. याची नोंद पोलीस स्टेशन चाकण येथे झाली. घटना घडल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे मुदतीत विमा प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह दाखल केला. तो गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर करण्यात आला,परंतु आजपर्यंत गैरअर्जदाराने विमादावा मंजूर केला नाही.म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.व शेतकरी अपघात विमा योजनेचे रु.1,00,000/-मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज शपथपत्र, वारसाचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, फिर्याद, पंचनामा, खबरी जबाब, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट इ.कागदपत्रे दाखल केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबात सदरील घटना घडली तेव्हा गैरअर्जदार क्रमांक 2 ची नेमणुक शेतकरी अपघात विमा योजनेचे सल्लागार म्हणून झालेली नव्हती त्यांची नेमणुक दिनांक 15 जुलै 2006 मध्ये झालेली आहे.म्हणून ते या विमादाव्या संदर्भात काहीही मत व्यक्त करु शकत नाहीत.असे सांगीतले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याच्या लेखी जबाबासोबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक जोडले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराने त्यांच्याकडे दाखल केलेला विमादावा गैरअर्जदाराने क्रमांक 3 कडे दिनांक 21/11/2006 रोजीच पाठवलेला आहे.त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 विरुध्दची तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याचे शपथपत्र लेखी जबाबासोबत जोडले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्याच्या लेखी जबाबात त्याला गैरअर्जदार क्रमांक 1 कडून विमा दावा मिळालेलाच नाही तसेच अर्जदाराने ही तक्रार मुदतीनंतर दाखल केलेली आहे.व परिपत्रक 166/11 – A दिनांक 05/01/2006 नुसार कमिशनर ऑफ अग्रीकलचर पूणे यांच्यापुढेच शेतकरी अपघात विमा योजनेच्या तक्रारी चालतील त्यामुळे ही तक्रार ग्राहक न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 3 ला मिळालेलाच नाही त्यामुळे अर्जदाराला त्रुटीची सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.वरील सर्व कारणांमुळे अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने केली आहे.त्याच्या लेखी जबाबासोबत गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 तक्रार अर्ज कायदेशिर मुदतीत आहे काय ? नाही. 3 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने दाखल केलेला प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 (अ) (1) मधील तरतुदीनुसार तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षांचे आत दाखल केलेला नाही हे विमा लाभार्थीची मृत्यूची तारीख व प्रस्तुतचे प्रकरण दाखल केलेल्या तारखेचे अवलोकन केले असता लक्षात येते.सदरील तक्रार अर्ज ग्राहक मंचात दिनांक 23/12/2010 रोजी दाखल केलेला आहे वास्तविक Cause of action घडल्यावर म्हणजे मयत कृष्णा याचा 18/01/2006 रोजी अपघाती मृत्यू झाल्यावर दोन वर्षांच्या आत म्हणजे दिनांक 18/01/2008 पूर्वी ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 (अ) (1) मधील तरतुदी नुसार तक्रार अर्ज ग्राहक मंचात दाखल करणे आवश्यक होते सदरील तक्रार मुदती पेक्षा 2 वर्षांपेक्षा उशीरा दाखल केलेली आहे.झालेला उशीर माफ व्हावा म्हणून अर्जदाराने उशीर माफीचा स्वतंत्र अर्ज दिला आहे,परंतु त्यात सुध्दा गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईची वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी अर्जदारास काहीही प्रतिउत्तर दिलेले नाही म्हणून तक्रार करणेस सलग कारण घडले असाही ठोस पुरावा सादर केलेला नाही.त्यामुळे तक्रार अर्जास कायदेशिर मुदतीची निश्चितपणे बाधा येत असल्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात पात्र ठरतो. या संदर्भात रिपोर्टेड केस. 1 2007 (1) सी.पी.जे. पान 232 ( राष्ट्रीय आयोग ) 2 2007 (1) सी.पी.जे.पान 323 (राष्ट्रीय आयोग ) 3 2009 (1) सी.पी.आर.पान 257 (राष्ट्रीय आयोग ) 4 महाराष्ट्र राज्य आयोग औरंगाबाद सर्कीट बेंच अपील क्रमांक 680/08 कचरुनील विरुध्द आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी निकाल 09/02/2002 मध्ये व्यक्त केलेल्या मताचा तसेच 5 रिपोर्टेड केस 2009 (3) सी.पी.जे.पान 75 ( सुप्रिम कोर्ट ) असे मत व्यक्त केले आहे की, Limitation for the purpose of sec 24 A of Consumer Protection Act 1986 Commences from the date of which incident happen of complaint ought to be filed within 2 years thereof. वरील सर्व रिपोर्टेड केसेस मधील मते विचारात घेऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापला सोसावा. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |