निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 16/07/2010 तक्रार नोदणी दिनांकः-19/07/2010 तक्रार निकाल दिनांकः- 29/11/2010 कालावधी 04 महिने10दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. वर्षा भ्र.वसंतराव देशमुख अर्जदार वय 28 वर्षे,धंदा घरकाम. अड.व्हि.पी.चोखट रा.सोन्ना ता. जि.परभणी. विरुध्द 1 तहसीलदार गैरअर्जदार. तहसील कार्यालय परभणी. स्वतः 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. स्वतः शॉप क्रमांक 2 कॅनॉट दिशा अलंकार कॉम्पलेक्स टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद. 3 व्यवस्थापक (अड.जी.एच.दोडीया.) रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.लि. रेक्टीफायस हाऊस इंदोरी जिन इले.लिमीटेड 570,नायगम क्रॉस रोड, नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट. वडाला वेस्ट मुंबई 400031 ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदारमौजे सोन्ना ता.जि.परभणीयेथीलरहिवाशी शेतकरी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा मयत पती वसंतराव राजाराम देशमुख हा देखील लाभार्थी होता तारीख21.03.2008 रोजीअर्जदाराच्यापतीचा शेतात जनावरे चारीत असतांना सायंकाळी 6 वाजता आकाशातील विज अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला. राजेश देशमुख याने दैठणा पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यचीखबरदिल्यावरपोलीसानीअपघाती मृत्यूची नोंद करुन घटनास्थळाचावमयताचाइन्क्वेस्टपंचनामाकेला. व प्रेताचे पोष्ट मार्टेम केले अर्जदारानेत्यानंतरगैरअर्जदार नं 1 यांचेतर्फेमयतपतीचे मृत्यू पश्चात तिला शेतकरीअपघातविम्याचीनुकसानभरपाईमिळणेसाठी दिनांक 16.07.2008 रोजी आवश्यक ती कागदपत्रे मुळ प्रतीत सादर केली. परंतू क्लेम मंजुरी बाबत अर्जदारास अजातागायत काहीच कळवलेले नाही.व पतीच्या अपघाती निधनाची नुकसान भरपाई दिलेली नाही. अशा रितीने विमा कंपनीने सेवेतील त्रूटी करुन मानसिक त्रास दिला व नुकसान भरपाई मिळण्याच्या लाभापासून वंचीत ठेवले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून रुपये 100000/- विमा नुकसान भरपाई मानसिक त्रासापोटी रुपये 2000/- अर्जाचा खर्च रुपये 2000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 5लगतएकूण18 कागदपत्रे जोडलेलीआहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी दिनांक 26.08.2010 रोजी व गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्टाव्दारे आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 26.08.2010 रोजी प्रकरणात नि. 10 ला समाविष्ठ केले.गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तारीख 20/09/2010 रोजी लेखी जबाब (नि.14) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 1.यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.9) तक्रार अर्जातील पॅरा नं 1 ते 5 मध्ये अर्जदाराने शेतकरी अपघात विम्या संबंधी लिहिलेला मजकूर बाबत असा खुलासा केला आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 यानी शासन तरतूदीनुसार नैसर्गिक अपत्तीत वीज पडून मृत्यू झाल्याबाबत मयताच्या वारसास धनादेश क्रमांक 45555 दिनांक 28.03.2008 रोजी रुपये 100000/- अर्जदारास दिले आहेत. शेतकरी विमा अपघात नुकसान भरपाई प्रस्ताव कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे त्यानी 22.07.2008 रोजी सादर केला. क्लेम मंजूर/ नामंजूर करण्याचा अधिकार गैरअर्जदार क्रमांक 1 याना नाही सबब त्यांच्या विरुध्दचा दावा खारीज करण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. पुराव्यात ( नि.11) गैरअर्जदार क्रमांक 3 यानी पाठविलेल्या समरण प्रताची प्रत दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात ((नि.10) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत वसंत देशमुख रा. सोन्ना याचा दिनांक 21.03.2009 रोजी अपघाती मृत्यू झाल्या संबंधी विमा क्लेमची कागदपत्रे तहशीलदाराकडून दिनांक 09.04.2010 रोजी प्राप्त झाली होती परंतू त्यामध्ये अपुरी कागदपत्रे असल्याचे दिसून आले. अर्जदाराने मयताचा वयाचा दाखला ,जमिनीचा 8-अ चा उतारा, केमिकल अनॉलेसिस रिपोर्ट, एफ.आय.आर. या कागदपंत्राच्या सही शिक्कांच्या नक्कला पाठविण्याबाबत तहसिलदारा मार्फत सुरुवातीला दिनांक 18.08.2008, त्यानंतर 10.11.2008, 20.03.2009 रोजी समरणपत्रे पाठवूनही कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे विमा कंपनीने 23.06.2009 रोजीच्या पत्राने फाईल बंद केली असल्याचे कळविले. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी आपल्या लेखी जबाबात ( नि.12 ) तक्रार अर्जामध्ये त्यांच्या विरुध्द केलेल्या सर्व विधानांचा इन्कार केला आहे त्याचे म्हणणे असे की, प्रस्तूतची तक्रार विमा कंपनी विरुध्द मुळीच चालणेस पात्र नाही गैरअर्जदार नं 2 कडून डेथक्लेमची कागदपत्रे विमा कंपनीला मिळालेली नाहीत.त्यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही अर्जदारने शेतकरी विम्यासंबंधी तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 1 ते 5 मध्ये दिलेला मजकूर विमा कंपनीने साफ नाकारला आहे. अतिरिक्त लेखी जबाबात पुढे असा खुलासा केला आहे की, शेतकरी विम्यासंबंधी राज्य सरकार व विमा कंपनी यांचे दरम्यान झालेल्या लेखी करार नाम्यानुसार तहसिलदार किंवा कृषी अधिकारी यांचेकडून कबाल इंन्शुरन्स ब्रोकरला क्लेमची कागदपत्रे पाठविल्यानंतर ब्रोकरने त्याची छाननी करुन विमा कंपनीकडे पाठवावी लागतात त्यानंतर एक महिन्यात विमा कंपनी क्लेम मंजुरीचा अथवा नामंजुरीचा निर्णय घेते. मयत वसंतराव देशमुख याच्या डेथक्लेमची कोणतीही कागदपत्रे कबाल इन्शुरन्स ब्रोकरकडून आजतागायत मिळालेली नाही त्यामुळे याबाबतीत गैरअर्जदार नं 3 कडून मुळीच सेवा त्रुटी झालेली नाही पुढे असाही खुलासा केला आहे की, गेरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे अर्जदाराचा मयत पतीचा विमा क्लेम प्रस्ताव त्यांच्याकडे आला होता परंतू त्यामध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची असल्याने तहसीलदारामार्फत दिनांक 18.08.2008 पासून 20.03.2009 पर्यंत अनेक वेळा स्मरणपत्रे पाठवूनही कागदपत्रांची पूर्तता केली नाही त्याबाबतीत विमा कंपनीने अर्जदाराला स्मरणपत्रे पाठविली होती परंतू कागदपत्रे न मिळाल्यामुळे दिनांक 23.06.2010 रोजी नो क्लेम करुन फाईल बंद केली. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार नं 3 चे थपथपत्र ( नि.15 ) दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. चौखड आणि गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे अड दोडिया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार नं 3 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या मृत्यू पश्चात शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मयत पती वसंतराव राजाराम देशमुख हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी शेतकरी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.5/2 वरील 7/12 उतारे नि. 5/11 वरील होल्डींग प्रमाणपत्र, नि.5/13 वरील फेरफार उतारा, नि.5/14 वरील नमुना नं. 6-क चा उतारा, यामधील नोंदीतून शाबीत झाले आहे दिनांक 21.03.2008 रोजी अर्जदारचा मयत पती शेतात काम करीत असतांना आभाळातील विज अंगावर पडून त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. याबाबत राजेश देशमुख याने दैठाणा पोलीस स्टेशनला खबर दिल्यावर पोलीस स्टेशनने अपघाती मृत्यूची नोंद केली होती. तो खबरी रिपोर्ट ( 5/5 ), घटनास्थळ पंचनामा ( नि.5/7) आणि सरकारी हॉस्पीटल परभणी येथे मयताचा दिनांक 22.03.2008 रोजी केलेला पी.एम.रिपोर्ट (नि.5/9) तसेच मरणोत्तर पंचनामा ( नि.5/6) या कागदोपत्री पुरात्यातील नोंदीतून ही शाबीत झालेले आहे मयत वसंतराव देशमुख हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) तहशीलदार परभणी यांचेकडे विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी विमा क्लेमसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 5 लगत दाखल केलेल्या आहेत. त्याचे अवलोकन केले असता क्लेम मंजूरीच्या बाबतीत शासनाच्या परिपत्रकात नमूद केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिलेली असल्याचे स्पष्ट दिसते असे असतानाही गैरअर्जदार क्रमांक 2 यानी त्यांच्या लेखी जबाबात ( नि.10) अर्जदाराकडून मागणी केल्याल्या कागदपत्राबाबत ज्या तारखांचा संदर्भ दिलेला आहे त्या तारखांचा आणि प्रत्यक्षात गैरअर्जदाराला अर्जदाराचा क्लेम मिळाल्याची तारीख यात विसंगती असल्याचे स्पष्ट दिसते कारण तारीख 09.04.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 याना क्लेमची कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 कडून मिळाली होती म्हटल्यानंतर कागदपत्रे मिळण्यापूर्वीच गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराला दिनांक 18.08.2008, 10.11.2008आणि 20.03.2009 रोजी स्मरणपत्रे पाठवून कशी काय कागदपत्रांची मागणी केली ? या विसंगतीमुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने घेतलेला बचाव मुळीच ग्राहय धरता येणार नाही. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने देखील आपल्या लेखी जबाबात ( नि.14) मध्ये सुरुवातीलाच परिचछेद क्रमांक 1 मध्ये अर्जदाराच्या मयत पतीच्या विमा क्लेमची कागदपत्रे आजपर्यंत त्यांच्याकडे गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 कडून मिळालेलीच नाही असे म्हटले आहे याउलट अतिरीक्त लेखी जबाबाच्या परिच्छेद क्रमांक 12 मध्ये असे म्हटले आहे की, अपू-या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत अर्जदाराला वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही तिने कागदपत्रांची पूर्तता केली नाही यावरुन गैरअर्जदार क्रमांक 3 याना अर्जदाराच्या विमा क्लेमची कागदपत्रे मंजूरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडून मिळालेली होती हे या विधानावरुन कबूल केले असल्याचे स्पष्ट होते शिवाय गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पुराव्यात नि. 11 वर विमा कंपनीने अर्जदाराला पाठविलेल्या पत्राची छायाप्रत दाखल केली आहे त्यावरुन ही ते सिध्द झाले आहे त्यामुळे लेखी जबाबात विमा कंपनीने अर्जदाराच्या विमा क्लेमची कागदपत्रे त्याना मिळाली नसल्या संबधी घेतलेला बचाव खोटा असून नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच तो बचाव घेतला असल्याचे अनुमान निघते. विमा कंपनीने दिनांक 23 जुन 2006 च्या नि. 11 वरील पत्रात कोणती कागदपत्रे त्याना हावीत त्याबाबत खुणाही केलेल्या नसल्यामुळे ते पत्रही पोकळच दिसते पुराव्यातील या वस्तूस्थितीवरुन अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेमची नुकसान भरपाई मंजूर होण्याचे बाबतीत कोणत्याही कागदपत्रांची अर्जदाराकडून पुर्तता करण्याचे राहून गेले नव्हते हे पुराव्यातून शाबीत केले आहे असे असतानाही गैरअर्जदारान क्रमांक 1 व 2 याने लेखी जबाबातून अर्जदारावरच त्याचा ठपका ठेवला आहे. व क्लेम मंजुरीविना अर्जदाराचे अर्थिक नुकसान करुन सेवा त्रूटी केलेली आहे याबाबत कोणतीही शंका उरत नाही सबब मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत दयावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 1000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 500/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |