Maharashtra

Jalna

CC/31/2014

Manisha Haribhau Jadhav - Complainant(s)

Versus

Tahasildar,Jafrabad - Opp.Party(s)

R.V.Jadhav

05 Sep 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/31/2014
 
1. Manisha Haribhau Jadhav
R/o Tembhurni,Tq.jafrabad
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tahasildar,Jafrabad
Jafrabad
Jalna
Maharashtra
2. 2) ICICI Lombard Genral Insurance Co.Ltd
2floor Alaknanda complex near baba petrol pump Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(घोषित दि. 05.09.2014 व्‍दारा श्रीमती. माधुरी विश्‍वरुपे, सदस्‍या)

 

तक्रारदारांचे पती श्री.हरीभाऊ दगडूबा जाधव हे शेतकरी असून दिनांक 06.05.2005 रोजी संध्‍याकाळी जालन्‍याकडे मोटार सायकलने त्‍यांचा मुलगा सतिषला घेवून जात असताना इंडिका कारने धडक देवून झालेल्‍या अपघातात गंभीररित्‍या जखमी होवून मृत्‍यू पावले. मयताला शासकीय रुग्‍णालयात नेले असता मृत घोषित केले, संबधित वैद्यकीय अधिका-यांनी प्रेत शवविच्‍छेदनासाठी पाठवले. सदर अपघाताची माहिती पोलीस स्‍टेशन कदीम जालना यांना मिळाल्‍यानंतर इंडिका कारच्‍या ड्रायव्‍हर विरुध्‍द गुन्‍हा दाखल केला तसेच घटनास्‍थळ पंचनामा, इनक्‍वेस्‍ट पंचनामा केला.

तक्रारदारांनी पतीच्‍या मृत्‍यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव विहीत मुदतीत व आवश्‍यक कागदपत्रासह दाखल केला. परंतू अद्यापपर्यंत गैरअर्जदार यांनी मंजूर अथवा नामंजूर केला नाही. महाराष्‍ट्र शासनाने गैरअर्जदार यांचे विरुध्‍द तक्रार क्रमांक 27/2008 राष्‍ट्रीय आयोगाकडे दाखल केली असून सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 यांना शेतक-यांचे विमा प्रस्‍ताव आदेश झाल्‍यापासून सहा महिन्‍याचे आत देण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले आहेत. तक्रारदारांनी विमा प्रस्‍तावा सोबत संपूर्ण कागदपत्रे दाखल केली आहेत. विमा कंपनीने राष्‍ट्रीय आयोगात शेतक-यांचा प्रस्‍तावाची यादी दाखल केली असून सदर यादीमध्‍ये तक्रारदारांचे नाव अनुक्रमांक 41-MUM/000/2255 Date 05.05.2005 4005/000/3568 असे नमूद केले आहे. परंतू अद्याप गैरअर्जदार यांनी विमा देय रक्‍कम अदा केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.

सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे विमा प्रस्‍ताव कागदपत्रासह दाखल केला असून सदर प्रस्‍ताव गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवला आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांना विमा प्रस्‍ताव मंजूर अथवा नामंजूर करण्‍याबाबतचे अधिकार नाहीत.  

गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांची तक्रार मुदतबाह्य आहे. तक्रारदारांचा प्रस्‍ताव अपूर्ण असल्‍यामुळे कार्यवाही करता येणे शक्‍य झाले नाही. तक्रारदारांनी नमूद केलेली शेतक-यांची यादी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने तयार केली आहे. सदर यादी मान्‍य व कबुल नाही. तक्रारदारांनी कागदपत्राची पुर्तता न केल्‍यामुळे विमा प्रस्‍तावाची फाईल बंद करण्‍यात आली आहे.  

तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.

तक्रारदारांचे विव्‍दान वकील श्री.आर.व्‍ही.जाधव यांचा युक्‍तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विव्‍दान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्‍तीवाद ऐकला.

तक्रारीतील दाखल कागदपत्रे व दोनही वकीलांचा युक्‍तीवाद यावरुन खालील प्रमाणे मुद्दे स्‍पष्‍ट होतात.

  1. तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्‍यांच्‍या अपघाती मृत्‍यूनंतर गैरअर्जदार यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव दाखल केला आहे.
  2. गैरअर्जदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू सन 2005 मध्‍ये झालेला असून सदरची तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदारांनी दाखल केलला प्रस्‍तावामध्‍ये काही कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्‍यक आहे. या कारणास्‍तव सदर प्रस्‍तावाची फाईल बंद करण्‍यात आली. यावरुन तक्रारदारांचा प्रस्‍ताव प्रलंबित आहे. त्‍यावर कोणत्‍याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. मंजूर अथवा नामंजूर केला नाही, म्‍हणजेच गुणवत्‍तेवर निकाली केला नाही.  
  3. तसेच तक्रारदारांना या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. कोणत्‍या कागदपत्रांची त्रुटी होती किंवा काय ? याबाबत कळवले नाही. गैरअर्जदार यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी आहे. त्‍याच प्रमाणे विमा प्रस्‍ताव प्रलंबित अवस्‍थेत असल्‍यामुळे तक्रारदारांना सदर तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण घडले आहे (Continuous Cause of action) अशा परिस्थितीत सदरची तक्रार मुदतबाह्य नाही असे न्‍याय मंचाचे मत आहे.
  4. महाराष्‍ट्र शासनाने सदरची योजना शेतक-यांकरीता कल्‍याणकारी योजना राबवलेली असून प्रस्‍ताव दाखल झाल्‍यानंतर त्‍वरीत कार्यवाही होवून निर्णय देणे आवश्‍यक आहे. तक्रारदारांच्‍या प्रस्‍तावामध्‍ये काही कागदपत्रांची अपूर्णता आहे असे गैरअर्जदार यांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे तक्रारदारांनी विमा प्रस्‍ताव आवश्‍यक कागदपत्रासह गैरअर्जदार 2 यांचेकडे पाठवणे उचित होईल असे न्‍याय मंचाचे मत आहे.
  5. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा परिपूर्ण प्रस्‍ताव मिळाल्‍यानंतर विलंबाचा मुद्दा वगळून गुणवत्‍तेवर निकाली करणे योग्‍य होईल असे न्‍याय मंचाचे मत आहे.

सबब न्‍याय मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.

 

 

आदेश

  1. तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव आवश्‍यक कागदपत्रासह गैरअर्जदार 2 यांचेकडे आदेश मिळाल्‍यापासून 60 दिवसात पाठवावा.
  2. गैरअर्जदार 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव मिळाल्‍यानंतर 60 दिवसात विलंबाचा मुद्दा वगळून गुणवत्‍तेवर निकाली करावा. 
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER
 
[HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.