जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/197 प्रकरण दाखल तारीख - 13/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 26/11/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. सविता भ्र.मारोती भिसे वय सज्ञान वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा. उमरी ता.अर्धापूर जि. नांदेड विरुध्द. 1. मा. तहसीलदार, तहसील कार्यालय, अर्धापूर ता.अर्धापूर जि.नांदेड 2. व्यवस्थापक नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. स्टलिंग सिनेमा बिल्डींग, दुसरा मजला, 65 मर्झबान रोड, डि.ओ.14 ख फोर्ट, मुंबई 400 001 3. नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगिना घाट रोड, नांदेड. 4. विभागीय प्रमूख गैरअर्जदार कबाल इन्शूरंन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही. भुरे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड.एम.बी.टेळकीकर. गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष ) अर्जदार सविता मयत मारोती पांडूरंग भिसे यांची पत्नी आहे. मयत मारोती हे शेतकरी व्यवसाय करुन त्यांचे कूटूंबीयाचे व त्यांचे पालनपोषन करीत होते. त्यांचे नांवे शेत गट नंबर 374 मध्ये क्षेञफळ 80 आर आणि स्थित मौजे उमरी येथे आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यास व त्यांचे कूटूंबियास सामाजिक न्याय देण्याच्या हेतूने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्यामध्ये मयत मारोती यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 ते 4 मार्फत उतरविण्यात आला आहे. सदर विम्याचा कालावधी दि.15.07.2006 ते 14.07.2007 असा होता. अर्जदाराचे पती दि.30.12.2006 रोजी कामठयाहून उमरीकडे मोटार सायकलम क्र.एम.एच.-26/बी-4005 ने जात असताना उमरी फाटा नांदेड ते बसमत रोडवर ट्रक्टर नं.एमएच-26/इ-4571 या ट्रक्टरच्या चालकाहने धडक दिल्यामुळे अर्जदाराचे पती व अर्जदाराचे पतीसोबत असलले ज्ञानेश्वर मुधळ हे जागेवरच मरण पावले. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायतचे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा इत्यादी आवश्यक त्या सर्व नियमानुसार कागदपञासह शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन अर्धापूर ता. अर्धापूर येथे गुन्हा नंबर 234/2006 कलम 279, 304 (अ) द्वारे नोंदविली आहे. घटनास्थळ पंचनामा व तपास केला. अर्जदाराने अर्जासोबत घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, 7/12 उतारावरील होल्डींग, 6 के चा उतारा,बॅंकेचे पासबूकचे सत्यप्रत, वारसा प्रमाणपञ, तलाठाचे प्रमाणपञ इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. नूकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- व त्यावर सन 2007 पासून 18 टक्के व्याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही, गैरअर्जदार क्र,2 व 3 हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. ज्यामध्ये गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार ही मयत मारोती यांची पत्नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत मारोती हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही. तसेच मयत मारोती यांनी प्रत्यक्षरित्या गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. मयत मारोती हे दि.30.12.2006 रोजी कामठयाहून उमरीकडे मोटार सायकलम क्र.एम.एच.-26/बी-4005 ने जात असताना उमरी फाटा नांदेड ते बसमत रोडवर ट्रक्टर नं.एमएच-26/इ-4571 या ट्रक्टरच्या चालकाने धडक दिल्यामुळे अर्जदाराचे पती व अर्जदाराचे पतीसोबत असलेले ज्ञानेश्वर मुधळ हे जागेवरच मरण पावले हे अर्जदाराने सिध्द केलेले नाही. अर्जदाराचा अर्ज ते मान्य करु शकत नाही. तसेच त्यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्य करण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.30.12.2006 रोजी झाला व त्यांना क्लेम हा दि.18.09.2007 रोजी प्राप्त झाला त्यावेळेस पॉलिसीची एक्सपिरेशन तारीख संपलेली होती. त्यांनी त्यांचा क्लेम हा नॅशनल इन्शुरन्स कंपनी मुंबई यांना दि.22.09.2007 रोजी पाठविला आहे या बाबत अर्जदार यांना तहसीलदार अर्धापूर यांचेमार्फत दि.18.02.2009 रोजी पञाद्वारे कळविलेले आहे. म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2, 3 व 4 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे नांव मारोती पांडूरंग भिसे दाखवलेले आहे. ज्यामध्ये सविता ही मारोती यांची पत्नी आहे असे लिहीलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत मारोती यांचे वारस आहेत हे सिध्द झालेले आहे. अर्जदार ही मयत मारोती यांची पत्नी आहे हे सिध्द होत असल्यामूळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- अर्जदार ही मयत मारोती यांचे नांवावर शेती असल्याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्यामध्ये मयत मारोती यांचे नांवावर शेत जमीन असल्याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत रंगराव हे दि.30.12.2006 रोजी कामठयाहून उमरीकडे मोटार सायकलम क्र.एम.एच.-26/बी-4005 ने जात असताना उमरी फाटा नांदेड ते बसमत रोडवर ट्रक्टर नं.एमएच-26/इ-4571 या ट्रक्टरच्या चालकाने धडक दिल्यामुळे अर्जदाराचे पती व अर्जदाराचे पतीसोबत असलेले ज्ञानेश्वर मुधळ हे जागेवरच मरण पावले हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्ये मृत्यूबदल पूरावा दाखल केला नाही म्हणून अमान्य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्यामध्ये अर्जदाराचा मृत्यू हा ट्रक्टरची धडक बसून झालेला होता अशी माहीती पोलिस स्टेशन अर्धापूर ता. अर्धापूर येथे दिलेली आहे. त्याबददल जवाब घेण्यात आला व घटनास्थळ पंचनामा दाखल केला. त्याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्यामूळे मयत मारोती हे ट्रक्टरची धडक बसल्यामूळे जागीच मरण पावले हे सिध्द झालेले आहे. सन 2006-07 मध्ये औरंगाबाद महसूल वीभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्यांचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला आहे. यामध्ये मारोती यांचा सहभाग असल्यामूळे व अर्जदार ही त्यांची पत्नी असल्यामूळे ती प्रत्यक्षरित्या जरी नाही तरी अप्रत्यक्षरित्या अर्जदार ही ग्राहक आहे. त्यामूळे अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्यू दाखला प्रमाणपञ, बँकेचे पासबूक, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्यादी कागदपञासह तहसील अर्धापूर यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. सदरील सर्व कागदपञ तहसील कार्यालय यांनी कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविले आहेत. दि.30.12.2006 रोजी घटना घडली आहे व त्याबददलची कागदपञे दि.02.04.2007 रोजी तहसील कार्यालय अर्धापूर यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत व त्याबददल नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांनी तो क्लेम हा 90 दिवसांनी आलेला असल्यामूळे त्यांनी दाखल करुन घेतलेला नाही. यावरुन अर्जदाराने क्लेम तहसील यांचेकडे वेळेत पाठविला होता व त्यांनी तो कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविला आहे. कबाल इन्शूरन्स यांनी गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे सेंटलमेंट साठी पाठविला आहे हे सिध्द होते. वरील सर्व कागदपञ सिध्द झाल्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्कम दयावी. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. वरील सर्व रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास, एक महिन्यानंतर संपूर्ण रक्कमेवर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना दयावे लागेल. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |