जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/277. प्रकरण दाखल तारीख - 19/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 31/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. जिजाबाई भ्र. गणेराव वानखेडे वय 50 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा.धोतरा ता. हदगांव जि. नांदेड विरुध्द. 1. मा.तहसीलदार, तहसील कार्यालय हदगांव ता.हदगांव जि. नांदेड. 2. व्यवस्थापक रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. 19,रिलायंन्स सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400038 3. रिलांयन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा उज्वल इंटरप्रायजेस च्यावर हनुमान गड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. 4. कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स, टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.जी.नरवाडे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकिल - अड.ए.जी.कदम गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार रिलायंन्स इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की,मयत गणेशराव वानखेडे हा शेतकरी असून तो अर्जदार यांचा पती होता, मयत गणेशराव हे त्यांची शेत जमिन गट नंबर 30/1 क्षेञफळ 00 हेक्टर 82 आर मौजे धोतरा ता.हदगांव जि. नांदेड येथे शेती करीत होते. सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक दि.22.01.2008 रोजी अर्जदाराचे पती मयत गणेशराव हे पायवाटेने कामानिमीत्त जात असताना ट्रॅक्टर क्र.एम.एच.-22/एच/5751 ने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन हदगांव ता. हदगांव जि. नांदेड येथे गू.रं.नं.11/2008 कलम 279,3045 (अ) भा.द.वि. प्रमाणे ट्रक्टर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला. साक्षीदाराचे बयान नोंदविले व घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराने आवश्यक कागदपञासह हदगांव तहसील यांचे मार्फत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा दाखल केला. महाराष्ट्र शासनाने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 रिलायंन्स इन्शूरन्स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. यांचा कालावधी दि.15.8.2007 ते दि.14.8.2008 होता व या कालावधीसाठी गैरअर्जदार क्र.4 मार्फत विमा उतरविला. म्हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे प्रपोजल दि.24.03.2008 रोजी तहसीलदार हदगांव यांचेमार्फत गैरअर्जदार यांना पाठविले असता सदरील प्रस्ताव आम्ही वर पाठवला आहे, लवकर होईल असे आश्वासन देत राहीले व टाळाटाळ करीत राहीले व आजपर्यत अर्जदारास कोणत्याही प्रकारची रक्कम दिली नाही. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्यांना विम्याची रक्कम रु,1,00,000/- व त्यावर दि.22.01.2008 पासून 12 टक्के व्याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळोवत म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना मंचाने पाठविलेली नोटीस मिळून ते हजर झाले नाही त्यामूळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे एकञितरित्या दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी ही अटी व शर्ती वर दिल्या जाते. अर्जदार यांनी वारसा बददल कोणतेही रेकॉर्ड अथवा ठोस पूरावा दाखल केलेले नाही.अर्जदार यांनी ते शेतकरी असल्याबददल व त्यांची नांवे गट नंबर 30/1 क्षेञफळ 82 आर मौजे धातोरा ता.हदगांव येथे जमिन होती हे त्यांनी सिध्द केले पाहिजे व शासनाने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 याचेकडून त्यांनी काढली आहे हे त्यांना मान्य नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्यांना अमान्य आहे. मयत गणेशराव हा दि.22.01.2008 रोजी ट्रक्टर क्र.एम.एच.-22-एच-5751 यांच्या धडकेने अपघातात मरण पावला हे त्यांना सिध्द करावे लागेल. मयत गणेशराव मयताचे कायदेशीर वारस कोण आहे हे ही त्यांना सिध्द करावे लागेल. गैरअर्जदार यांना हे मान्य नाही की त्यांनी सर्व कागदपञासह दावा दाखल केला. हे त्यांना मान्य नाही की, अर्जदार हिचा पती शेतकरी आहे व त्यांनी शेतकरी अपघात विमा पॉलिसी काढली होती. त्यामूळे ते गैरअर्जदार क्र.2 यांचे ग्राहक नाहीत. अर्जदाराने विम्याची रक्कम 12 टक्के व्याजासह व तसेच नूकसान भरपाई रु.50,000/- सह, रु.5,000/- खर्चासह मागितली हे देण्यासाठी गैरअर्जदार जबाबदार नाहीत. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर दाव्याबाबत मागणी केलेली नाही त्यामूळे दावा फेटाळण्याचा संबंधच नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार ही प्रिमॅच्यूअर स्वरुपाची आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. तसेच अर्जदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक नाही. तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही त्यामूळे अर्जदार कोणतीही नूकसान भरपाई मागू शकत नाही. पॉलिसीच्या नियम व अटी नुसार सदर तक्रार ही दिवाणी न्यायालयात चालू शकते मंचास अधिकार क्षेञ नाही. अर्जदाराने त्यांची तक्रार तलाठयाकडे एक महिन्याचे आंत अपघातानंतर नोंदवावयास पाहिजे व यानंतर त्यांनी एक आठवडयात गैरअर्जदार क्र.4 मार्फत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविली पाहिजे. परंतु अपघात हा दि.22.01.2008 रोजी झालेला आहे व तहसीलदार, हदगांव यांचेकडे दि.24.03.2008 रोजी तक्रार देण्यात आली जी की मूदतबाहय आहे.त्यामूळे गैरअर्जदार यांचेवर जबाबदारी नाही.पॉलिसी ही मूंबई येथून काढली आहे, त्यामूळे मंचास कार्यक्षेञ येत नाही. दावा हा मूंबई येथेच दाखल झाला पाहिजे. अर्जदार व विमा कंपनीत काही वाद उदभवल्यास तो कमिटीच्या पूढे नेला पाहिजे. अर्जदार यांनी Ombudsman यांचेकडे तक्रार नेली पाहिजे. परंतू अर्जदार यांनी असे न करता ते सरळ मंचात आलेले आहेत. संबंधीत प्रपोजल हे तहसीलदार यांनी कबाल इन्शूरन्स यांचेकडे पाठविले पाहिजे व त्यांनी ते व्हेरिफाय करुन कागदपञासह विमा कंपनीकडे पाठविले पाहिजे. यासोबत दाव्याशी संबंधीत कागदपञ जसे तलाठी व तहसीलदार यांचे प्रमाणपञ, मृत्यूचे प्रमाणपञ, बँकेचे डिटेल्स, नॉमिनीची नांवे इत्यादी कागदपञ असणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी दाखल करण्याची मूदत ही अपघाताचे नंतर 90 दिवसांचे आंत दावा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.4 यांनी आपले लेखी म्हणणे पोस्टाने पाठविले आहे. त्यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्कम मानधन म्हणून देखील स्विकारत नाहीत. त्यामूळे त्यांचे विरुध्द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्लेम त्यांचेकडे दि.03.03.2008 रोजी तहसिलदार यांचेकडून आला तो लगेच दि.28.04.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविण्यात आला. मध्यस्थ करणे व शेतक-यांच्या प्रस्तावाची छाननी करणे व योग्य त्या शिफारशीसह इन्शूरन्स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्यांचे काम आहे. त्यामूळे त्यांचे विरुध्दचा दावा खारीज करावा. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी त्यांचे मयत शेतकरी पती गणेशराव वानखेडे यांचा दि.22.01.2008 रोजी ट्रॅक्टर क्र.एम.एच.-22-एच-5751 यांनी धडक दिल्याने मयत गणेशराव यांचा जागीच मृत्यू झाला, म्हणजे त्यांचा अपघातात मृत्यू झाला असे म्हटले आहे. या बददलचा पूरावा म्हणून घटनास्थळाचा पंचनामा, तलाठयाचे प्रमाणपञ, एफ.आय.आर., मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट दाखल आहे. यात डॉक्टरच्या मते According to my opinion the probable cause of death is due to “ Cardio-respiratory failure ” which is due to “ Head injury ” However, viscera has been preserve into common salt solution, if needed. त्यामूळे मृत्यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. घटनेच्या प्राथमिक अहवालात मयताचे नांव गणेशराव वानखेडे असे असून पोलिस स्टेशन हदगांव येथे गून्हा नोंदविण्यात आलेला आहे. पी.एम. रिपोर्ट ही या सोबत जोडलेला आहे. मयत गणेशराव यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्याबददल त्यांच्या नांवाचा 7/12 व गाव नमूना आठ- अ दाखल आहे. याप्रमाणे गट नंबर 30/1 मध्ये 80 आर ही जमिन धोतरा ता. हदगांव येथे आहे. गांव नमुना सहा क वारसा प्रकरणांची नोंदवही दाखल केलेली आहे. यावरुन अर्जदार ही मयत गणेशराव यांची पत्नी आहे. तलाठयाचे प्रमाणपञ व ग्रामपंचायत मौजे धोतरा ता. हदगांव यंाचे मृत्यू दाखला प्रमाणपञ दाखल केलेले आहे. यात मयताचा मृत्यू हा दि.22.01.2008 रोजी झाला यांची नोंद आहे. मृत्यूनंतर दाव्यासाठी क्लेम फॉर्म नंबर 1 पूर्ण भरुन घेऊन दि.24.03.2008 रोजी तहसीलदार हदगांव यांना दिल्याची नोंद आहे. दि.22.01.2008 रोजीला अपघात झाला, तहसीलदार हदगांव यांना दि.24.03.2008 रोजी कळविण्यात आले म्हणजे दोन महिने विलंब झाला, पण 90 दिवसांचा अवधी क्लेम दाखल करण्यास होता. त्यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्यांना शासनाच्या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्यानंतर ते दूखात असतात. त्यामूळे जबाबदारीने क्लेम दाखल करणे शक्य नसते. म्हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्यास शासनाने परिपञका प्रमाणे क्लेम वेळेत दाखल करणे आवश्यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्पष्ट म्हटले आहे. शेतक-याचा मृत्यू अपघाती झाला हे स्पष्ट आहे त्यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्याची रक्कम दिली पाहिजे हे न्यायाच्या दृष्टीने उचित आहे. विम्याची रक्कम ही मयताच्या पत्नीस मिळाली पाहिजे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.22.01.2008 पासून 9 टक्के व्याजासह पूर्ण रक्कम वसूल होईलपर्यत व्याजासहीत दयावेत. 3. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- दयावेत. 4. गैरअर्जदार क्र.,1 व 4 विरुध्द आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |