Maharashtra

Nanded

CC/08/302

Ku.Lata Kesav Kadam - Complainant(s)

Versus

Tahasildar umri - Opp.Party(s)

ADV.Bhure B.V.

09 Mar 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/302
1. Ku.Lata Kesav Kadam R/o.abdulpur post.Talegoan Tq.umri Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Tahasildar umri Tq.umri Dist NandedNandedMaharastra2. The Divisional Manager,National Insurance Co.Lit.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 09 Mar 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र.302/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  04/09/2008.
                          प्रकरण निकाल दिनांक 09/03/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील       अध्‍यक्ष.
                     मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                 मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
कु.लता पि.केशव कदम                                
वय वर्षे 21, व्‍यवसाय शिक्षण,
रा. अब्‍दूल्‍लापूर पो.तळेगांव ता. उमरी
जि. नांदेड.                                          अर्जदार
विरुध्‍द
1.   तहसीलदार,
     तहसील कार्यालय, उमरी ता. उमरी
     जि.नांदेड.                                    
2.   व्‍यवस्‍थापक,
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग, दुसरा मजला,             गैरअर्जदार 65 मर्झबान रोड, डी.ओ.14 ख, फोर्ट
     मुंबई 400 001.
3.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,
     शाखा नगिना घाट रोड, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.           - अड.भुरे बी.व्‍ही.
गैरअर्जदार क्र.1 तर्फे      - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - अड.एम.बी.टेळकीकर.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या)
 
               गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली यामूळे अर्जदाराने नूकसान भरपाई मिळावी म्‍हणून ही तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार खालील प्रमाणे आहे, अर्जदार ही मयत केशव पि. मारोती कदम यांची मुलगी आहे. अर्जदार हिंचे वडिल केशव मारोती कदम हे दि.13.06.2007 रोजी जनावराना पाणी पाजवण्‍यासाठी विहीरीतून पाणी काढताना अपघाती पाय घसरुन पडले त्‍यामूळे त्‍यांना त्‍यांच्‍या हाता पायाला व छातीला मूक्‍का मार लागला. त्‍यानंतर त्‍यांना संजीवनी क्लिनिक उमरी येथे प्रथम उपचार करण्‍यात आले. कालांतराने ते देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता तेथे त्‍यांना मार लागलेल्‍या ठिकाणी दूखू लागले. तेथे त्‍यांना कॉटेज हॉस्‍पीटल पंढरपूर येथे शरीक केले. तेथे इलाज चालू असताना दि.19.07.2007 रोजी त्‍यांचा मूत्‍यू झाला. पोलिस स्‍टेशन पंढरपूर येथे कलम 174 सी.आर.पी.सी. अन्‍वये रिपोर्ट नोंदविला व साक्षीदारांचे बयान घेतले. अर्जदार यांचे नांवे मौजे अब्‍दूलापूर ता. उमरी येथे शेत गट नंबर 24, क्षेञफळ 3 हेक्‍टर एवढी जमीन आहे. त्‍यांचा पूरावा म्‍हणून 7/12 चा उतारा व नमुना नंबर 8 चा उतारा व 6-क चा उतारार दाखल केला आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-याचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे काढली आहे व त्‍यांचा प्रिमियम त्‍यांचे भरला आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दि.15.07.2006 ते दि.14.07.2007 पर्यत असा आहे व घटना ही दि.19.07.2007 ची आहे.  अर्जदाराने वडिलांच्‍या अपघाताचे सर्व कागदपञ घेऊन दि.30.08.2007 रोजी तहसील कार्यालय उमरी येथे विनंती अर्ज देऊन क्‍लेम मिळावा अशी विनंती केली. तर गैरअर्जदार क्र.1 यांनी असे उत्‍तर दिले की तूमचा क्‍लेम वर पाठविलेला आहे. मंजूर होऊन आल्‍यानंतर क्‍लेम देऊ असे सांगत राहिले. पण अद्यापपावेतो क्‍लेम दिला नाही. त्‍यानंतर अर्जदाराने दि.02.07.2008 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून नूकसान भरपाई मिळण्‍याची विनंती केली, पण नोटीस मिळूनही गैरअर्जदारांनी कोणतीही नूकसान भरपाई अर्जदारास दिली नाही. प्रस्‍तूतची तक्रार ही मंचाच्‍या कार्यक्षेञात येते. तसेच अर्जदार ही मयताची मूलगी असल्‍याने ती नुकसान भरपाई मिळण्‍यास हक्‍कदार आहे. त्‍यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- मिळावेत.
 
              गैरअर्जदार क्र.1 यांना मंचातर्फे पाठविण्‍यात आलेली नोटीस मिळाली व ते हजर झाले पण त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द नो से चा आदेश करण्‍यात आला.
 
              गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे.  अर्जदाराचा दावा हा खोटा व निराधार आहे. म्‍हणून खर्चासह फेटाळावा असे म्‍हटले आहे. हा दावा मूदतीत नसून विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीच्‍या विरुध्‍द व विसंगत आहे. अर्जदार ही मयताची वारस आहे हे सिध्‍द केलेले नाही. मयताला मार लागल्‍यासंबंधी एफ.आय.आर., वैद्यकीय प्रमाणपञ, घटनास्‍थळ पंचनामा, दाखल केलेले नाही.  मूक्‍का मार मयताच्‍या मृत्‍यूस कारणीभू होईल असा वैद्यकीय पुरावा आणलेला नाही. घटना घडल्‍यानंतर एक महिना 6 दिवसानंतर मयताचा मृत्‍यू झालेला आहे यामूळे हे स्‍पष्‍ट होते की, अर्जदाराचेक वडिलांचा अपघातातील मुक्‍यामारामूळे मृत्‍यू झालेला नाही. पंढरपूर पोलिस तपासात मयताच्‍या अंगावर कोणत्‍याही प्रकारच्‍या ताज्‍या मारहानीच्‍या नीशानी किंवा जखमा दिसून येत नाहीत. मयताचा मृत्‍यू हा थंडी व ताप आल्‍याने औषधोपचार चालू असताना झालेला आहे. पोस्‍ट मार्टम रिपोर्ट वरुन अर्जदाराचे वडिलांना न्‍यूमोनीया आजार झाला व त्‍यात त्‍यांना मृत्‍यू आला. त्‍यामूळे अर्जदाराचे वडिल हे दि.13.6.2007 रोजी घडलेल्‍या अपघात मरण पावले नसून त्‍यांचा मृत्‍यू हा न्‍यूमोनीया मूळे झालेला आहे.  केवळ पैसे उकळण्‍यासाठी दावा दाखल केलेला आहे. त्‍यामूळे अर्जदाराचा दावा खर्चासह फेटाळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराचा मृत्‍यू हा पॉलिसीच्‍या कालावधीत झालेला नाही त्‍यामूळे क्‍लेम देण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खरे आहे की, अर्जदाराने तहसीलदार उमरी यांचे मार्फत अर्ज केला आहे. अर्जदाराचा दावा विमा पॉलिसीच्‍या शर्ती तथा अटीत बसत नाही त्‍यामूळे अर्जदारांचा दावा मंजूर करण्‍यात आलेला नाही. असे करुन गैरअर्जदारांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही म्‍हणून अर्जदारांचा दावा खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच क्‍लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपञ, तहसीलदाराचे प्रमाणपञ, नुकसान भरपाई मिळण्‍यासंबंधी अर्ज, 7/12 चा उतारा, नमूना नंबर 8 चा उतारा, फेरफारचा उतारा, पोलिस पाटलाचे प्रमाणपञ, संजीवनी क्लिनीकचे उपचारासंबंधी पञ, वारसाचे प्रमाणपञ, बँकेचे पासबूक, रेशन कार्ड, पोलिस स्‍टेशन पंढरपूर यांच्‍या आदेशाची प्रत, घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर प्रमाणपञ, पी.एम. रिपोर्ट, नोटीसीची प्रत इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे रामनारायण रामप्रसाद बंग यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहेत. गैरअर्जदारांनी अड.एस.एस. टेंभूणीकर यांचा तपासणी रिपोर्ट, पोलिस स्‍टेशन अब्‍दूल्‍लापूर ता. भोकर यांचे प्रमाणपञ, सं‍जीवनी क्लिनीक यांचे वैद्यकीय प्रमाणपञ, स्‍टेटमेंट, करारानामा, शासनाचे परिपञक इत्‍यादी कागदपञ दाखल केले आहेत.
 
              दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                        उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     ञूटी केली आहे काय ?                               होय.
3.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.     
 
                                                कारणे
मूददा क्र.1 ः-
                    अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदाराचे ग्राहक असल्‍याबददल गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून प्रमाणपञ, इन्‍शूरन्‍स कंपनीस नूकसान भरपाई संबंधी पाठविलेले पञ, शेतकरी व्‍यक्‍तीगत विमा योजना याबाबत तलाठयाचे प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी त्‍यांची लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये सदरची बाब नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र.2ः-
              अर्जदार ही केशव मारोती कदम यांची मूलगी आहे. वच्‍छलाबाई केशव कदम (मयताची पत्‍नी) व मारोती केशव कदम (मयताचा मूलगा) यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. सदर शपथपञामध्‍ये कू. लता केशव कदम हिस नूकसान भरपाई देण्‍यास आमचा काही आक्षेप नाही नमूद करण्‍यात आलेले आहे.  श्री. केशव मारोती कदम हे दि.13.06.2007 रोजी जनावरांना पाणी पाजण्‍यासाठी विहीरीतून पाणी काढताना अपघाती पाय घसरुन पडले व त्‍यांत त्‍यांच्‍या हाता पायाला व छातीला मूक्‍का मार लागलेला होता. त्‍या बाबत त्‍यांनी संजीवनी क्लिनिक उमरी येथे प्रथम उपचार घेतले. त्‍या बाबतचे डॉ.डि.एस.देशमूख बारडकर यांचे दि.13.06.2007 रोजीचे औषधोपचार (प्रिस्‍क्रीप्‍शन) कागद दाखल केलेले आहे त्‍यावरुन स्‍पष्‍ट होत आहे. त्‍यानंतर श्री. केशव मारोती कदम हे दि.19.07.2007 रोजी कॉटेज हॉस्‍पीटल पंढरपूर येथे मृत्‍यू पावलेले आहेत. अर्जदार यांनी सदर अर्जासोबत मयत केशव मारोती कदम शेतकरी होते हे दर्शविण्‍यासाठी 7/12 चा उतारा, पोलिस ठाणे अमंलदार शहर पोलिस स्‍टेशन पंढरपूर यांचे दि.19.07.2007 रोजीचे आदेश, घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पी.एम. प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या पी.एम. प्रमाणपञाप्रमाणे केशव कदम यांचा मृत्‍यू हा Death due to Bilateral Pneumonits   यामूळे झालेला आहे असे कारण दिलेले आहे. अर्जदार यांनी त्‍यांचे लेखी यूक्‍तीवादासोबत दिलेला वैद्यकीय अहवालनुसार  API Text Book of Medicine  लेखक शांतीलाल शहा यांच्‍या पूस्‍तकात प्रकरण 10 पान नंबर 214, 215, 216 यात जे.आर. शहा यांनी येथे नमूद केल्‍याप्रमाणे अर्जदार यांचा मृत्‍यू हा अपघातामूळे झालेल्‍या दूखापतीमूळेच झालेला आहे. म्‍हणजेच अर्जदार यांचे मृत्‍यूस अपघाती घटना कारणीभूत ठरलेली आहे ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या वैद्यकीय अहवालानुसार स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत विमा अपघाती योजना या बाबतचे शासनाचे परिपञक ही दाखल केलेले आहे. सदर परिपञकाचे अवलोकन केले असता उंचावरुन पडून अपघात किंवा मृत्‍यू झालेला असल्‍यास शेतकरी हा विमा मिळण्‍यास पाञ आहे असे नमूद करण्‍यात आलेले आहे. तसेच शेतक-याचे प्रकरण तांञिक मूददयावर फेटाळले जाणार नाहीत या बाबत दक्षता घ्‍यावी असे ही नमूद करण्‍यात आलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ, शासनाचे परिपञक, वैद्यकीय अहवाल यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांचा मृत्‍यू हा अपघाती झालेला आहे. अर्जदार हे दि.13.06.2007 रोजी विहीरीतून पाणी काढताना पाय घसरुन पडले आहेत व त्‍या वेळी झालेल्‍या दूखापतीमूळे पूढे ते दि.19.07.2007 रोजी मयत झालेले आहेत. त्‍यांचे मृत्‍यूस दि.13.06.2007 ची घटना कारणीभूत झालेली असल्‍याने अर्जदार यांचा मृत्‍यू हा दि.13.06.2007 रोजीच्‍या दूखापतीमूळेच झालेला आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍यातील कथनास अर्जदार यांचा मृत्‍यू हा विमा पॉलिसीच्‍या कालावधीमध्‍ये बसत नाही या म्‍हणण्‍यास कोणताही अर्थ उरत नाही.
 
                               महाराष्‍ट्र शासनाने शेतक-याच्‍या हितासाठी  गैरअर्जदार  यांचेकडून शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा पॉलिसी प्रिमियमची पूर्ण रक्‍कम भरुन घेतलेली आहे व महाराष्‍ट्रातील सर्व शेतकरी लाभार्थी आहेत. मयतकेशवच्‍या नांवाने शेती असल्‍याबददलचा 7/12 व होल्‍डींग अर्जदाराने दाखल केलेले आहेत व इतरही कागदपञ आहेत. त्‍यामूळे ती लाभार्थी आहे याविषयी वाद नाही. शेतकरी विमा योजना सन 2006-07 हे परिपञक या प्रकरणात दाखल आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांना जबाबदारी टाळता येत नाही. त्‍यात 2008 (2) ALL MR (JOURNAL) 13 Consumer Dispute Redressal State Commission Mumbai,   ICICI Lombard General Insurance Com. Ltd.    Vs.   Smt. Sindhubhai Khanderao Khairnar  या प्रकरणात मूदतीचा मूददा येत नाही.    मा. उच्‍च न्‍यायालय यांनी  (2000)   I Supreme Court Cases 98 Regional Provident Fund Commissioner   Vs   Shivkumar Joshi   यात केलेल्‍या आदेशाप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा 1986 सेक्‍शन 2 (1)(ड) (ii)  Consumer---Includes also the beneficiary for whose benefit the services are hired of availed of.   म्‍हणजे तो लाभार्थी आहे.  यातही मयत विमेदार हा लाभार्थी आहे. हे सर्व असताना मयत विमेदार केशव यांचे वारस तिची मूलगी कू.लता ही विमेदाराची रक्‍कम मिळण्‍यास हक्‍कदार आहे हि बाब स्‍पष्‍ट होत आहे.
              कोणतेही योग्‍य व संयूक्‍तीक कारण नसताना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे विम्‍याची रक्‍कम मागणी करुनही आज अखेर दिलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपञ यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदार यांस शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम गैरअर्जदार यांनी दयावयास पाहिजे असताना व गैरअर्जदार यांनी कोणतेही योग्‍य व संयूक्‍तीक कारण नसताना अर्जदार यांची विमा क्‍लेमची रक्‍कम मागणी करुनही अर्जदार यांना अदा केली नाही. त्‍यामूळे अर्जदार यांना या मंचामध्‍ये सदरची शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज दाखल करावा लागला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून अर्जाचे खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे.
 
               अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना सदर अर्जामध्‍ये आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केलेले आहे. कारण अर्जदार यांचे विमा क्‍लेम मागणी करण्‍या बाबतचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यालया मार्फत पाठविला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून अर्जदार यांचा विमा क्‍लेम मागणीचा अर्ज गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे पाठविण्‍याचे काम गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेले आहे. सदरची बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदयादी सोबत दाखल केलेल्‍या दि.01.10.2007 रोजी तहसील कार्यालय, उमरी यांचे पञावरुन स्‍पष्‍ट होत आहे. यांचा विचार होता गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 यांचा विरुध्‍द कोणताही आदेश करणे योग्‍य होणार नाही असे या मंचाचे मत आहे.
 
              अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार यांचे क्‍लेम नाकारल्‍याचे पञ दाखल केलेले नाही. अगर क्‍लेम फॉर्म गैरअर्जदार क्र.1 कडे कोणत्‍या तारखेस दिला या बाबतचाही कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. त्‍यामूळे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना पाठविलेली वकिलामार्फतची कायदेशीर नोटीस दि.02.07.2008 पासून विमा क्‍लेमचे रक्‍कमेवर 9 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.  
     अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद यांचा सर्वाचा विचार होता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
          वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                            आदेश
 
1.                 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
2.                 गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्‍द आदेश नाही.
 
आजपासून 30 दिवसांचे आंत
 
3.                 गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास रक्‍कम 
     रु.1,00,000/- व त्‍यावर दि.02.07.2008 पासून  
     पूर्ण रक्‍कम पदरीपडेपर्यत 9 टक्‍के व्‍याजाने दयावेत.
4.    गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास मानसिक
      ञासापोटी रक्‍कम रु.5,000/- दयावेत.
5.   गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास अर्जाच्‍या        
      खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- दयावेत.
6.   पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)      (श्रीमती.सुजाता पाटणकर)      (सतीश सामते)    
           अध्यक्ष.                               सदस्या                   सदस्‍य
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.