Maharashtra

Jalgaon

CC/10/914

Gayabai Patil - Complainant(s)

Versus

Tahasildar, Pachora & Others - Opp.Party(s)

Adv. S.T. Pawar

18 Oct 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/10/914
 
1. Gayabai Patil
Jamner
Jalgaon
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tahasildar, Pachora & Others
Pachora
Jalgaon
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 914/2010                    
                                    तक्रार दाखल करण्‍यात आल्‍याची तारीखः-30/06/2010.       
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 18/10/2013.
 
 
 
श्रीमती गयाबाई भागवत पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.पहाण, ता.जामनेर,जि.जळगांव.                     ..........     तक्रारदार.
 
            विरुध्‍द
1.     तहसिलदार,
      तहसिल कार्यालय, पाचोरा,ता.पाचोरा,जि.जळगांव.
2.    तालुका कृषी अधिकारी,
      तालुका कृषी कार्यालय, पाचोरा,
      ता.पाचोरा,जि.जळगांव.
3.    व्‍यवस्‍थापक,
      कबाल इंन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट लि,
      4 अ, देहमंदीर सोसायटी, श्रीरंगनगर,
      माईलेले श्रवण विकास महाविद्यालयाजवळ,
      पंपींग स्‍टेशन रोड, नाशिक.
4.    डिव्‍हीजनल मॅनेजर,
ओरिएंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि,
डिव्‍हीजन ऑफीस नं.2, 8 हिंदुस्‍थानी कॉलनी,
नेरआंजन चौक, फरदा रोड, नागपुर.             .........      विरुध्‍द पक्ष
 
                        कोरम- 
                        श्री.विश्‍वास दौ.ढवळे                    अध्‍यक्ष
                        श्रीमती पुनम नि.मलीक                 सदस्‍या.
                                    तक्रारदारातर्फे श्री.सतीश तुकाराम पवार वकील.
                  विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 तर्फे प्रतिनिधी हजर.
                  विरुध्‍द पक्ष क्र. 3 एकतर्फा.
                  विरुध्‍द पक्ष क्र. 4 तर्फे श्री.एस.बी.अग्रवाल वकील.
निकालपत्र
श्री.विश्‍वास दौ.ढवळे, अध्‍यक्षः शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत पतीच्‍या अपघाती निधनानंतर विमा पॉलीसी अंतर्गत नुकसान भरपाई न मिळाल्‍याने तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
            2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचे पती भागवत काशिनाथ पाटील यांचा दि.31/10/2008 रोजी अपघाती निधन झाले. भागवत काशिनाथ पाटील यांचे नांवे मौजे पहाण,ता.पाचोरा,जि.जळगांव येथे शेतजमीन होती व ते शेतकरी या संज्ञेत येतात.   तक्रारदाराचे पती शेतकरी असल्‍याने त्‍यांचा व इतर सर्व शेतक-यांचा महाराष्‍ट्र शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र.एनएआयएस 1204/सी आर-166/11-अ, दि.5 जानेवारी,2005 चे निर्णयानुसार शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा उतरविलेला होता.    शेतकरी अपघात विमा योजनेनुसार तक्रारदार यांनी योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन रक्‍कम मिळणेसाठी तालुका कृषी अधिकारी,पाचोरा यांचेकडे अर्ज दाखल केला.    त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराकडे मागणी केलेली कागदपत्रेही पुरविली असता विरुध्‍द पक्षांनी आजतागायत तक्रारदाराचा विमा क्‍लेम मंजुर केला नाही अगर त्‍यास नुकसानीची रक्‍कमही दिली नाही.   सबब विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास रक्‍कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह मिळावी व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. 
            3.    सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्‍द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या.   विरुध्‍द पक्ष क्र. 1  हे प्रतिनिधी मार्फत याकामी हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्‍हणणे दाखल न केल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.   विरुध्‍द पक्ष क्र. 3 हे या मंचाची नोटीस मिळुनही याकामी हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
            4.    विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी याकामी म्‍हणणे दाखल केलेले असुन तक्रारदार श्रीमती गयाबाई भागवत पाटील, रा.पहाण,ता.पाचोरा यांचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा प्रस्‍ताव तक्रारदाराकडुन योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन घेऊन प्रस्‍ताव परिपुर्ण म्‍हणुन स्‍वाक्षरी करुन विमा कंपनीकडे वेळेवर पाठविला आहे असे विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात कथन केलेले आहे.
            5.    विरुध्‍द पक्ष क्र. 4 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराकडुन किंवा विरुध्‍द पक्ष क्र. 2 कडुन विमा कराराच्‍या विहित मुदतीत प्रस्‍ताव प्राप्‍त झालेला नव्‍हता त्‍यामुळे विमा कंपनी तक्रारदारास काहीएक रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाही.   तक्रारदार व विमा कंपनीचे दरम्‍यान कोणताही विमा करार नव्‍हता त्‍यामुळे मयत किंवा तक्रारदार हे विमा कंपनीचे ग्राहक नव्‍हते व नाहीत.    वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्‍यात यावा व नुकसान भरपाई दाखल रु.25,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- तक्रारदाराकडुन मिळावेत अशी विनंती विरुध्‍द पक्ष क्र. 4 यांनी केलेली आहे.    
                        6.         तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र. 2 व 4  यांचे लेखी म्‍हणणे,  त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे,  तसेच उभयतांचे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
 मुद्ये                                            उत्‍तर.
1.     विरुध्‍द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी केली
     आहे काय ? असल्‍यास कोणी                 होय., वि.प.क्र.4 यांनी.
3.    तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे        अंतीम आदेशानुसार
            7.    मुद्या क्र. 1 - प्रस्‍तुत तक्रारीचे युक्‍तीवादाचे वेळी तक्रारदार तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 4 विमा कंपनीचे वकीलांनी तक्रारदारास यापुर्वीच त्‍यांनी मागणी केलेली शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रक्‍कम रु.1,00,000/- देण्‍यात आलेली असल्‍याचे प्रतिपादन केले.   तक्रारदाराने देखील दि.7/12/2011 रोजी या तक्रारीत हजर होऊन त्‍यांना रक्‍कम रु.1,00,000/- प्राप्‍त झालेले असुन सदर रक्‍कमेवर नियमानुसार मिळणारे व्‍याज व खर्च तक्रारदारास मिळावा अशी विनंती अर्जातुन केलेली असुन सदर अर्जाचे पुष्‍ठयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे.   तक्रारदार व विरुध्‍द पक्ष क्र. 4 चे वकीलांनी युक्‍तीवादाचे वेळी याकामी योग्‍य ते आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.     उपरोक्‍त विवेचन विचारात घेता तक्रारदाराने या मंचासमोर दि.30/06/2010 रोजी तक्रार दाखल केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने कालांतराने तक्रारदारास नुकसान भरपाई दाखल रु.1,00,000/- दिल्‍याचे दोन्‍ही बाजुंचे वकीलांनी या मंचासमोर केलेल्‍या युक्‍तीवादातुन स्‍पष्‍ट होते.   विरुध्‍द पक्ष क्र. 4 विमा कंपनीने तक्रारदारा सारख्‍या खेडयात राहणा-या व्‍यक्‍तीस तिचे पतीचे अपघाती मृत्‍युनंतर त्‍यांनी योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन विमा क्‍लेम दाखल केल्‍यावर देखील त्‍यांचा विमा क्‍लेम तसाच प्रलंबीत ठेवला व सरतेशेवटी तक्रारदाराने या मंचाकडे धाव घेतल्‍यानंतर उशिराने तक्रारदारास नुकसानी दाखल रक्‍कम रु.1,00,000/- दिले ही बाब पाहता विरुध्‍द पक्ष क्र. 4 यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई रक्‍कम देण्‍यास विलंब लावुन व तिला सदरची रक्‍कम व्‍याजासह अदा न करुन सदोष व त्रृटीयुक्‍त सेवा प्रदान केली असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.   सबब मुद्या क्र. 1 चे उत्‍तर विरुध्‍द पक्ष क्र. 4 करिता आम्‍ही होकारार्थी देत आहोत.   
            8.    मुद्या क्र. 3 - तक्रारदाराने याकामी दि.7/12/2011 चे पुरवणी तक्रार अर्जातुन विमा रक्‍कम रु.1,00,000/- वर नियमानुसार व्‍याज व योग्‍य तो खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.      विरुध्‍द पक्ष क्र. 4 ओरिएंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम बाबत उशिराने निर्णय घेऊन त्‍यास विमा क्‍लेमची रक्‍कम व्‍याजासह अदा न करुन सेवेत त्रृटी केलेली आहे.    परिणामी कोणतेही संयुक्‍तीक कारणाशिवाय विमा दावा विमा कंपनीचे प्रतिनिधीने स्विकारलेली दि.16/09/2009 पासुन प्रलंबीत ठेवल्‍यामुळे रक्‍कम रु.1,00,000/- वर प्रस्‍तुत विमा प्रस्‍ताव दाखल केलेली दि.16/09/2009 पासुन  तक्रारदारास प्रत्‍यक्षात रक्‍कम रु.1,00,000/- अदा केलेल्‍या तारखेपावेतोचे द.सा.द.शे.8 टक्‍के व्‍याज मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे.   तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मागणी केली आहे तथापी आमचे मते तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब वरिल विवेचनावरुन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.                   
आ दे श
1.     तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येतो.
2.    विरुध्‍द पक्ष क्र. 4 ओरिएंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/-(अक्षरी रक्‍कम रु.एक लाख मात्र) वर विमा प्रस्‍ताव दाखल दि.16/09/2009 पासुन ते सदरची रक्‍कम रु.1,00,000/- तक्रारदारास यापुर्वीच प्रत्‍यक्ष अदा केल्‍याचे तारखेपावेतोचे द.सा.द.शे.8 टक्‍के प्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3.    विरुध्‍द पक्ष क्र. 4 ओरिएंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.10,000/- (अक्षरी रक्‍कम रु.दहा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र ) या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
  गा 
दिनांकः-  18/10/2013. 
                        ( श्रीमती पुनम नि.मलीक )        (श्री.विश्‍वास दौ.ढवळे )
                             सदस्‍या                           अध्‍यक्ष
               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,जळगांव.
 
 
[HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.