जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/205. प्रकरण दाखल तारीख - 19/09/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.सौ.सुवर्णा पिंगळीकर, देशमूख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य छगनलाल पि. कीशनलाल बलदवा वय,50 वर्षे, धंदा शेती, रा. बारड ता.मूदखेड जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. मा.तहसीलदार, तहसील कार्यालय मुदखेड, जि. नांदेड. 2. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत व्यवस्थापक, कार्यालय, 3, मिडीलटन स्ट्रीट, पो.नं.स.9229,कोलकत्ता-700 071. 3. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगीना घाट रोड, नांदेड. 4. कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. 4.शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स, 4.टाऊन सेंटर,सिडको, कॅनाट प्लेस, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.जी.बारसे पाटील गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 ते 4 तर्फे वकिल - अड.रियाजूल्ला खॉन निकालपञ (द्वारा - मा.सौ.सुवर्णा पिंगळीकर,देशमूख, सदस्या ) अर्जदार छगनलाल कीशनलाल बलदवा हे बारड ता.मुदखेड जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची पत्नी मयत संतोष कंवर ऊर्फ संतोषबाई भ्र. छगनलाल बलदवा ही दि.14.11.2006 रोजी लक्झरी बस क्रमांक एम.एच.-22-3236 ने नांदेडहून बारड येथे जात होती. ती लक्झरी बस अचानक झाडाला धडकली व आग लागून अर्जदाराची पत्नी त्यामध्ये जळाली. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1, 2,3 व 4 यांचेकडे विमा दावा दाखल केला व अर्ज दिला. परंतु अर्जदारास विमा दावा रक्कम मंजूर न झाल्यामूळे अर्जदाराने सदर तक्रार या मंचासमोर दाखल केली. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराची मयत पत्नी संतोषीबाई ही शेती करीत असून तिच्या नांवाने गैरअर्जदार क्र.1 तहसीलदार, मुदखेड गैरअर्जदार क्र.2 नॅशनल इन्शूरन्स कंपनी, गैरअर्जदार क्र.3 नॅशनल इन्शूरन्स कंपनी नांदेड यांचेकडे शेतकरी वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी काढली होती. दि.14.11.2006 रोजी मयत संतोषीबाई ही नांदेडहून बारड येथे जात होती. लक्झरी बस खैरगांव शिवारात आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सूटल्यामूळे सदरील बस रोडच्या खाली जाऊन झाडाला धडकली व त्या बसला आग लागून अर्जदाराची पत्नी जळून खाक झाली. दि.14.11.2006 रोजी सदरील बस चालक विरुध्द अर्धापूर पोलिस स्टेशन जि. नांदेड येथे गून्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, अंतिम अहवाल इत्यादी कागदपञ अर्जदाराने मंचासमोर दाखल केले. अर्जदाराची पत्नी हिच्या नांवाने मौजे बारड येथे गट नंबर 128 क्षेञफळ 1 हेक्टर 21 आर जमिन आहे व ती स्वतः शेती करीत होती. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी शेतक-यासाठी अपघात विमा योजना काढली होती. त्यामध्ये गैरअर्जदार क्र.2 नॅशनल इन्शूरन्स कंपनी कलकत्ता यांचेकडे अर्जदारांचा प्रिमियम भरला होता व त्या वेळेस अर्जदाराची सर्व जोखीम स्विकारली होती. अर्जदाराची पत्नी ही शेतकरी असल्यामूळे तिचा प्रिमियम महाराष्ट्र शासनाने भरला होता म्हणून ती लाभार्थी होती. शासनाच्या परिपञकाप्रमाणे अर्जदार तिचे पत्नीचे मृत्यूनंतर तहसिलदार कार्यालयामध्ये विमा दावा व क्लेम फॉर्म सादर करण्यासाठी गेले. दि.9.2.2007 रोजी सर्व कागदपञ व क्लेम फॉर्म तहसीलदार मूदखेड यांचेकडे अर्जदाराने दाखल केले व त्यांच दिवशी कागदपञासहीत क्लेम फॉर्म तहसीलदार मूदखेड यांनी गैरअर्जदार क्र. 4 कबाल इन्शूरन्स औरंगाबाद यांचेकडे पाठविला. अर्जदाराच्या पॉलिसीचा क्रमांक 260600/42/06/9600002, असा होता. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या पत्नीचे प्रथम खबर अहवालामध्ये नांवा नसल्यामूळे सदर स्ञी ही त्या बसमध्ये नव्हती असे म्हणून बेकायदेशीर अर्जदाराचा दावा फेटाळला व तसे पञ अर्जदारास पाठविले. त्या बददल अर्जदाराने गैरअर्जदार क्र.4 यांचे कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष विचारणा केली व गैरअर्जदार क्र.2 ने दावा नाकारल्यावीषयी माहीती दिली. सदरील योजनेस अर्जदार पाञ असल्यामूळे गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे विम्याच्या रक्कमेची मागणी केली. गैरअर्जदार क्र.4 यांनी सर्व कागदपञ परत आमच्याकडे पाठवा असे सांगितले. दि.27.3.2008 रोजी सदरील कागदपञ पून्हा दाखल केले. त्यानंतर आजपर्यत कोणत्याही गैरअर्जदारांनी अर्जदारास काहीही कळविलेले नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून सदरील दावा या मंचात दाखल केलेला आहे. अर्जदाराने शपथपञ दाखल केले, तसेच प्रथम खबरी अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, अंतिम अहवाल व गैरअर्जदार क्र.2 यांचे पञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.4 हे ही हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे (नि.9) गैरअर्जदार क्र.1 हे ही हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. प्रथम खबर अहवालामध्ये अर्जदाराच्या पत्नीचे नांव नसल्यामूळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा क्लेम नाकारला अशा पध्दतीचे म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखी जवाब दाखल केला. दि.18.12.2009 रोजी त्यामध्ये त्यांनी दि.9.2.2007 रोजी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी अर्जदारांनी दावा दाखल केला हे मान्य केलेले आहे. दि.14.11.2006 रोजी झालेल्या लक्झरी अपघातात अर्जदाराची पत्नी मयत संतोषीबाई जळून खाक झालेल्या आहेत अशा पध्दतीचे रिपोर्टस दाखल झालेले आहेत हे ही मान्य केलेले आहे. तसेच अर्जदार यांचा विमा दावा तहसीलदार मूदखेड यांनी कार्यालयाचे पञ क्र.2007/अ/जमा-1/दिनांक 09.02.2007 अन्वये पूर्ण कागदपञासह कबाल इन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. सिडको औरंगाबाद म्हणजे गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे विमा रक्कम देय करण्यासाठी पाठविला आहे. अशा पध्दतीचे लेखी जवाब दिलेला आहे. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपञावरुन खालील प्रमाणे मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदार हे गैरअर्जदार यांना विमा दावा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मागू शकतात काय ? होय. 3. गैरअर्जदार हे अर्जदार यांनी मागितलेली रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदाराची पत्नी मयत संतोषीबाई यांची शेतकरी वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी काढलेली होती या बददल वाद नाही. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हा मूददा स्पष्ट होतो म्हणून सदरील मूददयाचे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ते 4 ः- गैरअर्जदार क्र.4 यांनी मंचासमोर दि.7.11.2009 रोजी लेखी निवेदन दाखल केले होते. दि.14.11.2006 रोजी झालेल्या अपघाताबददल दाखल केलेला क्लेम हा दि.24.2.2007 रोजी मिळाला व तो क्लेम नॅशनल इन्शूरन्स कंपनी मुंबई यांचेकडे दि.25.06.2007 रोजी विमा दावा मंजूरीसाठी पाठविला. सदरचा क्लेम हा नॅशनल इन्शूरन्स कंपनी मुंबई यांनी फेटाळला. कारण सदरील मयत संतोषीबाई या अपघात झाला त्यावेळेस बसमध्ये प्रवास करीत नव्हत्या कारण त्यांचे नांव पोलिस रिपोर्टमध्ये नाही. या कारणास्तव दावा फेटाळला. दि.24.3.2008 रोजी सब डिव्हीजनल मॅजीस्ट्रेट नांदेड यांचेंकडून एक पञ कबाल इन्शूरन्स यांना प्राप्त झाले त्यामध्ये मयत संतोषीबाइ या पोलिस इन्व्हेस्टीगेशन मध्ये ओळखू आलेल्या आहेत व त्या प्रवास करीत होत्या अशा प्रकारची माहीती त्यामध्ये होती. ती माहीती दि.26.4.2008 रोजी पून्हा कबाल इन्शूरन्स यांनी नॅशनल इन्शूरन्स कंपनी मुंबई यांना पूढील हालचाली करण्यास्तव कळविली आहे. (नि.9) मध्ये आहे. यामध्ये कबाल इन्शूरन्स यांची कोणतीही ञूटी नसल्यामूळे त्यांना सदरील केसमधून वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. दि.18.12.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जवाब दाखल झाला. त्यामध्ये दि.09.2.2007 रोजी अर्जदाराच्या मयत पत्नीचा अपघात विमा योजनेचा दावा त्यांनी रितसर पाठविला व तो कबाल इन्शूरन्स कंपनी यांना दि.21.02.2007 रोजी प्राप्त झाला व त्या बददल त्यांची सही देखील आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरचा दावा नियमाप्रमाणे निकाली काढण्यात यावा असे म्हटलेले आहे व शपथपञ ही दाखल केलेले आहे. तसेच त्यांनी नि.क्र.17 वर गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले कागदपञ यांची यादी दिलेली आहे. त्यामध्ये अर्जदार संतोषीबाई यांचा 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, तहसीलदार यांचे कबाल इन्शूरन्स ला दिलेले पञ, मयत संतोषीबाई यांचे ओळखपञ, घटनास्थळ पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, क्लेम फॉर्म, दोषारोपपञ दाखल केलेले आहेत. हे सर्व कागदपञ पाहता मयत संतोषीबाई ही शेतकरी वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी होल्डर होती तसेच तिच्या नांवे शेती होती असे सिध्द होते. गैरअर्जदार क्र.1 व 4 यांनी त्यांचे कर्तव्य व्यवस्थीतरित्या पार पाडलेले आहे व त्यांनी दिलेली पूर्ण माहीती ही अर्जदाराचा क्लेम मंजूर करण्यास पूरेशी आहे. अर्जदार हा अशिक्षीत असल्यामूळे सदरील विमा दावा दाखल करण्यास त्यांस लागलेला थोडासा उशिर हा शासनाच्या परिपञकाप्रमाणे त्यांस विलंब माफी देण्यात येत आहे. गैरअर्जदार क्र.4 यांचे लेखी निवेदन पाहता त्यांनी दि.25.6.2007 रोजी गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना सदरच्या विमा दाव्या बददल माहीती दिलेली होती. यांचा अर्थ दि.25.6.2007 रोजी पासून गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी दावा रक्कम देण्यास टाळाटाळ केली असे स्पष्ट होते. शासनाने अर्जदाराच्या पत्नीचा विमा हप्ता भरलेला असतानाही विमा दाव्याची माहीती मिळाल्यानंतर गैरअर्जदार यांनी कोणतीही हालचाल केली नाही, उलटपक्षी दिनांक न टाकलेले पञ विमा दावा नामंजूर केलेले अर्जदारास पाठवून दिलेले आहे. सर्व गोष्टी पाहता व कागदपञ दाखल करुनही अर्जदाराचा क्लेम मंजूर केला नाही ही सेवेतील ञूटी आहे. या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- ची मागणी केली आहे. शेतकरी वैयक्तीक अपघात विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास अर्जदार नियमाप्रमाणे पाञ आहेत व अर्जदारास गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी दि.25.6.2007 पासून सदरील क्लेमकडे दूर्लक्ष करुन ञुटीयूक्त सेवा दिलेली आहे. अर्जदाराचा दावा मंजूर करण्यासाठी दोन महिने अवधी गृहीत धरला व त्यानंतर दि.1.9.2007 पासून रु.1,00,000/- वर 9 टक्के व्याज मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 1. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.01.09.2007 पासून 9 टक्के प्रमाणे व्याज दयावे. 2. गैरअर्जदार क्र.2 ते 3 यांनी अर्जदारास मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- दयावेत. 3. आदेश क्र. 1 मधील रक्कम एक महिन्यात न दिल्यास संपूर्ण रक्कमेवर (रु.1,00,000/- + 9 टक्के व्याज दि.01.09.2007 पासून) 9 टक्के व्याजासह रक्कम फिटेपर्यत दयावे लागेल. 4. गैरअर्जदार क्र.1 आणि 4 यांचे विरुध्द कूठलाही आदेश नाही. 5. उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील सौ.सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |