जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/153 प्रकरण दाखल तारीख - 31/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 30/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. कलावतीबाई भ्र. केशव चव्हाण वय 56 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार रा.गोर्लेगांव ता.हदगांव, जि.नांदेड विरुध्द. 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, हदगांव ता.हदगांव जि.नांदेड 2. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शूरन्स कंपनी लि. गैरअर्जदार 19, रिलायंन्स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 400 038 3. रिलायंस जनरल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक,शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्यावर हनुमानगड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. 4. कबाल इन्शूरंन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. दीशा अलंकार शॉप नंबर 2, सिडको, टाऊन सेंटर, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.जी.नरवाडे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे - अड.अविनाश कदम गैरअर्जदार क्र. 4 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या) अर्जदाराने ही तक्रार तिला शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या पतीचा विमा काढलेला असतानाही ती रक्कम त्यांच्या मृत्यूनंतर मिळाली नाही म्हणून दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार ही मयत केशव चव्हाण यांची पत्नी आहे. दि.1112.2008 रोजी शेतात गव्हाला पाणी देत असताना त्यांच्या उजव्या पायाला सापाने चावले. त्यामूळे त्यांना सरकारी दवाखाना हदगांव येथे दाखल करण्यात आले पण दि.12.12.2008 रोजी उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्या बददल अर्जदाराने पोलिस स्टेशन हदगांव जि.नांदेड यांचेकडे या अपघाता संदर्भात गून्हा दाखल केला आहे. ज्यांचा नंबर 38/2008 असून 174 सी.आर.पी.सी. खाली सदर गून्हा नोंदविला आहे. अर्जदाराने सदर विम्याच्या प्राप्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या तहसीलदार गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे अर्ज दाखल केला. तहसीलदार हदगांव यांचे कार्यालयामधून गैरअर्जदार क्र.4 कबाल इन्शूरन्स कंपनी यांचेकडे पाठविण्यात आला. सदरचा अर्ज हा गैरअर्जदार क्र.4 यांनी गैरअर्जदार क्र.3 रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी यांचेकडे पाठविला परंतु आजपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा रक्कम दिली नाही म्हणून अर्जदारास सदरचा अर्ज करावा लागला. अर्जदाराने आपल्या अर्जासोबत शपथपञ दाखल केलेले आहे. तसेच क्लेम फॉर्म नंबर 1 व 4, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, तसेच अर्जदार शेतकरी असल्याबददलचा त्यांचे नांवाचा 7/12, गाव नमूना आठ चा उतारा, अधिकार अभिलेखाचा उतारा, गाव नमूना 6 चा उतारा, वारसा प्रमाणपञ, ओळखपञ, यासर्व कागदपञाची पूर्तता केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे हजर झाले नाही व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.4 हे ही हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. ज्यामध्ये दि.11.12.2008 रोजीच्या अपघाताचे सर्व कागदपञ दि.24.02.2009 रोजी त्यांना मिळाले, पण त्यामध्ये काही कागदपञ अपूरे होते जसे की, फेरफार, केमीकल अनॉलेसीस रिपोर्ट मेडीकल ऑफिसरने अटॅस्टेड केलेला नव्हता, हे कागदपञ त्यांनी दि.02.02.2010 रोजी पञ देऊन मागितले, परत रिमांडर दि.24.02.2010 रोजी डिएसएओ नांदेड यांचे मार्फत मागितले व ते कागदपञ मिळाल्याबरोबर तूमचा दावा पूढे पाठविण्यात येईल असे सांगितले असा जवाब दिला आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, अर्जदार व मयत केशव चव्हाण यांचे नात्याबददल सक्सेशन प्रमाणपञ दिलेले नाही. तसेच अर्जदार हे सिध्द करावयाचे आहे की, मयत केशव हा दि.12.12.2008 रोजी साप चावल्याने मृत पावला.तसेच मयत हा मेडीकल टिटमेंट मध्ये निष्काळजीपणा झाल्यामूळे मृत पावला हे त्यांना सिध्द करावयाचे आहे.तसेच एफ.आय.आर., गून्हा नोंदवणे व पंचनामा व जवाब हे त्यांना मान्य नाहीत. तसेच त्यांनी तहसील कार्यालय हदगांव यांना दावा दिल्याचे मान्य नाही. मयत हा शेतकरी असल्याबददलचा कोणताही पूरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. अर्जदार यांना कोणतीही सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदार ही त्यांची ग्राहक नाही. अपघात दि.11.12.2008 रोजी झाला व अर्जदाराने तहसील कार्यालय हदगांव यांना दि.30.01.2009 रोजी कळविले हे मूदत बाहय आहे. त्यामूळे अर्जदाराची तक्रार मूदतीत येत नाही अर्जदार हे प्रत्यक्षरित्या त्यांचे ग्राहक नाहीत. त्यामूळे त्यांना ञूटीची सेवा दिली असे म्हणता येणार नाही. सदरची तक्रार ही ग्राहक मंचात न दाखल करता ती दिवाणी न्यायालयात दाखल करणे आवश्यक होते व अर्जदार ही नूकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही अशा प्रकारचे निवेदन त्यांनी केले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले निवेदन व कागदपञानुसार खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारास नूकसान भरपाई देण्यास बांधील आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदाराच्या पतीचा शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढलेला होता, सदरील विम्याचा कालावधी दि.15.08.2008 ते दि.14.08.2009 असा होता.गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार हे त्यांचे ग्राहक नव्हते असे कूठेही म्हटलेले नाही. अर्जदार ही मयत केशव यांची पत्नी आहे. म्हणून अर्जदार ही प्रत्यक्षरित्या नसली तरी अप्रत्यक्षरित्या ग्राहक आहे म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येत आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी आपल्या अर्जासोबत एफ.आय.आर., ची कॉपी,घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, तसेच अर्जदार शेतकरी असल्याबददलचा त्यांचे नांवाचा 7/12, गाव नमूना आठ चा उतारा, अधिकार अभिलेखाचा उतारा, गाव नमूना 6 चा उतारा, वारसा प्रमाणपञ, ओळखपञ,दाखल केलेले आहे. तसेच मयत केशव हे 7/12 धारक शेतकरी आहे व त्यांची मौजे गोर्लेगांव ता.हदगांव जि. नांदेड येथे गट क्र.10/3 मध्ये क्षेञफळ 00 हेक्टर 38 आर एवढी शेतजमीन आहे.याबददलचा पूरावा अर्जदाराने दाखल केलेला आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे निवेदनाप्रमाणे मयत केशव हे शेतजमीन धारक नव्हते हे म्हणणे चूक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने राज्यातील सर्व 7/12 धारक शेतक-याचा शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत सन 2008 ते 2009 या वर्षाकरिता विमा काढलेला आहे व यासाठीचा कालावधी दि.15.8.2008 ते दि.14.08.2009 असा होता. या योजनेमध्ये मयत केशव हे लाभार्थी होते. त्यांचा मृत्यू दि.12.12.2008 रोजी झालेला असल्यामूळे अर्जदार यांनी तक्रार मूदतीत दाखल केलेली आहे हे स्पष्ट होते. अर्जदाराच्या पतीचा मृत्यूनंतर तिने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे सर्व कागदपञासहीत विमा दावा दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा योजनेतील तरतूदीनुसार गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे अर्जदाराचा विमा दावा पाठवून दिला व गैरअर्जदार क्र.4 यांनी सर्व कागदपञ मिळाले नाही म्हणून दावा गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे पाठविलाच नाही. परंतु अर्जदाराने तक्रार सर्व कागदपञासहीत दाखल केल्यानंतर व मंचाने नोटीस पाठविल्यानंतर गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा विमा दावा मंजूर केला नाही. ही गैरअर्जदार क्र.2 व3 यांचे सेवेतील ञूटीच आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सर्व प्रकारचे हक्क समाविष्ट असल्यामूळे तिचे पती हे साप चावून अपघातात मृत झाले व सदरचा अपघात हा या व्याख्येमध्ये मोडतो म्हणून अर्जदार ही विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पाञ आहे, असे असूनही गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास विमा रक्कम न दिल्यामूळे अर्जदार यांनी वकिलामार्फत दि.07.05.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांना विमा रक्कम देण्या बाबत नोटीस पाठविली. ती गैरअर्जदार क्र.2 यांना प्राप्त झाली तरी देखील आजपर्यत गैरअर्जदार क्र.2 यांनी विम्याची रक्कम अर्जदारास न दिल्यामूळे अर्जदारास शारीरिक व मानसिक ञास झाला व गैरअर्जदाराने सेवेत ञूटी केली हे सिध्द झाले. म्हणून अर्जदारास शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- दि.12.12.2008 पासून 9 टक्के व्याज दराने एक महिन्याचे आंत दयावी, तसेच अर्जदारास मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- गैरअर्जदार क्र.2 यांनी दयावेत या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास रु.1,00,000/- दि.12.12.2008 पासून 9 टक्के व्याजाने एक महिन्याचे आंत दयावेत, असे न केल्यास दि.12.12.2008 पासून 12 टक्के व्याजाने रक्कम फिटेपर्यत दयावेत. 3. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,2,000/-एक महिन्याचे आंत दयावेत. 4. संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |