मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र.117/2011 निकाल तारीख – 12/10/2011 श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला) --------------------------------------------------------------------------------------- श्री दिलावर आब्बास शिकलगार ...... तक्रारदार रा. रोटरी उद्यान शेजारी, कोरेगांव ता. कोरेगांव, जि. सातारा. विरूध्द मा. व्यवस्थापक / विभाग प्रमुख टी.व्ही.सी. स्कायशॉप लिमीटेड, 401, जय कृष्णा कॉम्पलेक्स, यशराज फिल्म स्टुडिओचे विरूध्द, फन रिपब्लिक लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई- 40053 ....... जाबदार नि.1 खालील आदेश 1. विरूध्द पक्षाकडून खरेदी केलेला मोबाईल हॅन्डसेट ना दुरूस्त झाल्यामुळे तथा मोबाईलची रक्कम आपणास परत मिळावी व नुकसान भरपाई मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारदार यांने तक्रारीमध्ये शपथपत्र व मोबाईलचे डिलेव्हरी चलन कम रिसिट दाखल केली आहे मंचाचे रजिस्टर विभागाने तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेवून मंचासमोर दि. 5/10/2011 रोजी अडमशिन हिअरिंगसाठी ठेवली होती परंतु त्यादिवशी मंचासमोर तक्रारदार किंवा त्यांचे वकील हजर झाले नाहीत त्यामुळे पुन्हा मंचाने दि. 10/10/2011 रोजी सुनावणीसाठी प्रकरण ठेवले परंतु त्या दिवशी देखील तक्रादार व त्यांचे वकील मंचासमोर अडमशिन हिअरिंगकामी हजर झाले नाहीत त्यामुळे प्रकरण आज आदेशासाठी ठेवले आहे. 2. आज देखील मंचासमोर तक्रारदार किंवा त्यांचे वकील हजर नाहीत तक्रार प्रकरणाचे अवलोकन करता तक्रादाराने खरेदी केलेला मोबाईल संच नादुरूस्त होवून तो संच दि. 23/4/2011 रोजी विरूध्द पक्षाच्या कंपनीकडे पाठविण्याची बाब तक्रारादाराने त्याचे तक्रारीमध्ये नमूद केली आहे ; परंतु सदरचा संच अद्याप त्याला परत मिळाला नाही असे तक्रारदाराने तक्रारीमध्ये नमूद केले आहे ; परंतु या तक्रारी सोबत तक्रारदाराने डिलेव्हरी पावती व्यतिरिक्त अन्य कोणतीही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. 3 तक्रारदाराने त्याचे तक्रारीत आपण दि.5/4/2011 रोजी कंपलेन्ट दिल्याचे व दि. 24/4/2011 रोजी मोबाईल संच कंपनीकडे पाठविण्याचे व दि. 27/4/2011, 10/5/2011, 3/6/2011, व 9/6/2011 रोजी कंपलेन्ट केल्याचे नमूद केलेले आहे ; परंतु या बाबत देखील कोणतीही कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेली नाहीत त्यामुळे कागदपत्राचे अभावी व तक्रारदार व त्यांचे वकील अनुपस्थितीत असल्यामुळे सदरचे तक्रार प्रकरण दाखल करून घेता येत नाही. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढणेचे दृष्टीकोनातून खालील ओदश पारित करीत आहोत. आदेश 1. तक्रारदाराने त्याच्या तक्रारीसोबत योग्य ती कागदपत्रे जोडली नसल्यामुळे व अडमिशन हिअरिंगकामी तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर असल्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. तक्रादाराने सर्व कागदपत्रांसह नव्याने तक्रार दाखल करण्याची सूचना करण्यात येते. 4. प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 12/10/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |