( आदेश पारित द्वारा श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष)
-निकालपत्र-
(पारित दिनांक 14 जुन 2012)
तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदाराची वृत्तपत्रातील जाहिरात पाहून त्यांनी गैरअर्जदाराकडून मोबाईल विकत घेण्यासाठी आपली मागणी नोंदविली व त्याप्रमाणे गैरअर्जदाराने भ्रमणध्वनी तक्रारकर्ता दिल्ली येथे असल्यामुळे त्याला पाठविला व त्याच्याकडून रुपये 66,90/- रुपये घेतले . ही बाब दि. 19.02.2011 ची आहे.
तक्रारकर्ता वर्धा येथे राहत असून ते वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांनी वर्धेला या मोबाईलचा वापर सुरु केला. तेव्हा त्यास तो नादुरुस्त आहे आणि त्यामध्ये जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या असे दिसून आले. त्यावरुन तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराने त्याच्या जाहिरातीत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरुन संपर्क केला तेव्हा त्यास भ्रमणध्वनी पाठवा तो बदलून देतो किंवा दुरुस्त करुन देऊ, असे कळविले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दि. 18.03.2012 च्या पत्रासोबत नोंदणीकृत पार्सलद्वारा गैरअर्जदाराकडे पाठविला व तो गैरअर्जदाराला प्राप्त झाला.
गैरअर्जदाराला मोबाईल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रारकर्त्याला मोबाईल दुरुस्त करुन परत केला नाही किंवा नविन मोबाईल ही दिला नाही. त्यांनी वारंवार त्याची चौकशी केली असता प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त.क.ने वकिलामार्फत नोटीस दिली. ती गैरअर्जदाराला प्राप्त झाली, त्यावर ही गैरअर्जदाराने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला मंचात तक्रार दाखल करावी लागली.
तक्रारकर्त्याने मागणी केली आहे की, त्याला नविन मोबाईल बदलून मिळावा किंवा रुपये 6690/- एवढी रक्कम 18%व्याजासह परत करण्यात यावी. मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून 5000/- रुपये व या व्यतिरिक्त न्यायालयीन खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
मंचातर्फे गैरअर्जदाराला नोटीस बजाविण्यात आली . नोटीस प्राप्त झाल्यावरही गैरअर्जदार मंचात उपस्थित झाला नाही अथवा त्यानी आपले लेखी जबाब दाखल केले नाही. म्हणून गैरअर्जदारा विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश दि. 16.05.2012 ला दस्ताऐवज 1 वर करण्यात आला.
तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दस्ताऐवजाच्या यादीप्रमाणे दस्ताऐवज दाखल केले. तक्रारकर्त्याच्या संपूर्ण कागदपत्राची तपासणी करण्यात आली. त.क.तर्फे त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्या त्यावेळी गैरअर्जदार गैरहजर होते.
गैरअर्जदार मंचात उपस्थित झाला नाही किंवा तक्रारकर्त्याने केलेले निवेदन अथवा त्याने लावलेले आरोप याचे खंडन केले नाही अथवा खोडून काढलेले नाही. तसेच आपला खुलासा दिला नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही प्रतिज्ञापत्रावर आहे. शिवाय दाखल केलेले दस्ताऐवज यावरुन तक्रारकर्त्याने तक्रारीतील सर्व आरोप सिध्द केलेले आहे. तक्रारकर्त्याचे दि. 18.03.2011 च्या तक्रारी प्रमाणे सदर भ्रमणध्वनीमध्ये एकूण 7 तक्रारी होत्या त्या गैरअर्जदाराने दुरुस्त करुन भ्रमणध्वनी तक्रारकर्त्यास परत करावयास पाहिजे होता परंतु गैरअर्जदाराने भ्रमणध्वनी परत केला नाही. तक्रारकर्त्यास निकृष्ट दर्जाचा भ्रमणध्वनी दिला. तो दुरुस्त करण्यास दिला असता तो परत दिला नाही. याप्रकारे गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून ही त्याच्या सेवेतील त्रृटी आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून मोबाईलची एकूण स्विकारलेली रक्कम रु.6690/- ही दि.19.02.2011 पासून प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.12% व्याजासह परत करावी.