तक्रारकर्ता तर्फे त्यांचे वकील : श्री. पी. झेड. शेख,
विरूध्द पक्ष क्र 1 व 2 : एकतर्फा.
विरूध्द पक्ष क्र 3 : गैरहजर.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्य , -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दिनांक 08/01/2019 रोजी घोषीत)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने Gionee Model No E-7 Mini white Mobile विकत घ्यावयाचे ठरविले आणि विरूध्द पक्ष क्र 3 कडून दि. 13/02/2015 ला रू. 17,500/-,मध्ये विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतेवेळी विरूध्द पक्षाने SYSKA GADGET बाबत माहिती दिली की, ते मोबाईल विम्याची सेवा पुरवितात आणि तक्रारकर्त्याने पॉलीसी क्र. 19103446 प्रमाणे सदर मोबाईलचे विमाबाबत रू.1,299/-,अदा केले. दि. 11/01/2016 ला तक्रारकर्ता स्कुटरवर जात होता त्यावेळी सदरचा मोबाईल त्यांच्या शर्टचे पॅकेटमध्ये होता. अचानक बकरा त्याचे वाहनासमोर आला आणि तक्रारकर्त्यानी गाडीचे ब्रेक लावले आणि त्या क्षणाला तक्रारकर्ता रोडवर पडला. त्याचवेळी तक्रारकर्त्याचा मोबाईल स्कुटरखाली आल्यामूळे कुचलला (Crushed) गेला आणि सदर मोबाईल पूर्णपणे डॅमेज झाला आणि त्यानंतर तक्रारकर्त्याने तात्काळ विरूध्द पक्ष क्र 3 यांना कळविले आणि घडलेल्या घटनाची तक्रार केली आणि घटनेमूळे मोबाईल डॅमेज झाल्याचे कळविले. दि. 11/01/2016 ला तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्मसोबत, फॉर्म, बिल, डॅमेज मोबाईलचे इस्टीमेट कॉस्ट, त्याचे परवाना आणि आधारकार्ड विरूध्द पक्ष क्र 3 यांचेकडे सादर केले. त्यांनतर विरूध्द पक्ष क्र 3 यांनी जॉबशीट Cin No. 1601116844 प्रमाणे तक्रारकर्त्याचे जॉबकार्ड बनविले आणि सांगीतले की, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 लवकरच विमा रकमेची रककम अदा करील. तेव्हापासून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 2 आणि 3 यांचे कार्यालयाला विम्या रकमेकरीता भेटी दिल्या. विरूध्द पक्ष क्र 2 आणि 3 यांनी हमी दिल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने आणखी काही दिवस वाट बघितली की, त्याला मोबाईल हॅण्डसेटची विमा रक्कम मिळेल. तक्रारर्त्यानी विरूध्द पक्ष क्र 1 यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू काही उपयोग झाला नाही.
3. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 चे वेबसाईडवर तक्रारकर्त्याच्या विमा दाव्याची स्थिती (Status) तपासले असता, तक्रारकर्त्याला असे आढळून आले की, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्याचे जॉबकार्ड बंद केले. त्यानंतर तक्रारकर्त्यानी विरूध्द पक्ष क्र 3 यांचेशी संपर्क साधला, त्यांनी तक्रारकर्त्याला सांगीतले की, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी खोटया आधारावर मागणी नाकारली की, विरूध्द पक्ष क्र 1 ला मोबाईलचा IMEI NUMBER पाहिजे आहे की, जो मोबाईलच्या आतमध्ये बॅटरीखाली नमूद असतो. इथे सादर करण्यात येते की, विरूध्द पक्ष क्र 1 बेकायदेशीर आणी Malafidely तक्रारकर्त्याची मागणी हि खोटी व काल्पनिक आधारावर नाकारलेली आहे. सध्या तर मोबाईलचा मागचा भाग आणि मोबाईलमधील बॅटरी काढू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची मागणी नाकारणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि पूर्वाग्रह आहे. विरूध्द पक्षाचे बेकायदेशीर वागणे त्याचे सेवेतील न्यूनता आहे. विरूध्द पक्ष क्र 1 ते 3 चे बेकायदेशीर वागण्यामूळे तक्रारकर्त्याची कायदेशीर आणि खरी मागणी असतांना त्याचे मागणीप्रमाणे रक्कम वेळेमध्ये मिळणे शक्य नाही. विरूध्द पक्षाचे बेकायदेशीर वागण्यामूळे तक्रारकर्त्याचे फार मोठे मानसिक व शारिरिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता विरूध्द पक्षाकडून रू. 5,000/-,डॅमेज घेण्यास पात्र आहे.
4. तक्रारीचे कारण दि. 10/06/2016 घडले. जेव्हा सदर माबोईल हॅण्डसेट डॅमेज झाला आणि विरूध्द पक्षानी मागणी नाकारली होती. तक्रारकर्त्यांनी मा. मंचासमोर खालीलप्रमाणे मागणी केली आहे-
1) विरूध्द पक्षाला आदेश देण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्त्याची मागणी रू. 14,755/-, द.सा.द.शे 24 टक्केप्रमाणे डॅमेज तारखेपासून देय तारखेपर्यंत अदा करावे.
2) विरूध्द पक्षाला आदेश करावे की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल रू. 10,000/-,अदा करावे.
5. या कार्यालयाचे जावक क्र.जावक/जि.ग्रा.म.गों/आस्था/643,644 व 645 दि. 01/09/2016 अन्वये अनुक्रमे विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 3 यांना नोटीस पाठवून दि. 03/10/2016 ला ठिक 11.00 वाजता जिल्हा गोंदिया कार्यालयात हजर राहून, आपले उत्तरादाखल आपले लेखी निवेदन सादर करण्याबाबत कळविण्यात आले. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी नोटीस मिळूनही मंचात हजर न झाल्यामूळे, मा. मंचाने विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दि. 20/02/2017 रोजी पारीत केला. विरूध्द पक्ष क्र 3 दि. 02/08/2018 पासून ग्रा.सं.कायदा 1986 चे कलम 13 (4) (iii) प्रतिज्ञेवर पुरावा दाखल न केल्यामूळे, विरूध्द पक्ष क्र 3 चे विरूध्द प्रकरण विना पुरावा चालविण्याचा आदेश दि. 03/12/2018 रोजी या मंचाने पारीत केला.
6. तोंडीयुक्तीवादाच्या वेळेस तक्रारकर्त्याचे वकील श्री. पी.झेड.शेख यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दि. 20/02/2017 रोजी पारीत केला आहे.
7. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र 3 यांनी लेखीजबाब सादर केला आहे. मंचानी त्यांचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
8. तक्रारकर्त्याने Gionee Model No E-7 Mini white Mobile विकत घ्यावयाचे ठरविले आणि विरूध्द पक्ष क्र 3 कडून दि. 13/02/2015 ला रू. 17,500/-,मध्ये विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतेवेळी विरूध्द पक्षाने SYSKA GADGET बाबत माहिती दिली की, ते मोबाईल विम्याची सेवा पुरवितात आणि तक्रारकर्त्याने पॉलीसी क्र. 19103446 प्रमाणे सदर मोबाईलचे विमाबाबत रू.1,299/-,अदा केले. दि. 11/01/2016 ला तक्रारकर्ता स्कुटरवर जात होता त्यावेळी सदरचा मोबाईल त्यांच्या शर्टचे पॅकेटमध्ये होता. अचानक बकरा त्याचे वाहनासमोर आला आणि तक्रारकर्त्यानी गाडीचे ब्रेक लावले आणि त्या क्षणाला तक्रारकर्ता रोडवर पडला. त्याचवेळी तक्रारकर्त्याचा मोबाईल स्कुटरखाली आल्यामूळे कुचलला (Crushed) गेला आणि सदर मोबाईल पूर्णपणे डॅमेज झाला, त्यानंतर तक्रारकर्त्याने तात्काळ विरूध्द पक्ष क्र 3 यांना कळविले आणि घडलेल्या घटनाची तक्रार केली, घटनेमूळे मोबाईल डॅमेज झाल्याचे कळविले. दि. 11/01/2016 ला तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्मसोबत, फॉर्म, बिल, डॅमेज मोबाईलचे इस्टीमेट कॉस्ट त्याचे परवाना आणि आधारकार्ड विरूध्द पक्ष क्र 3 यांचेकडे सादर केले. त्यांनतर विरूध्द पक्ष क्र 3 यांनी जॉबशीट Cin No. 1601116844 प्रमाणे तक्रारकर्त्याचे जॉबकार्ड बनविले आणि सांगीतले की, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 लवकरच विमा रकमेची रककम अदा करील. तेव्हापासून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 2 आणि 3 यांचे कार्यालयाला विम्या रकमेकरीता भेटी दिल्या. विरूध्द पक्ष क्र 2 आणि 3 यांनी हमी दिल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने आणखी काही दिवस वाट बघितली की, त्याला मोबाईल हॅण्डसेटची विमा रक्कम मिळेल. तक्रारर्त्यानी विरूध्द पक्ष क्र 1 यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू काही उपयोग झाला नाही.
9. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 चे वेबसाईडवर तक्रारकर्त्याचे (Status) स्थिती तपासले असता, तक्रारकर्त्याला असे आढळून आले की, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी तक्रारकर्त्याचे जॉबकार्ड बंद केले. त्यानंतर तक्रारकर्त्यानी विरूध्द पक्ष क्र 3 यांचेशी संपर्क साधला, त्यांनी तक्रारकर्त्याला सांगीतले की, विरूध्द पक्ष क्र 1 यांनी खोटया आधारावर मागणी नाकारली की, विरूध्द पक्ष क्र 1 ला मोबाईलचा IMEI NUMBER पाहिजे आहे की, जो मोबाईलच्या आतमध्ये बॅटरीखाली नमूद असतो. इथे सादर करण्यात येते की, विरूध्द पक्ष क्र 1 बेकायदेशीर आणी Malafidely तक्रारकर्त्याची मागणी खोटे व काल्पनिक आधारावर नाकारलेली आहे. सध्या तर मोबाईलचा मागचा भाग आणि मोबाईलमधील बॅटरी काढू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची मागणी नाकारणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि पूर्वाग्रह आहे. विरूध्द पक्षाचे बेकायदेशीर वागणे त्याचे सेवेतील न्यूनता आहे. विरूध्द पक्ष क्र 1 ते 3 चे बेकायदेशीर वागण्यामूळे तक्रारकर्त्याची कायदेशीर आणि खरी मागणी असतांना त्याचे मागणीप्रमाणे रक्कम वेळेमध्ये मिळणे शक्य नाही. विरूध्द पक्षाचे बेकायदेशीर वागण्यामूळे तक्रारकर्त्याचे फार मोठे मानसिक व शारिरिक नुकसान झाले आहे.
10. या कार्यालयाचे जावक क्र. जावक/जि.ग्रा.म.गों/आस्था/643,644 व 645 दि. 01/09/2016 अन्वये अनुक्रमे विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांना नोटीस पाठवून दि. 03/10/2016 ला ठिक 11.00 वाजता जिल्हा गोंदिया कार्यालयात हजर राहून, आपले उत्तरादाखल आपले लेखी निवेदन सादर करण्याबाबत कळविण्यात आले. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी नोटीस मिळूनही मंचात हजर न झाल्यामूळे मा. मंचाने विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दि. 20/02/2017 रोजी पारीत केला. विरूध्द पक्ष क्र 3 दि.02/08/2018 पासून ग्रा.सं.कायदा 1986 चे कलम 13 (4) (iii) प्रतिज्ञेवर पुरावा दाखल न केल्यामूळे, विरूध्द पक्ष क्र 3 चे विरूध्द प्रकरण विना पुरावा चालविण्याचा आदेश दि. 03/12/2018 रोजी मंचाने पारीत केला.
11. विरूध्द पक्ष क्र 3 यांनी या मंचात सादर केलेल्या त्यांच्या लेखीजबाबात असे कथन केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून प्राप्त क्लेम फॉर्म व इतर दस्ताऐवज विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना सादर केले. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याची मागणी नाकारली हि पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
12. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्मसोबत बिल व इतर आवश्यक दस्ताऐवज विरूध्द पक्ष क्र 3 मार्फत पाठवून तक्रारकर्त्याची मागणी नाकारली. हि विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांच्या सेवेतील न्यूनता असून, मंच विरूध्द पक्ष क्र 1,2 व 3 यांचेविरूध्द सेवेतील न्यूनतेबद्दल खालीलप्रमाणे आदेश करीत आहे.
सबब, प्रकरणातील वस्तुस्थिती व पुराव्याचा विचार करता, हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहोत.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याची मागणी रू. 14,755/-,द.सा.द.शे 9 टक्के प्रमाणे डॅमेज तारखेपासून म्हणजे दि. 11/01/2016 पासून देय तारखेपर्यत अदा करावी.
3. विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक, मानसिक त्रासाबद्दल रू. 3,000/-, तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रू. 2,000/-,अदा करावे.
4. विरूध्द पक्ष क्र 1, 2 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावी. तसे न केल्यास, त्या रकमेवर द.सा.द.शे 12 टक्के प्रमाणे व्याज अदा करेपर्यंत लागु राहील.
5. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
6. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.