Maharashtra

Nagpur

CC/132/2020

SHRI ABDUL ALIM PATEL PROP. NEW PATEL AUTOMOBILES - Complainant(s)

Versus

SWASTIK ASSOCIATES THROUGH PROP. - Opp.Party(s)

ADV SHITAL ZHADE

21 Mar 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/132/2020
( Date of Filing : 24 Feb 2020 )
 
1. SHRI ABDUL ALIM PATEL PROP. NEW PATEL AUTOMOBILES
ITWARI PETH, UMRED DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SWASTIK ASSOCIATES THROUGH PROP.
2ND FLOOR SHYAM BHAVAN, MAKAN NO 336 WARD NO 35, DAGA HOSPITAL ROAD, GANDHIBAG NAGPUR 440002 CURRENT ADD. SHOP NO 3 & 4, SAI VAIBHAV PLAZA, NEAR POLICE CHOWKI, JALALPURA, CHITNIS PARK, NAGPUR 440032
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV SHITAL ZHADE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 21 Mar 2023
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1. तक्रारदाराच्या मालकीचे न्यु पटेल आटोमोबाईल्स या नावाने चिल्लर पार्टस् विक्रीचे  दुकान असुन  तक्रारकर्ता त्याचे कुटुंबाचे उपजिविकेकरिता हा व्यवसाय करतो. वि.प. चे स्वस्ति‍क असोशिएट या नावाने दुकानदारांना सॉफ्टवेअर तयार करुन विक्री करतात व ते सॉफ्टवेअर ग्राहकांचे लॅपटॉप व संगणकामध्ये स्थापीत करुन देणे व त्याचे प्रशिक्षण देण्‍याचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय सुलभ करण्‍यासाठी वि.प. कडुन सॉफ्टवेअर खरेदी करण्‍याचे ठरविले. तकारदाराने वि.प. यांचेकडुन सॉफ्टवेअर खरेदी करुन स्थापीत करण्‍याकरिता दिनांक 18.3.2019 रोजी नोंदणी केली. त्यानुसार ऑर्डर नंबर -484 व्दारे MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER एकुण रुपये 14,868/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचे ठरविले व वार्षिक खर्च रुपये 4200/- देण्‍याचे ठरले होते. त्यासोबत 3 जीबी पेनड्राईव्ह 3 वर्षाची टोटल सिक्युरीटी देण्‍याचे ठरले.
  2. वि.प.ने तकारदारास करारानुसार सॉफ्टवेअर 30 दिवसाचे आत देण्‍याचे ठरले होते परंतु आजपर्यत वि.प.ने तक्रारदाराचे दुकानात सॉफ्टवेअर स्थापीत करुन दिले नाही. तक्रारदाराने वि.प.चे स्वस्तीक असोशिएटचे, आय.सी.आय.सी बॅंकेचे- खाते क्रंमांक- १४६३०५०००९५७ मध्‍ये दिनांक 20.4.2019 ला रुपये 6,850/- जमा केले. त्यानंतर तक्रारदाराने वि.प. चे ऑॅफीसला तसेच वि.प.ला दूरध्‍वनीव्दारे अनेकदा विनंती केली परंतु वि.प.ने सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्‍याकरिता टाळाटाळ करीत आहे व आजपर्यत सॉफ्टवेअर स्थापीत करुन दिले नाही.  त्यामूळे तक्रारदाराच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान झाले म्हणुन तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 27.12.2019 ला कायदेशीर नोटीस दिली. परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेऊनही बनावट उत्तर पाठविले म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन वि.प. ने तक्रारदाराला सॉफ्टवेअर खरेदीपोटी अदा केलेली रक्कम रुपये 6,850/-, 18 व्याजासह परत करावी अशी मागणी केली आहे.
  3. तक्रार दाखल करुन वि.प. यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आली. नोटीस मिळुनही वि.प. मंचासमक्ष हजर  झाले व आपले लेखी उत्तर अभिलेखावर दाखल केले.
  4. वि.प. आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारदाराने वि.प. ची सेवा व्यापारी कारणास्तव घेतली असल्याने तक्रारकता ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे  व्याख्‍येनुसार ग्राहक नाही. त्यामूळे सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी. तक्रारदाराने दिनांक 18.3.2019 ला वि.प.कडुन MARG-ERP-9 SOFTWARE CATEGARY SILVER पॅकेज त्यामध्‍ये 6 जीबी पेनड्राईव्ह आणि 3 वर्षे टोटल सिक्युरिटी, असे एकुण रुपये 14,868/- एवढया कींमतीत विकत घेण्‍याचे ठरवले व सदर SOFTWARE चा वार्षिक देखभाल खर्च रुपये 4,200/- मध्‍ये देण्‍याचे ठरले. तक्रारकर्ता व वि.प. तोंडी करारानुसार तक्रारदाराने वि.प. चे नावाचे दोन धनादेश  MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER नोंदणी पोटी दिनांक 18.3.2019 ला दिले. तक्रारदाराचे दुकानात MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER इन्स्टॉल करण्‍यापूर्वी तक्रारदाराने वि.प.चे नावे दिलेले दोन धनादेश जमा करणे  अत्यावश्‍यक व जरुरी होते व ही बाब तक्रारदाराला माहिती होती. तक्रारदाराने वि.प.चे नावे दिलेले धनादेश बॅंकेत दोनदा जमा केले असता सदर धनादेश अनादरित झाले. वि.प.ने तक्रारदाराला संपूर्ण रक्कम अदा करण्‍याबाबत विनंती केली. परंतु तक्रारदाराने त्यापैकी रुपये 6,850/- नगदी वि.प.चे खात्यात जमा केले, परंतु पूर्ण रक्कम जमा केली नाही. त्यानंतर वि.प.ने त्यांचे नावे दिलेला दुसरा धनादेश क्रं.308810 रुपये 8,000/- खात्यात जमा केला. सदर धनादेश अपु-या रक्कमेस्तव अनादरीत झाला. उभयपक्षातील तोंडी करारानुसार तक्रारकर्ता उर्वरति रक्कम रुपये 8,000/- वि.प.चे खात्यात जमा करण्‍यास अपयशी ठरला.
  5. वि.प.ने तक्रारदाराचे दुकानात MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER ट्रायल बेसवर टाकुन दिले. सदर  MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER 7 दिवसाकरिता उपलब्ध करुन दिले. तसेच 6 जीबी पेनड्राईव्ह तक्रारदाराला देण्‍यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.चे नावे दोन धनादेश दिले ते अपु-या निधी अभावी अनादरीत झाले. त्यानंतर वि.प. ने तक्रारदाराला अनेकादा रक्कमेची मागणी केली असता तक्रारदाराने त्यापैकी रुपये 6,850/- वि.प. चे खात्यात मे -2019 ला जमा केले. परंतु MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER खरेदीपोटी संपूर्ण रक्कम अदा केल्याशिवाय SOFTWARE चालू होणे शक्य नव्हते. तक्रारदाराने वि.प.ला संपूर्ण रक्कम अदा न करुन कराराचे उल्लघन केले आहे. त्यामूळे तक्रारकर्ता MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER चालू करुन घेण्‍यास पात्र नाही. तक्रारदाराला आधीच सूचित केल्यानूसार रक्कम परत मिळणार नाही हे माहिती होते. तक्रारकर्ता उर्वरित रक्रकम रुपये 8,000/- व कायदेशिर खर्च वि.प.देण्‍यास तयार असल्यास वि.प. स्थापीत केलेले SOFTWARE चालू करुन देण्‍यास व वार्षिक सेवा देण्यास  तयार आहे. वि.प.ने तक्रारदाराला पाठविलेल्या नोटीस मध्‍ये SOFTWARE सुरु करुन देण्‍यास तयार असल्याचे सुचविले होते. त्यामूळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात येते अशी विनंती केली आहे.
  6.  तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तवेजांचे व  वि.प.ने दाखल केल्या लेखी उत्तर यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                 उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                     होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                              होय

  1. काय आदेश                                                       अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1.  तक्रारकर्ता व वि.प. यांचेमध्‍ये दिनांक 18.3.2019 रोजी वि.प.ने तक्रारदाराचे दुकानातील संगणकामध्‍ये MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER एकुण रुपये 14,868/- एवढया किंमतीत मध्‍ये स्थापीत करुन देण्‍याबाबतचा करार करण्‍यात आल्या असल्याचे व वार्षिक देखभालीपोटी रुपये 4200/- करण्‍याचे व सोबत 3 जीबी पेन ड्राईव्ह व 3 वर्षाची टोटल सिक्युरिटी देण्‍याचे ठरले असल्याचे नि.क्रं.2(3) वर दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते व ते उभयपक्षकारांना मान्य आहे यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 29.4.2019 ला रुपये 6,850/- अदा केल्याचे नि.क्रं.2(4) दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते. तक्रारदाराने वि.प. ला संगणकामध्‍ये सॉफ्टवेअर स्थापीत करण्‍याकरिता धनादेशाव्रदारे रुपये 6,868, व रुपये 8000/- दिले असता सदर धनादेश अपूरी रक्कम असल्याचे कारणास्तव अनादरित झाले हे सिध्‍द करण्‍यात वि.प. अपयशी ठरला आहे. वि.प.ने तक्रारदाराकडुन रुपये 6,850/’ स्वकारुनही तक्रारदाराचे दुकानात MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER स्थापीत करण्‍यास अपयशी ठरल्यामूळे तक्रारकर्ता वि.प. कडुनु 6,,850/- मिळण्‍यास पात्र् आहे त्यामूळे वि.प.ने कराराचे उल्लघन करुन तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे सिध्‍द होते. सबब

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. ने तक्रारदाराकडुन MARG-ERP -9 SOFTWARE CATEGARY SILVER सॉफ्टवेअर स्थापीतकरण्‍यापोटी स्व‍िकारलेली रक्कम रुपये 6,850/-, तक्रार दाखल दिनांक 13.3.2020 पासुन 09 टक्के व्याजासह येणारी रक्कम तक्रारदारास परत करावी.
  3. वि.प ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,000/-अदा करावे.
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  5. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.