Maharashtra

Chandrapur

CC/21/180

Abhishek Sudarshan Choudhari - Complainant(s)

Versus

Swapnshiree Devlopers and Builders Through its one of the Partner Smt.Nilima Ramesh Sonak - Opp.Party(s)

Adv.A.U.Kullarwar

12 Oct 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/180
( Date of Filing : 12 Oct 2021 )
 
1. Abhishek Sudarshan Choudhari
R/o.Dwara Hemant Dattatraya Patrange,Kasturba Road,Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. Swapnil Sudharshan Choudhari
R/o.Dwara Hemant Dattatraya Patrange,Kasturba Road,Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Swapnshiree Devlopers and Builders Through its one of the Partner Smt.Nilima Ramesh Sonak
R/o.Plot no-610,Lad House, Behind Saabarwal Travals ,Mohadiya Chowk,Choti Dhantoli nagpur- 440012
Nagpur
Maharashtra
2. Smt.Nilima Ramesh Sonak
Swapnashree Devlopers and Builders, Behind Bokade Kirana Store,Vakilpeth,nagpur,Nagpur- 440009
Nagpur
Maharashtra
3. Seema Sunil Lakhankar
R/o . Plot no-103,4-B,Arkhed,Shrinath Sai Nagar,Manewada,Ring Road,Nagpur- 440027
Nagpur
Maharashtra
4. Sunil Krushnarao Lakhankar
R/o . Plot no-103,4-B,Arkhed,Shrinath Sai Nagar,Manewada,Ring Road,Nagpur- 440027
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 12 Oct 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, श्री अतुल डी. आळशी, मा. अध्‍यक्ष,)

                      (पारीत दिनांक १२/१०/२०२२)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्ते यांनी  ग्राहक संरक्षण कायदा, कलम ३५ सह कलम ३८ अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. तक्रारकर्ते हे चंद्रपूर येथील रहिवासी असून स्‍वतःकरिता व कुटुंबाकरिता नागपूर येथे रहिवासी घर बांधावयाचे असल्‍यामुळे नागपूर परिसरात भुखंडाच्‍या शोधात असतांना तक्रारकर्ते यांचा  संपर्क श्री रमेश कांबळे या व्‍यक्‍तीसोबत झाला. श्री रमेश कांबळे हे विरुध्‍द पक्षांकरिता अभिकर्ता म्‍हणून काम करीत होते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही भागीदारी प्रतिष्‍ठान असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ या प्रतिष्‍ठानाचे भागीदार आहेत. श्री रमेश कांबळे यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे खास मौजा देवळी (गुजर) पटवारी हलका क्रमांक ७५, नागपूर ग्रामिण, तह व जिल्‍हा नागपूर येथील खसरा (फिल्‍ड) क्रमांक १०३ येथे  लेआऊट विकसीत होत आहे व जवळपासचा सर्व परिसर परावर्तीत झाला असून लवकरच विकास कामे सुरु होणार आहे तसेच या परिसरात जमिनीला चांगला भाव मिळणार असल्‍याचे तक्रारकर्ते यांना प्रस्‍तावित नकाशा दाखवून सांगितले. तक्रारकर्ते यांनी प्रस्‍तावित लेआऊट मधील भुखं‍ड क्रमांक ७, आराजी १५७४.२३ चौरस फुट असा खुला भुखंड खरेदी करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षांसोबत बोलणी केली व विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ते यांना उपरोक्‍त भुखंड क्रमांक ७ रुपये २८०/- प्रति चौरस फुट दराने एकूण मोबदला रुपये ४,४०,७८४/- मध्‍ये  विकण्‍याचा कबुल केले. त्‍यापैकी वेळोवेळी  रक्‍कम रुपये १,८४,४६०/- दिले आहे व उर्वरित रक्‍कम रुपये २,५६,३२४/- १८ महिण्‍यांत दरमहा रुपये १४,२४०/- प्रमाणे द्यायचे होते व विरुध्‍द पक्षांनी सदर भुखंड एन.ए.टी.पी. करुन तसेच आवश्‍यक सरकारी कार्यालयांची परवानगी घेतल्‍यानंतर त्‍याचप्रमाणे ले आऊटमधील डांबरी रस्‍ते, नाल्‍या, विद्युतीकरण व बगिचा विकसीत करुन तक्रारकर्ते यांना  विक्रीपञ करुन देण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्षांनी स्‍वीकारली व त्‍याप्रमाणे दिनांक १९/१०/२०१६ रोजी भुखंड विक्रीचा करारनामा करुन दिला. तक्रारकर्ते यांनी कबुल केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षांना वेळोवेळी दरमहा रक्‍कम रुपये १४,२४०/-  प्रमाणे मोबदल्‍याचे भागापोटी रक्‍कम दिली व विरुध्‍द पक्षांनी त्‍याबाबत पावत्‍या लिहून दिलेल्‍या आहेत. सदर पावत्‍या निशानी क्रमांक ४ वरील अनुक्रमे दस्‍त क्रमांक अ-३ ते अ-२६ वर दाखल आहे. विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ते यांना सर्व रक्‍कम मिळाल्‍यावर परिशिष्‍ट- अ वरील खाते उतारा दिला. सदर खाते उतारा दस्‍त क्रमांक अ-२७  वर दाखल आहे. अश्‍या प्रकारे तक्रारकर्ते यांनी दिनांक ०८/०१/२०१८ पर्यंत विरुध्‍द पक्षांकडे करार केलेल्‍या भुखंडाची संपूर्ण मोबदला रक्‍कम रुपये ४,४१,३८४/- चा पूर्णपणे भरणा केला आहे.  परंतु तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्षांकडे भुखंडाच्‍या संपूर्ण मोबदला रक्‍कम भरणा करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षांनी सदर प्रस्‍तावित लेआऊट एन.ए.टी.पी. करुन घेतला नाही किंवा करारात कबुल केल्‍याप्रमाणे मौक्‍यावर डांबरी रस्‍ते, विद्युतीकरण, नाल्‍या, बगिचा इत्‍यादी विकासाची कामे केलेले नाही. तसेच तक्रारकर्ते यांना  भुखंडाचा ताबा दिला नाही किंवा भुखंड विकसीत करुन तक्रारकर्ते यांचे  नावे विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्ते यांनी  वारंवार विरुध्‍द पक्षांकडे कधी व्‍यक्‍तीशः भेटून तर कधी फोनव्‍दारे पाठपुरावा केला परंतु काहीना काही कारणे सांगुन विक्रीपञ करुन देण्‍यास टाळाटाळ केली. शेवटी तक्रारकर्ते यांनी  वाट पाहुन दिनांक १०/०८/२०२१ रोजी विरुध्‍द पक्षांना लेखी विनंती करुन भुखंडाचे विक्रीपञ करुन देण्‍याची मागणी केली. सदर विनंती अर्जप्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्षांनी त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही, ही विरुध्‍द पक्षांनी अवलंबलेली अनुचित व्‍यापार पध्‍दती असून तक्रारकर्ते यांना दिलेली न्‍युनतापूर्ण सेवा आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ते यांनी आयोगासमक्ष विरुध्‍द पक्षांचे  विरुध्‍द तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये पुढीलप्रमाणे मागणी केली आहे.

 

१. विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याला दिलेली सेवा न्‍युनतापूर्ण व अनुचित व्‍यापार पध्‍दती ठरविण्‍यात यावी.

२. विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ते यांना कबूल केल्‍याप्रमाणे भुखंड ताब्‍यात देऊन त्‍याचे पंजिबध्‍द विक्रीपञ तक्रारकर्ते यांचे लाभात करुन द्यावे.तक्रारकर्ते यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये ५०,०००/- नुकसान भरपाई आणि तक्रारकर्ते भुखंडाच्‍या रकमेचे उपभोगापासून वंचित राहिल्‍यामुळे व दरम्‍यान झालेली भाववाढ याचे नुकसान भरपाई दाखल रुपये ४,४१,३८४/- आणि विरुध्‍द पक्षांना दिलेली मोबदला रक्‍कम रुपये ४,४१,३८४/- व त्‍यावर दिनांक २९/०२/२०१६ पासून द.सा.द.शे. १२ टक्‍के दराने व्‍याज अशी होणारी एकञित रक्‍कम देण्‍याचा आदेश तक्रारकर्ते यांचे लाभात विरुध्‍द पक्षांविरुध्‍द वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे पारित करण्‍यात यावा.

३. विरुध्‍द पक्षांना भुखंडाची विक्री करणे तांञिकदृष्‍टया अथवा कायदेशीर दृष्‍टया अशक्‍य झाल्‍यास तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्षास दिलेली रक्‍कम रुपये ४,४१,३८४/- दिनांक २९/०२/२०१६ पासून द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने व्‍याजासह व रुपये ४,००,०००/- नुकसान भरपाई अशी एकूण रक्‍कम रुपये पर्यायी स्‍वरुपी तक्रारकर्ते यांना देण्‍याचा आदेश तक्रारकर्ते यांचे  लाभात विरुध्‍द पक्षांविरुध्‍द वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे पारित करण्‍यात यावा.

४. तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/-  अदा करण्‍याचे आदेशीत व्‍हावे.

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा  आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही. करिता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक २७/०४/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ तसेच मुळ तक्रार, दस्‍तावेज आणि शपथपञ यालाच त्‍यांचे लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावे अशी पुर्सिस दाखल. यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

   अ.क्र.                 मुद्दे                           निष्‍कर्षे

    १.  तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्षांचे ग्राहक आहे कायॽ          होय

    २.  विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यांप्रति न्‍युनतापूर्ण सेवा दिली     होय

        आहे कायॽ

      ३.  आदेश कायॽ                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते  ४ यांचेकडून खास मौजा देवळी(गुजर) पटवारी हलका क्रमांक ७५, नागपूर ग्रामीण,  तह व जिल्‍हा नागपूर येथील खसरा (फिल्‍ड) क्रमांक १०३ मधील भुखं‍ड क्रमांक ७, आराजी १५७४.२३ चौरस फुट रुपये ४,४०,७८४/- इतक्‍या रकमेत खरेदी करण्‍याचा करार दिनांक १९/१०/२०१६ रोजी केला. तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्षाला भुखंड खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम रुपये ४,४०,७८४/- अदा करण्‍याबाबत दस्‍तावेज प्रकरणात निशानी क्रमांक ४ वरील दस्‍त क्रमांक अ-१ ते अ-२६ वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्षांचे ग्राहक आहे, हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांचेकडून खास मौजा देवळी(गुजर) पटवारी हलका क्रमांक ७५, नागपूर ग्रामिण, तह व जिल्‍हा चंद्रपूर येथील खसरा (फिल्‍ड) क्रमांक १०३ मधील भुखं‍ड क्रमांक ७, आराजी १५७४.२३ चौरस फुट रुपये ४,४०,७८४/- इतक्‍या रकमेत खरेदी करण्‍याचा करार दिनांक १९/१०/२०१६ रोजी केला. तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्षाला भुखंड खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम रुपये ४,४०,७८४/- अदा केले. परंतु तक्रारकर्ते यांनी  विरुध्‍द पक्षांकडे भुखंडाच्‍या  संपूर्ण मोबदला रक्‍कम भरणा करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षांनी सदर प्रस्‍तावित लेआऊट एन.ए.टी.पी. करुन घेतला नाही किंवा करारात कबुल केल्‍याप्रमाणे मौक्‍यावर डांबरी रस्‍ते, विद्युतीकरण, नाल्‍या, बगिचा इत्‍यादी विकासाची कामे केलेले नाही. तसेच तक्रारकर्ते यांना भुखंडाचा ताबा दिला नाही किंवा भुखंड विकसीत करुन तक्रारकर्ते यांचे नावे पंजीबध्‍द विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्ते यांचा हा आक्षेप विरुध्‍द पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्‍या समर्थनार्थ कोणतेही म्‍हणणे प्रकरणात दाखल केले नाही. अशा परिस्थितीत भुखंडाच्‍या विक्रीपोटी अदा केलेली रक्‍कम परत न करुन तक्रारकर्त्‍यांप्रति विरुध्‍द पक्षांनी न्‍युनतापूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होत असल्‍याचे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ३ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेंचणावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.   

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार क्र. १८०/२०२१ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांनी  मौजा देवळी (गुजर) पटवारी हलका क्रमांक ७५, नागपूर ग्रामिण, तहसील व जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक १०३ मधील भुखंड क्रमांक ७, आराजी १५७४.२३ चौरस फुट चे पंजीबध्‍द विक्रीपञ तक्रारकर्त्‍यांच्‍या नावे करुन द्यावे  अथवा विक्रीपञ करण्‍यास अडचण निर्माण झाल्‍यास मोबदला रक्‍कम रुपये ४,४०,७८४/-, १५ टक्‍के व्‍याजासह तक्रार दाखल झाल्‍याचे तारखेपासून म्‍हणजे दिनांक २०/१०/२०२१ पासून संपूर्ण रक्‍कम हाती पडेपर्यंत द्यावे. तसेच नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रुपये २५,०००/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रुपये १०,०००/- तसेच भुखंडाचे वाढीव किंमत (Escalation Price) पोटी रक्‍कम रुपये १,००,०००/- तक्रारकर्ते यांना  अदा करावे.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावेत.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.