Maharashtra

Nagpur

CC/419/2020

SACHIN YOGESHWAR BHAVSAR - Complainant(s)

Versus

SWAPNIL PACKERS AND MOVERS, THROUGH SUNIL BAHIRWAL - Opp.Party(s)

25 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/419/2020
( Date of Filing : 20 Oct 2020 )
 
1. SACHIN YOGESHWAR BHAVSAR
R/O. B-105, RACHANA VATIKA APARTMENT, BALPANDE LAYOUT, SANTAJI SOCIETY, NARENDRA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SWAPNIL PACKERS AND MOVERS, THROUGH SUNIL BAHIRWAL
R/O. PLOT NO.92, SECTOR 23, TRANSPORT NAGAR, NIGDI, PUNE-411044
PUNE
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 25 Nov 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजणे यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  विरुध्‍द पक्षाचा भारतात कुठेही एका स्‍थानावरुन दुस-या ठिकाणी सामान पॅक करुन पोहचविण्‍याचा व्‍यवसाय असून त्‍याचे  पुणे येथे कार्यालय आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे सामान सुरक्षितपणे वाहून नेण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे घरगुती सामान पुणे येथून नागपूरला स्‍थानांतरित करण्‍याकरिता दि. 29.08.2020 ला रुपये 24,450/- इतकी रक्‍कम अदा केली व त्‍यामध्‍ये 2  LED TVs, Wooden cupboard with mirror, almirah, plastic chair, mattress इत्‍यादीचा समावेश होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे घरगुती सामान पुणे येथून नागपूर येथे पोहचविल्‍यानंतर  तक्रारकर्त्‍याच्‍या निर्देशनास आले की, बरेच सामान वाहून आणतांना क्षतिग्रस्‍त (डॅमेज) झालेले आहे. यात तक्रारकर्त्‍याचा  Toshiba LED TV  बाहेरुन क्षतिग्रस्‍त झाला असून त्‍याची किंमत रुपये 11,500/-, दुसरा Samsung LED TV काम करीत नसून स्‍पीकर डॅमेज झालेले आहे त्‍याची किंमत रुपये 4500/-, Iron Almirah आतून एका बाजूने बेन्‍ड झालेली आहे, लाकडी आलमारीचे दोन्‍ही आरसे रुपये 1850/- व Queen size double mattress किंमत रुपये 16000/- हे देखील पूर्णतः क्षतिग्रस्‍त झाले. एक प्‍लास्‍टीक खुर्ची रुपये 650/- व इतर सामान असे एकूण रुपये 59,500/- या  व्‍यतिरिक्‍त वाहतूक भाडे रुपये 24,450/- असे एकूण 73,950/- इतक्‍या रक्‍कमेचे नुकसान झालेले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या घरगुती सामानासह heavy elevators equipments (हेव्‍ही एलवैटर  इक्‍वीपमेंट)  वाहून नेल्‍यामुळे सामानाचे नुकसान झालेले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 01.09.2020 ला ई- मेल द्वारा व दूरध्‍वनीवरुन त्‍याचे घरगुती सामान क्षतिग्रस्‍त झाल्‍याबाबतची तक्रार केली होती,  परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 73,950/- दि. 29.08.2020 पासून संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  2.      विरुध्‍द पक्ष यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि.23.02.2021 रोजी आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ               होय

2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ          होय

3.  काय आदेश ॽ                                      अंतिम आदेशाप्रमाणे  

 

                                                           कारणमिमांसा   

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला त्‍याचे घरगुती सामान पुणे येथून नागपूर येथे पोहचविण्‍याकरिता रुपये 24,450/- इतकी रक्‍कम अदा केली होती हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे घरगुती सामान आणतांना त.क.चे LED TV  नग 2 , स्‍टील अलमारी, लाकडी अलमारी आरसे , मॅटरेस, खुर्ची व इतर सामान क्षतिग्रस्‍त झालेले आहे हे नि.क्रं. 2 (4) वर दाखल छायाचित्रावरुन दिसून येते. तसेच याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे तक्रार केली होती हे नि.क्रं. 2 वर  दाखल ई-मेल वरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतलेली दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याने क्षतिग्रस्‍त सामानाची खरेदी बिलाच्‍या प्रती अभिलेखावर दाखल न केल्‍यामुळे तक्रारकर्ता  क्षतिग्रस्‍त सामानाच्‍या नुकसान भरपाई पोटी त्‍याने मागणी केलेल्‍या रक्‍कमेच्‍या 50 टक्‍के रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. याकरिता आयोगाने Carriage by road act 2007- याचा आधार घेतलेला आहे. त्‍यातील  Section 17 मध्‍ये नमूद केले आहे की, General responsibility of common carrier – Save as otherwise provided in this Act, a common carrier shall be responsible for the loss, destruction, damage or deterioration in transit or non-delivery of any consignment entrusted to him for carriage, arising from any cause except the following namely:-
  1. Act of God ;
  2. Act of war or public enemy ;
  3. Riots and civil commotion;
  4. Arrest, restraint or seizure under legal process;
  5. Order or restriction or prohibition imposed by the Central Government or a State Government or by an officer or authority subordinate to the Central Government or a State Government authorised by it in this behalf:

Provided that the common carrier shall not be relieved of its responsibility for the loss, destruction, damage, deterioration or non-delivery of the consignment if the common carrier could have avoided such loss, destruction, damage or deterioration or non-delivery had the common carrier exercised due diligence and care in the carriage of the consignment,

This section seeks to list out the force majeure conditions under which the common carrier would be exonerated from liabilities. These conditions include act of God, act of war or public enemy, fire, explosion, riots or civil commotion and orders of restriction or prohibition by Government.

विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे घरगुती सामान सुरक्षित वाहून नेण्‍याची हमी दिलेली असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने पुणे येथून नागपूर येथे सामान आणतांना त.क.चे बरेच सामान क्षतिग्रस्‍त झालेले आहे आणि ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

 

 करिता खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.     

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या क्षतिग्रस्‍त सामानाची 50 टक्‍के रक्‍कम म्‍हणजेच रुपये 29750/- तक्रारकर्त्‍याला द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.