Maharashtra

Nagpur

EA/242/2016

Shri Anand Vijay Keshattiwar - Complainant(s)

Versus

Swapnil Developer and Builders, through Promoter, Shri. Vilas Ganesh Asarkar - Opp.Party(s)

Adv. Anand Joshi

20 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/242/2016
( Date of Filing : 13 Oct 2016 )
In
Complaint Case No. CC/08/105
 
1. Shri Anand Vijay Keshattiwar
R/o.Nursingh Apartment, Killa road, Mahal, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Smt. Shobha Vijay Keshattiwar
R/o. Nursing Apartment, killa Road, Mahal, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Sau. Anjaly Sunil Tammewar
R/o. Uttarwar Layout, Pandharkawada, Dist. Yawatmal
YAVATMAL
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Swapnil Developer and Builders, through Promoter, Shri. Vilas Ganesh Asarkar
R/o.Sudam Niwas, Sudam Road, Itwari, Nagpur.
Nagpur
Maharashtra
2. Smt. Vijayabai Kamlakar Joshi
R/o. Nursing Apartment Kill Road, Mahal Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Smt. Indirabai Narayan Joshi
R/o. Nursing Apartment, Killa Road, Mahal, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Shri Uday Kamlakar Joshi
R/o. Nuring Apartment, Killa Road, Mahal, Nagpur
Nagpur
Maharashtra
5. Mrs. Chitra Kishor Addulwar
R/o. Near R.S.S.Building, Mahal, Nagpur
Nagpur
Maharashtra
6. Smt. Rekha Kumarrao Kharpate (died) (a) Kanchan Nitin Pande
R/o.Near Gajanan Dham, Sahakar Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
7. (b) Maithili Manish Dive
R/o. Near Gajanan Dham, Sahakar Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
8. (c) Kumarrao Bhalchandra Kharpate
R/o. Near Gajanan Dham, Sahakar Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
9. Mrs. Seema Sanjayrao Verulkar
R/o. Near Gayatri Plaza, Zenda Chowk, Mahal, Nagpur
Nagpur
Maharashtra
10. Sau. Prabha Vilasrao Dhankar
R/o. Near Vitthal Rukhamini Mandir, Grain Market, Tiroda, Dist. Bhandara
BHANDARA
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:Adv. Anand Joshi, Advocate
For the Respondent: ADV. S.M. GHARE, Advocate
 ADV. SHRI. MILIND P. SAGDEO & MRS. D.M. SAGDEO, Advocate
 ADV. S.M. GHARE, Advocate
 ADV. SHRI. MILIND P. SAGDEO & MRS. D.M. SAGDEO, Advocate
 ADV. S.M. GHARE, Advocate
 ADV. S.M. GHARE, Advocate
 ADV. S.M. GHARE, Advocate
 ADV. S.M. GHARE, Advocate
 ADV. S.M. GHARE, Advocate
Dated : 20 Jan 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये -

 

  1.       प्रस्‍तुत दरखास्‍त गैरअर्जदार यांचे विरुध्‍द त्‍याने मंचाच्‍या आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986  चे कलम 25 अंतर्गत दाखल करण्‍यात आली आहे.
  2.      अर्जदाराने गैरअर्जदार विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रमांक 105/2008 मंचात दाखल केली होती. त्‍या तक्रारीमध्‍ये मंचाने दिनांक 13.08.2008 ला आदेश पारित करुन अर्जदार विजय दामोदर केशट्टीवार यांच्‍या नांवे करारातील नमूद सुतिकागृह चौक, किल्‍ला गल्‍ली, महाल, नागपूर येथील घर क्रमांक 49 व 50, सिटी सर्व्‍हे न. 193/274, शीट नं. 68 (222) या वर्णनाच्‍या जमिनीवर बांधकाम केलेले न‍रसिंहा अपार्टमेंट मधील सदनिका क्रं. बी-4, एकूण क्षेत्रफळ 685.84 चौ.फु. या मालमत्‍तेचे विक्रीपत्र गैरअर्जदार क्रं. 1 यांनी नोंदवून द्यावयाचे होते व हे विक्रीपत्र नोंदवून देण्‍याकरिता गैरअर्जदार क्रं. 2 ते 8 यांना संमती देऊन ना हरकत प्रमाणपत्र द्यावयाचे होते. तसेच विक्रीपत्राचा येणारा खर्च अर्जदार यांना सोसावयाचा होता. तसेच गैरअर्जदार क्रं. 1 ने  तक्रारकर्त्‍याला 10,000/- रुपये शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 3000/-द्यावा असा आदेश पारित करण्‍यात आला होता.   
  3.      सदरच्‍या आदेशा विरुध्‍द मा. राज्‍य आयोग, नागपूर खंडपीठ येथे अपील दाखल केली होती. सदरच्‍या अपील मध्‍ये दि. 11.01.2016 रोजी आदेश पारित होऊन सदरची अपील अर्जदाराच्‍या उपस्थिती अभावी खारीज करण्‍यात आली.  
  4.   विरुध्‍द पक्ष यांनी मुळ तक्रारीतील आदेशाचे पालन न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने या मंचात दि. 16.12.2016 रोजी दरखास्‍त प्रकरण कलम 25 अंतर्गत दाखल केले.  उभय पक्षांच्‍या वकिलांचा युक्तिवाद ऐकला.गैरअर्जदार क्रं. 1 – स्‍वप्‍नील डेव्‍हल्‍पर्स अॅन्‍ड बिल्‍डर्स तर्फे त्‍यांचे प्रमोटर श्री. विलास गणेशराव आसरकर यांनी कां केले नाही याबद्दल कुठलेही समाधानकारक स्‍पष्‍टीकरण दिले नाही. त्‍याचप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 1 च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे अर्जदार क्रं. 1 ते 3 हे मृतकाचे कायदेशीर वारस असल्‍याबाबत सक्षम न्‍यायालयाचे वारसांन प्रमाणपत्र दाखल केले नसल्‍याने जिल्‍हा ग्राहक मंचास त्‍यांच्‍या नांवे विक्रीपत्र नोंदवून देण्‍याचे अधिकारक्षेत्र येत नाही. तसेच गैरअर्जदार क्रं. 1 ला अद्याप ही काही रक्‍कम व्‍याजासह नमूद अर्जदाराकडून घेणे बाकी आहे. परंतु मंचाने मुळ तक्रारीत निकाल पारित केलेला असून त्‍यामधील अर्जदारानां काही रक्‍कम देणे बाकी आहे असा उल्‍लेख अंतिम आदेशात नाही. त्‍यामुळे मंचाने पारित केलेल्‍या आदेशाचे तंतोतंत पालन करण्‍याची जबाबदारी सर्व गैरअर्जदारांवर आहे.
  5.      दरम्‍यानच्‍या काळात  मुळ अर्जदार विजय दामोधर केशट्टीवार यांचा दि.25.06.2016 रोजी मृत्‍यु झाल्‍याचे अर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी नमूद केलेले आहे. त्‍यापैकी अर्जदार क्रं. 1 श्री. आनंद विजय केशट्टीवार  हा मृतक श्री विजय यांचा मुलगा असून अर्जदार क्रं. 2 श्रीमती शोभा विजय केशट्टीवार ही मृतकाची पत्‍नी आणि अर्जदार क्रं. 3 सौ. अंजली सुनिल तम्‍मेवार ही मृतक विजय केशट्टीवार यांची विवाहीत मुलगी असून त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 अन्‍वये दरखास्‍त तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदारांनी असे नमूद केले की, मुळ अर्जदार मृतक विजय केशट्टीवार यांना करारातील सदनिका क्रं. बी-4, या सदनिकेचा ताबा दि. 09.05.2001 रोजी मिळालेला आहे. परंतु मुळ अर्जदार श्री. विजय यांनी गैरअर्जदारांना करारात ठरल्‍याप्रमाणे सदनिकेची किंमत रुपये 2,49,000/- एैवजी जास्‍तीची रक्‍कम म्‍हणजे एकूण रक्‍कम रुपये 2,64,000/- दिले असतांना सुध्‍दा सदनिकेचे विक्रीपत्र अद्याप नोंदवून मिळालेले नाही. अर्जदारांनी पुढे असे नमूद केले की, ते मुळ अर्जदार मृतक विजय केशट्टीवार यांचे कायदेशीर वारस असून या व्‍यतिरिक्‍त त्‍यांचे कोणीही कायदेशीर वारसदार नाही. सबब मृतक अर्जदार श्री विजय यांचे कायदेशीर वारसदार म्‍हणून अर्जदार क्रं. 1 ते 3 यांना मंचाच्‍या आदेशाचे अनुपालन गैरअर्जदार क्रं. 1 कडून करुन घेण्‍याचा कायदेशीर अधिकार आहे. सबब अर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी गैरअर्जदार क्रं. 1 कडून करारातील सदनिका क्रं. बी-4 चे विक्रीपत्र नोंदवून मिळावे व आदेशित रक्‍कमेची वसुली होण्‍याकरिता सदरचा दरखास्‍त अर्ज दाखल केलेला आहे.
  6.      सबब गैरअर्जदार क्रं. 1 – स्‍वप्‍नील डेव्‍हल्‍पर्स अॅन्‍ड बिल्‍डर्स यांचे प्रमोटर श्री. विलास गणेशराव आसरकर यांच्‍या मालकीची स्‍थावर चल/अचल मालमत्‍ते मधून जप्‍त करण्‍याकरिता जिल्‍हा दंडाधिकारी, नागपूर यांना वसुली प्रमाणपत्र  (Recovery Certificate) पाठविण्‍यात यावे.

             सबब  खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित .

अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराचा दरखास्‍त अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
  2. गैरअर्जदार क्रं. 1 विलास गणेशराव आसरकर यांच्‍या चल/अचल मालमत्‍ते मधून जमीन महसूलाच्‍या थकबाकी वसुली पध्‍दती प्रमाणे करुन ती रक्‍कम रुपये 13,000/- अर्जदार क्रं. 1 ते 3 यांना देण्‍याचे जिल्‍हा दंडाधिकारी नागपूर यांना आदेशित करण्‍यात येते.
  3. जिल्‍हा दंडाधिकारी नागपूर यांनी सदरच्‍या आदेशाप्रमाणे वसुली संबंधी योग्‍य ती कार्यवाही करुन त्‍याचा अहवाल या जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांच्‍याकडे पाठवावा.
  4. मुळ अर्जदार स्‍व. विजय दामोधर केशट्टीवार यांच्‍या मृत्‍यु नंतर त्‍यांचे असलेले कायदेशीर वारसदारां संबंधिचे वारसान प्रमाणपत्र अर्जदारांनी सक्षम न्‍यायालयाकडून प्राप्‍त करावे व अर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी हे वारसान प्रमाणपत्र या मंचासमक्ष दाखल केल्‍यानंतर नागपूर मंचाचे प्रबंधक, यांनी सुतिकागृह चौक, किल्‍ला गल्‍ली, महाल, नागपूर येथील घर क्रमांक 49 व 50, सिटी सर्व्‍हे न. 193/274, शीट नं. 68 (222) या वर्णनाच्‍या जमिनीवर बांधकाम केलेले न‍रसिंहा अपार्टमेंट मधील सदनिका क्रं. बी-4, एकूण क्षेत्रफळ 685.84 चौ.फु. या मालमत्‍तेचे विक्रीपत्र नोंद‍वून देण्‍याचा आदेश करण्‍यात येतो. सदरचे विक्रीपत्र नोंदविण्‍याचा खर्च अर्जदारांनी सोसावा.
  5. प्रबंधक, जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मंचाचे आदेशाप्रमाणे रक्‍कम रुपये 13,000/- च्‍या वसुलीकरिता जिल्‍हा दंडाधिकारी नागपूर यांच्‍याकडे विहित नमुन्‍यातील वसुलीचे प्रमाणपत्र पाठवावे. 
  6. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.