Maharashtra

Nagpur

CC/277/2022

SHRI. ACHAL ASHOK BORKAR - Complainant(s)

Versus

SWAMI SITARAM NAGARI SAHAKARI PAT SANSTHA MARYADIT, NAGPUR, THROUGH ITS PRESIDENT/ SECRETARY, ACCOUN - Opp.Party(s)

ADV. RUSHAK BAWISKAR

19 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/277/2022
( Date of Filing : 01 Apr 2022 )
 
1. SHRI. ACHAL ASHOK BORKAR
R/O. PLOT NO.101-H, MUNJE LAOUT, HILL TOP, AMBAZARI, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SWAMI SITARAM NAGARI SAHAKARI PAT SANSTHA MARYADIT, NAGPUR, THROUGH ITS PRESIDENT/ SECRETARY, ACCOUNTANT (CASHIER)
R/O. E-2, AJAY NAGAR, WARD NO.13, AMBAZARI HILL TOP, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
2. SMT. KALPANA WD/O. DILIP WAKE, PRESIDENT, SWAMI SITARAM NAGARI SAHAKARI PAT SANSTHA MARYADIT, NAGPUR, THROUGH ITS PRESIDENT/ SECRETARY, ACCOUNTANT (CASHIER)
R/O. E-2, AJAY NAGAR, WARD NO.13, AMBAZARI HILL TOP, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
3. SHRI. VILAS JAGOJI TAWADE, SECRETARY, SWAMI SITARAM NAGARI SAHAKARI PAT SANSTHA MARYADIT, NAGPUR, THROUGH ITS PRESIDENT/ SECRETARY, ACCOUNTANT (CASHIER)
R/O. E-2, AJAY NAGAR, WARD NO.13, AMBAZARI HILL TOP, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. RUSHAK BAWISKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 19 Apr 2023
Final Order / Judgement

     मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये  

  1. वि.प.क्रं.1-स्वामी सिताराम नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, नागपूर ही महाराष्‍ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत नोंदणी झालेली असुन वि.प.क्रं. 2 व 3 हे त्यांचे अध्‍यक्ष व सचिव आहेत. वि.प.क्रं.2- श्रीमती कल्पना दिलीप वाके (अध्‍यक्ष)  यांचे पती दिलीप गोविंदराव वाके हे सदर संस्थेमध्‍ये लेखाधिकारी या पदावर कार्यरत असतांना यांचा आक्टोबर -२०१९ मध्‍ये मृत्यु झाला. 
  2. दिनांक 16.10.2019 रोजी तक्रारदाराने वि.प.कडे 3.5 वर्षांकरिता म्हणजेच दिनांक 16.5.2023 पर्यत रुपये 8,00,000/- मुदत ठेव म्हणुन ठेवली होती तिचा प्रमाणपत्र क्रं.1901 असा आहे. त्यांनतर दिनांक 7.1.22019 रोजी तक्रारदाराने वि.प.कडे पुन्हा रुपये 4,00,000/-, दोन वर्षांकरिता म्हणजेच दिनांक 7.12.2021 पर्यत मुदत ठेव म्हणुन ठेवली होती तिचा प्रमाणपत्र क्रं.1920.  तक्रारदाराने वि.प.कडे बचत खाते होते त्यांचा क्रं.2573 असा होता. सदर बचत खात्यात 1,44,864/- इतकी रक्कम शिल्लक होती.
  3. ऑगस्ट –सप्टेंबर-2020 चे दरम्यान तक्रारकर्तीचे वडील अशोक शालीकराम बोरकर यांना करोना झाल्याने ते मेयो हॉस्पीटल येथे भरती असता त्यांचे उपचाराकरिता भरमसाट  खर्च झाला. त्यामुळे तक्रारकर्तीने वि.प.क्रं. 1,2,3 यांचे कडे दिनांक 11.6.2021 रोजी जमा रक्कम मिळण्‍याकरिता अर्ज सादर केला असता वि.प.ने तक्रारकर्तीला दिनांक 21.6.2021 रोजी रक्कम  रुपये 1,00,000/- देण्‍याचे आश्‍वासित केले होते. परंतु वि.प.आजतागायत तक्रारकर्तीला रक्कम परत केली नाही.  त्यामूळे तक्रारकर्तीने तिची सोन्याची साखळी दिनांक 24.3.2021 रोजी मुंजे यांचे गहाण ठेवुन रुपये 60,000/- रक्कम प्राप्त केली होती. त्यानंतर तक्रारकर्तीला परंतु पैशाची गरज असल्याने दुसरी सोन्याची साखळी श्री नटवर जयस्वाल यांचेकडे दिनांक 23.7.2021 रोजी गहाण ठेवुन रुपये 32,000/- प्राप्त केले. पूढे तक्रारकर्तीने परत दिनांक 11.3.2021 रोजी जयस्वाल यांचेकडे उर्वरित सोन गहाण ठेवुन रुपये 42,000/- प्राप्त केले.
  4. त्यांनतर तक्रारकर्तीने वि.प.ला रक्कम मिळण्‍याकरिता वारंवार विनंती केली परंतु वि.प.ने आजतागायता रक्कम परत केली नाही म्हणुन तक्रारकर्तीने तिचा प्रतीनीधी दिनांक 9.7.2021 रोजी वि.प.कडे पाठविला. परंतु वि.प.ने त्यांची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारकर्तीने वि.प.क्रं.1 ते 3 यांना दिनांक 23.7.2021 रोजी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठविली. वि.प.ला सदर नोटीस दिनांक 26.7.2021 रोजी प्राप्त होऊन त्यांची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन वि.प.क्रं. 1 ते 3 यांनी त्याची मुदत ठेव पोटी जमा असलेली रक्कम रुपये 12,00,000/- मुदत ठेव प्रमाणपत्रात नमुद व्याज दराने परत करावे. तसेच शारिरिक,मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी व तक्रारीचे खर्चाची मागणी केलेली आहे.
  5. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन वि.प.क्रं.1 ते 3 यांना नोटीस काढण्‍यात आली.  सदर नोटीस मिळूनही वि.प. क्रं.1 ते 3 तक्रारीत हजर झाले नाही म्हणून दिनांक 11.10.2022 रोजी तक्रार त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  6.  तक्रारदाराने तक्रारीत दाखल केलेले दस्तावेज, तसेच लेखी व तोंडी युक्तीवादाबाबत दाखल पुरसिसचे अवलोकन करता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

प्रश्न                                                          उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?      होय
  3. काय आदेश                                                               अंतिम आदेशानुसार

                      का र  मि मां सा

  1. तक्रारकर्तीचे  वि.प.संस्थेमध्‍ये बचत खाते होते त्यांचा क्रं.2573 असा होता. सदर बचत खात्यात रक्कम रुपये 1,44,864/- शिल्लक होती. तक्रारर्तीने वि.प.क्रं.1 यांचे संस्थेमध्‍ये दिनांक 16.10.2019 रोजी 3.5 वर्षांकरिता, दिनांक 16.5.2023 पर्यत रुपये 8,00,000/- मुदत ठेव म्हणुन ठेवली होती तिचा प्रमाणपत्र क्रं.1901 असा आहे. त्यांनतर तक्रारकर्तीने दिनांक 7.1.22019 रोजी वि.प.कडे पुन्हा रुपये 4,00,000/-, दोन वर्षांकरिता, दिनांक 7.12.2021 पर्यत मुदत ठेव म्हणुन ठेवली होती तिचा प्रमाणपत्र क्रं.1920 असा आहे. माहे ऑगस्ट–सप्टेंबर-2020 चे दरम्यान तक्रारकर्तीचे वडील अशोक शालीकराम बोरकर यांना करोना झाल्याने ते मेयो हॉस्पीटल येथे भरती झाल्याने त्यांचे उपचाराकरिता पैशाची आवश्‍यकता असल्यामुळे तक्रारकर्तीने वि.प.क्रं. 1,2,3 यांचे कडे दिनांक 11.6.2021 रोजी जमा मुदत ठेव रक्कम मिळण्‍याकरिता अर्ज सादर केला असता वि.प.ने तक्रारकर्तीला दिनांक 21.6.2021 रोजी रक्कम  रुपये 1,00,000/- देण्‍याचे आश्‍वासित केले होते. परंतु वि.प.आजतागायत तक्रारकर्तीला रक्कम परत केली नाही. 
  2. त्यामूळे तक्रारकर्तीला वारंवार तिचे सोने गहाण ठेवुन वडीलांचे उपचाराकरिता रक्कमेची जमवाजमव करावी लागली.  तरीसुध्‍दा वि.प.ने तक्रारकर्तीला रक्कमेची अत्यंत गरज असुन सुध्‍दा वि.प.ने मुदत ठेव रक्कम परत केली नाही ही वि.प.ची सेवेतील त्रुटी आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे  पारित करण्‍यात येतो.

आदेश

  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. क्रं.1 ते 3, यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीची मुदत ठेवी पोटी जमा केलेली रक्कम रुपये 8,00,000/-, दिनांक 16.10.2019 रोजी,3.5 वर्षांकरिता प्रमाणपत्र क्रं.1901, नुसार द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावतो परत करावी. 
  3. तसेच वि.प.क्रं. 1 ते 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीची मुदत ठेव रक्कम रुपये 4,00,000/-,प्रमाणपत्र क्रं.1920, दिनांक 7.12.2021 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावतो परत करावी. 
  4. तसेच वि.प.क्रं.1 ते 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की त्यांनी तक्रारकर्तीस मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 50,000/-अदा करावे.   
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
  6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.