तक्रार क्रमांक – 345/2009 तक्रार दाखल दिनांक – 14/05/2009 निकालपञ दिनांक – 20/02/2010 कालावधी - 0 वर्ष 09महिने 06 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. रमेश मोतीराम धार्मिक मुख्य वाणिज्य प्रबंधक कार्यालय मध्य रेल, 2रा माळा, बजट अनुभाग मुंबई 400 001. .. तक्रारदार विरूध्द स्वामी समर्थ एन्टरप्रायजेस प्रो. किसनराव सराफ वृशाली अपार्टमेंट, एस-14, व्हिलेज कुळगाव, बदलापुर-पुर्व, तालुका अंबरनाथ,मुंबई-बदलापुर-ट्रान्सपोर्टच्या मागे, कृष्णा अपार्टमेंट, कुळगाव(पुर्व) बदलापुर. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क स्वतः वि.प एकतर्फा एकतर्फा आदेश (पारित दिः 20/02/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्रीयुक्त रमेश मोतीराम धार्मिक यांनी स्वामी समर्थ एन्टरप्रायजेश यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकाराकडे लोन काढुन रु.5,000/- बुकींग देऊन सदनिका क्र.002, 650 चौफुट रु.4,55,000/- किंमत ठरवुन विकत घेण्यासाठी एकंदर रु.65,000/- रोख भरले त्या रकमेच्या पावत्या विरुध्द पक्षकार यांनी दि.15/03/2004 व दि.24/03/2004 रोजी तक्रारदार यांना दिलेल्या दिसतात. तक्रारदाराने सदर तक्रार पुर्ण विश्लेषन करुन दाखल केलेली नसल्यामुळे सदर ठिकाणाच्या जागेचा बोध होत नाही. करारनामा व रु.4,580/- भरुन नोंदणीकृत केलेली पावती दाखल आहे. उभय पक्षात ठरल्याप्रमाणे रु.4,55,000/-किंमत विरुध्द पक्षकार यांना लोन द्वारे किंवा प्रत्येक्षात फेड केली असल्यास सदर सदनिकेचा ताबा विरुध्द पक्षकाराने तक्रारदार यास वेळेवर न देण्याचा निष्काळजीपणा दाखविलेला आहे. 2. मंचाने नोटिस बजावुनही विरुध्द पक्षकार हजर राहिले नाहीत व त्याची लेखी कैफीयत त्यांनी दाखल केली नाही म्हणुन मंचाने दि.18/11/2009 रोजी विरुध्द पक्षकार विरुध्द नो डब्ल्यु एस आदेश केला व एकतर्फा चौकशी करुन हे मंच पुढील प्रमाणे एकतर्फा अंतीम आदेश देत आहे. .. 2 .. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 345/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) तक्रारदार यांस द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांचे कडुन सदनिकेची ठरलेली रक्कम रु.4,55,000/- लोन द्वारे किंवा रोख पोच झाली असल्यास किंवा झाल्यावर सदर सदनिकेचा ताबा तक्रारदार यास या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्यांच्या आत द्यावा. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु. 15,000/-(रु. पंधरा हजार फक्त) द्यावे. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 20/02/2010 ठिकान - ठाणे
(सौ.भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट ) प्र.अध्यक्षा सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|