Maharashtra

Bhandara

CC/12/104

Ku. Srushti Rajkumarji Jain - Complainant(s)

Versus

Suzuki Motor Cycle India Pvt. Ltd. - Opp.Party(s)

13 Jun 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/12/104
 
1. Ku. Srushti Rajkumarji Jain
R/o. Shiv Nagar, Tumsar, Dist. Bhandara
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. Geeta R Badwaik Member
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

विदयमान जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच

यांचे न्‍यायालयासमोर

अखिल सभागृहाजवळ, गणेशपूर रोड, भंडारा

 

तक्रार क्र. CC/12/104                          दाखल दि. 30.11.2012     

                                                                                          आदेश दि. 13.06.2014

 

                                                

 

तक्रारकर्ती         :-           कु.सृष्‍टी राजकुमारजी जैन

                              वय 22 वर्षे, धंदा—शिक्षण

            रा.शिवनगर तुमसर

                              ता.तुमसर जि.भंडारा

             

                                        

        

-: विरुद्ध :-

 

 

 

विरुद्ध पक्ष         :-        1. सुझूकी मोटरसाईकल इंडिया प्रा.लि.

      ग्राम खेरकी धवला, बादशाहपुर,

      एनएच-8 लिंक रोड,गुडगांव – 122004(हरियाणा) 

                                                                                                

   2. मे.नांगीया ऑटोमोटीव्‍ह प्रा.लि.

      (प्राधिकृत विक्रेता सुझूकी मोटरसाईकल इंडिया)

      नांगीया सुझूकी,शॉप नं.4 आणि 5, 

,                              यशवंत स्‍टेडियम, धंतोली नागपुर-440012

 

   3. श्री मनिष लांजेवार,प्रोप्रा.श्रीजी मोटर्स,तुमसर

      सामान्‍य रुग्‍णालय,भंडारा

      (प्राधिकृत विक्रेता सुझूकी मोटरसाईकल इंडिया)

      श्रीजी मोटर्स,श्रीराम नगर,भंडारा रोड,

         तुमसर ता.तुमसर जि.भंडारा

                                                                                                                                                       

                          

                               

गणपूर्ती           :-           मा. अध्‍यक्ष श्री अतुल दि. आळशी

                              मा. सदस्‍या श्रीमती गीता रा. बडवाईक

                                                            मा. सदस्‍य श्री हेमंतकुमार पटेरिया

 

उपस्थिती          :-           तक्रारकर्त्‍यातर्फे अॅड.मोटवानी  

                              वि.प.1 एकतर्फी

वि.प.2 तर्फे अॅड.नेरकर

वि.प.3 तर्फे अॅड.काटेखाये

                              .

                            

(आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष श्री अतुल दि. आळशी )

 

-//    दे    //-

(पारित दिनांक 13 जुन 2014)

 

 

 

       तक्रारकर्ती ही तुमसर जि.भंडारा येथील रहिवासी असून तिने महाविदयालयात जाणे-येणे करण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचे कडून सुझुकी कंपनीचे 2 चाकी वाहन Access 125 विकत घेतले. त्‍याचा R.T.O. No. MH-36M-7945 असा आहे. सदरहू वाहन Average  कमी देत असल्‍यामुळे तक्रारकर्तीने गाडी बदलून देण्‍याची विनंती विरुध्‍द पक्षाने मान्‍य न केल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार 4,00,000/-(चार लाख) रुपये नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी व 5,000/-(पाच हजार) रुपये खर्च मिळण्‍यासाठी तक्रार दाखल केली आहे.

 

   तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे

 

      तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून 52,800/- रुपये देवून Access125 ही गाडी विकत घेतली. विरुध्‍द क्र.1 हे गाडीचे उत्‍पादक असून विरुध्‍द पक्ष क्र.2 हे अधिकृत विक्रेते असून विरुध्‍द पक्ष क्र.3 हे Sub-dealer आहेत. तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे तक्रारकर्तीस गाडी विकत घेतांना विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी सदरहू गाडी 50 ते 55 किमी प्रतिलिटर Average देईल अशी घोषणा केली होती परंतु तक्रारकर्तीच्‍या गाडीचा Average हा फक्‍त 25 किमी प्रतिलिटर येत होता. तक्रारकर्तीने दिनांक 14/5/2011 ला 755 किमी गाडी चालविण्‍यानतर विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांच्‍या गॅरेजमध्‍ये प्रथम सर्व्हिसींग केली व तरी सुध्‍दा तक्रारकर्तीच्‍या गाडीच्‍या Averge वाढला नसल्‍यामुळे दुस-या दिवशी तक्रारकर्तीने सदरहू बाब विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांच्‍या नजरेस आणून दिली. तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये Starting trouble सुध्‍दा होता.

 

      त्‍यानंतर तक्रारकर्तीच्‍या वडिलांनी सदरहू गाडी नागपुर येथे विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍या सर्व्हिसींग सेन्‍टर मध्‍ये Average वाढण्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांच्‍या सांगण्‍यानुसार नेली असता तीथे 6-7 वेळा सर्व्हिसींग करुन सुध्‍दा गाडीचा Average मध्‍ये कुठलीही वाढ झाली नाही व सदरहू गाडीमध्‍ये उत्‍पादन दोष आहे असे विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी कबुल केल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तक्रारकर्तीने सदरहू गाडीमध्‍ये Manufacturing Fault असल्‍यामुळे ती बदलून देण्‍याची विनती विरुध्‍द पक्षांना केली परतु त्‍यांनी मागणी मान्‍य न केल्‍यामुळे व सतत दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक मनस्‍ताप सहन करावा लागला. करीता तक्रारकर्तीला सदरहू तक्रार दाखल करण्‍याचे कारण दिनांक 4/4/2011 पासून उद्भवल्‍यानंतर व दिनांक 28/8/2012 ला वकिलामार्फत नोटीस पाठविल्‍यानंतर दोन वर्षाच्‍या आंत सदरहू तक्रार 4,00,000/- (चार लाख) नुकसान भरपाई व 5,000/-(पाच हजार) तक्रारीचा खर्च देवून मान्‍य करावी अशा प्रार्थनेसह न्‍यायमंचात दिनाक 19/1122012 ला दाखल केली.

 

     तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षास दिनांक 30/11/2012 ला नोटीस पाठविण्‍यात आली.

 

     विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी नोटीस मिळून सुध्‍दा ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फी प्रकरण चालविण्‍याचा आदेश दिनांक 1/4/2013 ला पारीत करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष 2 यांनी जबाब दिनांक 24/1/2013 ला दाखल केल्‍यावर त्‍यांनी जबाबात असे म्‍हटले आहे की तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार नाकबूल असून खोटया स्‍वरुपात दाखल केलेली तक्रार आहे. विरुध्‍द पक्ष 2 यांनी पुढे असे म्‍हटले आहे की  तक्रारकर्तीचे वडील हे सर्वप्रथम 2011 मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍याकडे वाहन Average  कमी देत आहे व Starting trouble  आहे या कारणासाठी आले. विरुध्‍द पक्ष क्र. यांचे कर्मचारी बी.के.मेहर यांनी तक्रारकर्तीच्‍या वाहनाची योग्‍य दुरुस्‍ती करुन तक्रारकर्तीस दिले. तक्रारकर्तीने वाहन ताब्‍यात घेवून जॉबकार्ड वर Satisfied म्‍हणून सही केली. विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचे कर्मचारी बी.के.मेहर यांनी दिनांक 22/7/2011 ला लेखी पत्र तक्रारकर्तीला पाठवून तक्रारकर्तीचे वाहन पुर्णतः दुरुस्‍त झाले आहे व ते घेवून जाण्‍यासाठी पत्र सुध्‍दा पाठविले. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे की तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला ज्‍यावेळेस गाडी Servicing आणली होती त्‍यावेळेस Satisfication Voucher  सुध्‍दा लिहून दिले. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये कुठलाही दोष राहिलेला नाही. दिनांक 23/9/2011 ला तक्रारकर्तीने पुन्‍हा वाहन Paid Servicing साठी 23/9/2011 ला विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍याकडे आणले व त्‍यावेळेस सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी Regular And General Servicing करुन तक्रारकर्तीस तिचे वाहन दुरुस्‍त करुन दिले व त्‍याचे Satisfication Voucher  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षास सही करुन दिले. विरुध्‍द पक्षाचे असे म्‍हणणे आहे की तक्रारकर्तीने दोन वेळा सर्व्हिसींग विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे केली होती व त्‍यानंतर इतर सर्व्हिसींग त्‍यांनी अधिकृत सर्व्हिसींग सेन्‍टर मधून न करीता बाहेरील सर्व्हिस स्‍टेशन येथे वेळोवेळी करण्‍यात आलेली होती. तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये कुठलाही Manufcturing Fault नव्‍हता. त्‍याबद्दलचा Expert Evidence सुध्‍दा तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात दाखल केला नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार खोटया स्‍वरुपाची असून ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी असा जबाब दाखल केला.

 

       विरुध्‍द पक्ष 3 यांनी जबाब दिनांक 10/11/2013 ला दाखल केला. विरुध्‍द पक्ष 3 यांनी आपले जबाबात असे म्‍हटले की तक्रारकर्तीने वाहनाची सर्व्हिसींग ही 450 ते 500 किमी झाल्‍यानंतर किंवा 1 महिन्‍याच्‍या आंत विकत घेतल्‍याच्‍या तारखेपासून करणे जरुरी असते परंतु तिने सदरहू सर्व्हिसींग गाडी 750 किमी चालविण्‍यानंतर प्रथम सर्व्हिसींग केली व तक्रारकर्ती बाहेरगावी गेलेली असल्‍यामुळे सदर सर्व्हिसींग उशीरा केली असल्‍याचे कबुल केले आहे असे जबाबात म्‍हटले आहे. तक्रारकर्तीने गाडीच्‍या दुरुस्‍तीचे काम व सर्व्हिसीग ही अधिकृत सर्व्हिसीग स्‍टेशन येथे न करता बाहेरील सर्व्हिसींग स्‍टेशन येथे केली असल्‍याने तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये किरकोळ दोष निर्माण होत होता परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍याकडे सर्व्हिसींग साठी गाडी नेली असता ती प्रत्‍येक वेळेस दुरुस्‍त करुन देण्‍यात आली व त्‍याबद्दल जॉबकार्ड व Satisfaction Voucher  सुध्‍दा तक्रारकर्तीने दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी सेवेमध्‍ये कुठलीही कमतरता किंवा त्रृटी केलेली नाही. तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये Manufacturing Fault नव्‍हता. त्‍यामुळे गाडी बदलून दयावी हे म्‍हणणे उचित नाही असे जबाबात म्‍हटले आहे. तक्रारकर्तीची तक्रार वेळोवेळी दुर करण्‍यात आली. परंतु तक्रारकर्तीने खोटी तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षास विनाकारण त्रास दिला. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे जबाबात म्‍हटले आहे.

 

       तक्रारकर्तीने तक्रारीसोबत गाडीचे बील पान नं. 14 वर दाखल केले आहे. गाडीचा इन्‍शुरन्‍स पान नं.15 वर, R.T.O. चे रजिस्‍ट्रेशन पान नं. 16 वर, तक्रारकर्तीने दिनांक 17/7/2011 ला केलेल्‍या तक्रारीची प्रत पान नं. 18 वर,  तक्रारकर्तीने वकीलामार्फत पाठविलेली नोटीस पान नं. 21 वर, विरुध्‍द पक्षांना पाठविलेल्‍या नोटीसचे उत्‍तर पान नं. 32 वर दाखल केले आहे.

 

       विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे काम करणारे मेकॅनिक आशीष बरैया यांचे प्रतिज्ञापत्र पान नं. 50 वर दाखल केले आहे. तसेच जॉबकार्ड पान न. 55 व 56 वर दाखल केले आहे.

 

       विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी जॉबकार्ड दिनांक 20/6/2011  पान नं 67 वर, तसेच तक्रारकर्तीला पाठविलेले दिनांक 22/6/2011 चे पत्र पान न. 69 वर दाखल केले आहे व तक्रारकर्तीच्‍या वडिलांनी दिलेले दिनांक 29/7/2011 चे Satisfaction Voucher  पान नं. 70 वर तसेच दिनांक 23/9/2011 चे जॉबकार्ड  पान नं. 71 वर दाखल केले आहे.

 

       तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी दिनांक 9/4/2013 ला तक्रारकर्तीच्‍या गाडीची Expert कडून तपासणी करण्‍यात यावी असा अर्ज Consumer Protection Act 13 (1)(c) नुसार दाखल केला. सदरहू अर्जावर विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍या वकिलांनी आक्षेप घेतला व सद्यस्थितीला Expert Opinion ची आवश्‍यकता नाही. संपुर्ण कागदपत्रे तक्रारीमध्‍ये असल्‍यामुळे तक्रारकर्तीचा अर्ज फेटाळण्‍यात यावा असे म्‍हणणे सादर केले.

 

       तक्रारकर्तीचे वकिल वारंवार सुचना देवून सुध्‍दा सतत गैरहजर राहिले तसेच त्‍यांनी प्रतिज्ञेवर पुरावा/लेखी जबाब दाखल केला नाही व तोंडी युक्‍तीवादाच्‍या वेळी सुध्‍दा गैरहजर राहिले. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍या वकिलांनी असा युक्‍तीवाद केला की तक्रारकर्तीने खोटी तक्रार दाखल केली आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी Average 50 ते 55 किमी प्रतिलिटर Average हे Standard Condition मध्‍ये आहे,असे म्‍हटले आहे. तसेच तक्रारकर्तीने दोन वेळा त्‍यांच्‍याकडे गाडी नेला असता ती दुरुस्‍त करुन देवून त्‍यांनी दिनांक 14/5/2011 व दिनांक 4/6/2011 ला जे दस्‍त क्र.1 जॉबकार्ड विरुध्‍द पक्ष 2 यांनी दाखल केले आहे त्‍यानुसार 50 किमी प्रतिलिटर Average काढुन दिले. त‍क्रारकर्तीच्‍या वकिलांनी असे म्‍हटले आहे की तक्रारकर्तीच्‍या गाडीबद्दल वाद न राहिल्‍यामुळे त्‍यांनी Satification Voucher दिनांक 20/7/2011 ला सही करुन विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना दिले. तक्रारकर्तीच्‍या गाडीला पुन्‍हा सर्व्हिसींग दिनांक 23/9/2014 ला विरुध्‍द पक्ष 2 यांनी करुन देवून तक्रारकर्तीने कुठलाही दोष न राहिल्‍यामुळे Satisfied म्‍हणून सही सुध्‍दा केली. तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये Expert Evidence हा Manufacturing Defect बद्दल दाखल न केल्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये Manufacturing Defect आहे हे सिध्‍द् होत नाही. तक्रारकर्तीच्‍या गाडीची सर्व्हिसींग वेळोवेळी बाहेरील अनधिकृत सर्व्हिसींग स्‍टेशन मध्‍ये केल्‍यामुळे त्‍यास विरुध्‍द पक्ष कुठल्‍याही प्रकारे जबाबदार नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार खोटया स्‍वरुपाची असल्‍यामुळे ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी असा युक्‍तीवाद केला.

 

      विरुध्‍द पक्ष क्र.3 यांच्‍या वकिलांनी लेखी युक्‍तीवाद मंचात दाखल केला नाही.

 

      तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच विरुध्‍द पक्ष 2 चे वकील यांचा युक्‍तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.

1. तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये Manufacturing Defect आहे का? – नाही

2. तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे का? – नाही

 

      तक्रारकर्तीने गाडी विकत घेतल्‍यापासून जवळपास 750 किमी चालविल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे First Servicing साठी नेली व ती 500 किमी पर्यंतच प्रथम Servicing ला आणावयास पाहिजे होती. तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये कबुल केले आहे की तक्रारकर्तीला गाडी सर्व्हिसींग करीता ती बाहेरगावी गेली असल्‍यामुळे तसेच कॉलेज मध्‍ये जाणे असल्‍यामुळे वेळ मिळाला नाही तसेच केस मधील कागदपत्रांच्‍या आधारे सुध्‍दा सदरहू मुद्द सिध्‍द होतो. तक्रारकर्तीने असे कबुल केले आहे की विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे दोन वेळा सर्व्हिसींग करण्‍यात आली होती तसेच काही वेळा बाहेरील सर्व्हिसींग स्‍टेशन मध्‍ये सर्व्हिसींग करण्‍यात आली होती. विरुध्‍द पक्ष 1 यांनी दाखल केलेले जॉबकार्ड दिनांक 20/7/2011 व 29/7/2011, 23/9/2011 यामध्‍ये असे म्‍हटले आहे की तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्ष 2 यांनी 100 मिली पेट्रोल घेवून Average काढून दिला तसेच तो 52 किमी प्रतिलिटर असा निघाला. तक्रारकर्तीने दोन्‍ही जॉबकार्ड वर Satisfied म्‍हणुन सहया केल्‍या आहेत. तक्रारकर्तीने Satisfaction Voucher, दिनांक 20/7/2011 चे जॉबकार्ड व Satisfaction Voucher वर सुध्‍दा सुध्‍दा सही केली आहे. तक्रारकर्तीच्‍या वडिलांनी स्‍वतःचे हस्‍ताक्षरात गाडीची Test Drive घेतली व Average Satisfied म्‍हणून लिहीले आहे. तक्रारकर्तीने दिनांक 23/9/2011 चे Satisfaction Voucher वर Average व Starting trouble इत्‍यादी समस्‍या संपुष्‍टात आल्‍याबद्दल सुध्‍दा हिंदी भाषेत लिहीले आहे व सही केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या गाडीमध्‍ये कुठल्‍याही प्रकारे दोष राहिला नाही व सततचा दोष हा न दुर होणारा दोष नसल्‍यामुळे तो Manufacturing Defect या व्‍याख्‍येमध्‍ये येत नाही.

       विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे योग्‍यप्रकारे निराकरण केले. विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे तक्रारकर्तीने वेळोवेळी गाडी नेली असता त्‍यावेळीच निराकरण करुन दिलेले आहे.

 

       विरुध्‍द पक्ष 1 यांनी 50 ते 55 प्रतिलिटर Average  हा Standard Condition मध्‍ये आहे असे नमुद केल्‍यामुळे ते सदरहू प्रकरणामध्‍ये 50 ते 55 प्रतिलिटर पेक्षा कमी दिलेल्‍या Average च्‍या दाव्‍यासाठी विरुध्‍द पक्ष जबाबदार नाहीत. गाडीचे उत्‍पादन करतांना Central Government यांनी अधिकृत केलेले Laboratory यांच्‍या मार्फत गाडयांची चाचणी होवून ती गाडी विक्री साठी बाजारात नेल्‍या जाते.  Central Government शी संबंधित संस्‍था प्रत्‍येक उत्‍पादकाकडे जावून Random Sampling द्वारे Test करुन आपला अहवाल Central Government कडे देते. त्‍यामुळे उत्‍पादक हे उत्‍पादन केल्‍यानंतर वेळोवेळी वेगवेगळया स्‍तरावर वाहनाचे Testing केल्‍यानंतरच गाडी डिलर कडे विक्री साठी पाठवितात. जर एखादया गाडीमध्‍ये त्‍यानंतरही दोष आढळल्‍यास ती गाडी वितकरकातर्फे पाठवून उत्‍पादकाकडून वेळोवेळी Test करुन Manufacturing Defect आहे का हे तपासण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. अशी पध्‍दत उत्‍पादकाकडून अवलंबिली जाते, असे Central Government यांनी Prescribed केले आहे  व असे बंधन उत्‍पादकावर लावण्‍यात आलेले आहे.

 

      सदरहू तक्रारकर्तीच्‍या गाडीमधला दोष हा विरुध्‍द पक्ष यांनी वेळोवेळी काढून दिल्‍यामुळे तो Manufacturing Defect  होवू शकत नाही. Manufacturing Defect  साठी दोष हा Continuous and not removable असला पाहिजे. Manufacturing Defect  साठी Expert Opinion असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. सदरहू केसमध्‍ये Manufacturing Defect  असल्‍याबद्दल Expert opinion नाही तसेच तक्रारकर्तीच्‍या गाडीमधील दोष हा किरकोळ स्‍वरुपाचा व Removable असल्‍यामुळे तो Manufacturing Defect  होत नाही.

 

       गाडीचा Average हा गाडी चालविण्‍याची पध्‍दत तसेच रस्‍त्‍याची स्थिती (Quality),(quality), Petrol ची quality and quantity तसेच Petrol भरण्‍याची सकाळची किंवा रात्रीची वेळ तसेच रस्‍त्‍यावरील रहदारी व वेळोवेळी विनाकरण वापरण्‍यात येणारे ब्रेक यावर अवलंबून असतो. त्‍यामुळे प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या चालविण्‍याच्‍या पध्‍दतीवर त्‍या गाडीचे Average अवलंबून असते.

 

       विरुध्‍द पक्ष 2 यांनी दोन वेळा तक्रारकर्तीस Average काढून दिल्‍यामुळे व तो Average  प्रतिलिटर 50 किमी पेक्षा जास्‍त आल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष सकृतदर्शनी सदरहू प्रकरणात सेवेमधील त्रृटीसाठी जबाबदार नाहीत, असे दिसते. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र नाही असे मंचाचे मत आहे.

 

       तक्रारकर्तीने दाखल केलेला दिनांक 9/4/2013 चा गाडी Expert व्‍यक्‍तीकडून तपासण्‍यात यावी याबद्दलचा अर्ज याचा विचार करता सदरहू प्रकरणामध्‍ये दाखल केलेले जॉबकार्ड व इतर पुरावे, सदरहू तक्रारीवर निर्णय घेण्‍यासाठी सक्षम असल्‍यामुळे व अर्ज उशीराने दाखल केलेला असल्‍यामुळे तक्रारकर्तीचा दिनांक 9/4/2013 च्‍ाा गाडी Expert व्‍यक्‍तीकडून तपासण्‍याचा अर्ज खारीज करण्‍यात येतो.

 

      विरुध्‍द पक्षाने Orissa State Commission, CPJ  (4)  2006  पान नं 196

      Kartikeshwar Parida Vs. Sagar Motors  यामध्‍ये दाखल केलेला न्‍यायनिवाडा हा सुसंगत आहे. सदरहू न्‍यायनिवाडयात असे म्‍हटले आहे की, Defect caused by misused by bad handling vehicle, not manufacturing defect. Routine change of oil, gear oil, and gear adjustment without any major repair or change of part made during warranty period - no question of vehicle having manufacturing defects असे म्‍हटले आहे.

 

      विरुध्‍द पक्षाने दाखल केलेला  State Commission,Maharashtra  यांचे 2012 (6) ALL MR 28, Seva Automotive Ltd. Vs. Anil Chordiya या न्‍यायनिवाडयात असे म्‍हटले आहे की Certificate for manufacturing defect shall be issued by expert from automobile field similary the report of ARAI must be the evidence to attract manufacture defect.

 

            सदरहू प्रकरणात तक्रारकर्तीने Expert Service कुठल्‍याही मान्‍यताप्राप्‍त संस्‍था किंवा Laboratory कडून घेतली नसून तक्रारकर्तीच्‍या गाडीचा दोष हा Continuous  व not removable नसल्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करीता मुद्दा क्र.1 व मुद्दा क्र.2 यांचे उत्‍तर नाही असे दिलेले आहे. म्‍हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

करीता आदेश पारीत.

 

आदेश

 

1.तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

2.खर्चाबद्दल कुठलेही आदेश नाहीत.

 

 

 

                                                                                 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Geeta R Badwaik]
Member
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.