निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07.07.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 13.07.2010 तक्रार निकाल दिनांकः- 01.10.2010 कालावधी 2 महिने18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. कैलास पिता ज्ञानोबा चामले अर्जदार वय 32 वर्षे धंदा शेती रा.खडी, ( अड जी.एच.चव्हाण ) ता.पालम जि.परभणी. विरुध्द 1 सुवर्णा अर्बन को-आप बॅक लिमीटेड गैरअर्जदार परभणी तर्फे शाखाधिकारी ( स्वतः ) बसमत रोड, परभणी. 2 अवसायक ( एकतर्फा ) सुवर्णा नागरी सहकारी बॅक मर्यादीत, शिवाजी रोड, परभणी. ( अवसयनात ) ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) अर्जदाराच्या मुदत ठेवीची रक्कम त्या ठेवीची मुदत संपल्यावरही गैरअर्जदाराने अर्जदाराला ठेवीतील रक्कम दिली नाही व सेवा त्रूटी केली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार बॅकेकडे दिर्घमुदत ठेव पावती क्रमांक 0869 अन्वये दिनांक 24.04.2000 रोजी रुपये 10,000/- द.सा.द.शे 16.43 % व्याजाने जमा केली होती. पावतीनुसार दिनांक 24.04.2010 रोजी अर्जदाराचे रुपये 50036/- देय होतात अर्जदार दिनांक 24.04.2010 रोजी गैरअर्जदार बॅकेकडे गेला व मुदत ठेवीच्या रकमेची मागणी केली परंतू बॅकेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. दिनांक 20.05.2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लेखी अर्ज दिला परंतू गैरअर्जदाराने मुदत ठेवीची रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार दिला म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली व रुपये 50036/- हे द.सा.द.शे 18 % व्याजाने मिळावेत व मानसिक त्रास व शारीरीक त्रासापोटी रुपये 10000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 3000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदाराना दिलेल्या अर्जाची प्रत व मुदत ठेवीची पावतीची छायाप्रत इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदार हा ठेवीची रक्कम घेण्यासाठी त्याच्याकडे गेलाच नाही असे म्हटले आहे व अर्जदाराने मुळ पावतीसह ठरवून दिलेल्या नमुन्यात अर्ज केला तर नियमाप्रमाणे ठेवी परत देण्यात काही अडचण नाही असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 न्यायमंचाची नोटीस मिळूनही नेमल्या तारखेला हजर झाला नाही म्हणून त्याच्याविरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रे व अड घुगे यांच्या युक्तिवादानंतर तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार बॅकेने अर्जदाराला ठेवीची रक्कम व्याजासह परत करण्याबाबत त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने गैरअर्जदार सुवर्णा अर्बन को. ऑप बॅक लिमीटेड परभणी मध्ये दिनांक 24.04.2000 रोजी 10 वर्षासाठी रुपये 10,000/- द.सा.द.शे 16.43 % व्याजाने गुंतवले होते त्याचा पुरावा म्हणून ठेवीच्या पावतीची छायाप्रत प्रकरणात नि. 4/2 वर दाखल केली आहे. मुदत पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने रक्कमेची मागणी केली पण बॅकेने त्याना रक्कम दिली नाही हे अर्जात व नि. 2 च्या शपथपत्रात सांगितलेल असल्यामुळे ते खोटे मानता येणार नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या नि. 4/2 वरील मुदत ठेवीच्या पावतीची मुदत दिनांक 24.04.2010 रोजी संपल्यानंतर ती रक्कम गैरअर्जदारानी परत न करुन अर्जदाराला त्रूटीची सेवा दिलेली आहे तसेच तक्रारीमध्ये अर्जदाराने बॅक अवसायानात गेलेली आहे असे म्हटलेले आहे पण त्याबाबतचा कोणताही ठोस पुरावा तक्रार दाखल केलेला नाही तसेच अवसायकाविरुध्द कासयदेशीर कारवाई करता लागणारी कायदेशीर पूर्तता अर्जदाराने केलेली नाही. ( संदर्भ 2007 (2) सी.पी.जे. पान 175 राष्ट्रीय आयोग) त्यामुळे अर्जदाराला तक्रारीत अवसायकाला पार्टी करता येणार नाही. मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 सुवर्णा अर्बन को.ऑप बॅक लिमीटेड परभणी यानी अर्जदाराला त्याची मुदत ठेव पावती क्रमांक 0869 ची रक्कम रुपये 10000/- दिनांक 24.04.2000 पासून दिनांक 24.04.2010 पर्यंत द.सा.द.शे 16.43 % व्याजदराने व दिनांक 25.04.2010 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे 9 % व्याजदराने निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत परत दयावेत. 3 तसेच गैरअर्जदार सुवर्णा अर्बन को.ऑप बॅक लिमीटेड परभणी यानी अर्जदाराला मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 1500/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 500/- आदेश मुदतीत दयावेत. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |