// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 278/2014
दाखल दिनांक : 12/12/2014
निर्णय दिनांक : 07/03/2015
श्री. वामन मारोतराव देवघरे
वय 70 वर्षे व्यवसाय – सेवानिवृत्त
रा. पाटील किराणा यांचे घर श्री. कॉलणी,
जुना बायपास रोड, गजानन महाराज मंदिराजवळ,
दुस्तुर नगर, अमरावती
ता.जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- श्रीसुर्या इन्व्हेस्टमेंटस्
तर्फे प्रोप्रा. समीर जोशी (एच.यु.एफ)
पत्ता श्रीसुर्या इन्व्हेस्टमेंट प्लॉट नं. 90
विद्याविहार कॉलनी, प्रताप नगर, नागपुर – 440 025
- नितीन केसकर,
एजंट श्रीसुर्या इन्व्हेस्टमेंट
रा. एकविरा विद्युत कॉलनी, अकोली रोड,
साई नगर, अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. शेंडे
विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे : एकतर्फा आदेश
ग्राहक तक्रार क्रमांकः 278/2014
..2..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 07/03/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे अधिकृत एजंट आहे व ते अमरावती येथे काम करीत होते. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी मुदत ठेव घेवून त्यावर आकर्षक दराने व्याज देण्याची योजना अंमलात आणली, त्याबद्दलची माहिती लोकांना दिली होती व आकर्षीत केले होते. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदार यास या योजनेत सभासद करुन घेवून त्यांना वेगवेगळे आमीष दिले. तक्रारदाराने दि. ५.३.२०१३ रोजी रु. ५,००,०००/- 3 महिन्यासाठी, दि. २८.३.२०१२ रोजी रु. १,००,०००/- 24 महिन्यासाठी व दि. ३०.४.२०१२ रोजी रु. ५,००,०००/- 18 महिन्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे मुदत ठेवीत जमा केले होते. या रक्कमे पोटी त्यास मुदती अंती एकूण रु. १७,५०,०००/- देण्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कबुल केले होते. व त्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी वचन चिठ्ठी करुन दिली होती. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी मार्च 2013 पर्यंत या मुदत ठेवीच्या रक्कमेवर व्याज दिले परंतु त्यानंतर व्याज देणे बंद केले. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी
ग्राहक तक्रार क्रमांकः 278/2014
..3..
या रक्कमे पोटी दिलेला धनादेश बॅंकेत जमा केल्या नंतर ते अनादरीत झाले, त्यामुळे तक्रारदार हा त्याला मिळणा-या गुंतवणुक रक्कमेचा उपयोग करु शकला नाही. विरुध्दपक्षाने अशा त-हेने फसवेगिरी केली, त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले, यासाठी त्यांनी दि. १५.१.२०१४ रोजी विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली, परंतु त्यानंतरही विरुध्दपक्षाने योग्य ती कार्यवाही न केल्याने त्यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला.
3. विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द दि. ४.२.२०१५ रोजीच्या आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज खारीज करण्यात आला व विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द दि. ११.२.२०१५ च्या आदेशा प्रमाणे एकतर्फा चालविण्यात आला.
4. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. शेंडे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने तक्रार अर्जात ज्या बाबी नमूद केल्या त्या प्रित्यर्थ निशाणी 2 सोबत दस्त दाखल केले. मुदत ठेवी पोटी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दिलेली वचन चिठ्ठी दाखल करण्यात आली. त्यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदाराने नमूद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 कडे मुदत ठेवी ठेवल्या होत्या व त्याबद्दल या वचनचिठ्ठया विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी करुन दिल्या होत्या. तक्रारीतील मजकुर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी नाकारला नाही.
ग्राहक तक्रार क्रमांकः 278/2014
..4..
5. तक्रारदाराने निशाणी 9 ला पुरसीस दाखल करुन त्यात असे कथन केले की, त्यांनी दि. ५.३.२०१३ रोजी रु. ५,००,०००/- गुंतविलेली रक्कमेपैकी त्यास एकूण रु. ४,५०,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 कडून मिळाले परंतु दि. २८.३.२०१२ व ३०.४.२०१२ रोजी गुंतविलेल्या अनुक्रमे रु. १,००,०००/- व रु. ५,००,०००/- या रक्कमे पैकी कोणतीही रक्कम त्यास मिळालेली नाही. दि. २८.३.२०१२ च्या वचनचिठ्ठी नुसार त्यास रु. २५,०००/- व्याज मिळालेले आहे. पुरसीस मधील हा मजकुर विचारात घेता असे दिसते की, उर्वरित रक्कम ही मुदती अंती विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला दिलेली नाही, तसेच दि. १५.१.२०१४ ची नोटीस नंतरही विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्याची पुर्तता करुन तक्रारदारास त्यांनी मुदत ठेवीत जमा केलेली रक्कम व्याजासह परत केली नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 ही कृती सेवेतील त्रुटी ठरते. व त्यामुळे तक्रार अर्जात ज्याबाबी नमद केल्या त्या पृष्टयर्थ त्याने दस्त दाखल केले असल्याने हा तक्रार अर्ज मंजूर करावा लागतो. सबब खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदारांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष 2 विरुध्द अर्ज खारीज करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 278/2014
..5..
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदारास रु. १७,५०,०००/- पैकी रु. १२,००,०००/- (मुदत ठेव वचनचिठ्ठी प्रमाणे देण्यात येणारी रक्कम वजा करुन) तक्रारदारास द्यावे. तसेच दि. ५.३.२०१३ च्या रक्कमे पैकी राहिलेली रककम रु. ५०,०००/-, दि. २८.३.२०१२ ची रक्कम रु. १,००,०००/- व दि. ३०.४.२०१२ ची रु. ५,००,०००/- त्यावर अनुक्रमे दि. ५.६.२०१३, दि. २८.३.२०१४ व दि. ३०.३.२०१४ द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार यांना रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 1,000/- द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 07/03/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष