नि. 33
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 334/2010
--------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 12/07/2010
तक्रार दाखल तारीख : 14/07/2010
निकाल तारीख : 26/06/2013
-----------------------------------------------------------------
1. श्री शंकर ज्ञानोबा म्होपरे
2. श्री राहुल शंकर म्होपरे
3. इंदूबाई शंकर म्होपरे,
4. दिग्वीजय शंकर म्होपरे,
वरील सर्व नं.1 ते 4 करिता
श्री शंकर ज्ञानोबा म्होपरे,
सर्व रा.विटा ता.खानापूर जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. सुरेशबाबा देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
कडेगांव, शाखा विटा ता.खानापूर जि.सांगली
2. श्री चंद्रसेन आनंदराव देशमुख, चेअरमन
सुरेशबाबा देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
कडेगांव, शाखा विटा ता.खानापूर जि.सांगली
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली
3. श्री रविंद्र काशिनाथ पालकर, व्हाईस चेअरमन
सुरेशबाबा देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
कडेगांव, शाखा विटा ता.खानापूर जि.सांगली
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली
4. श्री सुनिल शंकर भस्मे, संचालक
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली
5. श्री श्रीकांत चंद्रकांत कराडकर, संचालक
मु.पो. पंकल अँटी केअर, ताटे हॉस्पीटलमागे,
कार्वे रोड, कराड जि. सातारा
6. श्री महंमदहनिफ मुबारक अत्तार, संचालक
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली
7. श्री सुभाष जुगराज भंडारी, संचालक
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली
8. श्री बबन आप्पा रासकर, संचालक
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली
9. श्री सुरेश महादेव नकाते, संचालक
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली
10. श्री राजेंद्र गोपीनाथ दिक्षीत, संचालक
मु.पो.कडेगांव ता.पलूस जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री व्ही.पी.रावळ
जाबदार क्र.1 ते 5 व 8 ते 10 : एकतर्फा
जाबदार क्र.6 व 7 : वगळले
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये मुदत ठेवीमध्ये रक्कमा गुंतविलेल्या होत्या, सदर ठेवींची मुदत संपूनही ठेवींच्या रकमा जाबदारांनी दिलेल्या नाहीत. सदरच्या रकमा मिळाव्यात यासाठी हा तक्रारअर्ज दाखल करण्यात आलेला आहे.
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये मुदत ठेव स्वरुपात खालीलप्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे -
अ.क्र. |
ठेवीदाराचे नाव |
ठेव-पावती क्र. |
रक्कम रु. |
मुदत ठेवीची तारीख |
परतीची तारीख |
ठेवीचा प्रकार
|
व्याज |
1 |
शंकर ज्ञानोबा म्होपरे |
1 |
22000 |
15/9/04 |
15/10/07 |
मा.व्याज प्रा.ठेव योजना |
10 टक्के |
2 |
शंकर ज्ञानोबा म्होपरे |
2 |
22000 |
15/9/04 |
15/10/07 |
मा.व्याज प्रा.ठेव योजना |
10 टक्के |
3 |
राहूल शंकर म्होपरे |
13 |
16000 |
4/10/05 |
4/7/09 |
दामदिडपट ठेव योजना |
11 टक्के |
4 |
इंदूबाई शंकर म्होपरे |
14 |
16000 |
4/10/05 |
4/7/09 |
दामदिडपट ठेव योजना |
11 टक्के |
5 |
शंकर ज्ञानोबा म्होपरे |
15 |
16000 |
4/10/05 |
4/7/09 |
दामदिडपट ठेव योजना |
11 टक्के |
6 |
दिग्वीजय शंकर म्होपरे |
16 |
16000 |
4/10/05 |
4/7/09 |
दामदिडपट ठेव योजना |
11 टक्के |
7 |
शंकर ज्ञानोबा म्होपरे |
003827 |
15000 |
10/6/03 |
10/12/08 |
दामदुप्पट ठेव योजना |
13 टक्के |
8 |
शंकर ज्ञानोबा म्होपरे |
012671 |
16000 |
30/4/04 |
30/5/07 |
मासिक व्याज |
11 टक्के |
9 |
राहुल शंकर म्होपरे |
012676 |
16000 |
30/4/04 |
1/7/10 |
मासिक प्राप्ती ठेव |
12 टक्के |
|
|
एकूण |
2,02,000 |
|
|
|
|
उपरोक्त ठेवींची रक्कम मुदत ठेव योजनेत गुंतविली होती. मुदत संपून देखील तक्रारदारांना रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदार यांनी आपल्या गुंतविलेल्या रकमा परत मिळणेसाठी मंचामध्ये धाव घेवून रक्कम प्राप्त करणेसाठी हा तक्रारअर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी वर नमूद केलेल्या ठेवींच्या रकमा ठेवींच्या मुदत संपल्यापासून होणा-या व्याजासह जाबदार यांचेकडून वसुल करुन मिळाव्यात, मानसिक त्रास व तक्रारअर्जाचे खर्चापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.15,000/- मिळावेत इ. मागण्या केलेल्या आहेत.
3. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराने अर्जासोबत स्वतःचे शपथपत्रासह नि.5 वर एकूण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. तक्रारदाराची तक्रार व त्यासोबतची कागदपत्रे या सर्वांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेला आहे.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय. |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय. |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
1. तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये मुदत ठेवपावतीद्वारे व पासबुकामध्ये रक्कम ठेवल्याचे नि.5/1 ते 5/10 वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक सेवादार हे नाते असल्याचे प्रत्यही दिसून येते.
2. जाबदार क्र. 1 ते 5 व 8 ते 10 यांनी तक्रारदारांची मुदत ठेव गुंतवणूकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही विहीत मुदतीनंतर रक्कम गुंतवणूकदारांना अदा केलेली नाही, ही सेवेतील त्रुटी आहे व तो सेवादोष दिसून येतो.
3. जाबदार क्र.6 व 7 यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले असून त्या संदर्भातील आदेश नि.क्र.25 वर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचेविरुध्द कोणताही आदेश पारीत करता येणार नाही.
4. जाबदार क्र.1 ते 5 व 8 ते 10 यांना नोटीस लागू होऊनसुध्दा तसेच जाहीर नोटीस देऊनही ते मंचासमोर हजर झालेले नाहीत. या कारणास्तव त्यांचेविरुध्द ‘एकतर्फा ’ आदेशपारीत करण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ तक्रारदाराने जाबदारविरुध्द मांडलेली तक्रार त्यांनी मान्य केल्यासारखीच आहे.
5. जाबदार पतसंस्था क्र.1 आणि त्यांचे संचालक मंडळ अर्थातच जाबदार क्र.2 ते 10 हे संस्थेच्या आर्थिक व्यवहारास पूर्णतः जबाबदार असून सहकारी संस्था ही सर्व भागधारकांची असली तरी संस्थेचा आर्थिक कारभार चालविणेसाठी संचालक मंडळाची निवड केली जाते. म्हणजेच पूर्णपणे आर्थिक जबाबदारींचे उत्तरदायित्व संचालक मंडळावर असते आणि म्हणून जाबदार क्र.2 ते 10 यांची आर्थिक गुंतवणूकीची परतफेड करणेची वैयक्तिक आणि संयुक्तपणे सर्वंकष जबाबदारी आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारअर्जातील मागणीप्रमाणे गुंतवणूक केलेली पूर्ण रक्कम सव्याज परत करणे तसेच मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.15,000/- हया मागण्या मान्य करण्यात येत असून त्याप्रमाणे खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. प्रस्तुतची तक्रार मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र.1 ते 10 (जाबदार क्र.6 व 7 वगळून)यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी गुंतविलेली रक्कम रु.2,02,000/- (खाते क्र.219, 220, 88, 89, 90, 91, 707, 211, 216)त्या त्या पावती/पासबुकवर दर्शविलेल्या व्याजदराप्रमाणे अदा करावी, तसेच एकूण व्याजासह झालेल्या त्या रक्कमेवर मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे. 8.5 टक्के व्याजदराने रक्कम तक्रारदारास अदा करावी.
4. जाबदार क्र.1 ते 10 (जाबदार क्र.6 व 7 वगळून)यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारदार यांना मानसिक, शारिरिक, आर्थिक नुकसानीपोटी रु.15,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 26/06/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष