Maharashtra

Sangli

CC/10/147

Baburao Bhausaheb Kore etc.4 - Complainant(s)

Versus

Sureshbaba Deshmukh Nag.Sah.Pat.Mar.Kadegaon through Chairman Shri.Chandrasen Anandrao Deshmukh etc. - Opp.Party(s)

23 Aug 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/147
 
1. Baburao Bhausaheb Kore etc.4
Sonar Galli, Vita, Tal.Khanapur, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Sureshbaba Deshmukh Nag.Sah.Pat.Mar.Kadegaon through Chairman Shri.Chandrasen Anandrao Deshmukh etc.10
Kadegaon, Tal.Kadegaon, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      नि. २७
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
                                                    
                                           मा.अध्‍यक्ष : श्री.अनिल य.गोडसे    
                              मा.सदस्‍या :  श्रीमती सुरेखा बिचकर 
                             
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१४७/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख   :  २६/३/२०१०
तक्रार दाखल तारीख  :  २९/३/२०१०
निकाल तारीख       २३/८/२०११
-------------------------------------------
 
१. श्री बाबूराव भाऊसाहेब कोरे, वय-६४, धंदा-व्‍यवसाय
२. सौ माणिकताई बाबुराव कोरे, वय-६०, धंदा-घरकाम
३. उत्‍तम बाबूराव कोरे, वय-३१, धंदा-व्‍यवसाय
४. जयश्री बाबूराव कोरे, वय-२८, धंदा-घरकाम
    सर्व रा.विटा (सोनार गल्‍ली),
    ता.खानापूर, जि.सांगली                                       ..... तक्रारदारú
  
  विरुध्‍द
 
१. सुरेशबाबा देशमुख नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.कडेगाव
    तर्फे चेअरमन श्री चंद्रसेन आनंदराव देशमुख,
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
२. श्री चंद्रसेन आनंदराव देशमुख,
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
३. श्री रविंद्र काशिनाथ पालकर
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
४. श्री सुनिल शंकर भस्‍मे,
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
५. श्री श्रीकांत चंद्रकांत कराडकर,
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
६. श्री म.हनिफ मुबारक आतार,
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
 
७. श्री सुभाष जुगराज भंडारी
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
८. श्री बबन आप्‍पा रास्‍कर
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
९. श्री सुरेश महादेव नकाते,
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
१०. श्री राजेंद्र गोपीनाथ दिक्षित,
    वय सज्ञान, धंदा व्‍यापार
    सर्व रा.मु.पो.कडेगाव, ता.कडेगाव जि.सांगली                 .....जाबदार
                              
                                  तक्रारदारú तर्फेò            : +ìb÷.दिलीप हिंगसे
  जाबदार क्र.१ ते १०       : एकतर्फा
 
नि का त्र
 
 
द्वारा- अध्‍यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेवी अन्‍वये गुंतविलेली रक्‍कम परत दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार सुरेशबाबा देशमुख नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रक्‍कम मुदतठेवी अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्‍याला रक्‍कम देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ नि.३ अन्‍वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण २० कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार क्र.१ ते १० यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्‍यात आला.
 
३.    तक्रारदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये खालीलप्रमाणे ठेवी गुंतविलेल्‍या आहेत. सदर ठेवपावत्‍यांच्‍या मंचाचे प्रबंधक यांचेकडून प्रमाणीत केलेल्‍या प्रती नि.२६ च्‍या यादीने दाखल केल्‍या आहेत. सदर ठेवपावत्‍यांचा तपशील पटकन लक्षात यावा म्‍हणून पुढीलप्रमाणे देण्‍यात येत आहे.
 

अ.क्र.
ठेवीदाराचे नाव
पावती नं.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
व्‍याजदर
ठेव परत मिळणेची तारीख
मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम
श्री बाबूराव भाऊसाहेब कोरे
१२३४
१००००
२४/०४/०७
१०.५
२५/०४/०८
११०५६
           -“-
३४१
१२०००
०७/०८/०६
११
७/२/१३
२४०००
                      -“-
२७१
१५०००
२०/०३/०६
११
२०/९/१२
३००००
                      -“-
३९०
५०००
२३/१०/०६
११
२३/४/१३
१००००
                      -“-
२५३
१५०००
१८/२/०६
११
१८/८/१२
३००००
माणिकताई बाबूराव कोरे
२६३
१३४००
२२/०२/०६
११
२२/०८/१२
२६८००
          -“-  
१२४५
१२५००
९/०६/०७
११
१०/०६/०८
१३८८३
          -“-  
१२३६
६५००
२७/०४/०७
११
२८/०४/०८
७२१९
          -“-  
११७७
५००
१४/०२/०७
९.५०
१/०४/०७
५०६
१०
          -“-  
१२४६
१२५००
९/०६/०७
११
१०/०६/०८
१३८८३
११
उत्‍तम बाबूराव कोरे
३४२
११०००
७/०८/०६
११
७/०२/१३
२२०००
१२
          -“-  
२७०
१५०००
२०/०३/०६
११
२०/०९/१२
३००००

 
 
तक्रारदार यांच्‍या काही ठेवपावत्‍यांची मुदत संपली आहे तर काही ठेवपावत्‍यांची मुदत अद्याप संपलेली नाही. तक्रारदार यांना त्‍यांनी मुदत ठेवीमध्‍ये गुंतविलेली रक्‍कम गरज पडल्‍यास मुद‍तीपूर्वी मागण्‍याचा निश्चित हक्‍क आहे. मुदतीपूर्वी रक्‍कम मागितल्‍यास किती टक्‍के व्‍याज द्यावयाचे याबाबत ठेवपावतीवर काही नमूद करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे सदरची रक्‍कम ठेवपावतीवरील नमूद व्‍याजदराप्रमाणे ठेव ठेवल्‍या तारखेपासून मंजूर करण्‍यात येत आहे. तक्रारदार बाबूराव भाऊसाहेब कोरे यांनी बचत खाते क्र.३०८ वरील दि.२४/३/२००८ पर्यंतची रक्‍कम रु.५१,०५३/- तसेच तक्रारदार जयश्री बाबूराव कोरे यांनी बचत खाते क्र.१०१ वरील दि.२४/३/२००८ पर्यंतची रक्‍कम रु.४०,०७९/- ची मागणी केली आहे. त्‍याबाबत बचत खात्‍याची प्रमाणीत प्रत याकामी हजर केलेली आहे. सदर बचत खात्‍यावर नेमके किती व्‍याज द्यावयाचे याबाबत कोणताही तपशील मंचासमोर आला नाही. त्‍यामुळे सदरची रक्‍कम वर नमूद दिनांकापासुन द.सा.द.शे. ७ टक्‍के व्‍याजाने मंजूर करण्‍यात येत आहे. 
 
      तक्रारदार यांनी इंदिराबाई आण्‍णा महाजन यांचे नावे असणा-या ठेवपावती क्र.८१९९ वरील रकमेची मागणी केली आहे व सदर इंदिराबाई महाजन मयत झाल्‍यामुळे आपणास रक्‍कम मिळावी अशी मागणी केली आहे. सदर इंदिराबाई महाजन मयत झाल्‍याचा दाखला नि.५/१७ वर दाखल आहे. सदर उता-यावरुन इंदिराबाई महाजन या दि.२२/०९/०७ रोजी मयत झाल्‍या आहेत. तसेच इंदिराबाई महाजन यांचे पश्‍चात माणिकताई बाबूराव कोरे यांची वारस म्‍हणून नोंद झाल्‍याचे तलाठी विटा यांचा दाखला नि.५/१८ वर दाखल करण्‍यात आला आहे. इंदिराबाई महाजन यांनी ठेवपावती क्र.८१९९ अन्‍वये दि.१७/४/२००४ रोजी रक्‍कम रु.१५,०००/- द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजाने गुंतविले आहेत. त्‍यामुळे सदरची रक्‍कम तक्रारदार क्र.२ यांना मंजूर करणेत येत आहे.
 
४.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  तक्रारदार यांनी त्‍यांचे युक्तिवादामध्‍ये सन्‍मा.मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा रिट पिटीशन क्र.११७/२०११ या निवाडयाचा उल्‍लेख केला आहे. तसेच इतर अन्‍य निवाडयांचाही उल्‍लेख केला आहे. परंतु सदरचे निवाडे याकामी दाखल केले नाहीत. तक्रारदार यांनी युक्तिवादामध्‍ये उल्‍लेख केलेल्‍या रिट पिटीशन क्र.११७/२०११ या निवाडयातील निष्‍कर्षाचे अवलोकन केले असता संचालकांना वैयक्तिक व संयुक्तिक केव्‍हा जबाबदार धरता येईल याबाबतचा ऊहापोह करणेत आला आहे. त्‍याअनुषंगाने संचालकांच्‍या विरुध्‍द कोणताही पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर आणलेला नाही. त्‍यामुळे सन्‍मा.उच्‍च न्‍यायालय यांनी वर दिलेल्‍या रिट पिटीशन क्र. ५२२३/२००९ मधील निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते १० यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो. 
 
५.    तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्‍कम मिळण्‍यासाठी या न्‍यायमंचात धाव घ्‍यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्‍यामुळे सदरची मागणी अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
दे
 
१. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.
 
२. जाबदार क्र.१ पतसंस्‍था यांनी तक्रारदार यांना वरील विवेचनामधील परिच्‍छेद ३ मधील
    तपशीलात नमूद केलेप्रमाणे ठेवपावत्‍यांची ठेव ठेवल्‍यापासूनची रक्‍कम त्‍यापुढे नमूद
    व्‍याजदराने अदा करण्‍यात यावी असा आदेश करण्‍यात येतो.
 
३. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार क्र.१ यांच्‍या बचत खात्‍यावरील रक्‍कम रु.रु.५१,०५३/- व सदर
    रकमेवर दि.२४/३/२००८ पासून द.सा.द.शे.७ टक्‍के दराने व्‍याजासह अदा करावी असा
    आदेश करण्‍यात येतो.
 
४. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार क्र.२ यांच्‍या बचत खात्‍यावरील रक्‍कम रु.रु.४०,०७९/- व सदर
    रकमेवर दि.२४/३/२००८ पासून द.सा.द.शे.७ टक्‍के दराने व्‍याजासह अदा करावी असा
    आदेश करण्‍यात येतो.
 
५. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार क्र.२ यांना इंदिराबाई महाजन यांची ठेवपावती क्र.८१९९ वरील     
    रक्‍कम रु.१५,०००/- दि.१७/४/२००४ पासून द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजाने अदा करावी
    असा आदेश करण्‍यात येतो.
 
६. जाबदार क्र.१ पतसंस्‍था यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे
    खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.३,०००/- अदा करावेत.
 
७. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.७/१०/२०११ पर्यंत न केल्‍यास
    तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु
    शकतील.
 
सांगली
दिनांकò: २३/०८/२०११    
                  (सुरेखा बिचकर)               (अनिल य.गोडसे÷)
                        सदस्‍या                                   अध्‍यक्ष           
                जिल्‍हा मंच, सांगली.                  जिल्‍हा मंच, सांगली.  
       
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.